शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक पहील्यांदाच फिरकलो या धाग्यावर.... मजा आली!
अजुन येवू दे!

>>चाकचक्य तर जन्मात आला नसता.......स्वरूपनी लिहीलाय
इथे नम्रपणे नमुद करतो की मलाही नव्हता माहित Wink

६ पसंती/ खुशी / ..नुसार
उर्दू ठिगळे जोडून --

?? राजी-मर्जी-तहत / तेहत ??
( ते/तहत = according to, in agreement, under the influence of)

to agree, give consent या अर्थी रझामंद सापडला. जबरदस्ती जोडून ७ अक्षरी केलाय.
?? राजी - ओ - रझामंद/दी ??
( -ओ- = and, conjunction of words)

६. राजीरजावंतीने
……………………………
सर्वांचा सुंदर खेळ.

मजा आली. धन्यवाद !
.............................................................
१. कच्चा ( 2) --- काचा
२. खरंच (3) -- साचार

३. तजेला (4) --- चाकचक्य
४. प्रतिभा (5) --- कविताशक्ती

५. मोजण्याचे साधन (6)---- शरायणीगज
६. पसंतीनुसार (7) ------ राजीरजावंतीने

मतीगुंग कोडे आहे खरे.... पण छान आहे. जुने मराठी कळतेय थोडेथोडे.

गज माहीत होता पण सुचला नाही
साचार साईबाबांच्या आरतीत आहे पण खरंच साठी नसता सुचला.
काचा -- काष्टा / वस्त्राचा घोळ खोचून घेणे या अर्थी माहीत होता फक्त.

धन्यवाद.
काचा >> प्राकृत मधून.

काचा -- काष्टा / वस्त्राचा घोळ खोचून घेणे या अर्थी माहीत होता फक्त......+१.

गज.. मोजण्याचे साधन माहीत होते.पण sharayani गज नव्हते माहीत.
असो.नवीन शब्द कळले.

हे पाहा खास ऐतिहासिक वाक्य !

देहाये काहि येत नाही मुतळ खडसर गायरान आहे जमिन बिघे २० विस गज शरायणी हे भोये तुह्मास श्री र्पण दिधळे

http://samagrarajwade.com/index.php/marathyanchya-itihasachi-sadhane-kha...

भारी होते.
कविताशक्ती शब्द फारफार आवडला. अगदी प्रेमात पडावे असा.

_/\_ .यातला एक कविताशक्ती शब्द सोडल्यास कुठलाही शब्द ऐकला वाचला नव्हता. ==> हो ना.

कुमार सर,
काठीण्यपातळी कमी करता येईल का..... Uhoh Light 1

प्रतिभेचा एक पैलू म्हणजे कविताशक्ती. कविताशक्ती म्हणजे प्रतिभा नव्हे. प्राणीजगताचा एक अंश म्हणजे हत्ती पण प्राणी शब्दाचा अर्थ हत्ती नव्हे.

हीरा
हे पाहा
कविताशक्ति

स्त्री. प्रतिभा; कव्यरचनेचें सामर्थ्य; स्फूर्ति. [सं.]
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%...

शब्दरत्नाकरही प्रतिभा च सांगतो.
............
सतीश, जरूर !

कोड्यांचा स्तर फारच हाय नेऊन ठेवलाय कुमार सर,अर्थातच कौतुक
पण त्यामुळे एखादं कोडं बनवताना अगदी बालिश वाटायला लागतं

पण त्यामुळे एखादं कोडं बनवताना अगदी बालिश वाटायला लागतं
नवीन Submitted by तेजो >>>>>
लाजत बसायचं नाही, रचा बिन्धास्त...... फार तर काय, सोपे म्हणून, लौकर सुटेल

हे माझे आवडते ---- The woods would be very silent if no birds sang there except those that sang best. – Henry van Dyke (नेटवरून घेतले, लेखक बरोबर आहे याची खात्री केलेली नाही. )

कोड्यांचा स्तर फारच हाय नेऊन ठेवलाय >>>

आता एकदम सोपे द्या की !
आपण भरती / ओहोटी लाटेप्रमाणे करत जाऊ. Bw
....................................................
बरेच दिवसात अक्षरसांगड झालेली नाही. नवीन मंडळीना खेळायची असेल तर मी देईन. त्यात प्रत्येकाला काही प्रमाणात उत्तर येतेच. त्यामुळे ‘अवघड’ वाटणार नाही

बरेच दिवसात अक्षरसांगड झालेली नाही. नवीन मंडळीना खेळायची असेल तर मी देईन. त्यात प्रत्येकाला काही प्रमाणात उत्तर येतेच. त्यामुळे ‘अवघड’ वाटणार नाही>> द्या की विचारुच नका.

मी नवीन मेंबर असले सोडवायला येणाऱ्यातला तरी मला कोणत्याही ग्रेडच्या कोड्याचे वावडे नाही. सोपे कठीण कसेही द्या. प्रयत्न करेनच सोडवायचा. नाही जमले तर उत्तरे वाचून लेव्हल वाढेलच माझी. फायदा माझाच दोन्ही बाजूनी Proud

अक्षरसांगड खेळ

खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे 13 शब्द बनवा. त्यापैकी निदान 4 तरी चार अक्षरी किंवा त्याहून अधिक अक्षरी असावेत.

मा पी र
गा गै हि
ट त र

खेळ सादर केल्यापासून 2 तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.
..................................
हा खेळ नव्याने सोडविणाऱ्या लोकांसाठी याचे काही नियम :

१. सर्व शब्द सामान्य व मूळ स्वरुपात हवेत.
२. उघड विशेषनामे नकोत. (मुलामुलींची , गावांची नावे, इ.)

३. सर्व शब्द किमान ३ अक्षरी हवेत.
४. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही.

५. एक शब्द करताना कुठलेही अक्षर एकदाच वापरा. पुढचा शब्द करताना ते अक्षर परत वापरू शकता.
६. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत.

७. दिलेल्या अक्षरांत ह्रस्वदीर्घ महत्वाचे आहे. ते तसेच ठेवावे.

प्रतिभेचा एक पैलू म्हणजे कविताशक्ती. कविताशक्ती म्हणजे प्रतिभा नव्हे.
Submitted by हीरा on 10 October, 2020 - 12:57 >>>>

हीरा तुमचे प्रतिसाद वाचूनच तुम्ही भाषेचे बारकावे जाणता हे कळते. तुम्ही म्हणताय हे बरोबरच.
पण २ मुद्दे येतात.

१. कोडे फारच सरळसोट झाले तर माहितीतलेच शब्द उजळणी होत राहतील. त्यांचा नवीन पैलू कळून भाषाज्ञान वाढणार नाही. म्हणून थोडासा अपरिचित अर्थ शोधसूत्र म्हणून दिला तर त्यानिमीत्ताने सोडवणारा आजूबाजूला वाचतो.

उदा - कर = हात / tax हे खूपच सोपे. पुणेकर / नाशिककर मधील कर उपशब्द थोडा वेळ घेतो लक्षात यायला.
नाहीतर मग ऑनलाईन शब्दकोश आणि ctrl F इतकेच करावे लागेल. त्याने कोडे सुटेल पण भाषाज्ञान तिथेच राहील. मुद्दाम कोश वाचायला मी तरी जात नाही / नव्हते.

२. कविताशक्ति = प्रतिभा; स्फूर्ति म्हणताना दाते-कर्वे कोशकारांनी काही संदर्भ घेतलाच असेल.. त्यांची संदर्भसूची पाहिल्यावर कळेल, असे का? थोडे मागे जाऊन शोधले तर हे सापडते -----

अ) कविताशक्ति = Poesy ;

आ) poesy <<--- via old French <<--- from Latin <<-- from Greek poesis ( e वर शेंडी आहे) ;

इ) poiesis / poesis =
NOUN
1 rare A poem; poems collectively, poetry, verse; poesy.
2 The process of making; production, creation; creativity, culture.

Origin
Mid 16th century; earliest use found in John Hall (1529–1568/9), surgeon and author. From classical Latin poēsis poetry, a poem from ancient Greek πόησις, early variant of ποίησις creation, production, poetry, a poem.

ई) मग πόησις आणि ποίησις पाहिले तर, आपण इथे येतो.

** In philosophy, poiesis (from Ancient Greek: ποίησις) is "the activity in which a person brings something into being that did not exist before."[1]

** Poiesis is etymologically derived from the ancient Greek term ποιεῖν, which means "to make".

** poesy, n. [OFr < L. poēsis, poetry, poem < Gk πόησις, a making, creation, poetry, poem.] (webplay: metrical, Poet Laureate).

** Poetry; music; melody; art of writing verse; [fig.] power of beautiful expression; ability to conjure up vivid images in the mind; [pun on posy] bouquet; nosegay; bunch of flowers.

उ) असे आपण,
कविताशक्ति = Poesy = poēsis = πόησις आणि ποίησις = creativity, ability to conjure up vivid images in the mind = प्रतिभा
या अर्थापर्यंत पोचतो.

अजून मागे पण जायला वाव आहे. मी दमले आणि थांबले.
हेच कविताशक्ति = स्फूर्ति साठी करून बघता येईल.
तेव्हा कोशकारांनी काय शब्द उगम-संदर्भ घेतलाय त्यावरून शब्दाच्या छटा घेता येतील.

कारवी,
सुंदर संशोधन व स्पष्टीकरण !
Poiesis = "to make". यावरून मला एकदम वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाची आठवण झाली. ‘लाल पेशी तयार होणे’ याला erythropoiesis म्हणतात.
........................................
अक्षरसांगड कोणकोण खेळत आहे याची हजेरी प्रतिसादात देऊन ठेवा. आज भाप्रवे २१.०० ला उत्तरे देऊ.

मी मी Happy कुमारसर.
(हात वर केला आहे. )

The woods would be very silent if no birds sang there except those that sang best. – Henry van Dyke... हे फारच आवडलं.

वा ! हजेरी मस्तच आहे.
...........................
दरम्यान तोंडी लावायला म्हणून मागील चर्चा पुढे चालू :

‘कविता आणि प्रतिभा’ यावरून एक आठवले. साहित्यप्रकारांमध्ये तथाकथित श्रेष्ठत्व / कनिष्ठत्व अशा कल्पना आहेत. एका विचारानुसार कविता हा सर्वश्रेष्ठ प्रकार मानला जातो.

वर आपण जे कविताशक्ती बद्दल संशोधन बघितले त्यावरून कुठेतरी आता हे पटले :
Poiesis >>> poetry >>> creation .

कदाचित ,कविता हा साहित्यातील “पहिला” लेखनप्रकार असेल ??

कविता हा साहित्यातील “पहिला” लेखनप्रकार असेल ??
असेल वाटतयं नाही तरी मानवाला नादाची भुरळ असतेच तर गाणं हे कवितेचेच एक रूप अंगाई पासून सुरू झाले असेल ही ... मगं हेही सृजनाचे सृजन कुमारसर Happy
नवीन सापडले काही....

उत्तरे जाहीर करताना आपण थोडी नाट्यमयता ठेवतो.

आता सर्वप्रथम प्रत्येकाने आपली फक्त ३ अक्षरी शब्दांची यादी जाहीर करा.

Pages