शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

645 विकार
हुश्श
बृहदकोशाप्रमाणे पदार्थाचें रूपां- तर किंवा बदललेलें रूप. 'दहीं हा दुधाचा विकार.

शिष्टता
अगदी बरोबर, मस्त !

रसालंकारविशिष्टता
कवितेचा गुण

पुणेकर, छान.

सर्वांचीच सुरेख लढत
धन्यवाद !

अरे, punekarp !! सुरेख.... २ तासात चट्टामट्टा.
मला चारपैकी एकही शब्द माहिती नव्हता.
शिष्टता हिंदीत असतो, मराठीत आहे? विसारपावती म्हणजे काय? कधी देतात?

नवीन धागा काढायला हवा. याचे कोडे संपताना नेमके २०२० झालेत.

शिष्टता मराठीत. बृहद कोशात आहे.

घर वगैरे घेताना एक करारपत्र असते, त्यात आगाऊ रक्कम दिल्यास ती विसार

नवा धागा १/१/२०२१ रोजी !

शिष्टता बद्दल मला नक्की खात्री नव्हती. सभ्यताचा क्लु घेऊन विचार केला आणि मटका.
विसार आधी आठवला नव्हता पण वि अक्षर आल्यावर आठवला. कधीतरी ऐकला होता. पण त्याचा अर्थ पैश्याचा हप्ता आहे की MoU सारखे काही आहे याबद्दल अजून मला संभ्रम आहे.

विसार or रा
विसार or रा visāra or rā m (Or इसार) Earnest-money.
मोल्सवर्थ शब्दकोश
........
विसार पावती नोंदणी करता येते. मात्र सदर नोंदणीस खरेदीप्रमाणेच पुर्ण मुद्रांक व नोंदणीशुल्क लागते. हे शक्यतो टाळावे. कारण कायदेशीर बाजुंची पुर्तता न झाल्यास व ठराविक कालावधीत व्य्वहार न झाल्यास ठरलेल्या अटीप्रमाणे विसार रक्कम परत करुन व्य्वहार मोडला जाऊ शकतो.

https://www.gpoperators.com/2019/01/check-documents-for-taking-home.html...

मालमत्ता व्यवहार आणि कायदा यातील मराठी संज्ञा कळत नाहीत, सरावाच्या पण नाहीत. इंग्लिश थोड्या कळतात.
हवाला, घसारा शब्द माहिती पण अर्थ नाही...
विसार = Earnest-money. म्हणजे हल्ली टोकन अमाउंट म्हणतो ती?

टोकन अमाउंट नाही कारण ती सरकारी कागदपत्राविना असते.
विसार मध्ये शासन नियंत्रण आले .

असा स्वानुभव असल्याने रकमेचे माहीत होते Bw

रच्याकने…
दुधाचे दही - विकार
म्हणून enzyme = विकर ??

अंदाज …
काय वाटते ?

नाही.
शब्दांवर विकार होणे ही एक व्याकरण शास्त्रातली संज्ञासुद्धा आहे. वापर करताना शब्द आपण जसाच्या तसा वापरत नाही, त्यात बदल होतो ह्या अर्थाने.

enzyme = विकर ??
रोचक.
मलाही विकारक शब्द सुचलायं.
Enzyme = विकारक. हे उगाच.

हीरा, धन्यवाद
अस्मिता
enzyme = विकर हे जालकोशात आहे

Hormones = संप्रेरक
तसंच आहे का हे , उत्प्रेरक ,
Catalyst
a substance that increases the rate of a chemical reaction without itself undergoing any permanent chemical change.

तुम्ही म्हणतायं ते अगदी पटलं. विकारक सुयोग्य होईल.

शब्दांचे विकारी आणि अविकारी असे दोन प्रकार असतात. सगळी अव्यये ही अविकारी असतात. ती आपण जशीच्या तशी म्हणजे मूळ रूपात कोणतेही बदल न करता वापरतो. उदा. आणि, परंतु, किंवा, पण, अरेरे इत्यादि. काही क्रियाविशेषणेसुद्धा अविकारी असतात. त्याउलट नामे, सर्वनामे, क्रियापदे विशेषणे हे विकारी शब्द.

छान माहिती हीरा.
अवांतर.. मी मराठी माध्यमात अगदी साध्या शाळेत होते . तरीही प्रत्येक पिढी बरोबर मराठी भाषा थोडी थोडी मागे पडत आहे त्याने वाईट वाटते. तुमचे, कुमार सरांचे मराठी वाचले की लगेच लक्षात येते , मला हे सुचतचं नाही.

प्रत्येक पिढी बरोबर मराठी भाषा थोडी थोडी मागे पडत आहे >>>
सहमत, कारण आपण सुयोग्य काय यापेक्षा सोयीचे काय ते करून पुढे जायला बघतो. वरून भापो आहेच. कशा पोचवतोय त्याचे काही देणेघेणे नसते बर्‍याचदा.
मराठी संस्कृत शब्दांचा उगम, संधि, समास, प्रत्यय याचे किती सुंदर आणि कारणासहित नियम आहेत व्याकरणाचे.
पण व्याकरण किती मार्काचे येणार त्यावर बोळवण होते सगळी.
सगळे आता पूर्ण आठवत नाहीत पण कोणी लिहीले की मनाशी उजळणी होते. शब्दार्थ किंवा कुठल्या कवितेचा, सुभाषिताचा अर्थ अशा धाग्यांवर खूपजण लिहीतात ते नियम, व्याकरणामुळे बदलणारी रूपे.... मग छान वाटते वाचायला. हीरा, सर, शंतनु, चिनूक्स, स्वाती२, स्वाती आंबोळे हे काही आठवतात लगेच. पण अजूनही खूपजण आहेत.

खरंच कारवी , काही तरी खूप समृद्ध व सुंदर गमावत आहोत. दुर्दैव म्हणजे हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाहीये .
आपल्यापरीने सतत शिकत रहावं , चुका दुरूस्त करत रहाव्यात. मुलांना शिकवावं, एवढंच करू शकतो.

सुरेख मंथन !

इथली मजा काही औरच आहे. प्रत्यक्ष खेळात शोधाचा आनंद मिळतोच. पण त्याहूनही अधिक नंतरच्या अशा चर्चेत मिळतो. आज व्यवहारात धेडगुजरी भाषेचे प्राबल्य आहे. आपली कार्यालयीन कामे बरीचशी इंग्लिशमध्ये चालतात. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर आणि अभिव्यक्तीवर परिणाम होतो. मग मराठीचा आत्मिक आनंद कुठे मिळवायचा ? याचे उत्तर अशा धाग्यांवर मिळते. या संस्थळामुळेच आपण सारे समानशील एकत्र जमतो.

शब्दखेळाच्या आतापर्यंतच्या तीन भागात तुम्हा सर्वांच्या सहभागाने मनमुराद आनंद लुटता आला. त्याबद्दल मनापासून आभार !

नववर्षानिमित्ताने उद्यापासून या खेळाच्या चौथ्या भागाचे उद्घाटन करूयात. तिथे आपणा सर्वांचेच स्वागत असेल.
धन्यवाद

Pages