Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवा खेळ सियोना देणार का ?
नवा खेळ सियोना देणार का ?

नाही हो सर.अजून तर मी नवीन
नाही हो सर.अजून तर मी नवीन आहे. कारवी,मानव नाहितर देवकी सारखे दिग्गजांना विचारा ते देतील.
अक्षरसांगड खेळ
अक्षरसांगड खेळ
खाली दिलेल्या अक्षरांपासून( किमान तीन अक्षरी) असे १७ मराठी शब्द बनवा. त्यापैकी निदान ६ चार अक्षरी आणि १ पाच किंवा अधिक अक्षरी असावेत.
खेळ सादर केल्यापासून 4 तासांनी उत्तर (शब्दयादी) जाहीर करूया. एकेक शब्द प्रतिसादात लिहू नका.
र ले का
ख सु ली
न वा क
...........................
उपस्थिती नोंदवा
उपस्थिती नोंदवा
उत्तरे लिहू शकता
उत्तरे लिहू शकता
लेखन
लेखन
लेखक
कारले
कालीन
कालीक
सुरकन
सुलेखन
सुखवान
सुखकर
सुकर
सुकलेली
नकार
नखवा
नलीका
नकली
वारली
वानर
वाकले
कानसुख
सुखकारक
आता बनवून दिले, सगळे अर्थ तपासले नाहीत.
)
कवाली
नरक
नरकसुख (कुणाला स्वर्गात सुख वाटतं, आम्हाला नरकात
मानव, छान
मानव, छान
किती शब्द शोधलेत हो! वाचले तर
किती शब्द शोधलेत हो! वाचले तर अरे,हे किती सोपे होते असं वाटले.
माझे शब्दः
कारले
कालीन
कारवान
नकार
लेखन
लेखक
देवकी छान
देवकी छान
माझा एक ६ अक्षरी आहे ....
बघूयात
माझे देतो अर्ध्या तासाने
सुलेखनकार ,
सुलेखनकार ,
सुलेखन, सुखकर , रखवाली, सुकलेली, वाकलेली, खरकन
लेखन, नवार, वाखर, सुकर, वारले, कारले, कवाली, नखवा, करवा, कारवा
रसरंग ची व्युत्पत्ती वि वा
रसरंग ची व्युत्पत्ती वि वा भिडे यांच्या सरस्वती कोशात मिळाली ती अशी:
संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी २ पात्रांत गूळ आणि कुंकू घालून एकमेकांना देतात.
>>> रस +रंग
शब्दव्यूह आणि अंताक्षरी
शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने ९ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. एक आड एक अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून सुरवातीस १ व २ ची उत्तरे एकदम द्या.
पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
……..
१. इथे दुसऱ्या वर्षी पीक घेतोय (३, वा )
२. हा मराठी, आसामी, तामिळ असे काही पण बोलतो(४)
३. त्याला माझी किंमत समजते ( ५, न)
४. कामधाम नाही अन कुचा ळ्या करणार (६)
५. ...आणि त्याचा गळा रंगला (६, र )
६. तो नाश बघवेना (५ )
७. "कर्मठपणा सोडा हो !" (६, द)
८. तो मृत्यू नैसर्गिक नाही वाटत हो (५)
९. इथे फुकट जेवायला मिळेल (४, क्र १ चे पहिले)
……..
कुमार सर, उभाराइ किंवा उराभाई
.
पुणेकर विपु पहा,
पुणेकर विपु पहा,
इथे मध्येच अवांतर नको
तिकडे चर्चा करू त्यावर !
९. सत्रशाला?
९. सत्रशाला?
2 वावदूक
2 वावदूक
9 अन्नछत्र?
२ वावदूक बरोबर असेल तर....
२ वावदूक बरोबर असेल तर....
३. त्याला माझी किंमत समजते ( ५, न) --- कदरदान
वावदूक व कदरदान
वावदूक व कदरदान
बरोबर !
बाकी नाही
९. इथे फुकट जेवायला मिळेल (४,
९. इथे फुकट जेवायला मिळेल (४, क्र १ चे पहिले) --- माधुकरी, भिक्षाटन
? काकबळी/लि --- कावळ्यांना जेवण ?
काकबळी/लि --- कावळ्यांना जेवण
काकबळी/लि --- कावळ्यांना जेवण ?
नाही
'जेवणाचे पैसे पडणार नाहीत ! पण जेवावे तर लागेलच.'
६. तो नाश बघवेना (५ ) --
६. तो नाश बघवेना (५ ) -- रबरबाट / रबरबीत
रबरबाट / रबरबीत नाही
रबरबाट / रबरबीत नाही
कारण ७ जुळणार नाही व असा अर्थ नाही
नाश / विनाश
८. द**वध ९. धर्मशाला?
८. द**वध
९. धर्मशाला?
८. द**वध
८. द**वध
९. धर्मशाला?
दोन्ही नाही
८. इतिहासाच्या पुस्तकात असतो
९. जेवणाचे पैसे पडणार नाहीत ! पण जेवावे तर लागेलच.'
तरीसुद्धा नको रे बाबा !
८. इतिहासाच्या पुस्तकात असतो>
८. इतिहासाच्या पुस्तकात असतो>>>>> दगाफटका!
दगाफटका!
दगाफटका!
बरोबर
या, स्वागत आहे !
८. दगाफटका?
८. दगाफटका?
४. कामधाम नाही अन कुचा ळ्या
४. कामधाम नाही अन कुचा ळ्या करणार>>>>>> नसनखवडा?
नसनखवडा नाही
नसनखवडा नाही
अर्थ बराच वेगळाय याचा
१. इथे दुसऱ्या वर्षी पीक
१. इथे दुसऱ्या वर्षी पीक घेतोय (३, वा )
२. हा मराठी, आसामी, तामिळ असे काही पण बोलतो(४)... ...वावदूक
३. त्याला माझी किंमत समजते ( ५, न)........ कदरदान
४. कामधाम नाही अन कुचा ळ्या करणार (६)
५. ...आणि त्याचा गळा रंगला (६, र )
६. तो नाश बघवेना (५ )
७. "कर्मठपणा सोडा हो !" (६, द)
८. तो मृत्यू नैसर्गिक नाही वाटत हो (५)........ दगाफटका
९. इथे फुकट जेवायला मिळेल (४, क्र १ चे पहिले)
Pages