शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक =अक्षरक्रम)

३४ - केस पिंजारलेली गबाळी
७८९- मनुष्यगुण

६२१- पैशांचा हप्ता
६४५- (उदाहरणार्थ) दुधाचे दही होणे

संपूर्ण - साहित्यातील गुण
……………….

किण्वन नाही,
कारण जुळणार नाही

हे फक्त १ "उदा" आहे

हो ते आले लक्षात लिहीताना.... ण्व ३४ मध्ये जुळणार नाही.... पण सुरूवात करायची म्हणून एक दिला.
दुधाचे दही हे उदा आहे तर मग शोधसूत्र काय आहे?
आंबणे, नासणे, विरजणे अशा अन्न्संस्कार कृती वा घटना
irreversible रासायनिक प्रक्रिया,
रूपांतरण
अवस्थांतरण
अयोग्य वस्तू एकत्र येणे

पुणेकर
माझी शेवटची विपु पाहिलीत का ?

645...बदल ?

Kinvan आणि प्रक्रिया आले होते पण बाकी जुळत नाही.

६४५- (उदाहरणार्थ) दुधाचे दही होणे ---- घनत्व / घनता / घनन / पक्वता / पौष्टिक

३४ - केस पिंजारलेली गबाळी --- दशा / पिशी ( पिसे, वेड लागलेली व्यक्ती)

७८९- मनुष्यगुण --- अमूर्त / सृजन / कल्पक / हव्यास / विचार / विकास / विकार / स्खलन

६२१- पैशांचा हप्ता --- हवाला / वायदा / उचल / इनाम

कारवी
छान प्रयत्न पण एकही नाही.
७८९ - सभ्य माणसाचा गुण
६२१ - खरेदी व्यवहारात ....

संयम , आदर नाहीं पण
अशाच गुणांचे मिश्रण !

६२१>>>> मामलेदार कचेरीत ऐकतो / लिहितो

७८९ - सभ्य माणसाचा गुण --- अदब / विवेक / संकोच / नम्रता / मदत / संस्कार

६२१ - खरेदी व्यवहारात .... --- हे advance paymentशी संबंधित आहे? पण शब्द नाही सुचत
मामलेदार कचेरीत काय होते तेच माहिती नाही....मुळात

६४५ दूध-दही ---- सुपाच्य ( पचायला सोपे) / निष्पत्ती / विपाक (matured, cooked या अर्थी) / क्लथन (coagulation)

६२१ - खरेदी व्यवहारात .... --- हे advance paymentशी संबंधित आहे होय

६४५ दुधाचे दही / पाण्याचा बर्फ इ इ >> अवस्थांतर
७८९ सभ्यता हीच दिशा

थोडी भर :

३४ - केस पिंजारलेली / एक अतिप्राचीन राजधानी
आता सोपे व्हावे !

आटणे नाही

दुधाचे दही / पाण्याचा बर्फ इ इ >> अवस्थांतर

सालस/सोज्वळ नाही

शब्दाचे योग्य रूप बघा
जसे की सभ्यता
संस्कार नाही पण या शब्दातली १-२ अक्षरे बदला !
आता हा सोडू नका; एकदाची कोंडी फोडा

म्हणजे 5 वं अक्षर र /रि असणार, अलंकार मधलं असं वाटतंय पण मग ते 645 चं *कार अजून जुळत नाही

साकार तर नाही 645?

Pages