Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कारवी,
कारवी,
चांगली सूचना.
.......................
हे ते प्रसिद्ध इंग्लीश:
“I do not know where family doctors acquired illegibly perplexing handwriting; nevertheless, extraordinary pharmaceutical intellectuality, counterbalancing indecipherability, transcendentalizes intercommunication’s incomprehensibleness.”
इंग्रजीत स्वर, अनुस्वार (m
इंग्रजीत स्वर, अनुस्वार (m आणि n) जोडाक्षर सगळे वेगळे अक्षर धरल्या गेल्याने आणि अक्षरांची पुनरावृत्ती (वरील उदाहरणात ss) यामुळे 20 अक्षरी शक्य आहे.
incomprehensibleness हा शब्द देवनागरीत लिहिला तर
इन्कॉंंप्रीहेन्सीबलनेस असा नऊ अक्षरी होईल.
तर कृष्णमुखकमलापरी हा ९ अक्षरी शब्द इंग्रजी लिपीत लिहिला तर Krushnamukhakamalaparee असा तेवीस अक्षरी होईल.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
तो त्या भाषेचा अंगभूत गुण आहे. त्यात छोटसं क्रियापद दुसऱ्या स्थानावर घेता येते.
आपल्या गद्य लेखनात चांगलं क्रियापद शेवटी असते.
असे काही फरक आहेत
खूपच प्रतिभाशाली उत्तरे. वा.
खूपच प्रतिभाशाली उत्तरे. वा.
वरील खेळाला चढती शब्दावली हे
वरील खेळाला चढती शब्दावली हे नाव कसे वाटते?
अन्य पण सुचवा
ये जळ भरल्या नयनांत अवचितशी
ये जळ भरल्या नयनांत अवचितशी चैतन्यझळाळी
कृष्णनभासभोती कातरसंध्यासमयी सुधांशुकिरणनव्हाळी>> अप्रतीम.
हे आधी सुचलेले, कोड्याच्या अटीत बसवायला बदलले -->> बर्याच कविता अशाच होत असाव्यात.
धन्यवाद विक्रमसिंह
धन्यवाद विक्रमसिंह
वरील खेळाला अन्य नाव >>>
नाव देताय? म्हणजे नेहमी खेळायचा? कुठून आठवणार नवेनवे ८-९-१० अक्षरी शब्द? अर्थपूर्ण वाक्य बनेल असे....
शब्द लगोरी, अक्षर-आरोही नावे सुचलीत
कारवी
कारवी
नावे छान !
जे हा खेळले नाहीत त्यांना घेऊन एकदा खेळायला हरकत नाही
१० अक्षरी मराठी शब्द
१० अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही उपशब्दांची शोधसूत्रे अशी :
१४८ हा सुपीक करतो
२७ पडदा
३६ गुरुची आज्ञा
४५७ आपला ‘तो’ पण त्यांची ‘ती’ !
९-१० चौकटीत डोके घालणारे
संपूर्ण : कायद्यातील महत्वाचे (शब्दाचे रूप)
१४८ हा सुपीक करतो -- गांडूळ /
१४८ हा सुपीक करतो -- गांडूळ / दानवे
९-१० चौकटीत डोके घालणारे -- कोडे
२७ पडदा -- चीर
सर्व नाही
सर्व नाही
गांडूळ >> ही दिशा योग्य. पर्यायी ?
३६ गुरुची आज्ञा --वर
३६ गुरुची आज्ञा --वर
४५७ आपला ‘तो’ पण त्यांची ‘ती’ ! -- कारटी
सियोना
सियोना
दोन्ही नाही
'आज्ञा' कशी असते ?
१४८ हा सुपीक करतो -- गांडूळ /
१४८ हा सुपीक करतो -- गांडूळ / दानवे
गांडूळ >> ही दिशा योग्य. पर्यायी ? >>>>
गेंडूर, शिदड सापडले.... यापैकी?
२७ पडदा -- धूर, थर, पट, पाट (अंतरपाट पैकी), गोषा, चिक
नाही
नाही
थर >>> हे थोडेसे बदला की येइल !
सुधारित
सुधारित
४५७ खेळातील आपला ‘तो’ पण त्यांची ‘ती’ !
१ ४ ८ दवणा
१ ४ ८ दवणा
२ ७ स्तर
३ ६ ऐक
दस्तऐवजकरणावळ?
४५७ वजीर
दस्तऐवजीकरणासाठी?
सुटले का? बहुतेक.... १०
सुटले का? बहुतेक.... १० अक्षरी बरोबर वाटतोय.
दस्तऐवजीकरणा * *
दस्तऐवजीकरणा * *
एवढे राहिले
छान
मुळे?
मुळे?
बरोबर मुळे - ज्योतिषी
बरोबर
मुळे - ज्योतिषी
मुळे = ज्योतिषी आणि गांडूळ =
मुळे = ज्योतिषी आणि गांडूळ = दवणा, आजच कळले; स्वप्नातही शंका आली नसती.
गांडूळला पर्यायी ह्यूमस, कंपोस्ट लिहायला आले तर कोडे सुटलेले.
मुळे = ज्योतिषी
मुळे = ज्योतिषी
हे मलाही नवलच होते.
आडनाव ऐवजी हे अवघड दिले
शब्दव्यूह आणि अंताक्षरी
शब्दव्यूह आणि अंताक्षरी
( सुधारित खेळ)
खाली ओळीने ९ शोधसूत्रे दिली आहेत. त्यानुसार तुम्हाला प्रत्येकी एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा) शोधायचा आहे. एक आड एक अपेक्षित शब्दाचे शेवटचे अक्षर दिले आहे. आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिला योग्य शब्द शोधल्यावर त्याचे शेवटचे अक्षर घ्या.
• त्या अक्षराने सुरू होणारा दुसरा योग्य शब्द ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसरा शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• नऊव्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे पहिल्या शब्दाचे सुरवातीचे अक्षर आहे. असे सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही समानार्थी पर्यायी शब्द काढलेत तरी अंताक्षरी जुळलीच पाहिजे. आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून सुरवातीस १ व २ ची उत्तरे एकदम द्या.
पुढे क्रमाने एकेक सुटे चालेल.
……..
१. ती मर्यादेत वागते (३, ती)
२.
पत्रलेखनात असते (५)३.
त्रासलेला बिचारा (५, ला)४.
प्रकाशस्रोत (५)५.
म्हातारीच्या पर्समधले प्रसंगी उपयुक्त (४, ग)६. विवेकन्यून अवस्था (६)
७. हिच्याशी जपून बोला बरे (५, पी)
८.कापडाची वीण (४)
९. सौभाग्यवतींची सभा( ४, क्र.१ चे पहिले )
………………..
2 पत्रलेखनात असते -
2 पत्रलेखनात असते --तीर्थस्वरूप
४. प्रकाशस्रोत -- लामणदिवा
५. म्हातारीच्या पर्समधले प्रसंगी उपयुक्त -- वावडिंग
२ ४ ५ सर्व बरोबर !
२ ४ ५ सर्व बरोबर !
आज पहिल्यांदा शब्दखेळ वर
आज पहिल्यांदा शब्दखेळ वर बरोबर उत्तर दिले मी.
होय, छान सुरवात केलीत !
होय, छान सुरवात केलीत !
येउद्या.....
३. त्रासलेला बिचारा --
३. त्रासलेला बिचारा -- पछाडलेला
पछाडलेला बरोबर !
पछाडलेला बरोबर !
Pages