शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लांबी वाढवताना मध्ये आणि, व, पण, परंतु घालून चालणार का?
मोजायचे नाहीत हे शब्द. मुख्यच मोजायचे. पण वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी लागलेच, तर वापरू का?

तेच वाक्य पुढे न्यायचेय का ? की वेगळे चालेल?
उदा -- मी तुला पाहिले
पुढचे वाक्य --- मी तुला पाहिले हसताना --- असे हवे की पूर्ण नवीन ४ अक्षरी चालेल?

छान !
पूर्ण नवीनच करा.
शक्यतो 'व' टाळून बघू आधी.

४ शब्दी --- ही फुले रात्रीच फुलतात.
वाक्ये सुचतील तशी लिहीत जायची ना? का तुम्ही सूचना देणार ५, ६, ७ शब्दीसाठी? थोडे थांबून लिहायचे?

वाले :

मी त्यांच्या घरात अभ्यासिका करावयास कुरकुरतोय.

तो रोज वाचतो कचेरीस निघण्यापूर्वी वर्तमानपत्र आदल्यादिवशीचे.

अश्विनी,
चुकताय, इतर वाक्ये नीट पाहा.
१,२,३,४,५,६,७. असे हवे

मानव छान

७.
ही तर तुमच्या मनातली आनंददायी समाधानयुक्त आत्मसंतुष्टताच !
................
इथून पुढे क्रियापद वगैरेंची जरा फिरवाफिरवी (किंवा टाळणे) वगैरे केल्याशिवाय पुढे जाता येणे अवघड दिसते....

८.
हो मला खरंच आवडते वेगवेगळ्या विषयांवरती बडबडावयाला मनमोकळेपणाने.

५ शब्दी ---- का अशी सारखी धावपळ करतेयस?
६ शब्दी ---- मी स्वतः सवय नसल्याने उंबरठ्याला अडखळतेय.
७ शब्दी ---- ती रोज अशीच घरभर हुंदडायची, भिरभिरणार्‍या फुलपाखरागत.
८ शब्दी ---- तो दैवी स्वरात रागमाला आलापताना तालासुरांवर हरीणशावकेही लहरतविहरत.
९ शब्दी ----
ये जळ भरल्या नयनांत अवचितशी चैतन्यझळाळी
कृष्णनभासभोती कातरसंध्यासमयी सुधांशुकिरणनव्हाळी

ती मला दिसली, पावसाळी कातरवेळी, रिमझिमणार्‍या पाऊसधारांतुन, तडिताघाताप्रमाणे, निमिषा-दो-निमिषासाठी!

अरे किती मस्त !!
९साठी पद्यच हवे. सत्यजित १०, ११ पण लिहा. तुम्हाला जमेल.
मी ९ जुळवले ट ला ट करून पण टाकायला लाज वाटत होती. आता टाकते.

सर्व छान !
.................
१० चा प्रयत्न :

तो पहा मनस्वी कलंदर वाकबगार प्रकांडपंडित बुद्धीप्रामाण्यवादी उच्चविद्याविभूषित वस्त्रप्रावरणमंडित सुघटनशल्यविशारद !

काय वाटते ?

सत्यजित यांच्या वाक्यावरून :
ती मला दिसली, पावसात वावरताना, रिमझिमणार्‍या पाऊसधारांतुन, अरुणोदयासमयी कृष्णमुखकमलापरी निमिषा-दो-निमिषांंकरीता.

>>>ये जळ भरल्या नयनांत अवचितशी चैतन्यझळाळी
कृष्णनभासभोती कातरसंध्यासमयी सुधांशुकिरणनव्हाळी>>> कूर्निसात!

कारवी,मी लिहिलंय त्यापेक्षा खूपच सरस, अर्थपूर्ण तसंच काहिसं अर्थ-गूढ लेखन वाटलं मला! अभिनंदन! लिहीत रहा.

११ कोण ? --- मानव आणि सत्यजित विभागून
मानव यांच्या वाक्यापुढे जोडायचे ---- विरह-आर्त-मनसंजीवनी,

१२ साठी त्याहीपुढे जोडता येईल ---- तृषितचातकमेघमालेपरि.

अभिनंदन! लिहीत रहा.
Submitted by सत्यजित... >>>>
नाही हो, कविता माझा प्रांत नाही. बो़जडच होतं काहीतरी. तुम्ही सभ्यपणे अर्थ-गूढ म्हणताय त्यालाच.
सोपं सुटसुटीत तरीही नेमके भाव घेऊन येणारे शब्द नाही जमत. हे आधी सुचलेले, कोड्याच्या अटीत बसवायला बदलले --
ये जळ भरल्या नयनांत, अवचितशी तेजझळाळी
जणू श्यामल-नभा-सभोती, सुधांशुकिरणनव्हाळी

११, १२ मस्त !
...................................

इंग्लिशमध्ये या प्रकारच्या रचनेला rhopalic म्हणतात. त्यांच्याकडे I do हे दोन शब्द पहिले घेतले की त्यापुढे वाक्य अफाट वाढवण्याची क्षमता असते.
त्यांचे असे एक गाजलेले मूळ 11 शब्दी वाक्य आहे. नंतर ते अर्धविराम आणि अनेक स्वल्पविराम वापरून 20 शब्दी करण्यात आलेले आहे !

ओके. आजचा खेळ आवडला.
इंग्लिशमध्येही असेच वाढवतात? की शब्द लहानमोठे मिक्स वापरतात?
यावरून एक अजून करता येईल. एकाच वाक्यात चढता+उतरता क्रम.
१ २ ३ ४ ३ २ १ असे शब्द. कठीण होईल कदाचित. एकक्षरी क्रियापद.

Pages