शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

……..
१. ती मर्यादेत वागते (३, ती)
२. पत्रलेखनात असते (५)

३. त्रासलेला बिचारा (५, ला)
४. प्रकाशस्रोत (५)

५. म्हातारीच्या पर्समधले प्रसंगी उपयुक्त (४, ग)
६. विवेकन्यून अवस्था (६)

७. हिच्याशी जपून बोला बरे (५, पी)
८.कापडाची वीण (४)

९. सौभाग्यवतींची सभा( ४, क्र.१ चे पहिले )

१.गरती बरोबर
सुंदर !
…....

हा सुंदर शब्द मी उमा वि कुलकर्णी यांच्या लेखात वाचला तेव्हा त्याच्या प्रेमातच पडलो.
इथे घ्यायचे तेव्हाच ठरवले.

नाही,
टोकाची दोन्ही अक्षरे नीट पहा !

महिला मंडळ असून या शब्दास वेळ का बरे Bw

धन्यवाद मानव!

६. विवेकन्यून अवस्था (६)

७. हिच्याशी जपून बोला बरे (५, पी)

देवकी
तुमच्या तिळगूळ वरून तुम्ही योग्य दिशेला आलाच होतात. म्हणून भर घातली नाही !

आज सियोनानी आघाडीला येऊन सुरेख सचिनबाजी केली. नंतर मधल्या फळीत मानव-देवकी यांचीही दमदार भागीदारी !
शेवटच्या २ साठी कोणी नवीन येणार की पहिलीच मंडळी संपवणार ?

अरे वा! नवीन कोडे येऊन संपले पण. मला उशीर झाला यायला ...
Happy आज सियोना दिनविशेष

६. विवेकन्यून अवस्था (६) --- गतानुगतिक
७. हिच्याशी जपून बोला बरे (५, पी) --- कर्णप्रलापी / कटुप्रलापी --- खात्री नाही
( क ??? पी जुळवण्यासाठी मीच बनवले)
प्रलाप म्हणजे अर्थहीन बडबडणे. त्यावरून कानाशी बडबडत रहाणे / ऐकवत नाही असे बडबडत रहाणे

७. हिच्याशी जपून बोला बरे (५, पी) --- शीघ्रसंतापी / शीघ्रप्रकोपी
६. विवेकन्यून अवस्था (६) ---- ग ??? शी म्हणून गद्धेपंचविशी --- खात्री नाही

गद्धेपंचविशी
शीघ्रसंतापी
वा, वा मारलात हो विजयी चौकार
अभिनंदन

१. ती मर्यादेत वागते (गरती)
२. पत्रलेखनात असते (तीर्थस्वरूप)
३. त्रासलेला बिचारा (पछाडलेला)

४. प्रकाशस्रोत (लामणदिवा)
५. म्हातारीच्या पर्समधले प्रसंगी उपयुक्त (वावडिंग )
६. विवेकन्यून अवस्था (गद्धेपंचवीशी)

७. हिच्याशी जपून बोला बरे (शीघ्रसंतापी)
८.कापडाची वीण (पीळदार)
९. सौभाग्यवतींची सभा( रसरंग )
………………..
समाप्त

हे कसे सुचले ते देवकी सांगतील का ?>>>>>> हा शब्द्,कथा कादंबर्‍यातून वाचला होता.त्याचा अर्थ "घरंदाज"असाच माहीत होता." ती मर्यादेने वागते" म्हणजे शालीन हा अर्थ डोक्यात आला.
हळदीकुंकू समारंभाला रसरंग म्हणतात्/म्हणायचे ही तर शब्द्कोड्यांची कृपा! फक्त तो शब्द नेमका आठवत नव्हता म्हणून तीळगूळ म्हणून लिहिले होते.मानव यांनी र**ग असे लिहिल्यावर मग तो शब्द लिहिला.कारवींनी मस्त दोनही शब्द सुचवले.

रच्याकने,रसरंग बाबत कोणी माहिती देऊ शकेल का? कुमारसरांच्या कोड्याबाबत आईला सांगितले असता ती जुन्या आठवणीत गेली.तिची आई सांगायची म्हणे ९ प्रकारची पाने,सुपार्‍या असं काहीतरीअसते.माझ्या आईला आता ते आठवत नाही.

देवकी, धन्यवाद.

*हळदीकुंकू समारंभाला रसरंग म्हणतात्/म्हणायचे ही तर शब्द्कोड्यांची कृपा! >>>
अगदी ! वारंवार येतो हा शब्द. तेव्हा खरे तर रसपान नसते; तिळगूळ असतो !
कारण माहिती नाही

Pages