शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंड?

तोंड नाही
त्याच्याच जवळ काय आहे ? सध्या फार जपतोय आपण !!

नाक
एकदम बरोबर !
सतीश अगदी महत्वाच्या क्षणी बरोबर आले !

हा धागा भारी Happy

सर खर तुम्च्या hint मुळे जमले., वरचे एकही शब्द मला नाही आले.

३. अब्रु >>>> होयच !
छान .
.........................
नाक

अग्रभाग, डोळा, अब्रू, नायक,
स्वर्गलोक, धीटपणा, नेढे .

नाक = डोळा ..... हे जरा विचित्रच नाही का ? Bw

सर्वजण छान खेळले.
मनापासून धन्यवाद !

स्वर्गलोक म्हणजे नाक? जुने मराठी का? ऐकलेच नव्हते.... कालानुरूप भाषा / शब्दार्थ यात किती फरक पडतो !
मोमंरा किष्किंधा १.१०. [सं.] --- या संदर्भाचा अर्थ कसा लावतात कुमार सर?
रामायण किष्किंधा कांड श्लोक १.१० ..... मोमं म्हणजे काय?

दुसरे कोणी देईपर्यंत, एक छोटे कोडे. एक ८ अक्षरी शब्द आहे.
त्यातील अक्षरांपासून बनणारे उपशब्द खालीलप्रमाणे आहेत. उपशब्द आणि मूळशब्द ओळखायचे आहेत.

१. 23 (२रे व ३ रे अक्षर मिळून) प्राणीमात्रांच्या आदिम वैशिष्ट्यांपैकी एक
२. 456 पूजेतल्या मूर्तीचे ठळक वैशिष्ट्य
३. 56 पचनसुलभ अन्नग्रहणासाठी आवश्यक
४. 76 पात्रता / लायकी
५. 34 एक तृणधान्य
६. 145 मालकी हक्क दाखवणारा विलायती शब्द (मराठी उच्चार)
७. 24 स्थिती / साम्य / शुभेच्छा -- दर्शक वाक्यात हा असतो
८. 78 एखाद्या जागेशी / प्रदेशाशी संबंध दाखवणारा उपशब्द
९. 64 हे अनुभवायला / बघायला पहाट योग्य
१०. 84 कीर्ती, डंका, रिवाज / नियम

नवीन Submitted by कुमार१ on 7 October, 2020 - 16:47 >>>> मोमंरा किष्किंधा
मोमंरा ग्रंथाचा संदर्भ असावा. रा = रामायण असावे कारण किष्किंधा आहे नंतर
मोमं --- लेखक असावा उदा---- तुकाराम गाथा असेल तर तुगा२४५ लिहीतात = तुकाराम गाथा अभंग २४५.
पण कोण? मोरोपंत? त्यांनी रामायण लिहीले आहे? माहीत नाही

मोरोपंत? त्यांनी रामायण लिहीले आहे? माहीत नाही>>> होय तर !! मोरोपंतांनी १०८ प्रकारची रामायणे लिहिली आहेत
प्रत्येकाचे एकेक वैशिष्ठय आहे ..
काही रामायण काव्ये अशी आहेत की ज्यात फक्त १३ ओळी आहेत. काहीं मधले प्रत्येक ओळींचे पहिले अक्षर घेतले तर ते 'श्रीराम जय राम जय जय राम' असे होते. काहींचे शेवटली अक्षरे 'श्रीराम जय राम जय जय राम' होतात. अजुन एक तर असे आहे की त्यातलं पहिल्या ओळीचं पहिलं अक्षर श्री, दुसऱ्या ओळीचं दुसर अक्षर रा, तिसऱ्या ओळीचं तिसरं अक्षर म, असं श्रीराम जय राम जय जय राम तयार होईल

शिवाय एक निरोष्ठ रामायण आहे म्हणजे ज्यात प फ ब भ म हि ओष्ठय अक्षरेच नाहीत !! त्यामुळे "राम " हा शब्दच नाही !! तरी रामायण
त्या ऐवजी "दशरथ नंदन " असा शब्द घेतलाय

मोरोपंत -- आर्या माहीत. त्यांची सगळी रचना संपदा नाही माहीत anjali_kool.
मग मोमंरा काय असावे? मोरोपंत ??? रामायण. शोधायला पाहिजेत....

धन्यवाद anjali_kool..... प्रश्न विचारावा आणि एक नवीनच 'वाचाल तितके थोडे' दालन उघडावे.... खूप मस्त वाटते.
ते मोरोपंत मंत्र रामायण असावे. तुम्ही म्हणताय तेच त्रयोदशाक्षरी मंत्र गुंफलेले. त्याची रचनाही कांडांप्रमाणे आहे. ते मोमंरा किष्किंधा १.१० जुळतेय.

याव्यतिरिक्त, मोरोपंत मंत्रिरामायण, मंत्रगर्भरामायण, मंत्रमयरामायण, मत्तमयूररामायण. (मत्तमयूर वृत्त), मंचरामायण. (क्रौंचपदा वृत्त), मंजुरामायण. (शुद्धकामदा वृत्त), ही पण आहेत -- मोमरा... !!

धन्य ती प्रतिभा. १०८ मधील ८७ ज्ञात आहेत. काही कालौघात हरवली.
हे सगळे / यापैकी साहित्य बारामतीला मोरोपंत विशेष ग्रंथालयात आहे.
मला फक्त बारामतीचे *** *** माहीत होते.

नवीन Submitted by कुमार१ on 7 October, 2020 - 18:06 >>>
२च? बाकी नाही जुळत? शोधसूत्रे रचायला चुकली का?
बाकी असलेले दोन ** पण भरून टाका सर, म्हणजे पुढचे कोडे देईल कोणीतरी ...

कना काय सूत्रासाठी भरला?
४. 76 पात्रता / लायकी
८. 78 एखाद्या जागेशी / प्रदेशाशी संबंध दाखवणारा उपशब्द
१०. 84 कीर्ती, डंका, रिवाज / नियम

हे आहेत ना ७, ८ अक्षरे सुचवायला

कद = लायकी >>>> बरोबर उदा -- कदान्न
८४ नाव --- रिवाज नव्हे ना.....
८. 78 एखाद्या जागेशी / प्रदेशाशी संबंध दाखवणारा उपशब्द --- जागा + उपशब्द ऐकला की माणसे मत बनवतात हो लगेच ! अनुकूल / प्रतिकूल कसेही..... कधी आपलेपणा कधी नको बाबा याची संगत

७८ कशी ?
नवीन Submitted by कुमार१ >>>>> नाही हो
माझ्या 7 October, 2020 - 18:15 पासूनच्या प्रत्येक प्रतिसादात क्ल्यू आहे. तुम्हाला पुरेसा आहे.
नवीन सदस्याला मी एकवेळ अजून अर्थ दिले असते....

हो.....
शेवटचा क्ल्यू -- 78 उपशब्द २दा उच्चारला की 84 चे उदाहरण मिळते
भरून टाका आता तो *

Pages