शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीच बनवलाय, वर्णनावरून ( जिथे जलाचे आवरण (सुरक्षित) राहील असा पट्टा )
---- वास्तव्ययोग्य केले असते तर १उ देवयानीशी जुळले नसते.

मीच बनवलाय, वर्णनावरून>> ओह! Lol

मी आत्ता आयुकाचं उत्तर शोधलं.
EW_wzBTWkAEzeVG.jpeg

यात त्यांनी वास्तवयोग्य म्हटलंय. पण तो बरोबर वाटत नाही.

मला राहण्यायोग्य किंवा वसतियोग्य हे शब्द जास्त योग्य वाटले होते. पण ते या शब्दकोड्यात बसत नव्हते.

वास्तव योग्य --- वाटले होते पण वास्तव वेगळ्या अर्थाने वापरतो आपण
वसतियोग्य / वास्तव्य योग्य / वास्तव्यानुकुल चालले असते पण जुळत नव्हते
कदाचित शब्दकोशात असेल..... वास्तव = रहाणे / वास करणे ......बघावे लागेल

काल कुमार सरांनी कोशाची लिंक दिली होती तिथे हे आहे ---

समवेत
समवेत samavēta prep (S) Together with, along with. Ex. तेथें वाल्मिक ऋषि वास्तव करी ॥ बहुत ऋषीसमवेत ॥.
मोल्सवर्थ शब्दकोश

पोथ्या लिहायच्या काळात वास्तव = निवास असे असावे (किंवा मूळ काव्यात मुद्रणदोष )
आयुकावाले काय संदर्भ वापरतात काय माहीत?

वावे, छान होते !

इंग्लिशमधील ‘Anagram’ (विपर्ययी नवशब्द) खेळाचा प्रयोग मी मराठीत करून बघत आहे. तो सर्वांसमोर ठेवायची इच्छा आहे. सर्वांच्या सूचनांनी तो विकसित करता येईल. माझा आराखडा तयार आहे.

आता कोणी इच्छुक नसल्यास तासाने देतो.

कोडे होते छान, वावे...... चिमूटभर खगोलशास्त्र वाचले गेले त्यामुळे...
द्या कुमार सर, माझे तरी तयार नाहीये

द्या डॉक्टर.

अवनी कडून गूढ शब्दकोड्यांचा प्रतीक्षेत.

इंग्लिशमध्ये ‘Anagram’ (विपर्ययी नवशब्द). हा एक अनोखा आणि मेंदूला वेगळ्या प्रकारची चालना देणारा शब्दखेळ आहे. यात ९ सुटी अक्षरे दिली असतात. आता ती योग्य क्रमाने जुळवून अनेक किमान ४ अक्षरी अर्थपूर्ण शब्द करायचे असतात. तसेच प्रत्येक शब्दात एक ठराविक अक्षर हे सक्तीने घ्यायचे असते. जास्तीत जास्त किती शब्द होऊ शकतात त्याचा आकडा जाहीर केलेला असतो. आपण जितके शब्द करू त्या प्रमाणात आपल्याला उत्कृष्ट/मध्यम/साधारण अशी श्रेणी मिळते.

हा प्रयोग आपण मराठीत करून बघूया.
९ अक्षरे देतो. आपण किमान ३ अक्षरी शब्द करूयात. (जास्तीत जास्त ९ पर्यंत कितीही अक्षरी शब्द चालेल ).

काही नियम :
१. सर्व शब्द सामान्यनामे हवीत.
२. एकाच शब्दाचे एकवचन घेतले असल्यास त्याचे अनेकवचन चालत नाही.
३. सर्व शब्द अर्थातच अधिकृत हवेत.
४. जोडशब्द ( मध्ये – असलेले) नकोत.
५. प्रत्येक शब्दात एक ठराविक अक्षराचा नियम आपण ठेवायला नको. आधीच काना, मात्रा, वेलांटीने खेळावर मर्यादा येतात.
........

खालील अक्षरांपासून जमतील तितके किमान ३ अक्षरी शब्द करा.
का श थ
र वे प
द शी र

.... मला ११ जमलेत. तुम्हाला नक्कीच जास्त जमतील !
( दोन अक्षरी बिलकूल नकोत ).

*** स्पर्धात्मक ठेऊ. एकेक शब्द लिहू नका. अर्ध्या तासाने तुमची पूर्ण यादी लिहा व कंसात एकूण शब्दांचा आकडा.

१ अक्षर १ दा च वापरू शकतो ना >>> नाही. अनेक शब्द करायचेत.
एक शब्द करताना एक अक्षर एकदा.
एकेक नका लिहू एक्दम यादी

ह्रस्व दीर्घ महत्वाचे

अस्मिता  नियम बघा शेवटचा...
धन्यवाद . !

किमान तीन अक्षरी म्हणजे जास्तीत जास्त कितीही चालतील का ...
ह्रस्व दीर्घ महत्वाचे...
धन्यवाद आणि sorry !

झाली ना वेळ? अजून आली तर वाढवू की टाईम-अप?

का श थ र वे प द शी र
(१५) + ३ शब्दात अक्षर २दा वापरले
पदर, शरद, परका, रपका, शपथ, काशीद, थकावे,
दरवेशी, थरकाप, परदेशी, शरकार, दशरथ, पदकाशी, दशशीर, थरथर,
पदपथ, थपथप,
****************
शपथशीर, शपथकार, रथकार, रशीद, कापशी, कादर, दरकार

छान !
शरकार, ?? अर्थ

३ शब्दात अक्षर २दा वापरले >>> हे नको. एका शब्दात एक अक्षर एकदाच.

का श थ
वे प
द शी

दिलेल्या अक्षरांत र दोन वेळा दिला आहे.

एका शब्दात एक अक्षर एकदाच. >>> मी तेच विचारले होते..... नाहीतर मग खूप निघतील
थकावे>>> म्हणजे काय? >>> उरावे, जगावे तसे थकणे चे स्वरूप, नियमात बसतय का माहीत नाही.....

Pages