शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाले की सगळे.

कारवी, मानव :
मागच्या कोड्यातील...
घरबारी = गृहस्थाश्रमी;
चालेल हाही.
धन्यवाद.

घरबारी = गृहस्थाश्रमी; चालेल हाही. >>>> ओके, धन्यवाद...मला वाटले की दिसताना अर्थ सारखा दिसला तरी शब्दकोश / भाषा अभ्यासाच्या नजरेतून काही सूक्ष्म फरक असावा. माझा शब्दकोश वापर नाहीच होत जवळजवळ.

कारवी विज्ञान कोडे >>> तयार नाहीये हो.... आणि ते सर्वांना सोबत नेत नाही, ते चांगले नाही वाटत.

पोपटलाड, हबल कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं तुम्ही? हबल हे या कोड्यात आहे, पण तुम्ही बहुतेक चुकीच्या प्रश्नासाठी लिहिलंय.
कुमार सर, दहा लाख नाही.

सहा आडवे हबल>> येस.

व्यास १ लक्ष ?>> बरोबर.
५ आडवे - गैरसौरीय असा शब्द मराठीत मी तरी कधी ऐकलेला नाही. (गूगल केल्यावर हिंदीत वापरतात असं दिसतंय) पण तिथे इंग्रजी शब्दच अपेक्षित आहे.

४ उ -- केप्लर
७ आ -- तेजोमेघ - एकदम बरोबर.

२ आ जलावरणी ---
(habitable zone / Goldilocks zone --- at a precise distance from the star where liquid water can exist on planet surface without freezing / evaporating)

habitable zone / Goldilocks zone>> पर्फेक्ट!
यासाठीचा जलावरणी हा शब्द कुठे मिळाला कारवी?
हाच शब्द मला माहिती नव्हता.

Pages