शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users


ब ह हे
वा रा
व सा

आवाहन
साहेबराव
सर्व बरोबर .
झकास झाली नेमबाजी राव.
धनयवाद

होय, चौरा मध्ये दिलिप प्रभावळकर यांनी मतिमंद माणसाची भूमिका साकारली होती. बाकी चित्रपट मी पाहिले नाही किंवा आठवत नाही.

आने दो कोडा. हम इंतजार कर रहे हैं. कोडं देणाऱ्याने समारोपादाखल दोन शब्द लिहावेत. एखादी नवी बाजू समजेल इतरांना.

अक्षरसांगड खेळ

दिलेल्या ९ अक्षरांतून किमान २५ सामान्य शब्द बनवा. सर्व शब्द किमान ३ अक्षरी. पण एक ५ आणि एक ७ अक्षरी हवा. बाकी कसेही.

उत्तरे तुमच्याकडे फक्त तयार ठेवा. ४ तासांनी उघड करू.
……
यि ण स

का म र

वा व जा

अक्षरसांगड उत्तरे

३ अक्षरी :
समर सरण स र वा सवार सकार
सकाम सरजा वणवा वावर वारस वरण वारण
रवका रमण
मरण मणका मसण मकाण मवास
कासव कारण कासर
जारण वासर

४ अक्षरी
मवसर सणवार सकारण

५ आणि ७ अक्षरी

हे आधी तुम्ही सांगा !

Pages