शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५. प्राण्यापुढे अज्ञात वातायन (३) >>> गोखडा
गो = गाय
खडा = पुढे उभा
गोखडा >>>
>> छान
पण हे कोड्यात नीट बसत नाहीत.
खडा - उभा या अर्थी मराठी शब्द आहे का?
असला तरी उभा असे कोड्यात दिले नाही.
आणि कोड्यातील सगळ्या शब्दांचा हिशेब लागत नाही.

१.
. सवलतीत सूर द्या खूप वेगात. (३)
सुसाट
सुट सवलत
सा हा सूर

प्राण्यापुढे अज्ञात वातायन (३) >>> - गवाक्ष

गवा - प्राणी
बीजगणितात अज्ञा त संख्येसाठी क्ष वापरतात

वातायन = खिडकी = गवाक्ष

हडपसर

हडप गिळंकृत कर
माळ सर
...
हे मनोगती ना ? Bw

४ . ऐकणारा काठी घेतो बघणारा करतो दुर्लक्ष. (४)
ऐकणारा - कान त्या ला काठी म्हणजे काना - काना
बघणारा - डोळा

कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे

थोडी भर

मोल घेऊन देणे - विकणे
मोल घेऊन देशील - विकशील.

सर्व बरोबर.

स्वरा सारखा माणूस इसम
इ इंग्रजी स्वर > अ आ इ ई ..... मराठी स्वरच
सम सारखा

हे मनोगती ना ? >> नाही. मनोगत मध्ये असेल तर कल्पना नाही.

दोन पोपट:
दोन = दु
पोपट (एकवचनी) रावा.
पण कोड्यात दोन पोपट म्हणजे अनेकवचनी दिले आहे असे वाटणे सहाजिक आहे. दोन पोपट हे दोन्ही शब्द एकत्र वाचले तर.
ते एकत्रच वाचले पाहिजेत असा नियम नाही.

अर्ध्या तासात संपवली - मस्तच. सगळेच तरबेज झालेत आता. Happy

सान्न?
अभंगात असल्याचं माहिती नाही.

बरोबर !
आता पाककृती सांगा कुणीतरी..
मला माहीत नाही पदार्थ

Pages