मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
संतान ? >>>> नाही .....
संतान ? >>>> नाही ..... संसारचा समानार्थी सं ने सुरू होणारा
वेधला
वेधला
आरती ज्ञानराजा
मनु वेधला माझा
कम्प्यूटर मध्ये असा काही
कम्प्यूटर मध्ये असा काही अल्गोरिदम असतो का? सॉर्ट सारखी कमांड दिली की अनेक उत्तरं तयार होतात.
Submitted by पोपटलाड >>>>असेल ना..... पासवर्ड हॅकिंगला वापरत असतील ना
वेधला
वेधला
आरती ज्ञानराजा >>> पर्फेक्ट....
भरतकाका फार धार्मिक माणूस
भरतकाका फार धार्मिक माणूस आहेत, मी त्यांना कम्युनिस्ट समजत होतो. देवदेव करतात हे समजलं इकडे.
नकळे कोणत्या आरतीत आहे?
नकळे कोणत्या आरतीत आहे?
कारवी जी तुमचा पेशन्स खूप छान
कारवी जी तुमचा पेशन्स खूप छान आहे. तुम्ही चांगल्या शिक्षिका बनू शकता.
म धू भ र ता ती सृ गो सं
म धू भ
र ता ती
सृ गो सं
असंच काही नाही, कदाचित
Submitted by पोपटलाड on 9 August, 2020 - 14:22
असंच काही नाही, कदाचित ऑनलाईन आरतीसंग्रह उघडून पाहिला असेल.
No political labeling PLEASE. आमच्यासारख्यांसाठी कुठलातरी धागा नितळ राहू दे.
सॉरी.
सॉरी.
नकळे कोणत्या आरतीत आहे? >>>
नकळे कोणत्या आरतीत आहे? >>>
दत्तात्रेय ----- सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त | अभाग्यासी कैसी नकळे ही मात (---> गुपित)
संसृती
संसृती
तुमचे नाम ध्याता हरे संसृती व्यथा
आरती साईबाबा
म धू भ
म धू भ
र ता ती
सृ गो सं >>>> हे भरता, तुजप्रति अनेकानेक आभार
राहिलेले ती क्ल्यू -- एक मानवी देहधारी संत, एक मानवी देहधारी देव, एक शिरा प्रेमी
ऑनलाइन नाही. छापील आहे
ऑनलाइन नाही. छापील आहे माझ्याकडे.
तुम्ही निवडलेल्या सगळ्या आरत्या म्हटलेल्याही आहेत कधीकाळी.
संसृती >>> बरोबर
संसृती >>> बरोबर
उरलेले दोन लिहून टाकू? की बघताय अजून?
निवडलेल्या सगळ्या आरत्या नेहमीच्या सरावाच्या आहेत. उरलेल्या २च कमी माहीत / नैमित्तीक
म धू भ र ता गो
म धू भ
र ता गो
संस्कृती मला सुचलं होतं पण
संसृती मला सुचलं होतं पण नेमकं आठवत नव्हतं कुठे वाचलंय ते.
हे भरता, राहिलेले ती क्ल्यू -
हे भरता, राहिलेले क्ल्यू -- एक मानवी देहधारी देव, एक शिरा प्रेमी
गोधूम?
गोधूम?
गोधूम?>>>> बरोबर
गोधूम?>>>> बरोबर
सत्यनारायण ---- घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूम चूर्ण ( गव्हाचा रवा)
भरता राहिले खाली.
भरता राहिले खाली.
शेवटी माझं नावच राहतंय
शेवटी माझं नावच राहतंय
मगाशीच क्ल्यू दिला होता
मगाशीच क्ल्यू दिला होता त्यांनी. मला हे शब्द माहीत होते पण आरती नव्हती माहित.
वा, छान झाले.
वा, छान झाले.
पोपटलाड यांचे परिवारात स्वागत.
कोणी नवोदित उत्सुक नसल्यास मी १ तासाने देऊ शकतो. वामकुक्षी घेऊन या !
धन्यवाद.
द्या सर. कुणीही द्या.
द्या सर. कुणीही द्या.
शेवटी माझं नावच राहतंय Lol
शेवटी माझं नावच राहतंय Lol
सगळे कोडे संपवून सामनावीर भरत दशांगुळे उरले !!!
नवीन Submitted by भरत. >>>>
श्रीराम आरती --- उत्कट साधुनी शिळा सेतु बांधोनि
आनंदे वोसंडे वैराग्य भरता | आरती घेऊनी आली कौसल्या माता
मानव, कुमार सर, पोपटलाड चिकाटीने सोडवल्याबद्दल आभार.
अस्मिता, देवकी धन्यवाद.
कारवी, माबो गणेशोत्सवासाठी
कारवी, माबो गणेशोत्सवासाठी रोज एका आरतीचा अर्थ लिहून द्या. संयोजकांना कळवा आताच.
माझी सगळ्यात जास्त आवडती आरती शेजारती
आता स्वामी सुखे निद्रा
द्या कुमार सर..... पुन्हा
द्या कुमार सर..... पुन्हा सीईटी...
रोज एका आरतीचा अर्थ >>>
नको हो, मला लिहायचा सराव नाही. म्हणायला जास्त आवडतात.
काही गोष्टी माहीत असणे आणि त्यावर अधिकाराने बोलणे वेगळे. मौखिक काव्य असल्याने पाठभेद असतात.
आणि माझ्याहून जाणकार माबोकर खूप आहेत. कुठला विषय काय वळण घेईल सांगता येत नाही.
माझे आवडते निरोप गीत (जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा ...)
विसर्जनाच्या आदल्या रात्री चेहरा उतरलेला बाप्पा समईच्या प्रकाशात आणि हे गळा दाटवणारे शब्द.
एक गूढ शब्दकोडं दिलंय ....
एक गूढ शब्दकोडं दिलंय ....
कळू देऊ नका चुकवून म्हातारपण सबब (५)
उत्तर कळलंय.
उत्तर कळलंय.
पण दिलेला अर्थ लागला नाही.
Pages