नागपंचमी स्पेशल ऊंडे

Submitted by VB on 6 August, 2016 - 13:22

आमच्याकडे नागपंचमीला अळुची पातळ भाजी, भुजावणे, लाह्या - कुरमुरे सोबत ऊंडे मस्ट आहेत

तर नागपंचमीच्या निमीत्ताने ही पारंपारीक रेसीपी देतेय

लागणारा वेळ:
१ - १/४ तास
लागणारे जिन्नस:

गहु, तांदुळ, गुळ, फुटाणे, शेंगदाणे, खोबरे, तिळ, खसखस, सौंफ (बडीशेप), खाण्याचा सोडा, तेल

क्रमवार पाककृती:

प्रथम दोन वाट्या तांदुळ स्वच्छ धुवुन सुकवायचे ( हा वेळ वर धरलेला नाहीये)
अर्धा वाटी गहु घ्यायचे.
मग सुकलेले तांदुळ आणी गहु एकत्र करुन बारीक रव्यासारखे दळुन घ्यावे .
एक भांडे घेवुन पावकिलो गुळ पुर्णतः विरघळेल ईतक्या पाण्यात कालवायचा (अंदाजे दोन वाट्या पाणी)
गुळ पुर्ण विरघळल्यावर त्यात गहु-तांदुळ चे वरील पीठ घालुन असे कालवायचे की त्यातील सगळ्या गुठळ्या निघुन जाव्यात.
त्यात चिमुट्भर खायचा सोडा, एक मोठा चमचा अर्धवट वाटलेली बडीशेप, दीड मोठा चमचा खसखस, दोन मोठे चमचे तिळ, फुटाणे, भाजुन साफ केलेले शेंगदाने आणी सुक्या खोबर्याचे बारीक तुकडे प्रत्येकी चार मोठे चमचे घालुन व्यवस्थीत एकजीव होईस्तर कालवावेत.
गरज पडल्यास थोडे पाणी अजुन घ्यावे

नंतर एक केकचे पातेले घेवुन त्यात अंदाजे २५० मिली तेल घ्यायचे व त्यात ते कालवलेले मिश्रण ओतायचे.

तेलात मिश्रण ओतल्यास ते असे दिसते...

Untitled1.jpg

कन्वेक्शन मोड मध्ये मावे १८० डीग्रीला ४ मि. प्रीहिट करुन नंतर हे भांडे ठेवुन ते २०० डीग्रीला ४५ मि. सेट करा

वेळ पुर्ण झाल्यावर तो बाहेर काढुन गार होऊ द्या

खालची बाजु

3.jpg

वरील बाजु..
4.jpgUntitled.jpg

थोडा गार झाला की प्लेट मध्ये काढुन सर्व करु शकता.

जर मावे नसेल तर केक सारखे तवा आणी रेती वापरुन करु शकता

वाढणी/प्रमाण:

३-४ जणांसाठी

माहितीचा स्रोत:

आई

हुश्श.... प्रथमच ईतके सगळे लिहीलेय....... वाक्यरचना वा ईतर काही चुका असल्यास समजुन घ्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यालाही उंडे म्हणतात का? इथेच माबोवर गव्हाच्या पातीत पूरण भरवून ते वाफवून केलेल्या पदार्थाला उंडे म्हटलेलं वाचलंय.

मी उंडे हा पदार्थ नेटवरच ऐकलं/पहिला. कोकणात करतात का माहित नाही. आमच्याकडे नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातले पातोळे करतात. तोही प्रकार म्हटले तर ऊंडेच. फक्त गव्हाच्या जागी तांदूळ वापरतात.

ह्यालाही उंडे म्हणतात का? इथेच माबोवर गव्हाच्या पातीत पूरण भरवून ते वाफवून केलेल्या पदार्थाला उंडे म्हटलेलं वाचलंय.>> साधना! ते दिन्ड!

भुजावणे म्हणजे काय >>>

चने रात्रभर भिजत ठेवायचे अन सकाळी किंवा ते निट भाजुन घ्यावे, भाजताना थोडे थोडे मिठ घालावे

साधना याला खरतर ऊंडा म्हणतात पण मी ऊंडेच बोलते

दिनेशजी हा बेळगाव महाराष्ट्र सीमेजवळच्या भागात बनवतात

फोटो टाकायचेत पण जमत नाहिये

गव्हाची पात किती रुंद असते. त्यात पुरण भरायचे म्हणजे कौशल्य पणाले लागले.

फोटोसाठी वाट बघत आहोत. मस्त आहे उंडे.

आमच्या गावाकडे (जि. कोल्हापूर) नागपंचमीला हमखास बनवतात हे. बादवे, आम्ही लहानपणी ह्याला चक्क 'हुंडा' म्हणायचो.

शाळेत सरस्वती काढून आलो की गल्लीत शाहीरगाण्याचा कार्यक्रम आम्ही ऐकत असायचो तेव्हां आई/आजी हुंडे करत असायची. गाणे संपवून आम्ही हजर होईतो नैवेद्य वगैरे आटोपलेला असायचा... मग काय, ताव मारायचा हुंड्यांवर Biggrin

गव्हाची पात किती रुंद असते. त्यात पुरण भरायचे म्हणजे कौशल्य पणाला लागेल.>>

हर्ट, आय डोंट वाँट टू हर्ट यू, पण हे तुम्ही विनोदाने लिहिलंय की नेहमीच्या भाबडेपणाने?
Happy

गव्हाची पात किती रुंद असते. त्यात पुरण भरायचे म्हणजे कौशल्य पणाला लागेल.>> Lol

हर्ट, आय डोंट वाँट टू हर्ट यू, पण हे तुम्ही विनोदाने लिहिलंय की नेहमीच्या भाबडेपणाने?>> Lol

> साधना | 7 August, 2016 - 00:12
ह्यालाही उंडे म्हणतात का? इथेच माबोवर गव्हाच्या पातीत पूरण भरवून ते वाफवून केलेल्या पदार्थाला उंडे म्हटलेलं वाचलंय.>>

>हर्ट | 8 August, 2016 - 02:04
गव्हाची पात किती रुंद असते. त्यात पुरण भरायचे म्हणजे कौशल्य पणाले लागले.>>

साधनाचीच चूक आहे. तिने पारीऐवजी पातीत का बरं म्हटलं ? Wink

:). :). मला कसला किडा चावलेला माहित नाही पण मी उंड्यांमध्ये भरपूर घोळ घातलेला आहे. आता उतारा म्हणून करून पाहावे काय??

ह्यालाही उंडे म्हणतात का? इथेच माबोवर गव्हाच्या पातीत पूरण भरवून ते वाफवून केलेल्या पदार्थाला उंडे म्हटलेलं वाचलंय. >> मीही जरा गोन्धळलेच की . गव्हाची पात म्हणजे मलाही गव्हांकुरच आठवले Happy

मस्त आहेत . आम्ही पातोळ्यावाले. Happy

तेलात गोड पदार्थ जरा विसन्गत वाटते, तेलात तिखट्,नमकिन आणी तुपात गोड पदार्थ चविला खुलुन येतात.
एन्ड प्रोडक्ट छान आहे.

तेल जरा जास्त आहे खरे पण एकदा ऊंडा शिजला की भांडे थोडे घसरणीला लावुन (तीरके किंवा जाळीवर ठेवुन) जास्तीचे तेल काढता येते.

आमच्याकडे हे तेलातच शिजवतात तुप नाही वापरत

Happy

मी खरेखरेंच विचारले होते. माझी एक कोकणी कलीग कशाकशाच्या पानामधे पदार्थ करायची. कधी हळदीचे पान, तर कधी फणसाचे पान, कधी अळूचे पान, तर कधी नागलीचे पान Happy

वाह ! किती मस्त रेसिपी आहे.
फोटोवरुन वाटतंय की चवीलाही नक्कीच भारी असणार Happy
एकदम सहज कृति अन् पौष्टिक पदार्थ ईथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद VB

एकदम सहज कृति अन् पौष्टिक पदार्थ ईथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद VB >>> Rofl

पावकिलो तेलात बनविलेला पदर्थ पौष्टीक Uhoh

भारीच गम्म्त कर्ता राव तुम्ही Biggrin

Pages