https://www.maayboli.com/node/75204 (1)
https://www.maayboli.com/node/75214 (2)
https://www.maayboli.com/node/75292 (3)
https://www.maayboli.com/node/75371 (४)
https://www.maayboli.com/node/75438 (5)
(रानाईची गढी !!..भाग -6 ) सारंग ने उचललाच नाही, पण ऋता चा लागला.
“ हॅलो , ऋता , देवयानी बोलतेय .. “
“हाय देवी , अगं हा कुठला नंबर आहे ? आहेस कुठे तू ? तुझा मोबाईल पण लागत नाहीये . ”
“ कमाल आहे , मी सुहृद बरोबर आले नाही का ,अमरापूरला ? तिथलाच आहे हा नंबर आणि तुम्ही सगळीजणं केव्हा येणार आहात ? “
“ भेंडी ssss तू एकटीच तिकडे काय कारतीयेस ? मंद आहेस का जरा ?.. “
“ म्हणजे ? अगं सुहृद घ्यायला आला मला , आणि तो म्हणाला की तुम्ही सगळे नंतर येणार म्हणून . “
“ तू पण चंपकच आहेस , ग्रुप वर एक मेसेज तरी टाकायचास ”
“ मग तुम्ही कोणी का नाही टाकला ? ते मरू दे , तुमचं काय झालं यायचं ? “
“ आमचं काय झालं काय? सुहृद ने फोन करून सांगितलं की गढीला जायचं कॅन्सल झालं आणि तो तुला तुझ्या घरी ड्रॉप करून पुढे जाईल . मग मध्येच हे काय ठरलं ? “
“ ऋता मला काय माहिती बाळे अगं ? एक तर आल्यापासून इथे काही ओके वाटत नाहीये मला , मी बाबांना पण फोन करून सांगितलंय , आज त्यांचा फोन पण येऊन गेला असेल , मी बाहेर गेले असताना . मोबाईलला रेंज नसल्यामुळे ,कोणाशी पट्कन कॉन्टॅक्टच होत नाही , ते काही नाही मी आजच्या आज सुहृद शी बोलून “ The End “ करून टाकते सगळ्या चमत्कारिक गोष्टींचा आणि उद्या सकाळी इथून निघते . “
“ हो त्या बावळट सुहृदलाच सांग तुला सोडायला ,तुझ्या सोनेरी रंगाच्या आणि खंडीभर तिळांच्या प्रेमात पडला असेल ,म्हणून तुला एकटीला तिकडे नेऊन गढी दाखवून , इम्प्रेस करून प्रपोज करणार असेल “
“गप्प बैस मूर्खां .इकडे माझं काय चाललंय , तु काय बोलतेयस .अगं तुला गम्मत माहितीये ? सुहृदला इथे , कंठाजी राव म्हणतात “ यावर दोघी खळखळून हसल्या.
, ऋता शी बोलून झाल्यावर खरं तर देवयानी अजून गोंधळात पडली होती , सुहृद ने चक्क खोटं बोलून तिला ईथे आणलं होतं , आणि ती किती विश्वासाने त्याच्याबरोबर आली होती , क्षणभर तिला वाईट वाटलं , आज आत्ताच त्याच्याशी बोलून घेऊ , समोर कोणी असो वा नसो, आता कोणाला काय वाटेल याचा विचार करायचं काही कारण नाही , दुपारी वसुंधरा नाही का सरळ निघून गेली , तिने विचार केला का आपला ? इथे इतके सिग्नल्स मिळतायत आपल्याला , तरी दुर्लक्ष करणं म्हणजे मूर्खपणा ठरेल . खोलीची अवजड कडी कशीबशी ती लावतच होती तेवढ्यात संध्याकाळच्या चहाचा ट्रे घेऊन एक नोकर आला , ती त्याला काही विचारणार तोच लांबून वसुंधराही येताना तिला दिसली. बाहेर झोपाळ्यापाशी ये अशा अर्थाने तिने खूण केली , मग देवयानी बाहेर झोपाळ्यावर येऊन टेकली , थोड्याच वेळात वसुंधराही पोहोचली , तिच्या शेजारी बसत म्हणाली , “ काय मग विश्रांती झालीच नाही म्हणायची ? चेहेरा अजूनही सुकलेला दिसतोय . “
“हो ना अगं फोनवर बोलत होते .”
“ एवढा वेळ ? ‘
“ नाही गं एवढा वेळ तर नंबर ट्राय करण्यातच गेला , मग कसा बसा लागला तर थोडं बोलले नाही तोच कट झाला ,बरं तू थांबतेस पाच मिनिटं ? मी साडे तीन मिनिटात फ्रेश होऊन येते “देवयानी मिश्किल हसत म्हणाली आणि खोलीच्या दिशेने पळाली , चेहेरा टॉवेलने पुसत जेव्हा देवयानी बाहेर आली , तेव्हा वसुंधरा तिच्याकडे निरखून पाहू लागली . “ देवयानी , तुझ्या उजव्या गालावर , ओठांच्या खाली उजव्या बाजूला , हनुवटीवर , कंठाच्या खाली , भिवयांच्या मध्यभागी आणि मानेवर , हे जे टपोरे तीळ आहेत ते सगळे खरे आहेत ?
“हो म्हणजे काय ? तिळांचा मेक अप कसा करिन मी ?, सगळे एकदम ओरीजिनल “
“ओ वाव , खूप cute दिसतायत , सकाळी प्रताप दादा पण म्हणत होता.”
“काय ? “
“हेच की तुझं खरं सौंदर्य , तुझ्या सोनसळी गोऱ्या रंगात नसून तुझ्या ब्राऊन तिळांमध्ये आहे “यावर देवयानीच्या डोळ्यासमोर सकाळी ओझरता पाहिलेला राजबिंडा प्रताप उभा राहिला , आणि तिचे गाल आरक्त झाले .
तेवढ्यात पुन्हा एकदा ती काळीज चिरत जाणारी भेदक किंकाळी ऐकू आली . देवयानीने वसुंधरे कडे पाहिलं , ती उठून उभी राहिली होती . तिचा चेहेरा कमालीचा गंभीर झाला होता . पाच एक मिनिट शांततेत गेली असतील ,मग मात्र देवयानीने वसुंधरेचा हात पकडून तिला जोरजोराने हलवीत विचारलं , “ ही कोण आहे वसुंधरा ? तिची किंकाळी ऐकली की माझा प्राण कंठाशी येतो , आल्या दिवसापासून मी ही ऐकते आहे , काय आहे हे ? “
“ती ‘रानाई’ आहे !!!!... . “ वसुंधरा खाली मान घालून गंभीर होत म्हणाली .
“रानाई !.. ? कोण रानाई ? हे तर तुमच्या गढीच नाव आहे ना ? “
“ होय , जिच्यावरून या गढीला हे नाव पडलं ती . रानाई , “देवयानी , इथे अशी वदंता आहे की गढीच्या पाया भरणीच्या वेळेला , पाया भक्कम रहावा , ही गढी ,चिरकाल सुरक्षित आणि मजबूत रहावी म्हणून तिचं संरक्षण करण्यासाठी काही अमानवी शक्तींना आवाहन केलं गेलं होतं , त्यावेळेला त्यांनी एका गरोदर स्त्रीचा बळी मागितला होता , हौसाक्काच्या वंशजांपैकी कुणीतरी हि जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि या ‘रानाई’ चा बळी दिला . “
“आई ग !.. “ देवयानी कळवळून म्हटली .
“ हं .. ‘रानाई ‘ही त्यांचीच कुणीतरी नातेवाईक होती , घरची गरिबी ,बाळंतपण परवडत नाही हे बघून हौसक्काच्या पूर्वजांपैकी कोणीतरी तिला आपल्या घरी रहायला बोलावलं , आणि गढीच्या पायाभरणीच्या वेळेस पूजा करायला म्हणून तिला एका खोल खड्ड्यात उतरायला लावलं , बिचारी मोठ्या विश्वासानं उतरली तोच वरून कोणीतरी माती लोटली , त्याच क्षणी तिला हे कुटील कारस्थान कदाचित कळलं असावं आणि प्राणभयाने तिने किंकाळी फोडली . तुला ऐकू येणारी ती किंकाळी हीच .”
“ बापरे ! … … हॉरिबल आहे हे सगळं .. “ देवयानीला विश्वास ठेवणं कठीण जात होतं .
“ हं … मग तिच्या बलिदानाची आठवण म्हणून , गढीच नाव ‘रानाईची गढी ‘असं ठेवलं , पण देवयानी ही किंकाळी अशी कधीही नाही ऐकू येत . “
“ मी आल्यापासून रोज ऐकतेय , कधी कधी दिवसातून तीन वेळा … “
“काय सांगतेस ? “
“ हो , खरं तेच सांगतेय , infact सुहृदला मी विचारणार होते कालच , पण तो मला भेटतच नाहीये , “
“ म्हणजे , आल्यापासून तु एकटीच आहेस ? “
“ सोना , i mean मुकी आहे सोबतीला , बाकी कोणी नाही . “
“ ओह , this is not fair , मी बोलते भाईशी , आणि अजून एक सांगू ? वाईट वाटून घेणार नसशील तर ?”
‘ नाही बोल ना “
“तू उद्याच्या उद्या इथून बाहेर पड , “
“ का? “
“ मी सांगतेय म्हणून , आणि लक्षात ठेव आपल्या या संभाषणाबद्दल कोणालाही सांगू नकोस , इनफॅक्ट मी भाई ला सांगते तुला उदयाच्या उद्या सोडायला “
“ अगं मी जाणारच आहे , तसं मीही ठरवलंच होतं , पण कारण तर सांगशील ? “
“ कारण कसं सांगू तुला ? बरं ऐक असं म्हणतात की ज्याला ही किंकाळी ऐकू येते त्याच्यावर प्राणघातक संकट येणार असतं , “
“ What rubbish !..माझा काय संबंध ? रानाई बद्दल पसरलेल्या अफवेचा फायदा घेऊन कुणी तरी मुद्दाम सुद्धा हे करू शकतं “ वसुंधरेने तिचे हात आपल्या हातात घेतले , “तू विश्वास ठेव अगर नको ठेवूस , तुझी मर्जी , पण आत्ता या क्षणी फक्त तु सुखरूप तुझ्या घरी पोहोचावीस असं ,मला मनापासून वाटतं आहे , प्लिज !.. “
“ठीक आहे , मग तूच व्यवस्था कर तशी , मला तर बाहेर कुठून जायचं हे देखील ठाऊक नाही “ देवयानी हसत म्हणाली .
“करते , आत्ता लगेच माँ शी बोलून तुझी व्यवस्था माझ्या शेजारच्या खोलीत करायला लावते ,माँ नी तुला असं एकटीला पाठीमागे का ठेवलंय कळत नाही , बरं चल मी निघते , रात्री जेवणाच्या वेळेस भेटू , बाय !.. “
“बाय !.. “
वसुंधरा जिना उतरून जाताच तिला बाय करून आपल्या खोलीकडे वळण्याऐवजी देवयानी अचानक पाठीमागे वळली आणि त्याच वेळी कोणीतरी तिला घाईघाईने शेजारच्या खोलीत शिरताना दिसलं .
आता कसली जाते देवयानी इथून.
आता कसली जाते देवयानी इथून. छे.
सस्पेंस n थ्रिल सुरु. मस्त.
मस्त चालू आहे. उत्कंठावर्धक
मस्त चालू आहे. उत्कंठावर्धक भाग आहे.
बळी द्यायला आणलाय का
बळी द्यायला आणलय का देवयानीला? तीळाचा संदर्भ तसाच वाटतोय.
वाचतेय.
उत्कंठा वाढलीय खूप . लवकर
उत्कंठा वाढलीय खूप . लवकर पूर्ण करा कथा
तिळा तिळा दार उघड
तिळा तिळा दार उघड
भन्नाट.... रानाईच्या नावाचं
भन्नाट.... रानाईच्या नावाचं गूढ तर उकलल... आता देवयानीच काय होणार याकडे उत्सुकता लागली आहे
मस्त.. पुढच्या भागाची खूप
मस्त.. पुढच्या भागाची खूप उत्सुकता लागली आहे.
आई शप्पथ.. भारीच
आई शप्पथ.. भारीच
खूप उत्कंठावर्धक कथा...
खूप उत्कंठावर्धक कथा...
मस्तच
मस्तच
भारी आहे कथा..
भारी आहे कथा..
डेंजर सुरुय एकदम
डेंजर सुरुय एकदम
Desperately waiting for next
Desperately waiting for next part
भारीच.
भारीच.
मस्त चाललीय.
मस्त चाललीय.
हा भागही मस्त!
हा भागही मस्त!
वाचत आहे.
वाचत आहे.
आता जास्त उत्सुकता वाटतेय.
आता जास्त उत्सुकता वाटतेय.
मस्तच !!!
मस्तच !!!
खूप उत्कंठावर्धक कथा...
खूप उत्कंठावर्धक कथा... पुढच्या भागाची खूप उत्सुकता लागली आहे.
डेंजर सुरुय एकदम>>>+१
डेंजर सुरुय एकदम>>>+१
छान सुरू आहे.वाचतेय.
छान सुरू आहे.वाचतेय.
थोडे मोठे भाग टाका.
वाचतेय छान चालूये कथा
वाचतेय
छान चालूये कथा
मस्त... एकदम योग्य ठिकाणी
मस्त... एकदम योग्य ठिकाणी संपवलाय
कथेवरचे प्रतिसाद वाचुन कथा
कथेवरचे प्रतिसाद वाचुन कथा वाचावीशी वाटतेय. पण लेखिकेने पूर्ण नाही केली तर या भीतीने वाचत नाही . खुपश्या लेखकांनी कथा अर्धवट सोडल्या आहेत म्हणून उगीच कथेत गुंतून जायला नको वाटते.