अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??

माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.

माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.

आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.

आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?

आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.

आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरती त्यांनी नमुना बिल असे लिहिले आहे ते सोयीस्कर वाचले नसणारच तू
ओळख लपवून बिल सादर करता येते हे त्यांनी दाखवुन दिले आहे
त्यामुळे तुझे अधिचे सगळे कांगावे सोड आणि बिल किती आले खरोखर हे दाखव
नाहीतर नेहमीप्रमाणे थापा मारतो आहेस हे सिद्ध होईलच

वीज म़ंडळाने बिलाचा हिशोब बरोबर केला नाही ( credit for paid bills • enhanced slabs) हे आरोप पुरावा न देता केल्याने वीज मंडळाची बदनामी होत नाही का?
अमिताभने चालत जाऊन सुसू केल्याची बातमी आजतकच्या नावावर खपवल्याने त्यांची बदनामी होते याची खूप काळजी आहे.

वीज म़ंडळाने बिलाचा हिशोब बरोबर केला नाही ( credit for paid bills • enhanced slabs) हे आरोप पुरावा न देता केल्याने वीज मंडळाची बदनामी होत नाही का?
>>>>>

याची जगभर बोंबाबोंब होतेय.
मंडळानेही दखल घेतली आहे

नाहीतर नेहमीप्रमाणे थापा मारतो आहेस हे सिद्ध होईलच
>>>>>

मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतानाचे त्यांचे राजकीय विरोधक आठवत आहेत मला.

तिथेही जनतेला सत्य माहीत होते
ईथेही जनतेला सत्य माहीत आहे Happy

वरती त्यांनी नमुना बिल असे लिहिले आहे ते सोयीस्कर वाचले नसणारच तू
>>>>

सोशलसाईटवर कोणी आपले फोटो टाकतात तर कोणी नाही.
एकाने पाठमोरा फोटोचा नमुना दाखवून दुसरयाला म्हटले की तू असा तरी टाक यात ओळख लपून राहील तरी तो टाकायचा की नाही याचा निर्णय ज्याचा त्याचा. तसेच आहे हे.

Submitted by आशुचँप on 18 July, 2020 - 13:42

धन्यवाद. पण तो प्रतिसाद ऋन्मेषकरिता नव्हताच त्यामुळे त्याच्या तथ्यहीन युक्तिवादांना प्रत्युत्तर देण्यातही काही अर्थ नाही. भरमसाठ वीजबिलाने त्रस्त झालेला खरोखरच कुणी प्रामाणिक तक्रारदाता आहे का जो आपली ओळख उघड व्हायच्या भीतीने वीजबिलाचे तपशील इथे द्यायचे टाळतोय ते पाह्यचे होते. असा कोणी खरोखरीचा प्रामाणिक तक्रारदाता वीजग्राहक नाही हे सिद्ध झाले आहे.

चला. शेवटी फेकूपंथाला उघडपणे जावेच लागले.
नवीन Submitted by भरत. on 18 July, 2020 - 14:25
>>>>

तुम्ही मोदींचे विरोधक आहात म्हणून तुम्ही त्यांचा उल्लेख फेकूपंथीय करत आहात.
मी तटस्थपणे त्या घटनेला बघतोय त्यामुळे माझ्या उदाहरणात त्यांचे उदाहरण तटस्थपणेच आलेय Happy

मालकाचे वीज बिल टाकायचे की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.
तुम्ही खुशाल नाझे बिलाचे ढोंग आहे असा अर्थ काढू शकता हे मी आधीही म्हणालो आहे.

पण महाराष्ट्रभर जो वाढीव बिलाने गोंधळ घातला आहे त्या सगळ्यांबद्दल आपल्याकडे काहीच उत्तर नाही Happy

असा कोणी खरोखरीचा प्रामाणिक तक्रारदाता वीजग्राहक नाही हे सिद्ध झाले आहे.
नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 18 July, 2020 - 14:28

>>>>>

हे म्हणजे आमच्या गल्लीत कोणाला करोना झाला नाही म्हणजे जगात कोणाला कोरोना नाहीयेच. लोकं ढोंग करत आहेत.
अहो कधी न्यूज बघितल्या असत्या तरी हे समजले असते की महाराष्ट्रभर किती गोंधळ चालू होता. लोकांचे साताअठ पट काय पाचशे र हजार बिल येणारया बाईचेही साठ हजार आलेले पाहिलेय. अर्थात तिच्या बिलाचा तिच्यासह फोटो माझ्याकडे नाहीये. तो घेण्याची आणि कोणाला सिद्ध करून दाखवायची गरजही नाही भासली.

बस कर रेतुझा भंपकपणा
खोटं ते खोटं वर आव नैतिकतेचा
जर माहिती द्यायची नव्हती तर धागा काढायचीच आवश्यकता नव्हती
जे खरोखरच त्रासले आहेत त्यांनी काय ते बघून घेतलं असतं
तुला फक्त मुद्दा लागतो काहीतरी भांडवल करायला
त्या प्रश्नाशी काहीही घेणेदेणे नसते हे अनेकदा सिद्ध झाले आहे
तुला फक्त काळजी की टीआरपी मिळतोय का नाही
तुझी आणि न्यूज चॅनेल ची मानसिकता सारखीच आहे
कोणी मेले जगले यापेक्षा आपल्याला लोकं बघत आहेत, वाचत आहेत, आपल्याबद्दल बोलत आहेत याचीच चिंता जास्त
मानसिकता अत्यंत घाणेरडी आहे हे मागेही बोललो होतो तेव्हा मायबोलीकर अंगावर आले धावून
पण मी आजही तेच म्हणतोय

{{{ मालकाचे वीज बिल टाकायचे की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे.
तुम्ही खुशाल नाझे बिलाचे ढोंग आहे असा अर्थ काढू शकता हे मी आधीही म्हणालो आहे. }}}

हा प्रतिसाद लिहित असेपर्यंत मायबोलीवरच्या एकूण आयडींची संख्या 76774. त्यापैकी सक्रिय (धागे अथवा प्रतिसाद टाकणारे) आयडी ५००० पेक्षा जास्त नाहीत. या पाच हजारांमधला एक जर बिलाचे ढोंग करत असेल तर

{{{ पण महाराष्ट्रभर जो वाढीव बिलाने गोंधळ घातला आहे त्या सगळ्यांबद्दल आपल्याकडे काहीच उत्तर नाही }}}

महाराष्ट्रातल्या १० कोटी जनतेपैकी वीस हजार लोकांनी जरी आपल्याला वाढीव बिल आले आहे असे ढोंग केले तरी तो आकडा न्यूज चॅनेलमध्ये मोठा दिसणारच. शिवाय या ढोंगी समस्येवर समोरच्याकडे उत्तर नाही हे आपण परस्परच ठरवले आहे याचा अर्थ इथे अनेक अभ्यासू मंडळींनी मेहनतीने विविध सूत्रानुसार बिलाच्या आकारणीची जी फोड करुन दाखविली आहे ती सगळी गाढवापुढे वाचलेली गीताच ठरली की.

वीज बिल हे काय रॉकेट सायन्स आहे का?

चालू रीडिंग - मागचे रीडिंग = या महिन्यातला वीज वापर (यूनिट्स)

वीज वापर युनिट्स मधील आधीचे शंभर युनिट्स गुणिले किमान दर +
वीज वापर युनिट्स मधील शंभर च्या नंतरचे व तीनशे पर्यंतचे युनिट्स गुणिले दुसर्‍या टप्प्यातले दर +
वीज वापर युनिट्स मधील तीनशे च्या नंतरचे व पाचशे पर्यंतचे युनिट्स गुणिले तिसर्‍या टप्प्यातले दर +
वीज वापर युनिट्स मधील पाचशे च्या नंतरचे युनिट्स गुणिले चौथ्या टप्प्यातले दर + इतर सर्व प्रकारचे स्थिर आकार + मागील थकबाकी (असल्यास) + विलंब आकार (असल्यास)

इतके सोपे गणित आहे. यातील रीडींग हे फक्त चूकीचे असू शकते. बाकी गणित हे संगणकावर घडत असल्याने चूकण्यासारखे काय आहे?

आणि समजा चुकले असेलच तर ती चूक धडधडीत इतर सर्वांनाच दिसेल ना? त्याकरिता फक्त बिलावरचे तपशील इथे मांडायचा उशीर.

आपण इथे असा तपशील स्वतः द्यायचा नाही आणि वर बिल जास्त आले असा कांगावा करायचा याला काहीएक अर्थ नाही.

बरं समजा तुम्हाला बिलाचा फोटो (ग्राहक क्रमांक, नाव, पत्ता व बिलिंग युनिट खोडूनदेखील) टाकायची इच्छा नसेल तरी तुमच्यात थोडा जरी प्रामाणिकपणाचा अंश असेल तर तुम्ही इथे मांडू शकता की -

तुमचे या महिन्याचे नेमके किती यूनिट्स वीजवापर दर्शविला आहे? त्याला योग्य त्या दरानुसार गुणले आहे का?

तुम्हाला स्वतःलाच कळेल की नेमके कुठल्या टप्प्यावर गणित चूकले आहे? की रीडींगच चूक आहे? संपूर्ण बिलच वाढीव आहे असे म्हणण्यापेक्षा नेमका कुठे दोष आहे तो पॉईंट आउट करा. नाहीतर नुसताच धुरळा उडवायचा तर त्याचा प्रामाणिक तक्रारदात्यांना (जे तुमच्या मते आहेत) काहीच उपयोग नाही.

तो त्यांचा प्रश्न आहे, ज्यांना खरोखरच उत्तरे हवी असतात ते बरोबर शोधतात नुसते कांगावे करत नाहीत
तू त्या पेक्षा अमिताभ ची काळजी कर
तुझ्या दांभिकपणाला तेच साजेसे आहे

बिपीन सर तुम्ही कोणाला समजवताय अहो
चीनचे फोन नकोत म्हणून धागा काढून ओपो आणि किंवा रेडमी फोन घेणारा ढोंगी आहे हा
वर म्हणतो धागा सुरू राहू दे, बाकीच्यांना उपयोग होईल
म्हणजे सगळं लक्ष फक्त धागा सुरू राहण्यात
बाकी मरेनात का कोणी त्याला काय फरक पडतो

नाही आशूजी त्याला समजावण्याची इच्छा / गरज / उपयोग अजिबात नाही. तो किती ढोंगी आहे हे त्याच्या इथल्या पाठीराख्यांना समजलं तरी पुरेसं आहे.

Screenshot_20200718-152807.png. हे माझ्या बाबांच्या घरी आलेल बेस्टच बिल . मागील तीन महिने दर महा ७१० भरले तरी पण जुलैमध्ये दोन हजार च्या वर बिल आले आहे . त्यांच्या तक्रार विभागाला मी फोन करणारच आहे परंतु तोवर मला या चं विश्लेषण कुणी करून सांगितल तर बर. अजून कुणाला बेस्टचा अव्वाच्या सव्वा बिल आलंय का

अवांतर प्रतिसाद टाळावेत अन्यथा माझा प्रतिसाद इग्नोर केला तरी चाले ल

अंदाजपत्रक बिलं यायच्या आधीच न मीटर रीडिंग झालं तेव्हाचे युनिट आणि तारीख आणि या बिलातले मीटर्ड युनिट आणि रीडिंग ची तारीख काय? थोडक्यात मारली ते जुलै consumption किती?
मार्च ते जून १९ मध्ये किती कंझम्प्शन होतं?

भरतजी, धन्यवाद

आपण दिलेली लिंक पाहिली त्यात व्यवस्थित एक्सप्लेन केले आहेत . मला वाटले तसे अव्वाच्या सव्वा आकारणी केली नाहीये असं दिसतंय. पुन्हा एकदा डिटेलमध्ये पाहिन धन्यवाद

ज्यांना खरोखरच माहिती हवीय ते घेत आहेत असं दिसतंय आणि कांगावा करणारे गायब आहेत हेही

बिपीन सर त्याचे पाठीराखे त्याच्या सारखेच आहेत
त्यांच्याकडे एकच उत्तर आहे इतका त्रास होतोय तर इग्नोर करा की त्याला
कुणी सक्ती केलीये

आमचे मागच्या महिन्याचे बिल बरेच जास्त आले होते.
MSEB ने पेमेंट हिस्टरी मध्ये ती रक्कम लिहिली आहे आणि या महिन्याचे बिल 0 रुपये आले आहे. तसंच, थकबाकी / चालू वीज देयक (मायनस, negative, ऋण) रक्कम दाखवली आहे.
म्हणजे पुढच्या महिन्यात ते ऍडजस्ट होऊन बिल कमी येईल.

धन्यवाद आशूजी. निदान मी नमूना बिल इथे टाकल्यावर मेघाएसके यांनी देखील त्यांच्या वडिलांना आलेले वीज बिल इथे सादर केले आणि त्यांचे शंकानिरसन झालेले दिसते आहे. पीनी यांनीही व्यवस्थित स्पष्टीकरण दिले आहे आणि पोस्टर बॉय गेल्या चार तासांपासून गायब आहे.

हेही नसे थोडके.

पोस्टर बॉय गेल्या चार तासांपासून गायब आहे
>>>
पोस्टर बॉय म्हटल्याबद्दल धन्यवाद. माझे ऑर्कूट समूहांवरचे मित्रही मला या नावाने हाक मारायचे. जुने दिवस जुने मित्र आठवले Happy

आमचे मागच्या महिन्याचे बिल बरेच जास्त आले होते.
MSEB ने पेमेंट हिस्टरी मध्ये ती रक्कम लिहिली आहे आणि या महिन्याचे बिल 0 रुपये आले आहे.
>>>>

आताचे बिल शून्य म्हणजे आधीचे चुकीचे जास्त आले होते

मी सुद्धा आता या बिलाची वाट बघतोय. अजून आले नाहीये. मागचे आम्ही अजून भरले नाहीये.

मी सुद्धा आता या बिलाची वाट बघतोय. अजून आले नाहीये. मागचे आम्ही अजून भरले नाहीये.>>
भरुच नका. तुम्हाला खर तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

निर्लज्जम सदासुखी
नवीन Submitted by आशुचँप on 18 July, 2020 - 21:26
>>>>>>

सुखी होण्यासाठी हि फार कमी किंमत आहे Happy

भरुच नका. तुम्हाला खर तर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
>>>>
चालेल Happy
पीनी यांना शून्य रुपये बिल आले ही आशादायक बाब आहे

पोस्टर बॉय म्हटल्याबद्दल धन्यवाद. माझे ऑर्कूट समूहांवरचे मित्रही मला या नावाने हाक मारायचे. जुने दिवस जुने मित्र आठवले>>>> मूर्ख कुठचा

Pages