अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??

माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.

माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.

आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.

आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?

आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.

आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एप्रिल ते जून हा एक कालखंड धरून सगळे स्लॅब्सही २.३३ ने गुणून वाढवले आहेत.
पहिला स्लॅब २३३ युनिट्स गुणिले ३.४६ = ८०६ रु
दुसरा ४६६ युनिट्स गुणिले ७.४३ = ३४६२ रु
तिसरा उरलेले १५७ युनिट्स १०.३२ = १६२० रु.
एकूण विद्युत भार ५८८८.

म्हणजे मार्चपासून तीन सरासरी बिलं काढताना गृहित धरलेल्या सरासरी वापरापेक्षा प्रत्यक्ष वापर ११२६ वजा १९२ गुणिले ३ = ५७४ यापेक्षा ५५० ने जास्त म्हणजे जवळपास दुप्पट आहे.

आताचं प्रत्यक्ष बिल जास्त आलं असं म्हणण्यापेक्षा सरासरी बिलं खूप कमी लावली गेली असं म्हणायला हवं.
२०१९ सालीही एप्रिल मे साठी ते तिसर्‍या स्लॅबमध्ये जात होते. पण सरासरी बिलात दोनच स्लॅब लागलेत.

भरत + 1
सरसकट चुकीचेच बिल आले असा बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला असावा

एकंदर इथे नॉर्मली ३-५ हजार रुपयांची घरगुती वीजबीलं सुद्धा येतात हे वाचुन मला घेरी यायचीच बाकी राहिलं. उभ्या जन्मात मी पहिल्यांदाच लाईटबील २४६० रुपये इतकं भरलं..!

घरात इन्वर्टर असेल तर मुळात येणाऱ्या बिलापेक्षा ते बिल दीड पट जास्तच येते. त्यामुळे जिकडे इतर अप्लाइंसेस + इन्वर्टर असेल तिकडे ३ हजार बिल महिन्याचं म्हणजे कमीच रक्कम असेल (२ bhk करिता). हीच रक्कम १२ते१५०० यायला हवी तर तसेही उपाय उपलब्ध आहेतच.

>>आताचं प्रत्यक्ष बिल जास्त आलं असं म्हणण्यापेक्षा सरासरी बिलं खूप कमी लावली गेली असं म्हणायला हवं.

अगदी बरोबर भरत. तुम्ही केलीय तशी आकडेमोड केली की चित्र स्पष्ट होतं. बरेच जण गणित समजून घ्यायच्या आधीच महामंडळाच्या नावाने बोटं मोडताहेत. जर तुमचं मीटर रिडींग बरोबर असेल तर बिलाची रक्कम व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेली आहे.

६०००० वगैरे बिल आलेल्या लोकांचं रीडिंगच चुकीचं असणार. मीटरवर साचलेल्या धुळीमुळे शून्याऐवजी आठ आकडा वाचला गेल्याचं उदाहरण माहीत आहे मला

ऍमी वेलकम बॅक - सुडो फेमिनिस्ट चा सुळसुळाट झालाय माबोवर- त्यांचे हल्ले परतवण्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे.... आता जाऊ नका ...

अगला बिल किडनी बेचकर चुकाना पड़ेगा’, बढ़े हुए बिजली बिल को लेकर अरशद वारसी का ट्वीट
https://www.jansatta.com/entertainment/arshad-warsi-tweet-about-increasi...

सेलिब्रेटीही सुटले नाहीत.
लाखाचे बिल आलेय याला

इथे एक लिंक दिली गेली आहे, त्यावर जाऊन तीन महिन्यांचं कॅलक्युलेशन बघता येतं. ते कोणी कोणी पाहिलंय? की उगाच फुगे सोडायचं काम चाललंय?
मार्च , एप्रिल , मे ची बिलं गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आली होती का?
आली असतील, तर तेव्हा प्रश्न पडले का?

बेस्ट वाले की दुसरे काय नीट माहीत नाही पण परवा म्हणे एक बातमी होती वीजबिल माफीची, खरी आहे काय? अन जर खरे असेल तर नक्की कोणाचे बिल माफ करणार आहेत. ज्यांनी आधीच सगळी बिले भरलेत त्यांचे काय?

वीज बिले तीन इन्स्टॉलमेंट्स मध्ये भरायची सवलत दिली आहे.
माफीबद्दल कुठे वाचले नाही.

लोक पी आय एल घेऊन न्यायालयातही गेलेत .

“I want to address consumers experiencing issues related to their electricity bills– my name is Ashok Pendse and I’m a consumer representative at Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC). From June 20th onwards, we started receiving complaints from consumers about the exorbitantly high electricity bills. Celebrities made remarks like, ‘Main bill bharke mar gaya.’ We received hundreds of complaints on our WhatsApp group. It’s been distressing for everyone. So, I want to take this opportunity to help our consumers understand the situation better.
Because of lockdown guidelines, meter readings weren’t possible during March to May– so Distribution companies couldn’t get an exact amount of electricity consumption from each household. To combat this, they followed MERC Regulation and averaged the electricity consumption of the 3 month period before the lockdown– that’s December, January and February, which are winter months where the electricity consumption is normally lower.
But, in June, when they could finally do the meter readings, they realized that the total electricity consumption during March to May was higher than the average that the consumers were billed at, because of it being summer and as well as everyone being home during lockdown. Since they couldn’t read the meters during March to May, they went ahead with the winter month averages for it, and for June they considered the actual meter readings.
Since cumulative consumption from March to May was obviously very high, the Distribution companies divided the units consumed uniformly over March, April and May so that consumers could benefit from a lower tariff in each month.
In case the average calculated was higher than the actual units consumed, the Distribution companies shall credit the excess amount to the consumers. These are a few other solutions which Distribution Companies are offering to try and alleviate the situation:
1. Your electricity supply will not be cut till your grievance regarding electricity bill is resolved.
2. Installment-based payment – For all those consumers who may not be able to pay the entire bill amount immediately, the Distribution companies are offering loans that can be paid in installments.
3. Each Distribution Company has its own helpline number set up. Consumers can talk to the concerned officers directly to lodge complaints or for inquiries.
It’s a difficult time for us as consumers. We are in a dire situation of losses, and fellow consumers are struggling to pay their bills. The only way out is to help each other. In my capacity as a consumer representative, I am extending every possible help to explain the bill to the consumers and willing to represent them in case any consumer is charged wrongly by the Distribution Companies. Hope we all will come out of this crisis together.”

https://www.facebook.com/humansofbombay/

मार्च , एप्रिल , मे ची बिलं गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आली होती का?
आली असतील, तर तेव्हा प्रश्न पडले का? Proud apt एकदम +१२३

प्रिय ग्राहक, महावितरणने घरगुती ग्राहकांसाठी माहे जून-२० च्या देयकासाठी जाहीर केलेल्या योजनेनुसार घरगुती ग्राहकांना जून-२० चे संपूर्ण बिल (थकबाकी सहित) देय दिनांकापर्यंत भरल्यास चालू वीज देयक रकमेच्या २% परतावा माहे जुलै-२० च्या बिलामधून मिळणार आहे. तसेच, एकरकमी बिल भरणे शक्य नसल्यास या बिलाचा भरणा ३ समान मासिक हफ्त्यामध्ये करता येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या माहे जून-२० च्या देयकाचा देय दिनांक ०८.०७.२०२० पर्यंत वाढवण्यात आला आहे. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे.
-----------------
वीज बिल कंपनी सर्व गोष्टी स्पष्ट बोलतेय तरी काही जण उगीच वाढीव बिलाच्या नावे बोटे मोडीत राहतात. जरा सुद्धा सबुरी नाहीच Biggrin

<गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.>

बिल स्कॅन करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन इथे टाकलं तर हे सगळं पाहता येईल..

बिल स्कॅन करून किंवा स्क्रीनशॉट घेऊन इथे टाकलं तर हे सगळं पाहता येईल..
>>>>>

आधी माझा तोच विचार होता.
पण एवढी हजारो जनता या बिलाने परेशान असताना. थोडेथोडके नव्हे कित्येकांना सात आठ वा त्यापेक्षाही जास्त पटीत बिल आलेले असताना. काही लोकं अजूनही बिल कॅल्य्कुलेशनची पाठराखण करताहेत हे बघून उत्साहच मावळलाय.
म्हणजे आपण आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध न्याय मागावा आणि कोर्टात आपल्याच अब्रूचे धिंदवडे निघावेत असे काहीसे फील होऊ लागलेय.
आता मला न्याय मिळावा अशी जराही अपेक्षा उरली नाहीये _/\_

तुर्तास माझ्यापुरता मी निर्णय घेतला आहे की हे बिल भरू नये. जे कर्मचारी मीटर रीडींग घ्यायला आले नाहीत ते लाईट कट करायलाही येणार नाहीत अशी अपेक्षा. आले तरी वॉचमनला सक्त ताकीद आहे की पीपीई सूट घातला नसेल तर कोणालाही आत सोडू नये. त्यामुळे आता पुढचे बिल काय येतेय याची वाट बघतोय. ऑनलाईन तक्रार केली आहे !

जे mseb वाल्यांची पाठराखण करत आहेत ते एक तर त्यांच्या कुटुंबातील किंवा मित्रमंडळातील तिथे कोणी असावेत असे वाटले किंवा त्यांचे बिल बरोबर आले असावे. दुसऱ्याच्या वेदनेची मजा घेणारी वृत्ती काहींच्या प्रतिसादातून स्पष्ट जाणवतेय,

असो, वाद नको

चालू द्या तुमचे

भरत Biggrin

माझे घर दोन वर्ष झाले बंदच आहे. दर महिन्याला बिल 80 ते 120 या मध्ये येते. आणि वेळेवर भरतो आम्ही. एप्रिल मध्ये 990 आणि मे मध्ये 900 rs पाठवल MSEB ने. जून मध्ये परत 200rs . तक्रार केली आहे एप्रिल लाच. एप्रिल आणि मे च बिल सरासरी काढून पाठवलं अस MSEB च म्हणणं. ते सरासरी करताना भागाकार करत नसावेत अस दिसतंय

.

भरत अमा आशूचॅम्प
जरा या धाग्यावर जमलेल्या थापाड्या लोकांची लिस्ट काढा बघू
कि तुम्ही माझेच प्रतिसाद वाचले आणि ईतरांना इग्नोर केलेत Happy

नाही मी अनेकदा तुझे प्रतिसाद इग्नोर करतो
एखादं दुसरं वाक्य असेल तर ठीक
मोठा असला की नेहमीचे दळण असणार हे लक्षात घेऊन पुढे जातो Happy

Hi
If you have any issues with meter reading then please raise a complaint with MSEB.
MSEB have correctly given all calculation and there is no error in the bills provided against actual reading taken in June.
I have helped at least 25 people to understand their bills after they sharing bill calculation from MSEB website.
If your house was closed from March till June then you should see credit for the bill charged in April/May in latest June bill if reading is taken.
In case reading is not taken then all calculations will be provided in July.

If you need help in understanding your bill please do contact me personally.

Disclaimer : I am not MSEB/State Govt employee, neither any one of my near and dear is.
I am not associated with any political party.

Pages