अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??

माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.

माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.

आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.

आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?

आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.

आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूखच्या अनुपस्थितीत तो स्वत: या वादात सामील नसताना त्याच्या मुलांचा उल्लेख टाळता आला असता असे मला वाटते.

एखादा जोक सुचल्यावर तो मारायचा मोह होतो. पण तो पोस्ट करण्याआधी सारासार विचार करून तो मोह आवरायला हवा. स्पेशली जोकही काही खास नसताना हे सहज शक्य होते. भले त्यात शाहरूखचा उल्लेख असल्याने चार लोकं हसतीलही ती गोष्ट वेगळी.

यावर ईतरांची मते जाणून घ्यायला उत्सुक !

काजवा म्हणलं तर त्याच्या बुडाखाली उजेड असला पाहिजे

बघितलं असेलच या निबा ने कधीतरी
काय ते खरं सांगून टाक रे
नक्की कुठून उजेड पडतो शाहरुखचा

आणि असं म्हणतात की सुर्यावरचा उजेड हा त्यात होत असलेल्या स्फोटामुळे
तेच लॉजिक लावायचं म्हणलं तर अवघड आहे बावा

पोरं आणि गौरी त्याची हैराण होऊन गेली असतील
नुसते स्फोटावर स्फोट

पोरं आणि गौरी त्याची हैराण होऊन गेली असतील
नुसते स्फोटावर स्फोट
नवीन Submitted by आशुचँप on 10 July, 2020 - 14:41

Sad
पुन्हा याची गरज नव्हती

माझी या चर्चेतून माघार

अरे अरे, मग प्रतिसाद कसे वाढणार

जाऊ दे नवीन धागा काढ, तिकडे कंतीन्यू करू हेच

तू आता कुठलाही धागा काढ काय फरक पडत नाही

भाटघोषित सूर्य, सूर्याची पिल्ले येतील बघ सगळीकडे Happy

पुन्हा याची गरज नव्हती
माझी या चर्चेतून माघार >> जाऊ द्या तो शारुख त्याचं बघुन घेईल, तुम्ही फारच मनाला लावुन घेता.
आपण लाईट बीलावर बोलु.

खरंय काय बेक्कार लोकं आहेत
सतत त्या शरूख ला आणि निबाला टोचून बोलत असतात
देव त्यांच्या बुडाखाली जळणारा लाईट देऊन काजवा बनवेल पुढच्या जन्मी तेव्हा कळेल

मी तुझ्या बाजूने आहे रे, अजिबात भीक घालू नकोस या ट्रोलस ना
ना काम ना धंदे
दिवसरात्र मायबोलीवर पडीक राहतात मेले

निबा ला जेव्हा राग अनावर होतो
पण त्याच वेळी मायबोली वरची इमेज पण जपायची असते
तेव्हा स्ट्रेंजर येतो आणि दे दणादण शिवराळ बोलतो
सगळी भडास काढली किंवा समोरचा गप्प झाला की परत गायब होतो

हे चाच चौधरी च्या साबू को जब गुस्सा आता है तो ज्वालामुखी फटता है च्या चालीवर वाचावे Happy

हे बघा
नुसते बघू नका, तर झरूर वाचा

माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ

https://www.maayboli.com/node/56984

मला शिवीगाळ करायला कोण्या स्ट्रेजरची गरज का पडावी? Happy

ते आता तुलाच माहिती
तू काय खोटं पण बोलतोस
त्यावरती पण एक धागा आहे ना?

मध्ये तूच म्हणत होतास की मी तो नाही
मग म्हणालास मी भास्कर नाही
मग अजून काय तरी म्हणालास
मग म्हणालास होय मीच तो
त्यामुळे आजचा तुझा नकार हा भविष्यातील होकार धरून चालतो Happy

शिवीगाळचे लेख चालतात का इथे? सारखे शारुख शारुख करणं पण चालतं, मग कोणाच्या प्रतिसादातली विसंगती दाखवली तर ते ट्रोलिंग.

Aamche April-May-June 2019 che ektra bill hote 4550 ani April-May-June 2020 che bill aahe 5030. Khup Jast farak nahi. Tasech yavarshi vijdar vadhale aahet. Mule suttimadhe ghari asalyamule tv prakaran jast vadhate.

बघा खुद्द प्रभूतीं ने सांगितलं आहे की त्याला इग्नोर करु शकत नाही
त्यामुळे आता अन्य मायबोलीकरांनी इग्नोर करा, बस करा वगैरे सल्ले देऊ नयेत
एकदा ठरलंय की इग्नोर नाही करू शकत
म्हणजे मग लव्ह किंवा हेट
आता हेट तर आपण शत्रूला पण करत नाही
त्यामुळे प्रेमच करावं लागणार आणि तेच करतोय केव्हापासून
लोकांना उगाच वाटतय त्याच्या विरोधात बोलतोय किंवा टिंगल करतोय
हे सगळं त्याच्या प्रेमाखातर च सुरू आहे
शरूखची शपथ Happy

माझ्या बोलण्यावर ज्यांना शंका असेल ते पुढच्या जन्मी काजवा होतील आणि शागरुख रुपी सूर्यावर थुंकायला बघतील

बसा मग Happy

थोडक्यात ऋन्मेष जे करतो ते करणे आता ईतरांनाही गौरवास्पद वाटू लागले आहे असे म्हणू शकतो Happy

मी कधी मेलोच, लवकर नाही मरणार.. आणि मेलो तरी वर्षभर तरी तो ईथेच कुठेतरी आहे असे तुम्हाला जाणवर राहणार. पण जेव्हा मी मेल्याची खात्री होईल तेव्हा माझ्या स्मरणार्थ दर वर्षी माझ्या पुण्यतिथीला एक धागा काढून तो हायजॅक करायची स्पर्धा घ्यावी अशी माझी ईच्छा आहे. या कलेचा प्रसार होत राहावा, ती लोप पाऊ नये ईतकाच यामागे हेतू आहे

अगदी अगदी काळजीच करू नकोस
तुझ्यासोबत शरूख, झबा, सुकडी सई आणि म्हगरू यांचेही करू
अत्यंत त्रासदायक आणि असह्य लोकांची मांदियाळी च घेऊ बघ
भास्कर पण ते बघून ढसाढसा रडेल Happy

दवे बाई ते एक सांगा की स्फोट करणारा शरूख हा सूर्य म्हणून तू भास्कर का

ऐक ना, हा धागा आता बोर झालाय
नवीन विषय घे की चांगला
आजच पाड छान जिलेबी
मी रात्री येतो वाचायला आणि कमेंट करायला
निराश करू नकोस

EBill.png

वर एक वीज बिलाचा नमूना दिला आहे. त्यात दिलेली माहिती बिल योग्य आहे की नाही याची सूत्रबद्ध गणिती तपासणी करण्याकरिता पुरेशी आहे का?

या बिल नमून्यात दिलेल्या माहितीवरुन ग्राहकाचे नाव, पत्ता इत्यादी खासगी व गोपनीय माहिती उघड होऊ शकते का?

नसल्यास ज्यांच वीजबिल जास्त आहे अशी तक्रार आहे त्यांनी इतक्या माहितीसह विज बिल नमूना इथे समाविष्ट करण्यास काय हरकत आहे? जेणेकरुन वीजबिल जास्त नाही व ते आम्ही सूत्रबद्ध गणिती तपासणीसह सिद्ध करु असा ज्यांचा दावा आहे त्यांच्यासमोर सादर करुन आपले शंकानिरसन करुन घेता येईल.

Pages