अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??

माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.

माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.

आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.

आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?

आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.

आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचे ठाण्याच्या घराचे बिल अंदाजे २०० रुपये जास्त आले सो ते भरुन टाकले, पण राहत्या घराचे बिल अंदाजे २५०० ते ३००० रुपये जास्त आले आहे. काय करावे कळत नाहिये, ती लिंक चेक केली जिथे बिलाचे तपशिल आहेत, जॅम कंफ्युझिंग आहे ते, फक्त ईतके कळले की टोट्ल रिडींग युनिट २ ने भागलेय, अर्धे जुन महिन्यात टाकलेत, उरलेले अर्धे परत दोन ने भागुन एप्रिल अन मे मध्ये टाकलेत. जुन चे सगळे युनिटचे पैसे वाढलेल्या दराने घेतलेत.

माझ्या घरी ज्ये ना असल्याने आम्हाला तिकडे जाऊन खेपा मारायची ईच्छा नाहीये.
ऑनलाईन काही करण्यासारखे असेल तर कृपया सांगा नाहीतर ह्या ६ तारखेला बिल भरायचे ठरवलेय नाईलाजाने Uhoh

Whatsapp वरती एक महावितरण ची pdf आली आहे. महावितरण च्या साईट वरतीही असावी. त्यामध्ये खूप डिटेल मध्ये explain केलं आहे स्लॅबस सहित पूर्ण माहिती दिली आहे. आणि वरच्या स्लॅबचा दर लावण्यात आलेला नाही हे ही दिले आहे.

कसंही गणित मांडलं तरी आठपट बिल कसं बरोबर असेल? एरवी दर महिन्याला ४०० पर्यंत येणारे बिल डायरेक्ट ३००० आलेय.

Attrocious loot by Maharashtra State Electricity Distribution Company Limited. They did not take reading during the lockdown. Approximate Bills were raised and the consumers paid the bills. Now, instead of distributing the total consumed units in equal proportion across the three months of lockdown period, the MSEDCL has raised a combined Bill for the three months and mischievously calculating the total units and charging at the higher slabs. Distribution of the units across 3 months would have meant the higher rates would not have been applicable. For roughly a bill of say 1700, consumers have received Bills of not less than Rs 4000, ranging up to Rs 20000. This is a shameful brazenness and outrageous against the vulnerable consumers, many of whom are already going through the mental trauma of loss of wages to loss of jobs, thus staring at a bleak future. I request the GOVT OF MAHARASHTRA to please intervene and direct the MSEDCL to raise the bills for three months separately by dividing the units consumed across the three months of lockdown. This is against the provisions of Monopolies And Restrictive Trade Practices Act 1969. I also learnt that all the other utilities have also adopted the same method. This is cartelization, unethical and done with the sole motive of robbing the unsuspecting and vulnerable consumers. Those who agree with me, please forward.

=======
व्हॅटसप आले

आमच्या सोसायटीत लोकांना ९००० ते २७००० अशी काहीही बिले आली आहेत. ज्यांची नॉर्मली बिले १५०० ते २५०० च्या घरात असतात.

सगळीकडेच अशी परिस्थिती आहे.
काही लोकं या बिलाचे जस्टीफिकेशन देत किंबहुना योग्यच कॅलक्युलेट केले आहे म्हणत मंडळाला पाठीशी घालतानाही बरेच ठिकाणी दिसत आहेत.
ते लोकं वीजमंडळात कामाला आहेत की यामागे कोणता राजकीय ॲंगल आहे याची कल्पना नाही.

कदाचित ज्यांचे बिल उन्हाळा आणि एसीमुळे नेहमीपेक्षा जरासेच जास्त आले त्यांच्या कॅलक्युलेशनची टोटल बरोबर लागली असेल. आणि त्यांनी अफाट जास्त बिल असलेल्यांचेही कॅल्युलेशन बरोबरच असेल असा समज करून घेतला असेल.

माझ्या दोन्ही घरात वीज बील वाढिव आलं असलं तरी एवढं नाही.
माझ्या शहरातल्या घरी महिन्याचे ५०-५५ युनिट लाईट जळते तिथे ३४० रुपयांपर्यंत वीजबील यायचं आता ८१० रुपये आलं (१८० रुपयांचं जुन मधे आलेलं ते पण भरलं होतं मी) आणि मी लगोलग भरुनही टाकलं.

गावाकडच्या घरी ६०-७० युनिट लाईट जळतेतिथे २००-२५० रुपयांच लाईट बिल यायचं आता २४६० रुपये आलं (बहुतेक ४ महिन्यंचं बिल आलंच नाही त्याचा परिणाअम असावा..!) तेही मी भरुन ठेवलं.
माझा एक मित्र महावितरण मधे आहे. तो म्हणाला जर जास्त पैसे घेतले असतील तर पुढच्या बिलात वळते होतील.

त्याच्याशी बोलताना असाही निष्कर्ष निघाल की संपुर्ण उन्हाळ्यात लॉकडाऊन असल्याने आणि घराबाहेर पडण्यासाठी कोणतेही कारण नसल्याने टीव्ही, फ्रिज, फॅन, मायक्रोवेव्ह, मिक्सर्स, ग्राईंडर्स, गिरण्या, इलेक्ट्रिक शेगड्या, किचन चिमण्या, कुलर्स, वॉशिंग मशिन्स, कंप्युटर्स, लपटॉप यांचा वापर अतोनात झाला आहे आणि सलग ३ महिन्यांचं एकत्रीत बिल बघुन लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत बाकी काहि नाही.

बाकी वीजमंडळाने दिलेली ***१ एप्रिल २०२० पासुन नवीन दर लागु होतील*** ही सुचना ग्राहकांनी दुर्लक्षीत केली आहे का याची खातरजमा करणे गरजेचे आहे

संपुर्ण उन्हाळ्यात लॉकडाऊन असल्याने आणि घराबाहेर पडण्यासाठी कोणतेही कारण नसल्याने टीव्ही, फ्रिज, फॅन, मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रिक शेगड्या, कुलर्स, वॉशिंग मशिन्स, कंप्युटर्स, लपटॉप यांचा वापर अतोनात झाला आहे आणि सलग ३ महिन्यांचं एकत्रीत बिल बघुन लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत बाकी काहि नाही.

बाकी वीजमंडळाने दिलेली ***१ एप्रिल २०२० पासुन नवीन दर लागु होतील*** ही सुचना ग्राहकांनी दुर्लक्षीत केली आहे का याची खातरजमा करणे गरजेचे आहे >>>> थापा आहेत या महावितरण वल्या बंडलबाजांच्या. आमच्या घरी वर लिहिलेली सगळी उपकरणे एरव्ही जेवढी चालतात तेवढीच चालली कारण आम्ही दोघे जरी कामावर असलो तरी बाकीचे घरीच असतात. उन्हाळ्यात येते थोडे बिल जास्त म्हणून काही ते अचानक 3. 5 हजाराचे 8 हजार होत नाही 5 हजाराच्या जवळपास असते Angry

थापा आहेत या महावितरण वल्या बंडलबाजांच्या. आमच्या घरी वर लिहिलेली सगळी उपकरणे एरव्ही जेवढी चालतात तेवढीच चालली कारण आम्ही दोघे जरी कामावर असलो तरी बाकीचे घरीच असतात. उन्हाळ्यात येते थोडे बिल जास्त म्हणून काही ते अचानक 3. 5 हजाराचे 8 हजार होत नाही 5 हजाराच्या जवळपास असते>> मुळात बिल जास्त गेलं असण्याची शक्यता नाहीच परंतु गेले असेल तर ते पुढील महिन्यात वळते होइल. काळजी करु नका.

आधी माझ्याकडे प्रे-पेड मीटर होतं त्यावेळेस एकदा वॉशिंग मशिन ५० मिनिटांच्या प्रोग्राम वर सेट करुन लावली की त्या दिवसाचे १० रुपये जास्त संपायचे (यावरुन आपण घरात वापरत असलेल्या इतर इलेक्ट्रिक उपकरणांचे साधारणतः किती बिल येत असावे हे लक्षात येईल). नंतर वीजमीटर वरील नाव बदलायचं असल्यामुळे नाईलाजाने नालासाठी घोडा बदलुन पोस्टपेड मीटर घ्यावं लागलं (पण बहुतेक पोस्टपेड मधे महिन्याचं बील कमी प्रमाणात येतं याचा साक्षातकार झाला). आता सद्ध्याच्या बिलांमुळे आमच्या बिल्डींग मधले प्री-पेड मीटर असणारे निवांत आहेत आणि ज्यांचं पोस्टपेड आहे ते वैतागलेले आहेत असं चित्र आहे.

प्री-पेड मीटर असण्याचा एकच फायदा म्हणजे तुम्ही वीजमंडळाच्या कोणत्याही ऑफिस मधे पाय ठेवण्याची अथवा त्यांचा माणुस तुमच्या घरी येण्याची शक्यता १००% नाही अशीच असते. त्यामुळे ज्यांना वीज बिलांचा शॉक लागतो अशांसाठी प्रे-पेड मीटर चांगले ऑप्शन आहे.. पण ते देण्यासाठी तुमचं वीजपरिमंडळ सक्षम आहे का ते बघावं लागेल.

सगळा कॅल्क्यूलेशन घोळ आहे बाकी काही नाही. चुकीचा हिशेब करून विजमंडळ ग्राहकांना लुबाडीत आहे. एक एप्रिल पासून दरवाढ झाली त्याकडे लोक दुर्लक्ष करीत आहेत म्हणणे देखील मंडळाची लबाडी आहे. मार्च पर्यंत बिले आली पुढे तीन महिने कोवीडमूळे मीटर वाचन नसल्याने सरासरी बिल पाठविले. तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष रीडिंग मिळाल्यावर कॅल्क्यूलेशन उच्च दर टप्प्याने केले गेले. म्हणजे सरासरी १०० युनिटच्या आसपास वापर असणारे रीडिंग ३००+ मिळाले. आता १०० यूनिटचा दर टप्पा वेगळा आहे मात्र हिशेब ३०० युनिट दर टप्प्याने केले गेले.

मुळात बिल जास्त गेलं असण्याची शक्यता नाहीच परंतु गेले असेल तर ते पुढील महिन्यात वळते होइल. काळजी करु नका.>>> एकतर तो तुमचा मित्र आहे म्हणून किंवा तुमचे बिल जास्त आले नाही म्हणून तुम्ही बोलत असावेत. कारण हे डामबीस लोक असे काही करणार नाहीत हे लहान मुल पण सांगेल. तसेही ह्या दिडशहाण्यांना हा शोध कुठून लागला की जूनमध्ये वीज जास्त प्रमाणात वापरली गेलीये. का नाही सगळे युनिट तिन्ही महिन्यात समप्रमाणात विभागले?
उत्तर स्पष्ट आहे, जर असे केले असते तर आज चढ्या दराने जुनचे जे अवाढव्य बिल दिलेय ते कसे जमले असते, चोर आहेत सगळेच, उगाच पिडतायेत सामान्य जनतेला.

प्री-पेड मीटर मिळत असतील तर लाऊन घ्या.. वीजमंडळाचा कसलाही संबंध उरणार नाही आणि कोण चोर आहे कोण साव आहे याची खातरजमा करण्याचे कष्टही आपोआप वाचतील.

लॉकडाऊनमधे जास्त बिल यायचे तर ते एप्रिल आणि मे चेही यायला हवे. एप्रिल आणि मे ची युनिटस नॉर्मल आणि जूनची युनिटस तिप्पट हे कसे काय होईल? काहीही उगाच.
एकतर इथे व वि मधे रोज थोडा थोडाथोडा, दोन चार वेळा वीज घालवली नाही तर नोकरी जाईल असे महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिकवलेले असावे अशी परिस्थिती. कधीकधी तर दर १० मिनिटांनी स्विच ऑन ऑफ खेळत असावेत की काय अशी शंका येते अश्या प्रकारे वीजेचे जाणे येणे चालू असते. हे सुधारण्याची शक्यता शून्य.
वसईतल्या एका केंद्रामधे दर वर्षी पावसाळ्यात एकदा तरी पाणी भरतं आणि सगळा परिसर १५-१६ तास किंवा जास्तच बिनाविजेचा असतो. तरीही अजून महावितरणला तिथे पाणी भरू नये यासाठी उपाययोजना करायची बुद्धी होत नाही.
हे असले लोक बिलांच्या झालेल्या चुका निस्तरतील? सोडाच!

प्रीपेड मीटर लावून घेणे हा निर्णय घरमालक घेऊ शकतो. लि न ला ने राहणारे लोक नाही. आम्ही फक्त बिले भरायला.

> तीन महिन्यानंतर प्रत्यक्ष रीडिंग मिळाल्यावर कॅल्क्यूलेशन उच्च दर टप्प्याने केले गेले. म्हणजे सरासरी १०० युनिटच्या आसपास वापर असणारे रीडिंग ३००+ मिळाले. आता १०० यूनिटचा दर टप्पा वेगळा आहे मात्र हिशेब ३०० युनिट दर टप्प्याने केले गेले. >
https://billcal.mahadiscom.in/consumerbill/
या साईटवर गेल्यानंतर Energy Charge JUN 2020 या नावाखाली जो टेबल दिसतोय तो पहा. कॅलक्युलेशन योग्य स्लॅबमधे केलेली दिसताहेत.
===

> दिडशहाण्यांना हा शोध कुठून लागला की जूनमध्ये वीज जास्त प्रमाणात वापरली गेलीये. का नाही सगळे युनिट तिन्ही महिन्यात समप्रमाणात विभागले? >
Comparison of consumption pattern of previous and current year या नावाखाली दिसणार टेबल पहा. युनिट्स तिन्ही महिन्यात समप्रमाणात विभागली गेली आहेत.

> त्याच्याशी बोलताना असाही निष्कर्ष निघाल की संपुर्ण उन्हाळ्यात लॉकडाऊन असल्याने आणि घराबाहेर पडण्यासाठी कोणतेही कारण नसल्याने टीव्ही, फ्रिज, फॅन, मायक्रोवेव्ह, मिक्सर्स, ग्राईंडर्स, गिरण्या, इलेक्ट्रिक शेगड्या, किचन चिमण्या, कुलर्स, वॉशिंग मशिन्स, कंप्युटर्स, लपटॉप यांचा वापर अतोनात झाला आहे आणि सलग ३ महिन्यांचं एकत्रीत बिल बघुन लोकांचे डोळे पांढरे झाले आहेत बाकी काहि नाही. >
मलादेखील आता असंच वाटू लागलंय.

इतरवेळी उन्हाळयात जो वापर असतो त्याखेरीज wfh साठीचा 1 लॅपटॉप आणि 1 मोबाईल इतकाच आमचा विजवापर वाढला आहे. त्यामुळे एका महिन्याचे 30-35 युनिट किंवा 200/250 ₹ इतका विजबिलात बदल दिसतोय. जो ठीकच आहे.

ॲमी>> बरे वाटले तुम्ही परत आलात

<<< या नावाखाली दिसणार टेबल पहा. युनिट्स तिन्ही महिन्यात समप्रमाणात विभागली गेली आहेत>>> किमान आमच्या बाबतीत असे नाही झाले आहे, आमचे मार्च एप्रिल , मे, जून सरासरी बिल सारखेच असते नेहमी कारण ac जास्त वापरला जातो म्हणून तर हे चार महिने एरव्ही 2 हजारापर्यंत असणारे बिल 3.5 ते 4 हजारापर्यंत असते तर आता एकट्या जुनचे 8 हजार आलेय

https://billcal.mahadiscom.in/consumerbill/
या साईटवर गेल्यानंतर Energy Charge JUN 2020 या नावाखाली जो टेबल दिसतोय तो पहा. कॅलक्युलेशन योग्य स्लॅबमधे केलेली दिसताहेत
>>>>>>

लिंकबद्दल धन्यवाद
त्या ६० हजार बिल आलेल्या बाईला हि लिंक पाठवतो.
तिला आपले बिल बरोबरच आहे याचा दिलासा मिळेल Happy

कॅलक्युलेशन योग्य स्लॅबमधे केलेली दिसताहेत.>> आपण पुन्हा एकदा पहा. विशेषतः जूनचा तक्ता. त्यात इलेक्ट्रिसिटी चार्जेस, त्यामुळे वाढलेला कर, इतर चार्जेस, टप्प्याचा वेगळा दर. मुळात तीन महिन्यांचे बिल तीन टप्प्यात विभागून बिले काढायला हवी होती. असे न करता सगळं हायर बाजूने घेऊन बिल काढले मग तीन भागात विभागून त्यातून मागची सरासरी दोन बिले वजा केली गेली.

धन्यवाद VB _/\
फक्त या धाग्यापुरती ऍक्टिव झालेय.

> आमचे मार्च एप्रिल , मे, जून सरासरी बिल सारखेच असते नेहमी कारण ac जास्त वापरला जातो म्हणून तर हे चार महिने एरव्ही 2 हजारापर्यंत असणारे बिल 3.5 ते 4 हजारापर्यंत असते तर आता एकट्या जुनचे 8 हजार आलेय >
इतर वर्षी-
इतर महिन्यांचे बील 2000
मार्च एप्रिल मेजूनचे बील 3500-4000

यावर्षी
मार्च एप्रिल मे चे बील 2000 (सरासरीने काढलेले)
जूनचे बील 8000 (मार्च एप्रिल मे चे कमी लावलेले 1500 ते 2000 थकबाकी इथे भरून काढलीय)
∆असं असेल ना?

> आपण पुन्हा एकदा पहा. विशेषतः जूनचा तक्ता. >
Consumer Number :
Consumer Name :
Tariff :
Bill Month APR 2020 MAY 2020 JUN 2020

इथला जूनचा कॉलम पाहताय का?
तिथे नको, खाली Energy Charge JUN 2020 हे शब्द जिथे दिसताहेत तिथे पहा.

ॲमी ☺️, आता सगळीकडे लिहित्या व्हा, मला खूप आवडेल

मार्च एप्रिल मे चे बील 2000 (सरासरीने काढलेले)
जूनचे बील 8000 (मार्च एप्रिल मे चे कमी लावलेले 1500 ते 2000 थकबाकी इथे भरून काढलीय)
∆असं असेल ना?>> नाही ना, 3हजार प्र एप्रिल अन मे चे 2950 मी भरलेत आधीच, नाहीतर कशाला इतका त्रास करून घेतला असता

> नाही ना, 3हजार प्र एप्रिल अन मे चे 2950 मी भरलेत आधीच, नाहीतर कशाला इतका त्रास करून घेतला असता >
एप्रिल मे गेल्यावर्षी 4000₹/महिना
यावर्षी दर बदलल्याने 4500-5000₹/महिना
भरले 3000₹/महिना
2 महिन्याची थकबाकी 3000-4000
ती जूनच्या बीलात ऍड झाली असेल.
===

> मुळात तीन महिन्यांचे बिल तीन टप्प्यात विभागून बिले काढायला हवी होती. > हे गणित (बदलेल्या दराने) स्वतःसाठी कोणी केलं आहे का?

आता पूरते ज्यादा बिलापाई पैसे भरले म्हणजे ते कायमचे फुकट गेले / फसवणूक झाली ह्या मानसिकतेमध्ये राहिले तर काहीही निष्पन्न नाही. दर आकारणी करताना चुका घडल्या असतील तर जास्तीचे पैसे पुढील बिलात वजावट करून मिळतात. काही वर्षापुर्वी माझे एका साइटवरचे बिल नेहमी पेक्षा ८ पट जास्त आले तर नेक्स्ट रिडिंग नंतर ते कित्येक महीने शून्य रूपये येत राहिले. ज्यादाचे पैसे फुकट नाही जात मात्र तत्कालिक मानसिक त्रास आणि आपले पैसे बिनव्याजी वापरले म्हणून आलेला राग ह्या २ गोष्टी मात्र व्यक्तिनुरूप घडत राहतील.

आमच्या सोसायटीत लोकांना ९००० ते २७००० अशी काहीही बिले आली आहेत>>>>>

ज्यांनी मीटर रिडींग दिले नाही त्यांना गेल्या काही महिन्यांची सरासरी बघून बिल दिले जाणार असे घोषीत केले होते. सरासरी काढताना युनिट्सची बेरीज केली पण त्याला एकूण महिन्यांनी भागायला वीज मंडळ विसरले असे दिसतेय. Happy

त्यामुळे ज्यांनी रिडींग दिले त्यांना त्रास नाही, ज्यांनी दिले नाही त्यांना गेल्या पूर्ण वर्षाचे बिल एकरकमी एका महिन्यात आले.

@ अज्ञानी : मला देखील असाच अनुभव आला आहे. माझं प्री-पेड मीटर काही कारणाने पोस्टपेड करुन घेताना प्री-पेड वर आधीच्या मालकाने ठेवलेले ४००० रुपयांचे डिपॉझिट नंतर पोस्टपेड वर ट्रांसफर झाले अन नंतर ७-८ महिने शुन्य बील आकारणी झाली. त्यानंतर बील आले ते एकदम ५८० रुपये. मला त्यात चुकीची आकारणी झाली असे दिसले म्हणुन मी वीज मंडळाच्या ऑफिसात रिक्षा करुन गेलो. तिथं गेल्यावर त्यांनी सांगितले की पहिलेच बील आहे त्यामुळे कोणतातरी जास्त चार्ज लागला आहे तो पुढील महिन्यात वळता होईल. आणि तसेच झाले.. पुढील महिन्यापासुन ३६०-३८० रुपये बील येऊ लागले. पण आधी वाढीव बील आले म्हणुन मानसीक त्रास करण्यात अन वीजमंडळाच्या हाफिसात चक्कर मारण्यासाठी काटेकोरपणे नाकासमोर रिक्षेने जाण्या-येण्यात ८० रुपयांचा वाढीव खर्च झाला. Proud

मी एम एस ई बी चा ग्राहक नाही.

ट्विटरवर तक्रार करणार्‍या एकाने त्याचा ग्राह क क्रमांक दिला होता. तो वापरून वरच्या लिंकवरून डेटा पाहिला.
त्यावरून काही प्रकाश पडू शकतो का ते बघतो.
त्याचे एप्रिल २०१९ आणि मे २०१९ चे युनिट्स अनुक्रमे २१३ आणि ३२५ होते. एप्रिल २०२० आणि मे २०२० साठी सरासरी बिल प्रत्येकी १९२ युनिट्स साठी लावले. ही सरासरी मार्च पर्यंतच्या सहा किंवा तीन महिन्यांची असेल तर तेव्हा वीजवापर कमी असतो.

शेवटी एप्रिल ते जून २०१९ आणि एप्रिल ते जून २०२० अशा तीन महिन्यांच्या बिलांच्या एकूण युनिट्स आणि एकूण रकमेची तुलना केली आहे.
---------------- ए-जू २०१९--------------- ए-जू २०२०
युनिट्स ---------- ९४१-------------------११२६
रक्कम------------ रु ८९५६--------- रु ११०३७

२०८१ रुपये = २३% अधिक बिल आलं आहे.

जून २०२० च्या बिलाचा हिशोब बघतो.

त्याचं मागचं रीडिंग ९ मार्चचं होतं. ताजं ९ जूनचं आहे. म्हणजे बरोबर ३ महिने. पण बिलात जुन्या दराने ०.७४ महिन्यासाठी आणि नव्या दराने २.३३ महिन्यांसाठी असं म्हटलंय. ०.७४+२.३३ = ३.०७ होतात.
मार्चचे २२ दिवस म्हणजे ०.७४ महिना हे बरोबर आहे. ३.०७ महिन्याचं गणित कळलं नाही. पण हा फरक नगण्य आहे.

मार्च साठी सरासरी बिल १९२ युनिट्स चं १०० x 3.05 +92 x 6.95 = 944.4 (फक्त इलेक्ट्रिसिटी चार्जेस)

आता प्रत्यक्ष बिलात मार्च महिना २२ दिवसांचा = ०.७४ भाग म्हणून स्लॅबही तसे कमी होतात.

९ मार्च ते ९ जून ११२६ युनिट वापरले त्यातले मार्चचे ११२६ x ०.७४ भागिले ३.०७ = २७१ युनिट होतात. बिलात २७० घेतलेत.
पहिला स्लॅब १०० गुणिले ०.७४ = ७४ युनिट्स ३.०५ पैसे दराने २२५.७ रु
दुसरा स्लॅब २०० गुणिले ०.७४ = १४८ युनिट्स ६.९५ पैसे दराने १०२८.६ रु
तिसरा स्लॅब उरलेले (२७०-७४-१४८) = ४८ युनिट्स ९.९ पैसे दराने ४७५.२ रु
एकूण १७२९.५ रु. आधी हे ७४४.४० रु इतके लागले होते. म्हणजे मार्चचं बिल जास्त युनिट्स आणि लहान स्लॅब्स मुळे दुपटीपेक्षा जास्त आलं.

Pages