अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??

माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.

माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.

आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.

आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?

आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.

आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ धाग्यात जे लिहिलंय त्या थापा वाटताहेत. तेवढा भाग quote करून ते दाखवायला सांगितलं.

मी आधी लिहिलं तसं ट्विटरवर एकाने तक्रार केली होती, त्याचा उपभोक्ता क्रमांक मिळाला. त्याचा डेटा मला पडताळून पाहता आला. (हे पाहण्यासाठीची लिंक याच धाग्यावर मिळाली) जूनचं बिल जास्त का वाटतंय त्याची कारणं कळली.

ज्यांना बिलाबाबत तक्रार आहे, त्यांनी हे करून पहा, असं मी सुचवलं. एकानेही ते केल्याचं लिहिलेलं नाही.

ज्यांना बिलाबाबत तक्रार आहे, त्यांनी हे करून पहा, असं मी सुचवलं. एकानेही ते केल्याचं लिहिलेलं नाही.
>>>>
जेव्हा सरासरी बिले भरूनही सहसात पट बिल येते तेव्हा खरेच कोण हि माथेफोड करत बसेल असे वाटते का?

काल बातम्यात ऐकले की कोकणातल्या बंद शाळांनाही अव्वाच्या सव्वा बिल आले आहेत. लोकांच्या बंद घरांनाही बिल येत आहेत. त्यांमा कॅलक्युलेशन करायला सांगणे हेच हास्यास्पद नाही का ठरणार ?

आणि सौ बात की एक बात !
मुळात काही लोकं ईथे या भरमसाठ बिलाने त्रस्त नागरीकांना दिलासा द्यायला वा तक्रारीच मार्ग सुचवायला ईथे आलेले नसून बिल आकारणी योग्यच आहे आणि त्यांची तक्रारच कशी चुकीची आहे हे दाखवायच्या हेतूने आले आहेत. म्हणून कदाचित पिडीत लोकं या हेतूस सहकार्य करत नसतील.

बाकी कोणालाही खोटारडे ठरवायचा अधिकार मायबोलीवर कोणालाही आहेच Happy
आपले सत्य आपल्यापाशी. आपल्या मर्जीने ते उघड करावे.

क्यों की अम्मीजान कहती थी,
अपना दर्द उन्हे हि दिखओ जिनके पास दवाई हो
जो नमक लेके घुमते है उन्हे कभी अपने घांव खोलके ना दिखाओ तो ही अच्छा है Happy

कोकणातले काय ते त्यांचं बघून घेतील
तू सांगितलं ते कर की आधी थापड्या
उगाच नेहमीप्रमाणे फाटे फोडण्यापेक्षा

माथेफोड करायची गरज नाही. त्या लिंकवर सगळा हिशोब व्यवस्थित दिला आहे. मी आकड्यांच्या जोडीला शब्द वापरून तो मांडला.

इथे प्रतिसाद लिहिण्यात जितका वेळ वाया घालवला तेवढ्या वेळात तो हिशोब समजून घेणे नक्कीच शक्य होते.

अगदीच राहवेना म्हणून...
प्रत्येक धाग्यावर ऋन्मेष आणि त्याचे विरोधक यांचा उंदरामांजराचा खेळ बघून आता वैताग आला आहे. Sad
बरेचदा केवळ त्याने लिहिले आहे म्हणून मुद्द्याला विरोध होताना दिसतो.
तुम्ही कितीही बोललात तरी तो लिहायचा थांबणार नाही हे अजूनही कळले नाहीये का? अनुल्लेख करून पुढे जाता येणार नाही का? त्यानी सुरू केलेल्या धाग्यांवर येऊन दरवेळी तोच तोच दंगा करण्यात काय अर्थ आहे?
यामुळे, बरेचदा चांगले मुद्दे मागे पडतात. तो धागा भरकटवतो असे तुम्ही म्हणता पण त्याच्या एका प्रतिसादावर तुम्ही ५/६ जण परत परत लिहून धागे पिंजून टाकता हे तुमच्या लक्षात येत नाही का?
प्लीजच.. आता अगदी वैताग आलाय. Sad

लॉकडाउनमुळे बंद असलेल्या जागांसाठी ज्यांना सरासरी बिले आली त्यांना जूनमध्ये प्रत्यक्ष बिल उणे आले. म्हणजे क्रेडिट मिळाले. हेही मागच्या पानावर लिहिलंय.

मी काय म्हणतो तुम्ही या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकत असाल ना?
मग कशाला त्रागा करून घेताय
त्याला काही प्रॉब्लेम नाहीये तर बाकीच्यांना का होतोय तेच कळत नाही
तो चिडला की आणतोय की त्याचे कुपुत्र शिवराळ भाषेत बोलणारे
सगळं काही सेट आहे Happy

लॉकडाउनमुळे बंद असलेल्या जागांसाठी ज्यांना सरासरी बिले आली त्यांना जूनमध्ये प्रत्यक्ष बिल उणे आले. म्हणजे क्रेडिट मिळाले. हेही मागच्या पानावर लिहिलंय.

>>>>>

तुम्हाला बेसिक फंडाच नाही कळालाय.
अहो बिल सरसकट शंभर टक्के लोकांचे अव्वाच्या सव्वा आलेले नाहीये.
कित्येकांचे ते योग्य वा किंचित जास्त तर क्वचित काही लोकांचे अपेक्षेपेक्षा कमीही आले आहे.
आता समजा अशी जनता ९० टक्के असेल.
तर आता तुम्ही काय करत आहात तर अश्या जनतेची उदाहरणे घेऊन येत आहात. आणि उरलेल्या १० टक्के जनतेलाही तुमचे भरमसाठ जास्त बिल योग्यच आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करत आहात.

या लिंका आणि न्यूजवर अवलंबून राहू नका ओ. जरा बाहेर पडून त्रस्त लोकांना भेटा. वार्षिक उत्पन्नाएवढे बिल असलेल्यांनाही भेटा. आणि त्यांनाही समोरासमोर प्रत्यक्ष बोलून पटवून देता येते का बघा त्यांचे जास्तीचे बिल का आलेय ते

तो चिडला की आणतोय की त्याचे कुपुत्र शिवराळ भाषेत बोलणारे
सगळं काही सेट आहे Happy
>>>

हो नक्कीच
आपली तर गॅंग आहे Happy

पण सगळे कॉम्पुटर वर आपोआप होते तर कुणाला जास्त कसे येईल
>>>>
आपोआप काही झाले नाहीये यंदा.
कोणी मीटर रीडीण्ग दिलेले कोणी नाही कोणाचे सरसरी कोणाची तीन महिन्यानंतरही रीडींग घेतलीय कोणाची नाही सगळाच गोंधळ आहे.

पण मला अजूनही समर्थन करणारयांचा नेमका हेतू कळत नाहीये. ते न्क्की कोणाला वाचव्ताहेत आणि का?

मी काय म्हणतो तुम्ही या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ शकत असाल ना?>>>
खरे आहे तुमचे. तसं तर तुम्ही पण दुर्लक्ष करूच शकता, पण करता का? असो.

तसं तर तुम्ही पण दुर्लक्ष करूच शकता
>>>>

पण मुळात दुर्लक्ष का करायचे. हा काही माझ्या एकट्याच्या घरचा प्रॉब्लेम नाहीये. आज सगळीकडे या विजबिलाची चर्चा आहे. मी एकटाच याचा बळी नाहीये.
वर कोणीतरी म्हटलेय की कोकणातले काय ते त्यांचे बघून घेतील.
का? त्यांनाही थापाड्या बोला की? की त्यांचा घोळ खरेच घातला आहे हे मान्य आहे? की ते मान्यही करायचे नाहीये म्हणून त्यांचे ते बघून घेतील.?

बिल जास्त का येऊ शकतं याची कारणं माझ्यासकट अनेकांनी मांडलीत.

आपलं बिल नक्की कशामुळे जास्त आलं हे तपासलं का?

त्यासाठीच मी मूळ धाग्यातले ते मुद्दे लिहून विचारलं होतं.

<गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.>

मी आणखी ३ जणांची बिलं पाहिलं. असं झालेलं नाही . स्लॅब्स नीट कॅल्युलेट केलेत. पेद बिलाचं क्रेडिट मिळालंय.

ते बरोबर असेल तर मीटर प्रमाणे सध्याचं रीडिंग आणि बिलातलं रीडिंग यांची तुलना करून बिलातलं रीडिंग बरोबर आहे का हे पाहावं लागेल.
मीटरचं चुकीचं रीडिंग घेतले जाणे हे एक कारण असू शकेल हे इथे लिहिलं गेलं आहे.

पण तुमचा दावा आहे की बिलाचा हिशोबच चुकलेला आहे. असो. लष्करच्या पुरेशा भाकरी भाजून झाल्यात.

तुम्हाला माबोवर येऊन बरीच वर्षे झाली असावीत असे गृहीत धरतो
तर हे सगळं दुर्लक्ष, अनुल्लेख करून झालंय
आता वेगळा स्टँड घेतलाय तर लोकांना खूपू लागलंय
इतके वर्षे आम्ही जे केलं ते आता तुम्ही करा इतकेच सांगतो

आणि अश्याप्रकारे आशूचॅम्प यांनी इग्नोर करा हा सल्लाच इग्नोर केला आहे. Happy

जोक्स द अपार्ट

भरत आपण मला त्या तीन जणांचे आताचे बिल आणि आधीची बिले दाखवलीत तर बघायला आवडेल.
छोटासा सॅम्पल साईज घेऊन आपण सरसकट सर्वांन एकच न्याय लावत आहात.

मोठी बातमी: वीज बिलाचे जादा पैसे व्याजासहित परत मिळणार; 'बेस्ट'चा मोठा निर्णय

https://zeenews.india.com/marathi/mumbai/best-will-pay-excess-electricit...


आरे देवा
आता हे काय नवीन
जर वीज बिल योग्य आहे तर हे लोकं परत काय करणार आहेत

कोणी मला हे गणित समजावेल का आता?

<गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.>

मला हे पॉइंट्स चेक करायचे आहेत.

या उपरही काही लोकांची बिलं भरमसाठ आलीच आहेत. फक्त त्या चं कारण चुकीचं कॅल्क्युलेशन हे दिसलेलं नाही.

तुम्ही ठामपणे कॅल्युलेशन चुकलंय असं म्हणता य तो मुद्दा क्लियर करायला हवा.

थापा मारण्यात मास्टरी असे ऐकायला मिळाले त्याबद्धल तुम्हाला आनंद व्हायला हवा ऋन्मेष...
थापा मारणे हि एक कला आहे आणि त्यात प्राविण्य मिळवणे इतके सोपे नाही...
राहिला वीज बिल ऍनालिसिस - ते तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड ला विचारू शकता... Wink

या उपरही काही लोकांची बिलं भरमसाठ आलीच आहेत.

>>>>>

हे आधीच्या कुठल्या पोस्ट मध्ये आपण कुठे लिहिलेले का?

असो
आता बेस्ट ज्यादाची रक्कम परत करत आहे हे म्हटल्यावर मान्य तरी केलेत Happy

आजोबा, तुम्ही तुमचं बिल जास्त येण्याचं कारण स्वत: च लिहिलं आहे.
त्यावर कायम रहा.

आणि माझं वाक्य अर्धवट उचलून फिरवाफिरवी करू नका.

थापा मारण्यात मास्टरी असे ऐकायला मिळाले त्याबद्धल तुम्हाला आनंद व्हायला हवा ऋन्मेष...
>>>>>
ते मी आहे हे कबूलही करतो.
सध्या कुठलीही थाप मारत नाहीये
फक्त ते ईथे सिद्ध करून दाखवायची ईच्छा नाहीये ईतकेच Happy

आणि माझं वाक्य अर्धवट उचलून फिरवाफिरवी करू नका
>>>>

काही हरकत नाही.पुर्ण वाक्य पुन्हा लिहा

बिलांचा घोळ झालाय हे अखेर आपण मान्य केलेच आहेत.

तर मग आपणच सांगा काय कारणं आहेत त्या घोळांची?

की मी धागा काढला म्हणून घाबरून बेस्ट उगाच लोकांना पैसे परत करतेय?

आपण तुमच्या बिलाबद्दल बोलतोय.
बिल जास्त येण्याची काही कारणं तुम्ही सांगितली आहेत.
मी ती किमान दोनदा कॉपी पेस्ट केली आहेत.
बिल जास्त येण्याचं तेच कारण आहे हे दाखवून द्या.

बिल दोन कारणांमुळे जास्त येऊ शकतं.
१. मीटर चुकीचा आहे आणि जास्त रिडींग दाखवतो
२. तीन महिन्याचं रिडींग बरोबर आहे पण चुकीचा स्लॅब आकारल्याने

ज्यांना पहिला प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रत्येकाने आपापला सोडवायचा आहे. त्यांना मुळात सिद्ध करावे लागेल की मीटर चुकीचे रिडींग दाखवतोय.

भरत यांचं म्हणणं आहे, आणि मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे, की, मीटर रीडिंगनुसार बिलाच्या रक्कमेची आकडेमोड व्यवस्थित केली गेलेली आहे. ज्यांना शंका आहे त्यांनी ही आकडेमोड स्वतः तपासून पाहणे गरजेचे आहे. ते न करताच वीज कंपनीला दूषणं देणे चुकीचे आहे.

ज्यांच्या बाबतीत ही आकडेमोड चुकीची असेल त्यांनी नक्की तक्रार करावी. पण न तपासताच तक्रार केली तर विजकंपनीचा तक्रारींचा लोड उगाचच वाढतो आणि ज्यांचा जेन्यूईन प्रॉब्लेम आहे ते बिचारे रखडतात.

बिल दोन कारणांमुळे जास्त येऊ शकतं.
१. मीटर चुकीचा आहे आणि जास्त रिडींग दाखवतो
२. तीन महिन्याचं रिडींग बरोबर आहे पण चुकीचा स्लॅब आकारल्याने

>>>>>

मग आता लोकांना कुठल्या कारणाने बिल जास्त आलेय असे तुम्हाला वाटते

भरत आपणही याचे उत्तर देऊ शकता

ज्यांना बिल जास्त आलेय त्याचे कारण काय असावे असे आपल्याला वाटते?

काही जणांचं बिल जास्त आलेलंच नाही, त्यांना फक्त वाटतंय की जास्त आलंय म्हणून. ते उगाचच आकडेमोड तपासून बघायच्या आधीच थयथयाट करताहेत

Pages