(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................
जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.
मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.
नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :
१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?
‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?
बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:
१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
३. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:
१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.
४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.
६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?
या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.
कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
५. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :
१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:
*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.
*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.
२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.
याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.
२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
७. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.
१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .
२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?
कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?
लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.
ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?
ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?
याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?
या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.
१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?
२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?
होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?
मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?
‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.
१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.
३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.
५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?
या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:
१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.
३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.
५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?
यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:
१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.
३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध
वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?
१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)
२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................
परी,
परी,
बाधित रुग्ण किती काळ संसर्गक्षम राहील याचे उत्तर आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. स्वाब चाचणीवर आधारित दोन अभ्यासांचा निष्कर्ष असा आहे:
१. 8 ते 37 दिवस ( सरासरी वीस दिवस )
२. 18 ते 48 दिवस ( सरासरी 31 दिवस)
( म्हणून संबंधित डॉ चा सल्ला आवश्यक ).
धन्यवाद कुमार
धन्यवाद कुमार
म्हणजे ४८ दिवस काळजी घ्यावी लागणार
डॉ च्या सल्ल्याने 'सरासरी'
डॉ च्या सल्ल्याने 'सरासरी' दिवस ठरवता येईल
Covid19 var कोणतेच औषध नाही.
Covid19 var कोणतेच औषध नाही.
फक्त लक्षण वर उपचार करतात.
खोकला असेल तर त्या वर औषध दिले जाते,सर्दी असेल तर सर्दी वरच,ताप असेल तर tapavarach औषध दिले जाते.
अशीच आता पर्यंत माहीत होते.
मग ,covid19 बरा होतो म्हणजे नक्की काय होते.
लक्षण पूर्ण नष्ट होणे म्हणजे covid19 ,मुक्त होणे की अजुन काही.
Covid19 मुक्त होणे म्हणजे व्हायरस मुक्त होणे हा अर्थ आहे का.
असा arth asel तर व्हायरस कसा नष्ट होतो जर तो व्हायरस नष्ट करण्याचे किंवा निष्क्रिय करण्याचे औषध नाही मग हे घडत कसे
@hemant, कोविडला आपली
@hemant, कोविडला आपली प्रतिकारशक्ती संपवते.आपल्या प्रतिकारशक्तीइतके पावरफुल औषध /थेरेपी अजून आलेली नाही.ज्यांची शक्ती कमी आहे त्यांना आजार कोविड होत आहे.जे हेल्दी आहेत त्यांना इन्फेक्शन होऊन गेलेलेही समजत नाही.(ऐकीव माहिती)
हा विषाणू हवेतून पसरत
हा विषाणू हवेतून पसरत असल्याने आता उपाहारगृहे आणि व्यापारी संकुलात त्याचा हवेतच नाश करण्याचे उपाय विचाराधीन आहेत. त्यासाठी UV-C या किरणांचा वापर हा एक पर्याय आहे. तो काही परिपूर्ण उपाय नसला तरी प्राप्त परिस्थितीत योग्य अशी त्याची भलामण केली गेली आहे.
याबाबत काही अधिक/उणे असे:
१. बाधिताकडून लहान आकाराच्या तुषारांच्याद्वारा हवेत आलेले विषाणू त्याने मरतात.
२. मात्र मोठ मोठे तुषार हवेतून खाली जाऊन बसत असल्याने त्यांच्यातून आलेले विषाणू मरत नाहीत. तो धोका राहतोच.
३. ही यंत्रणा बंदिस्त जागांमध्ये बसवायची असेल तर त्या जागांची उंची खूप चांगली असल्यास फायदा होतो, कारण या यंत्रणेसाठी खोलीत वरपर्यंत हवा चांगली खेळती राहावी लागते.
४. समजा इथे दोन व्यक्ती जवळ आल्या आहेत. अशा वेळेस जे तुषार त्यांच्या समीप सान्निध्यात उडतील, त्यांच्यावरही या किरणांचा परिणाम होत नाही.
५. या किरणांमुळे आपल्या डोळे व त्वचेला इजा होऊ शकते. त्याचा नीट अभ्यास व्हायला हवा.
हवेतून पसरतो हे नक्की आहे का?
हवेतून पसरतो हे नक्की आहे का?
ठरावीक वातावरणातच हवेतून पसरतो (जसे की बाधिताला नेब्युलाईझर दिल्यास त्या खोलीत हवेतून पसरेल) असे वाचनात आले.
मानव,होय, पसरतो. असे जगभरातील
मानव,
होय, पसरतो. असे जगभरातील २४० वैज्ञानिकांनी संयुक्तरीत्या जाहीर केले आहे. नंतर WHO ने देखील ‘ हा विषाणू हवेतून पसरतो, पण मर्यादित वातावरणात’, अशी पुष्टी जोडली आहे.
हा जगातील एकमेव आजार आहे इथे
हा जगातील एकमेव आजार आहे इथे संशोधक आणि डॉक्टर मंडळी मध्ये एका पण पॉइंट वर एकमत नाही.
आश्चर्य आहे.
खोकला आल्या नंतर काही वेळ ते तुषार हवेत राहणार ही साधी गोष्ट आहे.
पण ते संसर्ग करण्यास सक्षम आहेत का?
असतील तर किती टक्के त्याची शक्यता आहे?
शक्यता असेल तर व्हायरस लोड किती असेल?
ह्या वर सविस्तर माहिती न देता फक्त हवेतून प्रसार होतो अशी अर्धवट माहिती का दिली जाते
हवेतून पसरतो हे नक्की आहे का?
हवेतून पसरतो हे नक्की आहे का? >>>>
पसरणार ना हवेतून. मला तरी वाटते. उदा. --
रोगी नाक-तोंड न झाकता शिंकला/ खोकला / बोलला; त्यातून द्रवाचे थेंब आणि जंतू हवेत मिसळले. हवा स्थिर आहे तरी पुढचे काम brownian motion करेल ना? रोगी-निरोगी बोलतायत, वारा आहे तर त्याच्या दिशेप्रमाणे जंतू वाहून नेले जाणार......... की नाही? मी चुकीचा अंदाज लावतेय?
काही वर्षांपूर्वी रिकाम्या ट्रेनमध्ये वार्यामुळे शिंकेच्या फवार्याचा अनुभव आलेला आहे.
Submitted by Hemant 33 on 23 July, 2020 - 22:11 >>>> मागच्याच पानावर कुमार१नी हे दिलेले आहे. त्यांना माहितीचा संदर्भ विचारता येईल.
व्हायरस नवीन आहे
व्हायरस नवीन आहे
रोज थोडी थोडी माहिती मिळत आहे,
मोदीजी बोलले होते , महाभारत 18 दिवसात संपले होते वगैरे
महाभारतात तिकडचे व इकडचे आज कोण मेले / जगले ह्यावर उद्याचे व्यूह ( किंवा view ) ठरवले जात होते
तसेच सुरू आहे
डॉक्टर कुमार
डॉक्टर कुमार
प्रतेक शंकेचे उत्तर देत आहेत आणि ती उत्तर समाधान कारक आहेत .
त्या विषयी काहीच आक्षेप नाही.
पण जागतिक लेवल जे उलट सुलट मत संशोधक मंडळी व्यक्त करत आहेत त्याचे आश्चर्य वाटत आहेत.
खोकला आला की काही वेळ ते तुषार हवेत असणार हे सामान्य लोक समजू शकतात .
पण हीच माहिती सहा महिन्यानंतर दिली जाते आणि बचाव करताना व्हायरस नवीन आहे असे स्पष्टीकरण दिले जाते.
हे खरोखर आश्चर्य आहे.
Sarse 1 येवून गेला ना .
प्रसार कसा होतो हे माहीत नाही का अजुन.
किती महिने गेल्या वर हा व्हायरस जुना होईल.
की वर्षभर व्हायरस नवीन आहे. हेच कारण सांगणार
ओके, मला वाटले संसर्ग सक्षमता
ओके, मला वाटले संसर्ग सक्षमता, त्याची शक्यता टक्केवारीत, व्हायरस लोड इत्यादि डेटा हवा आहे.
म्हणून म्ह्टले तो दिलाय त्यांनी नुकताच.
संशोधक मंडळी, WHO, निर्णयकर्ते मान्यवर आहेत. त्यांना प्रणाम. काही सन्माननीय अपवाद वगळता बाकीचे पोपट मेला हे सांगायला शब्द जुळवत रहातात. मजबुरी असेल. आपल्याला दिसतोय तो मेलेला. मग का वाट बघा...
who वाले स्वप्नात येते ते
who वाले स्वप्नात येते ते बोलतात... इतके जबाबदार कोणी पहिले नाही...
WHO म्हणजे incompetence
WHO म्हणजे incompetence personified आहे. इथे काही WHO चे कट्टर समर्थक आहेत. पण हल्ली भांडायला धावून येत नाहीत.
कारवी, हवेतून पसरणेचा अर्थ
कारवी, हवेतून पसरणेचा अर्थ वेगळा आहे.
रोगी - निरोगी बोलत आहेत याला हवेतून पसरणे म्हणता येणार नाही. रोगी खोकला, शिंकला तर काही काळ हवेत droplets रहातील याला ही हवेतून पसरणे म्हणता येणार नाही.
Airborne transmission occurs when infectious agents are carried by dust suspended in the air. With airborne transmission, direct contact is not needed to spread disease (as compared with respiratory droplet transmission).
तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हवेतून पसरत असेल तर ते सांगायला शास्त्रज्ञांना इतके महिने लागले नसते.
आमच्याकडे १२ August ला शाळा
आमच्याकडे १२ August ला शाळा सुरू होणार आहेत. ऐंशी टक्के पालकांनी online पर्याय असताना in person /normal setting निवडला आहे. बऱ्याच जणांना वाटते की तो मुलांना होत नाही /त्यांच्यामुळे पसरत नाही. आणि वर्किंग पेरेन्ट्सना मुलांना घरी बसवणे शक्य नाही.
खरे आहे का ते ? काय करणे योग्य राहील!! मी अजून निर्णय घेतला नाही पण फार ताण येत आहे. ... रविवारी ठरविण्याचा शेवटचा दिवस आहे.
धन्यवाद कुमार सर.
Airborne transmission occurs
Airborne transmission occurs when infectious agents are carried by dust suspended in the air. With airborne transmission, direct contact is not needed to spread disease (as compared with respiratory droplet transmission.
किती अंतर ते धुळी कणा बरोबर प्रवास करतात ?
त्यांची हवेत किती घनता असते.
बंद रूम मध्ये ते किती वेळ हवेत तरंगत असतात.?
आणि तीव्र संसर्ग निर्माण करण्यासाठी ते सक्षम राहतात का?
मित्रांनो ,सेरोलॉजिकल
मित्रांनो ,सेरोलॉजिकल सर्व्हेनुसार म्हणजे रक्तचाचणीनुसार ३० % लोकांना व्हायरल इन्फेक्शन होऊन गेले आहे,निदान मुंबई पुण्यात तरी व त्यामुळे डेथ रेट हा .०५आे असे तज्ञ सांगत आहेत.याचा अर्थ हा रोग खूप गंभीर आहे असे नाही फक्त काही लोकांमध्येच कोविड गंभीर होतोय.घाबरु नका फक्त योग्य काळजी घ्या .
काही तज्ञांच्यामते आपण हर्ड इम्युनिटीकडे जात आहोत,लस येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे हर्डचा पर्यायच शिल्लक राहतो.तरी तज्ञांनी मार्गदर्शन करावे.
टाळेबंदीमुळे आणि करोनाच्या
टाळेबंदीमुळे आणि करोनाच्या भीतीमुळे करोना व्यतिरिक्त इतर व्याधींचे अनेक रुग्ण डॉक्टर कडे जाणे टाळत असतील, तसेच जे जात असतील त्यातील काहींना वेळेवर हवी ती सुविधा मिळत नसेल. असे अनेक रुग्ण दगावतही असतील.
करोनामुळे दगाववलेल्यांची संख्या जाहीर होत आहे, पण असे रुग्ण जे दगावत आहेत त्यांची संख्या जाहीर होत नाही, त्यांचा हिशेब ठेवला जातोय की नाही हे ही माहीत नाही. कदाचित अशा दगवणाऱ्यांची संख्या करोनामुळे दगवणाऱ्यांपेक्षा जास्तही असेल? एकंदरीत मृत्यदर गेल्या चार महिन्यात वाढलाय का (करोना मृत्य वगळून) अशी काही सांख्यिकी माहिती उपलब्ध आहे का?
हवेतून पसरणारा श्वसन आजार
हवेतून पसरणारा श्वसन आजार
१.सूक्ष्मजंतूयुक्त लहान कण (aerosols) बाधिताकडून हवेत पसरतात. हे बऱ्यापैकी कोरडे असतात. त्यांचा व्यास ५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असतो.
२. या कोरडेपणामुळे त्यातील जंतूची संसर्गक्षमता कमी होते.
३. असे कण वेळेप्रसंगी चाळीस फूट अंतरापर्यंत पसरू शकतात.
४. वातावरणातील उष्णता/आर्द्रता यांचा यावर परिणाम होतो.
५. अशाप्रकारे पसरणारे दोन ठळक आजार म्हणजे क्षयरोग आणि गोवर. त्याखालोखाल सर्दी, फ्लू व करोना विषाणूंचा क्रमांक लागतो.
आता सार्स २ संदर्भातील अशी माहिती पुढील प्रतिसादात ....
हवेतील कणांच्याद्वारा सार्स २
हवेतील कणांच्याद्वारा सार्स २ चा प्रसार
प्रयोगशाळेतील अभ्यास:
१. यात नेब्युलायझर वापरून या विषाणूचे कण हवेत सोडतात.
२. असे कण ३ ते १६ तासांपर्यंत हवेत राहिलेले आढळले. ते कण संसर्गक्षम होते.
३. मात्र असे प्रायोगिक अभ्यास आणि रुग्णसंदर्भातील वास्तव यात नेहमी एकवाक्यता असेलच असे नाही.
४. रुग्णालये, उपाहारगृहे आणि व्यायामशाळा अशा गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी काही अभ्यास झालेत. त्यातून मध्यम अंतरापर्यंत या विषाणूचे सूक्ष्मकण पसरतात असा प्राथमिक अहवाल आहे.
वाफ घेतल्याने करोना मरतो
वाफ घेतल्याने करोना मरतो
ह्याचे लॉजिक तेच आहे
जे
नोटांबंदीने अतिरेकी मरतात , ह्यात होते
के तु,
के तु,
काही तज्ञांच्यामते आपण हर्ड इम्युनिटीकडे जात आहोत
>>>>
होय. नुकताच ऑक्सफर्डचा एक शोधनिबंध जाहीर झालाय. त्यात त्यांनी २०% लोकाना झालेला संसर्ग पुरेसा ठरेल असे म्हटले आहे.
पण अजून यावर अन्य तज्ञांची चिकित्सा व्हायची आहे.
(https://www.medrxiv.org/content/10.1101/2020.07.15.20154294v1.full.pdf).
नवीन Submitted by मानव
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 24 July, 2020 - 07:39 >>>>
हे वैयक्तिक घेऊ नका प्लीज.....आपण मुद्द्यावर लक्ष ठेवू फक्त...
म्हणताय ते मान्य. ही व्याख्या तुम्ही कुठून घेतली माहीत नाही. २-३ ठिकाणी वेगवेगळ्या तर्हेने Airborne transmission ही संकल्पना दिलेली आहे. मी म्हणतेय ते droplet / respiratory infection संज्ञेत येते असे कळले.
माझ्या मते Airborne म्हणजे हवा हे माध्यम वापरून पसरणारा. जसे कावीळ / टायफॉईड / कॉलरा पाणी / अन्नातून पसरतात. Umbrella concept. मग हवेतून --- तात्काळ / कालांतराने / जवळ / लांब / हवेच्या कणावरून / धुळीच्या कणावरून / शुद्ध हवेत / प्रदूषित हवेत / स्थिर हवेत / वार्याचा वेग / हवेची आर्द्रता, घनता, तापमान या सगळ्या subordinate शक्यता.
तुम्ही दिलेल्या व्याख्येनुसार --- जर एक प्रशस्त हवाबंद खोली आहे, आपण तिथे शून्य धूलिकण परिस्थिती निर्माण केली. रोगी-निरोगी एकत्र ठेवले. अंतर राखले तर करोना पसरणार नाही? शून्य शक्यता? पण सर्वसाधारण्पणे असे होणार नाही. मग धूलिकणांचा करोना Airborne करण्यात काय significance?
नैसर्गिक हवा ही अनियंत्रित माध्यम आहे. त्यात एके ठिकणी जंतू आलेले आहेत. दुसर्या ठिकाणचा निरोगी माणूस बाधित होईल की नाही हे अंतर आणि काळ यावर ठरेल कारण त्यानुसार जंतूंच्या संसर्ग क्षमतेची तीव्रता कमी होईल. Linearly की exponentially की logarithmically कमी होईल हा कीसही पुढे पाडता येईल.
आपल्याला जीव प्यारा तर का यामागे लागा. Airborne आहे गृहीत धरू. Airborne असण्याची ५% / ५०% / १००% शक्यता असली आणि आपण त्यात फसलो तर. लोक चंदनाचा हार घालून भिंतीवर गेल्यावर WHO म्हणाली नाही हो नाही असतो बरं Airborne. आधीचे hypotheses statistically insignificant, तर काय उपयोग आहे त्याचा?
करोना संदर्भात Airborne हे droplet आणि aerosol (म्हणजे अनुक्रमे ५ मायक्रोमिटर पेक्षा मोठे आणि लहान) असे distinguish केलेत. पुढे हे aerosol कसे अभ्यासतात हे कुमार१ यांनी दिले आहेच.
आता हे aerosol पकडून culture करून replicate होतात हे दिसलेय म्हणजेच ते संसर्गजन्य असतात म्हणे. म्हणून केवळ शिंकणे-खोकणे नव्हे तर बोलणे आणि उछ्श्वासातूनही पसरू शकतो असा निष्कर्ष.
१ मायक्रोमिटर पर्यंतचे aerosol तपासले. त्यात, १८ पैकी ३ नमुने replicate झाले म्हणजे १६-१७% aerosol संसर्गक्षम झाले? हे कितपत महत्त्वाचे समजायचे? की दिलासादायक आहे?
ज्यांचे aerosol पकडले ते रोगी किती गंभीर आजारी होते / नव्हते? त्यांच्या प्रतिकारशक्तीने किती दुबळा केला होता विषाणू aerosol स्वरूपात बाहेर फेकण्याआधी या मुद्द्यांचे काय? सो, सामान्य माणूस म्हणून आपण सावधगिरी आणि तारतम्य यावरच तरून जाऊ. बाकी व्याख्या, प्रयोग, निष्कर्ष पुढे त्या त्या संस्थांच्या रिपोर्ट मध्ये वाचता येतील.
डॉक, छान माहिती.
डॉक, छान माहिती.
>>>> आपण सावधगिरी आणि तारतम्य यावरच तरून जाऊ. >>>> +१११
संक्रमित होण्याचे सर्व मार्ग
संक्रमित होण्याचे सर्व मार्ग माहीत होणे गरजेचे आहे.
त्या वर प्रतिबंधात्मक उपाय हे रोग पेक्षा भयंकर नकोत.
हवेतून पसरतो म्हणून 24 तास मास्क वापर करा असे सल्ले नकोत.
कायम स्वरुपी मास्क वापरून श्वसन स अडथळा निर्माण होवून नवीनच समस्या उभी राहायची .
हवेतील विषाणू नष्ट करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात अती नील किरणांचा वापर करणे त्याचा मानवी शरीरावर covid19 पेक्षा भयंकर परिणाम झाला तर.
Santizer किती वापरावे त्याचे पण तारतम्य असावे.
हा लेख वाचण्यात आला.Lift
हा लेख वाचण्यात आला.
Lift lockdowns, protect the vulnerable, treat Covid like a health issue and not a disaster
मानव,
मानव,
लेख वाचला.
'दुर्बल आणि व्याधीग्रस्तांचे रक्षण करा ' हा मुद्दा पटला.
Since there are so many
Since there are so many previously infected people, the Covid-19 infection fatality rate (IFR) in India implied by ICMR’s previous study is around 0.1 per cent or lower — one death per thousand infections. This is much lower than the widely reported fatality rate estimate of 2.5 per cent, which ignores the large number of unreported and uncounted cases found by the serological studies. Unreported cases must then be also counted in the denominator to estimate the true danger from the Covid-19 infection.
मानव पृथ्वीकर ,तुमच्या लिंकमध्ये वरील माहिती महत्वाची आहे. सध्या कोविडचा संसर्ग ४०% लोकांमध्ये असेल असे वाटते.सरकारने आता लॉकडाऊन कमी करावे असे वाटते.
Pages