कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

Submitted by कुमार१ on 16 June, 2020 - 23:52

(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................

जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.

मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.

नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :

१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?

‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अ‍ॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?

बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:

१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:

१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.

४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.

६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?

या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.

कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:

*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.

*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.

२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.

याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.

२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.

१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .

२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?

लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.

ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?

ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?

या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?

२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?

मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?

‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.

१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.

३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.

५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?

या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:

१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.

३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.

५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?

यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:

१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.

३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध

वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?

१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)

२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती,
या प्रश्नाचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जेव्हा हा विषाणू शरीरात हल्ला करतो तेव्हा साधारण अशा घटना क्रमवार घडतात:

दाह प्रक्रिया >> रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला इजा >>>
छोट्या रक्तगुठळ्या >>
फुफ्फुसे आणि आणि अन्य काही इंद्रियांच्या कार्यात बिघाड.

रक्तगुठळ्याची प्रक्रिया जे रुग्ण अति गंभीर झाले त्यांच्यात अधिक आढळली. सर्वांमध्ये नाही.
अजूनही यावरील अभ्यास अपुरा आहे. अधिक संशोधनाअंती अन्य बारकावे समजतील.

माझ्या बाजूला राहणाऱ्या एका व्यक्ती का स्टेप wise sarv covid19 chi lakshan दिसत होती.
उपचार पण स्टेप wise badlat gele.
सुरवाीपासूनच khokla hota mag x ray सुचवला गेला.
नंतर लक्षण गंभीर झाली श्वास घेण्यास त्रास होत होता मग admit केले ऑक्सिजन चे रक्तातील प्रमाण खूपच कमी मग कृत्रिम श्वसन चालू केले.
Covid टेस्ट केली ती निगेटिव्ह आली .
पण तरी सुद्धा उपचार डॉक्टर नी covid चे च चालू ठेवले.
बेंबीत जी 3 इंजेक्शन देतात ती दिली गेली.
एकाची किंमत 30000 अशी होती.
एक 7 दिवसात तो व्यक्ती ठीक झाला पण खूप अशक्त पना होता .
प्रश्न हा आहे covid19 असताना टेस्ट रिझल्ट निगेटिव्ह का आला असेल.

या लेखात काय लिहिलं आहे बघा:

"Most bizarrely of all, when researchers tested blood samples taken years before the pandemic started, they found T cells which were specifically tailored to detect proteins on the surface of Covid-19. This suggests that some people already had a pre-existing degree of resistance against the virus before it ever infected a human. And it appears to be surprisingly prevalent: 40-60% of unexposed individuals had these cells."

https://www.bbc.com/future/article/20200716-the-people-with-hidden-prote...

मानव + १
माझा आधीचा एक प्रतिसाद यावरच आहे:
स्वीडनमध्ये अजून एका संशोधनात गेल्या तीन वर्षात जुन्या करोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास झाला. या जुन्या संसर्गामुळे त्यांच्यात काही T पेशींची निर्मिती झाली होती. या पेशींमुळे या लोकांना सध्याच्या विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती आपसूक मिळाली असावी. त्यामुळे असे लोक सध्या संसर्ग होऊनही लक्षणविरहित असावेत.
यावर अधिक अभ्यास होत आहे. हे नक्कीच आशादायक चित्र आहे.

(Submitted by कुमार१ on 12 July, 2020 - 11:45)

हे छान संकलन झालेय कुमार१, कोविड-१९ विषयी. खूप सविस्तर व शास्त्रीय माहिती मिळते इथे. मनापासून आभार.
माझे बरेच वाचायचे बाकी राहिले आहे. हा प्रश्न झालाय का --

लोकसत्तामध्ये गिरीश कुबेर यांनी लिहीले होते की ---- मुंबईतील एका सरकारी रूग्णालयातील ओपीडीत अनुभवी डॉनी केवळ क्ष-किरण तपासणी अहवालावरून करोना संसर्गाचे निदान केले होते. कुठलीही आधुनिक तपासणी न करता हे सांगितल्याने नातेवाईक संभ्रमित होते. डॉ म्हणाले आधी त्याला अ‍ॅडमिट करा, ऑक्सिजन लावण्याची गरज पडणार आहे. बाकी मग बोलू. आणि खरोखरच २४ तासात त्याची प्रकृती खालावली.

त्यामागे डॉचा अनुभव आणि कौशल्य आहेच. पण या निदानाचे वैद्यकीय स्पष्टीकरण काय असू शकेल?

हे अनमानधपका निदान नव्हते. श्री कुबेरांनी डॉना विचारले की इतक्या साध्या तपासणीत इतके अचूक निदान शक्य असेल तर त्यावर तुम्ही पेपर का लिहीत नाही? डॉ म्हणाले जेवायला फुरसत नाही तर वैद्यकीय डेटा, त्याचे संख्याशास्त्रीय विवेचन, निदानाचे स्पष्टीकरण, मग पत्रव्यवहार इतके कधी करू? आधी लोकांचे जीव वाचू देत.

खरेच जर इतक्या साध्या मार्गाने निदान झाले तर किती दिलासा मिळेल रुग्णांना, वेळ वाचेल, कोणाला नेमकी कसली गरज आहे ते स्पष्ट कळल्याने आरोग्यसेवा देणार्‍यांचा ताण कमी होईल.
पेपर सोडा पण अशा आणीबाणीच्या वेळी बाकीच्या डॉना मार्गदर्शक म्हणून सरकारचे आरोग्य खाते / रूग्णालयाच्या डीननी किमान डॉक्टरी वर्तुळात ही माहिती का पुरवू नये. मग जगासमोर हे आपोआप येईल की लाखो रूग्ण भारताने कसे यशस्वीपणे हाताळले.... की आपल्याला फक्त बाजारपेठ व्हायचेय निरोगी असताना आणि रुग्ण म्हणून देखील.....

हाताशी असलेल्या साधन सुविधांमध्ये उत्तम आणि अचूक रिझल्ट देणारे असे किती गुणी लोक दुर्लक्षित रहातात आपल्याकडे, तरीही ते त्यांची कर्तव्ये चोख करतात.

गिरीश कुबेर / सदर अन्यथा / लेख त्यात काय सांगायचं? / लोकसत्ता शनिवार २० जून पान ७
https://epaper.loksatta.com/2719760/loksatta-mumbai/20-06-2020#page/7/2

याबद्दल लोकसत्ता प्रतिनिधी शैलजा तिवले यांचे वॄत्त लोकसत्ता शुक्रवार १९ जून पान ४
https://epaper.loksatta.com/2718543/loksatta-mumbai/19-06-2020#page/4/2

एक्स रे व सीटी मध्ये विशिष्ट patches दिसतात , त्याने निदान लवकर व कन्फर्म होते
आणि हा रिपोर्ट लगेच बघून प्राथमिक उपचार तरी सुरु होतात,
स्वेब् टेस्ट मग दुसऱ्या दिवशी सकाळी करतात, त्याचा रिपोर्ट तिसऱ्या दिवशी येणार
मग तोवर क़ाय करणार ?

कारवी, धन्यवाद.
वृत्तांत वाचला. त्या डॉक्टरांचे निदान चांगले आहे. अर्थात एका रुग्णावरून या सल्याचे सार्वत्रिकीकरण करता येत नाही. यावर थोडी अधिक माहिती देतो.

कोविडने बाधित 30 ते 50 टक्के रुग्णांमध्येच छातीच्या क्ष-किरणातून वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळते- सर्व रुग्णांमध्ये मिळेलच असे नाही. बऱ्याच रुग्णांना हे छातीतले बदल, त्यांचे पहिले लक्षण आल्याच्या दहा ते बारा दिवसानंतर आढळतात.

तेव्हा प्रत्येक रुग्णतपासणीनुसार सल्ला बदलू शकतो. काही वेळेस छातीतले तसे बदल अन्य सूक्ष्मजंतूंच्याही आजारात किंवा अन्य फुफ्फुसविकारातही दिसू शकतात.

दुसरी बाजू !
आता काही करोना- सार्स २ च्या बाजूने लिहितो.

१. तो अनेक वर्षे वटवाघूळ व खवलेमांजरांत सुखाने नांदत होता.
२. बहुधा खवलेमांजरांत असताना त्याने मोठा जनुकीय बदल केला. त्यामुळे त्याला माणसात उडी मारणे सोपे गेले.

३. माणसात आल्यावर त्याने अजून काही बदल केले, ज्यांच्यामुळे त्याला या ‘नव्या घरात’ पाय घट्ट रोवता आले. हीच पायरी त्याच्या दृष्टीने फायद्याची आणि आपल्या दृष्टीने महात्रासाची ठरली.
४. आता कुठल्याही जंतूप्रमाणे त्याचे ध्येय “वाढ, वाढ आणि वाढ” हेच असते.

५. जर का त्याने सुरवातीच्या रुग्णांना खूप गंभीर आजार करून मारून टाकले, तर ते त्याच्या दृष्टीने नुकसानीचेच असते ! कारण जिवंत माणसातच तो वाढू शकतो. सार्स १ बऱ्यापैकी असाच वागला. त्यामुळे त्याची महासाथ घडवण्याआधीच संपला.

६. पण, सार्स २ हा बेटा शहाणा व चतुर आहे. त्याने अधिकतर लोकांत हल्ला सौम्यच ठेवला आणि त्यामुळे तो अधिकाधिक लोकांत पसरत गेला.

७. मग काय ......वाढता वाढता वाढे असे त्याचे स्वरूप झाले !!
८. भविष्यात त्याला आपल्याशी मैत्री करून आपल्याबरोबरच शांतपणे जगायचे आहे खरे, पण त्यासाठी तो बराच वेळ घेतोय बेटा......
Bw

कुमार,
बरंच चांगलं कळलं.
(एक डोक्यात शंका बरेच दिवस येत होती.अंगावरचे, कपड्यावरचे करोना विषाणू चष्मा घातल्यावर दिसतील असा चष्मा अजून कोणी बनवला नाही का?चष्म्यात इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप फिट करावा लागेल.इतकं सोपं नसावं.)
अणुशक्ती केंद्रांमध्ये ड्रायवेल च्या रेडिएशन झोन मधून बाहेर आल्यावर एका केबिन मध्ये गेल्यावर अंगावरचे रेडिएशन (पार्टीकल्स) दिसतात.मग ते नीट शॉवर किंवा हात धुवून काढावे लागते.असे काहीतरी आठवतेय.

धन्यवाद BLACKCAT,
एक्स रे व सीटीतील patchesने निदान लवकर व कन्फर्म होते, तर तेच पुरेसे नाही का?
मोठी लोकसंख्या, अपुरी व्यवस्था, आर्थिक चणचण, अडचणीच्या काळातील नफेखोरी --- या स्थितीत केस कन्फर्म होण्याचा वेग वाढणे आणि खर्च कमी होणे चांगले ना? प्रसाराचे प्रमाणही कमी होईल?

स्वेब् टेस्टने अजून काय वाढीव कळते? patches करोनामुळे आहेत की अन्य रोगामुळे?
म्हणजे स्वेब् टेस्ट unique confirmatory test म्हणून अनिवार्य आहे?

व्हायरल लोड कळतो मग औषधाची निवड + मात्रा ठरवता येते? अजून काही?
लक्षणहीन, सौम्य लक्षणे असणार्‍यांना लक्षणाधारित उपचारच होतात असे पण? बळावल्यावर मग अँटीव्हायरलस देतात ना, की मी चुकीचे समजतेय?

धन्यवाद कुमार१,
एक रूग्ण नाही बहुतेक. शैलजा तिवले यांच्या बातमीवरून वरळी कोविड केंद्रात ही पद्धत वापरतात. ९९% अचूकता आहे म्हणे. सामान्य माणसाला कसे कळणार, हा वृत्तपत्रीय दावा की वैद्यकीय सत्य आहे.....
एक्सरे प्लेट वाचता येत नाही. हाडे, मांसल भाग कळतो. काळा पांढरा राखाडी रंग दिसतो. बस.

एक्सरेतील patches चे पॅटर्न रोगागणिक वेगळे "दिसतात" का?
म्हणजे कोविड, क्षय, दमा, न्युमोनिआ, प्रदूषण / धूम्रपान यामुळे झालेली फुफ्फुसाची हानी याचे patches एकमेकांपासून वेगळे ओळखू येतात का?
की patches आहेत म्हणजे "काहीतरी" आहे, कुठल्या भागात आहे, किती आहे इतकेच कळते......
पण नेमके काय हे रोग्याची बाह्य शरीर लक्षणे + पॅथोलॉजी टेस्ट यावरूनच pin down होते अन्यथा नाही?

छातीतले बदल, त्यांचे पहिले लक्षण आल्याच्या दहा ते बारा दिवसानंतर आढळतात. >>>>>
म्हणजे संसर्ग झाला >> +१० दिवस << बाह्य लक्षणे सुरू >> +१० दिवस << फुफ्फुसात एक्सरेत दिसण्याएवढा बदल असे का?
पटतेय.... व्हायरसला वेळ लागेलच फुफ्फुसाची जाणवण्याइतकी हानी करण्यासाठी. व्यक्तिगणिक कमीजास्त....
आणि एक्सरे तंत्रज्ञानाची least count / Projection ability मर्यादाही असणार.
(काय शब्द असतो माहीत नाही.... नेमका किती लहानात लहान, फिका, क्षीण, अडनिड्या जागेवरचा patchही एक्सरे तंत्र यशस्वीपणे पकडेल आणि बाकीच्या शरीर रचनेपासून वेगळा दाखवू शकेल याची क्षमता )

जंतुमुळे होणाऱ्या रोगाचे अचूक निदानासाठी तो जन्तु शोधणे हेही महत्वाचे असते,

त्याशिवायही रोग बरा होउ शकतो , उदा सर्दी , 3 दिवस गोळ्या घेतात , कुणी सर्दिचे कल्चर , माइक्रोस्कोपी वगैरे करून जन्तु शोधत नाही,

हगवन कोलरयाची आहे की व्हायर्स ची , 90 % उपचार तेच असतात , पण साथ असेल तर जन्तु शोधावा लागतो

गम्भीर आजारात खर्च होउ दे , पण जन्तु शोधा ही गाइड लाइन असते,

IMG-20190823-WA0069.jpg

नॉर्मल फुफ्यूस सर्वत्र काळे असते , कारण त्यात हवा असते

कोविडिय फुफ्यूस पेरीफेरिला पांढरे असते,
एक्स रे लगेच 10 मिनितात मिळतो

द्राविडिय तसे कोविडिय

माझ्या बाबांच्या X Ray वरून कोव्हिडचा संशय आला.
त्यांना विलगिकरणात ठेवून swab टेस्ट केली. ती निगेटिव्ह आल्यावर नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट केले. दहा दिवस रुग्णालयात होते, सोबत मी होतो. अनेक वार्ड बॉइज, नर्सेस, डॉक्टर्स अगदी जवळून संपर्कात आले. त्यांना तेव्हा खोकला सुद्धा होता. पण कुणालाही संसर्ग झाला नाही, म्हणजे कोव्हिडं नव्हताच जरी लक्षणे (ताप, खोकला, ऑक्सीजन पातळी कमी) होती, फुफ्फुसात इन्फेक्शन होते तरी.

आम्ही इतके त्यांच्या संपर्कात नेहमी, कुणाला तरी संसर्ग झाला असता ना. त्यांचे वय ८६. अंथरुणात असतात, उचलून व्हील चेअर मध्ये बसवणे, ताप असताना जेवण भरवणे, डायपर बदलणे वगैरे करावे लागते. त्यांच्या एवढ्या जवळून संपर्कात आलेल्यांपैकी कुणालाही लागण न होणे / किंवा सगळ्यांनाच लक्षण विरहित लागण होणे म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल.

Submitted by BLACKCAT on 22 July, 2020 - 19:35 >>>>>
आता मुद्दा कळला. साथ आहे म्हणून अधिक खात्री पटवण्याची निकड.
मला नाही हो अक्कल चित्र वाचायची. पण कळतेय थोडेथोडे.
कोविडीय पेरीफेरी म्हणजे फक्त मिलीमीटरभर बॉर्डरलाईन नव्हे.... १ल्या चित्रात आहे तशी ....
तर २र्‍या चित्रा सारखी ..... पिवळ्या गोलात पिठाची फक्की उडाल्यासारखा कडेकडेचा सरफेस एरिआ

मग १ल्या चित्रातले फुफ्फुस ----- बघणार्‍याच्या डाव्या हाताचा भाग केळीच्या पानाच्या अर्ध्यासारखा दिसतोय
आणि उजव्या हाताचा भाग चमच्या सारखा.... त्यालाही थोडा टवका गेल्यासारखा पांढरा गोलाकार दिसतोय.
हे नॉर्मल फुफ्फुस आहे का? की दुसर्‍या आजाराचे चिन्ह आहे?

मी सहज विचारतेय.... नवीन काही समजलं की डोकं फ्रेश होते...... तुम्हाला वेळ होईल तेव्हा द्या उत्तर.....

जंतुमुळे होणाऱ्या रोगाचे अचूक निदानासाठी तो जन्तु शोधणे हेही महत्वाचे असते, >>>>
+१११११

आणि साथीच्या रोगांत तर तशी मार्गदर्शक तत्त्वेही असतात.
स्वाब चाचणी विषाणूचा थेट आर एन ए सिद्ध करते. ( त्याचा आधारकार्ड क्र ! )

मानव,
एवढ्या जवळून संपर्कात आलेल्यांपैकी कुणालाही लागण न होणे >>> खरंय
तुम्हा सर्वांना सदिच्छा !

Dr,
असे काही नाही, 30 % केसेस मध्ये जन्तु मिळत नाही ==> covid 19 test negative का ?

खरच data analysis करावे लागते असे दिसते.... & its not easy, I hope all data get synced and analysed...

> (एक डोक्यात शंका बरेच दिवस येत होती.अंगावरचे, कपड्यावरचे करोना विषाणू चष्मा घातल्यावर दिसतील असा चष्मा अजून कोणी बनवला नाही का?चष्म्यात इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप फिट करावा लागेल.इतकं सोपं नसावं.) ===> मलाही खूप दिवसांपासून Mr. India सारखा आठ्वत होता..... Happy pls शोधा रे......

उजवा चमचा

Proud

तुमच्या दिशा चुकल्या आहेत

एक्स रे मध्ये आपल्या डाव्या हाताला पेशंट ची उजवी बाजू असते
म्हणजे आपल्या डाव्या हाताला त्याचे उज्वे फुफ्यूस आहे , ते मोठे असते

आता आपल्या उजव्या हाताला त्याचे डावे फुफ्यूस आहे
पांढरा चमचा म्हणजे हृदय आहे
त्यामुळे डावे फुफ्यूस लहानच असते

त्यांना विलगिकरणात ठेवून swab टेस्ट केली. ती निगेटिव्ह आल्यावर नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट केले. दहा दिवस रुग्णालयात होते, सोबत मी होतो. अनेक वार्ड बॉइज, नर्सेस, डॉक्टर्स अगदी जवळून संपर्कात आले. त्यांना तेव्हा खोकला सुद्धा होता. पण कुणालाही संसर्ग झाला नाही, म्हणजे कोव्हिडं नव्हताच जरी लक्षणे (ताप, खोकला, ऑक्सीजन पातळी कमी) होती, फुफ्फुसात इन्फेक्शन होते तरी.

माझ्या बाजूला राहणाऱ्या व्यक्तीचे पण असेच रिपोर्ट होते ,
आणि covid टेस्ट निगेटिव्ह.
पण डॉक्टर नी covid19 चेच उपचार केले त्यांना योग्य ते निदान झाले होते.

दिल्ली आणि मुंबईमध्ये सेरोलॉजिकल सर्वे केला आहे त्यात २५% लोकांमध्ये कोविडच्या अँटीबॉडी सापडल्या व त्यावरुन दिल्ली मुंबईतील २५% लोकांना कोविड होऊन गेला पण लक्षणं दिसली नाहीत असे वाचले. आपण हर्ड इम्युनीटीकडे जात आहोत व कोरोनाचा डेथ रेट फक्त .०५ % आहे असेही काहीजण म्हणत आहेत .काय खरे आहे??

Antibody पेक्षा t cell vishanu la jast divas लक्षात ठेवतात आणि t cell ch आपले रक्षण करतात.

के तु,
होय, आपण समूह प्र- शक्तीकडे जात आहोत . आता प्रश्न जनतेच्या % चा आहे.
त्यावर अजून एकमत नाही. देशोदेशींचे अनुभव/मते वेगवेगळी आहेत.
................................................

काही रोचक:
सुमारे २२०-२५० विषाणू माणसाला संसर्ग करतात. पण त्यांपैकी निम्म्याहून कमी एकातून दुसऱ्या माणसात पसरतात. जे पसरतात, त्यातलेही बरेच क्षीण असतात. तर काही संसर्ग झाल्यावर नाशही पावतात. आता जे काही जोरदार असतात ते जनुकीय बदल करून माणसात स्थिरावतात. अशी ‘यशस्वी’ मंडळी मग साथी घडवतात.

Infection च्या किती दिवसा नतर तुम्ही दुसऱ्याला इन्फेक्ट करत नाही ? मी १० दिवस अस कुठे तरी वाचल होता

Pages