चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लुडो खेळणारा दाढीवाला यमराज, हा रोल अनुराग बसूनेच केलाय. त्याच्यासोबत चित्रगुप्त.

साडेआठ को प्रोग्रॅम है म्हणजे साडेआठला धमाका होऊन लोक मरणार, त्यांना उचलायला यमराज आलेत. पैल्यांदा चित्रगुप्त तिकडे स्वर्गात बसून sorting करायचा, आता त्याचे डीमोशन होऊन सोर्सलाच सॉर्टइंग करायचे काम गळ्यात पडलेय बहुतेक.

दुर्योधन स्वर्गात वाली गोष्ट माहीत नाही. युधिष्ठिर सदेह स्वर्गारोहण करतो आणि त्याच्यासोबत त्याचा कुत्रा शिल्लक राहतो, द्रौपदी व इतर पांडव आधीच पडतात. ते का पडतात ही कथा माहीत आहे पण दुर्योधनवाली माहीत नाही. चित्रगुप्त म्हणतो की त्याचेही स्पष्टीकरण आहे पण यमराज त्याला थांबवतो.

दुर्योधन अत्यंत लॉयल मित्र, कर्तव्यदक्ष राजा आणि बायकोवर पूर्ण विश्वास ठेवणारा चांगला पती होता म्हणून त्याला स्वर्ग मिळाला असे इंटरनेट सांगते.

Ok.

लुडोची थीम हीच आहे की पाप पुण्य सापेक्ष आहे.

अरे कोणीतरी सूरज पे मंगल भारी विषयी पण लिहा की..

कमी प्रतिसाद मिळाल्याने अनेक थिएटरमधून उतरवण्यात आला असे वाचण्यात आले.

Thank u अस्मिता, नेफ्ली नाहीये. मागे कधी एक महिना फ्री घेतलेलं, भाचीचा पिक्चर बघायला.

अगं मगं छलांग आहे ना प्राइमवर... काही तरी नवीन दोन्हीकडे आहे. मलाही बघायचेत अजून वरची चर्चा वाचून उत्सुकता वाटतेयं.

छलांग पाहिला. सुरवातीला मस्त आहे, मला कंटाळा आला नंतर... तेच ते वाटायला लागले. राजकुमार रावसाठी बघितला शेवटपर्यंत. हा माणूस खरेच अमेझींग आहे.

तो थेटरात रिलीज झालाय ना? कोण जाईल मग? घरबसल्या हातातल्या मोबाईलवर बघता आला असता तर पाहिला असता. चांगला आहे असे ऐकलेय.

लुडो पाहिला

वन टाइम वॉच आहे सिनेमा. थोडा predictable आहे पण मस्त क्वर्कि टीपी आहे. साना म्लाहोत्रा मला आवडली मस्त दिसते. अभिषेक बच्चनच काम भारी (जरी युवाच एक्सटेन्शन आहे तरी ) राजकुमार राव धमाल आणतो. पंकज त्रिपाठी भारी त्याबरोबर ती नर्स पण .
भानू उदय बऱ्याच काळाने दिसला.
थोडक्यात चटपटीत भेळ आहे . एन्जॉयबल

शेवटी एकदाचा झाला बघून ल्युडो
कॉमेडी काय होते त्यात ते कळलं नाही
डार्क ह्युमर चे मुव्ही पाहिलेत त्यामुळे तो अगदी ओढून ताणून आलाय
मुळात कुठलेच पात्र नीट ठसत नाही
इतकी खिचडी केल्यामुळे
आणि माशा माराव्यात तसे माणसे मरतात
पण काही प्रसंग भारी घेतलेत
पंकज त्रिपाठी ची चार्लस इंजेल्स सारखी गन
त्याची अक्खी टीम
दोन्ही नर्स आणि ऑफ कोर्स ती अभिषेक बच्चन सोबतची पोरगी
त्याला फोनवर प्रोम्पटिंग करते तो सिन

ओव्हरल अगदी सो सो आहे चित्रपट
नंतर तर कंटाळा आला, अटपा आता

ओव्हरल अगदी सो सो आहे चित्रपट
नंतर तर कंटाळा आला, अटपा आता. >>> प्रचंड अनुमोदन. अत्यंत पीळ चित्रपट आहे. अभिषेक बवचन (त्याचं काम वगळता) आणि आदित्य रॉय कपूर ह्यांच्या स्टोरया त्यातल्या त्यात बऱ्या होता. उगीच तीन तास वाया गेले. त्यापेक्षा ती नवीन आलेली आचरट मालिका तरी बघितली असती.

ल्युडो आवडला. वन टाइम वॉच. सिनेमाची लांबी जरा कमी असती तर आणखी मजा आली असती.

काही काही क्षण फार धमाल आहेत. वरती साधनाने लिहिलाय तो होडीतला सीन. तसंच, शेवटी हॉटेलमधल्या गनफाइटच्या वेळी इन्स्पेक्टर पंकज त्रिपाठीवर गन रोखतो, तेव्हाच्या त्याच्या जेस्चरमुळे पं.त्रि. मागे वळून बघतो तो क्षण टायमिंगमुळे बेस्ट झाला आहे. Lol
पं.त्रि.ची गन ठेवायची जागा Lol
पुन्हा पाहताना असे आणखीही काही सापडतील. त्यासाठी फारएण्डला अनुमोदन.

पहिला एक तास सगळ्या कड्या जोडल्या जाताना बघायलाही मजा आली.

मॉलमध्ये काम करणारा तरुण - त्याला आख्ख्या सिनेमात एकही डायलॉग नाहीये. ते बघताना जाणवतही नाही.

ललिता ,त्या तरुणाला एक दोन डायलॉग आहेत जसे की ट्रॅफिक था वगैरे
पण तो इतक्या तोंडातल्या तोंडात पुटपुटत असतो की कांय फरक पडत नाही

क्युट आहे तो मुलगा
मला लुडो फार कळला नाही पण एक 10 मिनिटात मिस्टर बिन चे अनेक एपिसोड पाहिल्या सारखं हसू मात्र आलं.
एकडा नीट बसून पाहायला हवा.ते दोघे पुलावरून पंकज त्रिपाठी ला ढकलतात तो सीन पण धमाल आहे.

ल्युडो काहिना आवडतोय काहिना बोर वाटतोय, मला आवडला होता नवर्‍याला बोर वाटला त्याच्यामते अर्धा मुव्ही एडीटिन्ग करुन तेच तेच सीन वेगवेगळ्या अ‍ॅन्गलने दाखवलेत.

मला आवडला.. AB मला तरी प्रत्येक सिनेमा मध्ये एक्सारखाच वाटतो. one time watch आहे.. TP movie.

Pages