Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"मीनाक्षी सुंदरेश्वर" - दोन
"मीनाक्षी सुंदरेश्वर" - दोन तीनवेळा पहायला घेतला पण गाडी पुढे सरकतच नाहीये. एक तर तमिळ वातावरणनिर्मितीसाठी बराच वेळ आणि पैसा खर्च
केलाय, पण भाषेवर काहीच मेहनत घेतली नाहीये. सगळे अगदी उत्तर भारतीय वळणाची हिंदी बोलतात जे सारखं कानाला खटकतं. स्टोरी पटपट पुढेच सरकत नाही. बाकी करण जोहर टाईप्स 'सगळं भव्य-दिव्य पण पोकळ' हा अनुभव सतत येत रहातो. उदा. तो हीरो नोकरीच्या ठिकाणी जातो आणि तो कंपनीचा मालक तिथे जी काही मुक्ताफळं उधळत असतो - तो हॉल, संवाद - तो सगळा सीन च अ. अ. कॅटेगरी आहे.
बघायला सुरुवात केली
बघायला सुरुवात केली सुंदरेश्चर, पण सान्या मल्होत्रा कुठल्याही अॅन्गलने तामिळ दिसत नाही की बोलतचालत नाही.
तमिळ जनतेने सोशल मीडियावर बरीच पिसं काढली सिनेमाची असं वाचलं. एका ट्वीटमध्ये 'एक तामिळ रजनीकांत फॅन त्याच्या नावाचं स्पेलिंग Rajani Kant (no th!) कसं करू शकते असा मिलिअन डॉलर प्रश्न विचारलेला वाचला.
मला त्या लग्नातल्या साड्याही खरंतर आवडल्या नाहीत अजिबात - मुलाच्या बापाचा साड्यांचाच बिझनेस आहे म्हटल्यावर अधिकच!
सूर्यवंशी आताच पाहून आलो. खूप
सूर्यवंशी आताच पाहून आलो. खूप कमी वेळा असं होतं की न पाहता लिहीलेलं परीक्षण सिनेमा पाहिल्यावर अचूक निघतं. मागच्या पानावर जे लिहीलं ते किती अचूक होतं हे आता समजल्यावर मागच्या जन्मी मी नॉस्त्रॅडॅमस असलो पाहीजे अशी शंका येतेय.
सुपरबॅड पाहतोय, बऱ्याच
सुपरबॅड पाहतोय, बऱ्याच दिवसांनंतर पोटधरून हसायला लावणारा सिनेमा पहिला.
तो हिरो भाग्यश्री चा मुलगा
तो हिरो भाग्यश्री चा मुलगा आहे हे नंतर पाहिलं. >>> ओह्ह हे नव्हतं माहित! क्युट वाटला पण अॅक्टिंग सो सो आहे पण निरागस वाटतो.
हिरवीण आणि सिन सिनरी मस्त आहेत.
रजनी फॅन असणे उगाच ओढुन ताणुन वाटले..
निरागस acting >>>हे आवडले.
निरागस acting >>>हे आवडले.
सुपरबॅड .. हसायला लावणारा
सुपरबॅड .. हसायला लावणारा सिनेमा>> +१
स्क्वाड वाईट आहे.
स्क्वाड वाईट आहे.
डॅनी डेंग्झोंपाचा मुलगा फारच भाव खातो पण अभिनयात दम नाही. आवाज काढताना बापाची नक्कल केल्यासारखे वाटते. इतर सर्व अभिनेतेही फालतू अभिनय करत आहेत. कथा बालिश आणि तर्कहीन आहे.
Kutup कसा आहे
Kurup कसा आहे
Eternal बघितला का कोणी?
Eternal बघितला का कोणी?
Red Notice , Netflix वर
Red Notice , Netflix वर बघितला , मस्त आहे
Eternal बघितला का कोणी?
Eternal बघितला का कोणी?
Marvel cha ना... मी पाहिलंय...मला आवडला ..पण गरज नसताना काही सेक्स सीन्स आहेत... awkward for Marvel movies.. बाकी reviews भरपूर मिक्स्ड आहेत... ट्विस्ट and turns भरपूर आहेत... प्रत्येकाची बॅक स्टोरी आहे...more of humanised version of super heroes...
धन्यवाद सतीश.
धन्यवाद सतीश.
आताच eternal सिनेमा बघून आले.
आताच eternal सिनेमा बघून आले. तब्बल 2 वर्षांनी थेटरात गेलेले. मस्त वाटलं. सिनेमा टाईमपास आहे. भारतीय पद्धतीने दाखवलेले मार्व्हलच लग्न पण आहे Biggrin पटेल बुवा आहेत. बॉलिवूड डान्स आहे. गरमागरम सीन आहे ( लहान मुलांना घेऊन जाताना विचार करा) , टंग इन चीक विनोद आहेत. नेत्रसुखद हिरोज आहेत. VFX चे मारधड सीन आहेत, नैतिकतेची फोडणी आहे.
थोडक्यात ओव्हरऑल पॅकेज आहे
ड्युन पाहिला. जाम आवडला. दोन
ड्युन पाहिला. जाम आवडला. दोन भाग केल्याने फुरसतमे स्टोरी टेलिंग होतंय. पुस्तक वाचलेले नाही पण १९८४ चा पाहिलेला आहे त्यामुळे हा अधिकच आवडला. त्यांनी आरामात वेळ घेत सगळे हळू हळू पुढे नेलेले आहे. आणि व्हिजुअल इफेक्ट्स तर जबरा आहेत. तो वाळवंटी ग्रह आणि त्या वर्म्स भारी झालेत सगळे. झेंड्या तर आपली फेव्हरेट आहेच बहुतेक पुढील भागात तिला थोडा जास्तीचा रोल असेल आता.
झिम्मा बघितला. छान हलकाफूलका.
झिम्मा बघितला. छान हलकाफूलका...
निर्मिती ताई रॉक्स, सो कूल पण छान.
धमाका पाहिला आता. चांगला आहे.
धमाका पाहिला आता. चांगला आहे. वेगवान आहे.
गंदा है पर धंदा है.. म्हणूनच मी गेले कित्येक वर्षात न्यूज चॅनेल चुकूनही लावला नाहीये.
अपवाद कोरोनाची सुरुवात झाली तो आठवडा आणि या सरकारची निर्मिती होताना घडलेल्या शपथविधी नाट्याचे दोन दिवस.
हो! धमाका आवडला मला पण, जरा अ
हो! धमाका आवडला मला पण, जरा अ.आणि अ. आहे पण हिंदीत असा पिक्चर आलाय ते एकदम आवडलं. एकही गोष्ट नेहेमीच्या ठोकताळ्यांप्रमाणे होत नाही.
कार्तिक आर्यन आणि (चक्क अमृता सुभाष) ही आवडली. अमृता सुभाषने नेहेमीचा कटकटा/ किरकिरा टोन न पकडता चांगलं काम केलंय. हल्ली तिला हळूहळू जरा अॅक्टिंग जमायला लागली आहे अशी पुसटशी शंका येतेय मला.
ती कपिलशर्मा शो मधे आली होती
ती कपिलशर्मा शो मधे आली होती तेव्हा काहितरी विचित्रच मेकप करुन आली होती.
ती कपिलशर्मा शो मधे आली होती
ती कपिलशर्मा शो मधे आली होती तेव्हा काहितरी विचित्रच मेकप करुन आली होती.
धमाका मला तरी नाही आवडला.
धमाका मला तरी नाही आवडला. promised a lot, failed to deliver वाटला. धमाका न वाटता सादळलेली सुटी लवंगी वाटला.
कार्तिक आर्यनचा विचित्र लूक
कार्तिक आर्यनचा विचित्र लूक आणि अचाट / अतर्क्य ट्रेलर बघून अजिबात बघावसा वाटला नाही धमाका.
कुठे पाहिले सिनेमे ते हि
कुठे पाहिले सिनेमे ते हि सांगा ना लोकहो म्हणजे शोधाशोध करायचे कष्ट वाचतील.
अ.आणि अ तर होता. आणि ते
अ.आणि अ तर होता. आणि ते टाळायला फारच अभ्यासून बनवावा लागला असता. पण संवादातून मिडीयावर ओढलेले ताशेरे आवडले. ती खरी थीम मानली तर ते पोहोचले. बाकी लूपहोल शोधत बसलो आणि चुका काढत बसलो तर मजा गेली
मुळात हिंदीत असा पिक्चर आला की बघायला बरा वाटते. बोअर होत नाही कुठे त्यामुळे बघायला हरकत नाही असे वाटते.
मृणाली धमाका नेटफ्लिक्सवर आहे
मृणाली
धमाका नेटफ्लिक्सवर आहे
बंटी बबली बघितला थिएटरात,
बंटी बबली बघितला थिएटरात, नवीन काहीच नाही अर्थात, बनवाबनवी च्या आयडिया पण काही खास नाहीत, एकही गाणं धड नाही
नाही पहिला तरी चालेल असा...
अॅनबेल राठोर बघितला
अॅनबेल राठोर बघितला हाॅटस्टारवर. फूल टाईमपास आहे. तापसी छानच दिसलीय यात. स्टोरी राजस्थानमध्ये घडते,मुख्य खलनायक राजस्थानी आणि त्याचे सगळे नातेवाईक सौदिन्डीयन दाखवलेत.
झिम्मा पाहिला आजच. एकतर खूप
झिम्मा पाहिला आजच. एकतर खूप दिवसांनी चित्रपट गृहाचं दर्शन झालं. आणि मुव्ही भन्नाट आवडला. खूप रिफ्रेशिंग अनुभव. साधारण स्टोरी सगळ्यांना माहीत आहेच. सगळ्यांचा मस्त अभिनय आणि नेत्रसुखद छायाचित्रण. सगळीकडे हाऊसफुल चाललाय.
अॅनबेल राठोर बघितला
अॅनबेल राठोर बघितला हाॅटस्टारवर. फूल टाईमपास आहे
>>>
+७८६
मलाही आवडला..
वन टाईम वॉच आहे.
इथे वाचून 'द व्हॉयर्स'
इथे वाचून 'द व्हॉयर्स' (उच्चार?) बघितला. (प्राइम)
शेवटी जरा अ आणि अ वाटला. पण विषय चांगला आहे.
उघडउघड सेक्स सीन्स दाखवण्याच्या नादात विषयाच्या गाभ्यात शिरायचं जरा राहूनच गेलंय. तरी एकदा पाहण्यासारखा आहे.
Pages