लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -
जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.
........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.
तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.
Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...
समांतर का बघावी -
१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी
२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी
३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन
४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती
आता का बघू नये?
१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन
२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का?
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष
जिओ स्वप्निल !!
बोकलत
बोकलत
प्लिज प्लिज स्पॉयलर काढा
आधीच मराठी वेब सिरीज लोक बघत नाहीत
ही एक आवडीने बघतायत तर बघूदे.
मी पुस्तक आधीच वाचले आहे.सिरीज लागल्यावर परत वाचले
ज्यांना स्पॉ हवे असतील त्यांनी किंडल वर पुस्तक विकत घेऊन वाचावे किंवा सिरीज बघावी.
काढून टाकला स्पॉयलर.
काढून टाकला स्पॉयलर.
अच्छा तो बोकलत यांचा स्पॉईलर
अच्छा तो बोकलत यांचा स्पॉईलर खरा होता का...
मी बोकलत यांनी भूताखेतांची कॉमेडी केलीय समजून ती पोस्ट वाचलेली.. आणि आता अठवतही नाही.. नशीब
पण बरे केलेत उडवले. मराठी वेबसिरीजचा टीआरपी उगाच गंडायला नको. छान प्रतिसाद मिळेल तितके भविष्यात अणखी मराठी वेबसिरीज बनतील
छान आहे
छान आहे
अनु, मला नाही सापडले हे
अनु, मला नाही सापडले हे पुस्तक किंडल वर. मला वाचायचे आहे, कुठे मिळेल सॉफ्ट कॉपी?
मी घेतले तेव्हा सॉफ्ट कॉपी
मी घेतले तेव्हा सॉफ्ट कॉपी होती
आता सध्या पेपर बॅक आहे बुकगंगा, अक्षरधारा आणि किंडल वर
सॉफ्ट कॉपी आली की सांगते
दिलीपराज ची बुक्स बेस्ट असतात.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/new-marathi-web-series-samanter...
अरे वा चांगली बातमी.. पटापट
अरे वा चांगली बातमी.. पटापट संपवा शूटींग
दरम्यान, समांतर या पहिल्या पर्वाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, ‘समांतर 2’ चं दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत
काय फरक पडणारे
काय फरक पडणारे
शेवटी पडद्यावर उकडलेला रताळे च दिसणार ना?
स्वप्निल शाहरूखच्या मार्गावर
एखाद्या मराठी कलाकाराला असे चिडवण्यात काय मजा आहे... ईंग्रजीतील एखाद्या ख्रिस्ती धर्मीय हिरोला चिडवा मग मानतो
असो,
.
स्वप्निल शाहरूखच्या मार्गावर आहे... यू कॅन लव्ह ऑर हेट हिम... बट कान्ट
हो अगदीच मार्गावर आहे
हो अगदीच मार्गावर आहे
दिवसेंदिवस अधिक हॉरीबल आणि असह्य
स्वप्नील जोशी चा अभिनय तर
स्वप्नील जोशी चा अभिनय तर वाईत असतोच पण त्याचे उच्चार फार भयानक असतात, स आणि श चे तर हमखास चुकीचे असतात
त्याचे उच्चार फार भयानक असतात
त्याचे उच्चार फार भयानक असतात, स आणि श चे तर हमखास चुकीचे असतात >>>> त्याला चुकीचे म्हणत नाहीत, त्याला lisp आहे. *मला स्वप्नील जोशी अजिबात आवडत नाही, पण हे सांगावंसं वाटलं. कारण lisp असणाऱ्या माणसांचा हा प्रॉब्लेम असतोच.
त्याचे उच्चार फार भयानक असतात
डबल पोस्ट
लिस्प? अच्छा हे नवं कळलं
लिस्प? अच्छा हे नवं कळलं
माझ्या आजुबाजूला पण स श एक्स्चेंज करणारी बरीच माणसं आहेत.
स्वप्नील जोशी चा अभिनय तर
स्वप्नील जोशी चा अभिनय तर वाईत असतोच पण त्याचे उच्चार फार भयानक असतात, स आणि श चे तर हमखास चुकीचे असतात
Submitted by Sadha manus on 16 December, 2020 - 12:29
त आणि ट चे उच्चार चुकविणारे कोण असतात?
Lisp बद्दल माहीत नव्हते, मी
Lisp बद्दल माहीत नव्हते, मी माफी मागतो त्याबद्दल
Lisp नवीनच कळलं.
Lisp नवीनच कळलं.
आस्कला आक्स, रिस्क ला रिक्स, टाक्स असं म्हणणारांना काय असतं?
स्वप्निल जोशी अजिबात आवडत
स्वप्निल जोशी अजिबात आवडत नाही पण समांतर मधे आवडला, तसेच जिवलगामधे व्हिलन झाल्यावर चांगलं काम केलं. चॉकलेट हिरो वगैरे बिग नो, बोअर होतो.
'स्वप्निल जोशी अजिबात आवडत
'स्वप्निल जोशी अजिबात आवडत नाही' असं म्हणण्याची फॅशन आहे का?
आस्कला आक्स, रिस्क ला रिक्स,
आस्कला आक्स, रिस्क ला रिक्स, टाक्स असं म्हणणारांना काय असतं? >> त्यांनाच विचारा, ते सांगतील आम्हाला लिप्स (लिस्पचे लिप्स) आहे.
माहिती नाही, माझ्या मनातलं
स्वप्निल जोशी अजिबात आवडत नाही' असं म्हणण्याची फॅशन आहे का? >>>
माहिती नाही, माझ्या मनातलं लिहिलं.
समांतर 2 मध्ये सिझन 1 मध्ये
समांतर 2 मध्ये सिझन 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे स्वप्नीलच्या आयुष्यात एक बाई येणार असते.काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने इंन्स्टावर पब्लिकला विचारल होत की तुम्हाला कोणाला बघायला आवडेल.
मेजॉरिटी मुक्ता आणि सई ताम्हणकरची होती.
आस्कला आक्स, रिस्क ला रिक्स,
आस्कला आक्स, रिस्क ला रिक्स, टाक्स असं म्हणणारांना काय असतं? >>>> अज्ञान
साधा माणुस, माफी कशाला मागता आहात? बऱ्याच जणांना माहीत नसतं की lisp हा जिभेतील दोष आहे. उच्चराची चुक नाही. मी हे especially सांगते म्हणजे अशा माणसाची आपण टर उडवणार नाही. तोतरेपणाएवढा मोठा जाणवण्याइतका दोष नसतो, पण किंचितसा असतो.
( मला तर कधी कधी छान वाटतं ऐकायला. माझा एक ग्लोबल बॉस होता, मला त्याच लिस्पिग गोड वगैरे वाटायचं
)
स्वप्निल जोशी अजिबात आवडत
स्वप्निल जोशी अजिबात आवडत नाही' असं म्हणण्याची फॅशन आहे का? >>> तसे नसावे. पण समोरचा सारखा मला आवडतो, मला आवडतो, मला आवडतो, मला आवडतो म्हणत असेल तर आपल्यालाही आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटून ‘मला अजिबात आवडत नाही' असे एकदा तरी सांगावेसे वाटते. तसे ईथे सारखे होते.
स्वप्निल जोशी अजिबात आवडत
स्वप्निल जोशी अजिबात आवडत नाही' असं म्हणण्याची फॅशन आहे का?
>>>>>>
फॅशन असेल तर ओल्ड फॅशन आहे असे म्हणेन
मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी !
https://www.maayboli.com/node/52037
या धाग्यावर ८५०+ पोस्ट आलेल्या.. मग काही स्वप्निल कंटकांमुळे हा धागा वाहता झाला
कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ??
https://www.maayboli.com/node/52048
या धाग्यावरही स्वप्निल जोशीच्या पारड्यात सर्वाधिक मते पडली होती
बहुधा...
आणि स्वप्निल हा मराठीचा अमिताभ + शाहरूख आहे हे ईथे सिद्ध झाले आहे.
स्वप्निल जोशी, कोण होईल मराठी करोडपती २०१६ !
https://www.maayboli.com/node/59546
टिमकी वाजलीच
टिमकी वाजलीच
मराठीचा अमिताभ???
मराठीचा अमिताभ???
अमिताभ ला मराठी वाचता येत नसेल आणि तो मायबोली वर नसेल अशी आशा करूया
बिचारा धक्क्याने परत ऍडमिट व्हायचा
आशूचॅम्प, अमिताभ वन ऑफ द
आशूचॅम्प, अमिताभ वन ऑफ द ग्रेट सुपर्रस्टार आहे. पण तो देखील त्याच्या काळातील ग्रेटेस्ट ॲक्टर नव्हता. हेच शाहरूखबाबतही लागू. तो ऑल टाईम ग्रेटेस्ट सुपर्रस्टार आहे. पण निव्वळ अभिनयाचा निकष लावता तो सर्वोत्तम नाहीये. आपल्याकडे एखाद्या व्यक्तीला डोक्यावर घेतले की देवपदच बहाल करून टाकतात की त्यांच्याशी कोणाची तुलनाच होऊ नये. जे स्वप्निल जोशीमध्ये आहे वा जे त्याने अचिव्ह केलेय त्यातले काही अमिताभ वा शाहहरूखलाही जमले नसेल, वा नाहीये.
आशूचॅम्प तुम्हाला चिखलात दगड
आशूचॅम्प तुम्हाला चिखलात दगड मारायची भारी हौस आहे
Pages