समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिसरा एपिसोड आटोपला
हा देखील रोचक वाटला.
यात सईला स्वप्निल ज्या अवस्थेत पाहतो त्यानंतर दुसरया दिवशी ती त्याला ऑफिसमध्ये भेटतो तो सीन आवडला.
सईचा चेहरा मध्यंतरी वय झाल्यासारखा वाटू लागलेला.
यात जे दिसतेय ते खरेच थक्क करणारे आहे. कमालीची सुंदर दिसलीय दोन्ही पात्रात Happy

चला आता चहाकॉफीची वेळ झाली....

चौथा भाग संपवला
काल रात्रभर ती माझ्या आणि मी तिच्यासोबत होतो
दुसरीवाली सई दर एपिसोडगणिक जास्तच सुंदर वाटू लागलीय
आता थांबतो Happy

तो डायरी जिवंत असताना लिहीत होता ना ? मग शेवटच्या दिवशीची ओळ , आणि वेगाने घात केला, हे तो कसा लिहिल^^^ कादंबरी मध्ये शेवटची पाने कोरी आहेत

बघितली. नाही आवडली ईतकी...म्हणजे फारच पाणी ओतलंय..
थोडक्यात काय तर दोघांचेही स्वभाव भिन्न असतात.. तरी आयुष्य मात्र समांतर आहे..

आणि वेगाने घात केला >>> मला वाटलेले आणि बाईने किंबहुना बाईलवेडाने घात केला असेल... असो, चार एपिसोड झालेत. शेवटाकडचा प्रवास अजून सुरू झाला नाहीये. सध्या तरी नायक मौज करतोय Happy

आणि वेगाने घात केला, हे तो कसा लिहिल?>>> हे शेवटल्या एपीसोड मध्ये कळते. तसा सुदर्शन चक्रपाणीच्या पहिल्या भेटीत अंदाज आलेला असतो, शेवटी ते कन्फर्म होतं.

पहिला सिझन बरा होता. फँटसी असली तरी त्याला थोड्याफार प्रमाणात वास्तवाची जोड होती. हा सिझन मात्र प्योर फँटसी झाला आहे. थोडक्यात, अ आणि अ...

सिझन २ पूर्ण केला. पहिले ५-६ पॉर्न एपिसोड पाहून नंतर पुढे गंभीर कथाही पाहिली.
कथा माहित होती. पण तरीही वाईट वाटलंच. मला सिझन २ पण आवडला.

पाचवा एपिसोड पाहिला.
पुर्वार्ध सेमीपॉर्न होता खरे. पण मराठी कलाकार असल्याने बघायला ऑकवर्ड वाटले नाही.
उत्तरार्धात मात्र जो ट्विस्ट आला, किंवा कथेने जे वळण घेतलेय ते पाहता अजून रोचक होणार आता हा सामना Happy

अवांतर - नवराबायकोचे नाते विशेष आवडले. दोघांनाही एकमेकांना शिव्या द्यायचा आणि मारायचा हक्क आहे. अर्थात या कृत्यांचे समर्थन नाही करायचेय. ते वाईटच. पण नात्यातली समानता आवडली.

Btw मध्ये वेबसिरीजवर सेन्सॉर आणणार होते त्याचं काय झालं. सीन्स पुढे ढकलता येतील म्हणा, पण शिव्या कशा ढकलायच्या. त्या पटकन येतात, मला ऐकवत नाहीत.

असो बघणं न बघणं आपल्या हातात आहे म्हणा.

सहावा एपिसोड खतरनाक
कोर्टात मजा आली
पण त्या आधी पोलिस स्टेशनात मजा आली.
आता पर्यंत बायको, नोकरचाकर, चहावाला यांना बिनधास्त शिव्या देणारया स्वप्निलला स्वत:ला पोलिसांच्या घाणेरड्या शिव्या खाव्या लागतात त्याची मौज वाटली. त्याचे विमान जमिनीवर आल्यापासूनचा त्याचा अभिनयही आणखी सकस वाटला.
या देखील भागाचा शेवट पुढच्या भागाची उत्कंठा वाढवणारा आहे. हि मी बघत असलेली पहिलीच वेबसिरीज असल्याने प्रत्येक वेबसिरीज अशीच असते का माहीत नाही. मात्र यांची शेवट करायची पद्धत फार भारी आहे.

सातव्या भागाच्या शेवटाने हादरवले. फार वाईट वाटले.
त्याआधीच मनात एक विचार आलेला. असा संकटातही घालूनपाडून बोलणारा बाप कोणालाच मिळू नये.
यावर एक स्वतंत्र धागा लिहायला हवा.

काहीजणांनी कुठल्या पोस्टवर लिहिलं आहे, शेवटचे तीन भाग बघा
>>>
१० भाग आहेत ना टोटल. म्हणजे माझे ३ बाकी आहे. हे सात बघितल्याशिवाय ते तीन कसे कळणार वा कशी मजा येणार होती हे तुर्तास अनाकलनीय. बघितल्यावरच समजेल Happy

पण ओवरऑल मी सुद्धा काही नकारात्मक रिव्यू पाहिलेत याचे. ते पाहून मला असे वाटतेय की बहुधा स्वप्निल वा सई वैयक्तिकरीत्या न आवडणारे असे नकारात्मक प्रतिसाद देण्यात आघाडीवर असावेत. अर्थात हा अंदाज. कोणाला जज करायचा हेतू नाही. पण सई स्वप्निलबाबत का माहीत नाही उगाचच आकस ठेवल्यासारखे लोकं ट्रोल करतात हा अनुभव आधीही घेतलाय.
अन्यथा मला तर आवडत चाललीय ही मालिका. उत्कंठाही वाढतेय. ज्यांनी पाहिली नाही त्यांना विनंती आहे की स्वत: बघा. कुठल्या फेसबूक वगैरे रिव्यूवर जाऊ नका.

समांतर संपवला.
कमाल केली आहे स्वप्निल जोशीने
सविस्तर उद्या ..... उजाडायच्या आधी झोपतो पटकन

लेखकाला काय म्हणायचे आहे काही कळले नाही... म्हणजे स्वप्नील ने काळाला हरवले नाही म्हणून चक्रपाणी सुटला? आणि हरवले असते तर??

ईन ॲनी केस. चक्रपाणी तो फेरा झाल्यावर सुटणारच होता. फक्त काळाला मी नाही तर कोणीतरी हरवले याने त्याला समाधान मिळणार होते. आणि अर्थात हरवले असते तर चक्रपाणीही सुटणारच होता आणि स्वप्निलही अडकला नसताच..

ॲक्चुअली पुर्ण बघून संपवल्यावर मला असे वाटले की माझ्या हाताच्या रेषा तश्या पाहिजे होत्या, मी घेतले असते ते चॅलेंज, काळाला हरवायचे Happy

स्वप्नीलने काळाला हरवले हे कसे ठरवणार ?

समजा , चक्रपाणी 30 व्या वर्षी अपघातात मेला
तर महाजन सुद्धा 30 व्या वर्षीच मरणार का ? की तो 100 व्या वर्षीही अपघातात मरेल ? आणि मग 100 वर्षांनी मेला , मग तो जिंकला की हरला ?

भुतामधून झुंबर फेकले तर आरपार जाते , पण भूत डायरी मात्र उचलू शकते, हे कसे ?
ह्याचे उत्तर प्यार का साया सिनेमात आहे . राहुल रॉय भूत असतो त्यात.

https://youtu.be/tC_PLzXEd9c

महाजन सुद्धा 30 व्या वर्षीच मरणार का ? की तो 100 व्या वर्षीही अपघातात मरेल ?
>>>..
डायरी दर दिवसाची तंतोतंत मॅच होते याचाच अर्थ त्याच वर्षी नाही तर त्याच दिवशीही

ह्याचे उत्तर प्यार का साया सिनेमात आहे . राहुल रॉय भूत असतो त्यात.
>>>
वाह राहुल रॉय आणि त्याचे सिनेमे.. काय मस्त आठवण काढलीत. यावर एक स्वतंत्र लेख बनेल !

चक्र तोच भेदेल जो पत्ता शोधत चक्रपाणी/कुमारच्या चिपळूण च्या घरी येणार नाही.
म्हणजे तो तेच भविष्य जगेल पण चक्रपाणी/कुमार चा आत्मा तुरुंगवास त्याच्या नशिबी येणार नाही.(इथे कुमार ला कोणी रिलिव्ह न केल्याने त्याचे भूत काही शतकानंतर अशक्त होऊन एक्सपायर होईल.
किंग च्या एका कथेत ज्याने जुन्या कब्रस्तानात कोणाला पुरले तो पुढच्या कोणाला घेऊन येतो, आणि तो पुढचाही जादूच्या कब्रस्तानात प्रेत पुरतो.
पण एक मित्र मात्र या शापातून सुटतो कारण तो घाबरून पळून जातो कब्रस्तानात पोहचण्या पूर्वी, आणि त्याच्या मेमरीतून ही घटना निघून जाते.

Pages