समांतर (वेब सिरीज) - Starring स्वप्निल जोशी !!! (चर्चेत स्पॉईलर असतील)

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 March, 2020 - 20:13

लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -

जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.

........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.

तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.

Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...

समांतर का बघावी -

१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी

२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी

३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन

४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती

आता का बघू नये?

१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन

२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का? Happy

स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष

जिओ स्वप्निल !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी चित्रसृष्टीला नव्या चेहऱ्यांची नितांत गरज आहे. समांतरमध्ये या नाळरोग्याऐवजी कोण शोभलं असतं?? माझं मत गिरीश कुलकर्णीला

कोण गिरीश कुलकर्णी? ते डोंबिवलीवाले का? ते नितीश भारद्वाजच्या जागी चालले असते. स्वप्निल ऐवजी या भुमिकेत दुसरा विचारही करू शकत नाही मी..

मला तो हा चालला असता. भूषण इनामदार. जरा त्याला बघून उत्साही वाटतं.
पण स्वजोही चांगला दिसतो या भूमिकेत. फक्त त्याच्या पाठीला अडकवलेल्या बॅकपॅक ला बघून कंटाळा आला.

स्वप्नीलने इंन्स्टावर पब्लिकला विचारल होत की तुम्हाला कोणाला बघायला आवडेल.
मेजॉरिटी मुक्ता आणि सई ताम्हणकरची होती
>>>>>

त्या दोघींसोबत त्याची केमिस्ट्री शाहरूख-काजोल आणि शाहरूख-जुही सारखी जमते. पहिली नावे तीच डोळ्यासमोर येणे स्वाभाविक आहे.

अच्छा मी पण त्याचे आडनाव विसरलेलो. गूगल केले पुन्हा. भुषण प्रधान आहे तो. सिरीअलमध्ये वा मॉडेलिंगला म्हणून ठिक आहे. पण पिक्चरचा हिरो म्हणून व्यक्तीमत्व दमदार नाही वाटत मला त्याचे..

स्वप्निल जोशीमध्ये आहे वा जे त्याने अचिव्ह केलेय त्यातले काही अमिताभ वा शाहहरूखलाही जमले नसेल, वा नाहीये.>>>
अत्यंत सुजलेल्या चेहऱ्याने, ढेरी दाखवत, तेच भयाण हावभाव करणे
किंवा लग्नाच्या वयाच्या माणसाने अर्धवट वेडसर हसणे, आणि एकुणातच रोल कुठलाही असला तरी वर्षानुवर्ष उकडलेल्या रताळ्याचे काम करणे ही खरंच खूप मोठी आचिव्हमेंट आहे

@ आशूचॅम्प, स्वप्निलवर टिका मुद्देसूद कराल तर प्रत्युत्तर द्यायला आवडेल Happy

@ अचिव्हमेण्ट - स्वप्निल हा बालकलाकार म्हणून अमिताभ आणि शाहरूखपेक्षा जास्त यशस्वी आहे. जे त्याला लहान वयात जमले ते बच्चन साहेबांना देखील जमले नाही म्हणू शकतो. जसे सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारया सचिनचे मला कौतुक आहे तेवढेच त्या गोड बालकृष्णाचे देखील आहे आणि तेवढेच लव मी कुश वर देखील करतो Happy

अरे असुद्या आता स्वजोच. उगाच नवीन चेहरा नको. ह्याचा न- अभिनयच बघु स्टोरीसाठी Lol
स्वजो आणि निभा असुदेत.
बाकी दुसरी हिरोईन सई आज्जिब्बात्त नको. Lol
मुक्ता पण नको. ती काही 'दुसरी' बाई वाटणार नाही. तसलंच काही लफड्याचं काम असेल तर तिला शोभाणार नाही. Happy
सईला शोभेल पण ती नको.
अमृता खानविलकर चालेल. Happy
वर गिरीश कुळकर्णी लिहिलंय. एवढा स्वजो नकोसा वाटतो का की ह्या रोलमधे गिकु पण चालेल Lol
गिरिश ओकांना घ्या मग Light 1

मुक्ता फार शहाणपण शिकवेल
त्यालाच फंडे देईल 'असं अफेअर करणं माझ्या तत्Vआत बसत बसत नाही, मी करणार नाही' म्हणून.

वर गिरीश कुळकर्णी लिहिलंय. एवढा स्वजो नकोसा वाटतो का की ह्या रोलमधे गिकु पण चालेल Lol
>>>>
हो ना..
त्या तेजस्विनी पंडितलाही चॉईस द्या जरा.. तिला काय चालेल ते विचारा.. कि स्त्रियांच्या मताला किंमतच नाही

दोन बायका म्हणजे झी वरचा कोणताही हिरो चालला असता....
स्वप्नील च्या जागी गुरुनाथ
तेजस्विनी च्या जागी धारकका
नवीन बाई शनाया...

उड्या पडल्या असत्या प्रेक्षकांच्या...


ते काय बायनरी आहे का, स्वजो झिरो असेल तर तेजस्विनी वन असायलाच पाहिजे? Happy

अनेकांनी इथे स्वजो अजिबात आवडत नाही हे निक्षून लिहिलंय, त्यांना तेजस्विनी आवडते का?
>>>
तेजस्विनी आवडते वा आवडत नाही हे प्रत्येकाने आवर्जून सांगावे ईतके वलय तिला अजून नाहीये.
सई असती तर मात्र ईथला माहौलच वेगळा असता..

सईला बघायला कंटाळा येईल. मुक्ता शोभणार नाही असं वाटतं, मुक्ता मला आवडते खूप, ती करेल छान अभिनय. मला अमृता खानविलकरला बघायला आवडेल.

तेजस्विनी, सई माझ्या नावडत्या. मुक्ता, अमृता आवडत्या कॅटेगरीतल्या आहेत.

दुसरी स्त्री: सैयमी खेर... पण स्वजोला शोभणार नाही ती.. rather स्वजोला झेपणार नाही
हि का?
मराठी आहे का?
खेर म्हणजे अनुपमच्या गावची ना?

IMG_20201220_000516.jpg

ही मराठी आहे, उषा किरण यांची नात. नाशिकला वाढलीय. आम्ही लहान असताना हिच्या आईबाबांची एक ऍड लागायची tv वर.

अच्छा ती हि होय..
उषा किरण यांनी सायन हॉस्पिटलचे डीन डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी लग्न केलेले माहीत होते. त्यांना दोन मुले होते. एक त्या अ‍ॅक्ट्रेस तन्वी आझमी आणि एक अद्वैत खेर. त्या अद्वैत खेर यांनी उत्तरा म्हात्रे यांच्याशी लग्न केले होते ज्या मिस ईंडिया होत्या. त्यांना मग दोन मुली झाल्याचे कानावर आलेले. एक संस्कृती आणि एक सैयामी की काहीसे नाव ठेवले होते. ती हिच पण हे माहीत नव्हते Happy

येनी वेज स्वप्निलला नाही शोभणार ही तशीही. शाहरूख-कंगणा अशी काहीतरी विजोड जोडी वाटेल Happy

स्वप्नील पहीले पहीले आवडायचा जेंव्हा तो त्याच्या वयाला शोभणारे रोल करायचा!

शाहरूख वगैरे माहित नाही पण आता तो महागुरुंच्या वाटेवर नक्की आहे..... आणि परवा चला हवा येऊ द्या मध्ये काहीतरी कुटुंबप्रमुख वगैरे म्हणून स्वतंत्र मोठ्या खुर्चीवर त्याला बसलेले बघून तर खात्रीच पटली!

Pages