लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -
जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.
........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.
तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.
Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...
समांतर का बघावी -
१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी
२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी
३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन
४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती
आता का बघू नये?
१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन
२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का?
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष
जिओ स्वप्निल !!
ईकडची ईतकी चर्चा वाचुन पुर्ण
ईकडची ईतकी चर्चा वाचुन पुर्ण ९ एपी बघीतले.
शेवट मला तरी निट कळला नाही. संपुर्ण ९ एपी बघुन एकच प्रश्न पडला की असे काय वेगळे भविष्य होते जे सांगता येत नाही
एडीटींगच्या चुका आहेत बर्याचशा, पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे, कुमार जेव्हा चिपळुणला पोहचुन रिक्षा करतो तेव्हा रात्र असते, त्याचवेळी त्याच्या मित्राला कुमारची बायको घरी बोलवुन पुरणपोळ्या देते तेव्हा दिवस असतो अन मग लगेच दुसर्या दृष्यात परत कुमार चिपळुणमध्ये असतो अन तीथे परत रात्र असते. मला तरी तो पुपोचा सिन फिलर अन ऊगाच टाकला असे वाटले.
"त्याच वेळी" हे स्क्रिप्ट
"त्याच वेळी" हे स्क्रिप्ट मधलं "इनडोअर, आफ्टरनून" असू शकतंच.
म्हणजे "हे आता असं चालू आहे" "पण गंमत अशी की दुपारीच मुंबई मध्ये असं झालं" असं एखाद्याने बोलण्याच्या ओघात सांगावं तसं.(अर्थात ही डिसकन्टीन्यूटी असण्याची शक्यता जास्त.)
मी सध्या तेलगू एपिसोड बघते आहे.सहोदर, सहोदरी म्हणजे भाऊ बहीण आणि गारु म्हणजे 'भाई साहब" सारखं आदरार्थी संबोधन इतकं कळलं।
कथानक दमदार आहे , पण मुख्य
कथानक दमदार आहे , पण मुख्य रोलमध्ये स्वप्नील अजिबात फिट बसत नाही . एक त्रासलेला, रागावलेला आणि अस्सल गावरान शिव्या घालणारा तरुण ही भूमिका म्हणावी तशी उमटवता आली नाही . ( इथे जीतेन्द्र जोशी किंवा अंकुश चौधरी शोभला असता ) , मूळ लेखात मराठीतील नवाजौद्दीन वगैरे म्हटले आहे ज्याल काहि अर्थ नाही , नवाज च्य नखाचीही सर अजून स्वप्निल ला नाही . अजूनही चॉकलेट हिरो हिच प्रतिमा आहे.
पहिला आणि शेवटचा (९वा भाग ) मस्त झालाय , पण एकूण कथानकाला न्याय देता आलेला नाही. काही सीन पाहून घाबरणे अपेक्षित असताना फारच रटाळपणे हाताळले गेले आहेत . मात्र तरिही उत्कंठा ताणून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरतो आहे. नितिश ,तेजस्विनी यांचा अभिनय उत्तम झाला आहे . थोडक्यात एकदा पाहण्यासारखी नक्किच आहे .
साधारण ९० च्या दशकात असाच प्लॅटफोर्म असलेली एक मराठी मालिका दूर दर्शन वर लागायची , एका माण्साला एक डायरी सापडते आणि त्याच्यबाबतीत दिवसभारात घडलेल्या गोष्टी त्याच असायच्या ज्या तो त्या गोष्टी घडून गेल्यानंतर त्या रात्री वाचायचा कारण त्याला उद्याची डायरी वाचायची मुभा नसते . मला नक्की नाव आठवत नाही मालिकेचे पण मी सर्व भाग बघितले होते.
७ एपि पाहिले.
७ एपि पाहिले.
बरेचजणांसारखे नेहमीच्या आयुष्यातले बरे वाईट प्रसंग तर आहेत.
अरे हो की थांब जरा. रीलॅक्स. एवढं काय? न केलेल्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा झालेय असंकाही गुढ रहस्य असल्यासारखं तर काही नाही. असेल काही गुढ रहस्य तर पहिल्या काही एपितुन पोचत नाही म्हणून कुमारची उत्सुकता, चक्रपाणीला शोधण्याच्या खटाटोप भिडत नाही. उत्सुकता वाटत नाही.
मला तर काही झेपत नाहीये. उगाच हाईप वाटतंय सगळं.
असं काय मोठं भविष्य आहे जे स्वामी सांगत नाहीत.
उगाच साध्या साध्या मॅटरमधे लाउड अॅक्टींग लाउड म्युझिक वाटतंय. स्वप्निल उगीचच्या उगीच एवढा घाबरलेला वाटतोय.
डोळे रोखुन मला उत्तर हवंय चक्रपाणी! मला उत्तर हवंय चक्रपाणी!
थोडक्यात काय अपील होत नाहीये. बळच वाटतंय सगळं. आता पुस्तक मिळवुन वाचणं आलं.
नितीश भारद्वाज आवडतो. पण त्याचं मराठी अमराठी माणसाने बोलल्यासारखं वाटतं.
मला डायरी आणि त्यासंबंधी
मला डायरी आणि त्यासंबंधी काहीतरी पुसटसं आठवत होतं, दुरदर्शन मालिका. पण अजूनही अगदी पुसट आठवतंय, ती प्लॅटफॉर्मच असेल. तो डायरी वाचतो तेव्हाच असं काहीतरी बघितलं आहे पुर्वी आठवत होतं पण नक्की संदर्भ लागत नव्हता, अजूनही लागत नाहीये.
अजून एक मराठी मालिका होती, त्यात एक कथा होती, डायरीत लिहिलेलं असत आणि ते घडते, दिलीप कुलकर्णी आणि दिलीप कोल्हटकर होते, त्यात शेवटी डायरीत लिहिलेलं असत विष घातलंय पेढ्यात, तो खाऊन अमुक मरणार म्हणून दि कु सांगायला जातो पेढा खाऊ नको पण दि को ने आधीच खाल्लेला असतो पण ती कथा यापेक्षा टोटली वेगळी होती पण डायरी म्हटल्यावर मला ह्या काही गोष्टी आठवल्या.
पेढा खाऊ नको पण दि को ने आधीच
पेढा खाऊ नको पण दि को ने आधीच खाल्लेला असतो >> हो मला आठवतेय हे नाटक होता की मालिका आठवत नाही.
दि को ला भविष्य दिसत असतं. पण हे डायरीत लिहीलेल नसतं, तो स्वत:च सांगतो ते.
अरे हो, अजून एक, एखादया
अरे हो, अजून एक, एखादया माणसाचे दैनंदिन आयुष्य फक्त ४ डायरीत कसे बसले? सु च चे वय किमान ६३ असावे असे वाटते मग प्रत्येक वर्षाची एक अश्या ६३ डायऱ्या किंवा गेलाबाजार किमान ४०-५० डायऱ्या तरी नक्कीच लागतील. इथे रोज एक पान वाचायचे सांगून फक्त ४ डायऱ्या दिल्या.
काहीच झेपली नाही. अन त्यात स्व जो बोर करतो. अंकुश बेस्ट वाटला असता ह्या रोलसाठी.
बादवे, शेवट कुणी उलगडून सांगाल का ?
दि को ला भविष्य दिसत असतं. पण
दि को ला भविष्य दिसत असतं. पण हे डायरीत लिहीलेल नसतं, तो स्वत:च सांगतो ते. >>>
'द्रष्टा' नावाचं नाटक होतं... बहुतेक दूरदर्शनसाठीच सादर झालं होतं, (म्हणजे नाट्यगृहात त्याचे प्रयोग वगैरे झाले नव्हते.)
मस्त होतं ते.
'द्रष्टा' नावाचं नाटक होतं...
'द्रष्टा' नावाचं नाटक होतं... बहुतेक दूरदर्शनसाठीच सादर झालं होतं >>> हो बरोबर हेच नाव. तेव्हा लहान अर्ध्या एक तासांची नाटकं होत दूरदर्शनवर, खास दूरदर्शनेच बनवलेली असत. एक बेफाम पण मस्त होतं विवेक लागू, रीमा लागूचं याचा भविष्य, डायरी etc शी काही संबंध नाही, सहज आठवलं.
दि को ला भविष्य दिसत असतं. पण हे डायरीत लिहीलेल नसतं, तो स्वत:च सांगतो ते. >>> हो बरोबर पण तो लिहित असतो का, काहीतरी शेवटी दि कु वाचतो असं आठवतंय.
५ भाग पाहिले . राजवाडेने ओढून
५ भाग पाहिले . राजवाडेने ओढून ताणून थ्रिलर केलय असं वाटत. किसिंग सीन तर बकवास आहे. खूप दिवसांनी नवरा बायको भेटल्यानंतर जो आवेग दाखवायचा तो नीट जमला नाहीये.
आणि एक स्व जो पेक्षा चिन्मय
आणि एक स्व जो पेक्षा चिन्मय मांडलेकर शोभला असता या भूमिकेसाठी
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/manoranjan-news/article-on-samantar-web-series-...
आजच सुरू करून आजच संपवली,
आजच सुरू करून आजच संपवली, आवडली. पण एक कळलं नाही की शेवटी काय असं शॉकिंग आहे ? त्या शेवटच्या ओळी वाचून कुमार इतका का दचकतो? कुणी सांगेल का plz?
विवाहीत जोडप्याचं ठीकठाक सुरू
विवाहीत जोडप्याचं ठीकठाक सुरू असताना त्यातील त्याला/तिला अचानक कळलं की त्याच्या/तिच्या आयुष्यात एक पर स्त्री/पुरुष येणार आहे तर ते शॉकिंग नव्हे का?

इथली चर्चा वाचून घेतली बघायला
इथली चर्चा वाचून घेतली बघायला
त्या स्वप्नील ची ओव्हर एकटिंग बघून वैताग आला
नवाजुद्दीन शी तुलना करनाऱ्या व्यक्तीला तर दंडवत
कसले बदाम आणि खारका देताय च्यायला
एकतर लहान मुलासारखा सगळीकडे पाठीला सॅक लावून हिंडतो, फ्रॉड करतो, नोकरी जाते तरी हा माठच
बायको जीव तोडून किस करतीये तर याचा अविर्भाव फ्लॉवर ची भाजी खाल्ल्यासारखा
शी अत्यंत माती खाल्ली आहे
त्यामुळे इंटरेस्ट च गेला पूढे बघायचा, यांना एक चांगला कलाकार मिळू शकत नाही मराठीत हे दुर्दैव आहे
बायको जीव तोडून किस करतीये तर
बायको जीव तोडून किस करतीये तर याचा अविर्भाव फ्लॉवर ची भाजी खाल्ल्यासारखा

>>>>
अहो हिच तर ओरिजिनल ॲक्टींग आहे. नाहीतर आपल्याच लग्नाच्या बायकोला ते ही ईतक्या वर्षांच्या लग्नानंतर किस करताना गुलाबजाम खाल्यासारखी ओवर ॲक्टींग करायची का
आता पुढच्या सीजनला एक दुसरी बाई येणार आहे आयुष्यात. .. तिला बघा कशी किस करतो
डोंबल
डोंबल
स्वप्नील जोशी कडून शून्य अपेक्षा आहेत
ज्याला कॉलेज युवकाचा रोल करताना आपली सुटलेली ढेरी कमी करण्याची किमान इच्छा सुद्धा होत नाही अशा अनप्रोफेशनल नटाकडून काय होईल असे वाटत नाही
मुळात मोठे बटबटीत डोळे करून दाखवले आणि आरडाओरडा केला की आपण अभिनय करतोय असे जर त्याला वाटत असेल तर प्लिज कुणीतरी सांगा त्याला
आजकालचे कॉलेज युवकही ढेरी
आजकालचे कॉलेज युवकही ढेरी वाले असू शकतात असे त्याला दाखवायचे असेल.
आजकालचे कॉलेज युवकही ढेरी
आजकालचे कॉलेज युवकही ढेरी वाले असू शकतात असे त्याला दाखवायचे असेल.>>
एकतर लहान मुलासारखा सगळीकडे
एकतर लहान मुलासारखा सगळीकडे पाठीला सॅक लावून हिंडतो >>>>>>>> त्यात काय एवढ? आजकाल कोणत्याही वयातील पुरुष आणि बायकासुद्दा पाठीला सॅक लावून फिरतात की, मग ते कुठल्याही प्रोफेशनमधले का असेना.
मी सुद्धा ऑफिसला जाताना,
मी सुद्धा ऑफिसला जाताना, पोरांना गार्डनमध्ये फिरायला नेताना, किंवा अगदी लॉकडाऊन काळात खरेदीला जातानाही पाठीला सॅक लाऊन जातो.. स्वप्निल माझी स्टाईल मारत असेल यात. संशयाचा फायदा द्या त्याला.
आजकालचे कॉलेज युवकही ढेरी
आजकालचे कॉलेज युवकही ढेरी वाले असू शकतात असे त्याला दाखवायचे असेल
>>>
हे अगदी शक्य आहे. प्रत्यक्षातही आजकालची युवा पिढी बीअर पिऊन फुगत चाललीय.
मुळात मोठे बटबटीत डोळे करून
मुळात मोठे बटबटीत डोळे करून दाखवले आणि आरडाओरडा केला की आपण अभिनय करतोय असे जर त्याला वाटत असेल तर
>>>>>
कमाल आहे. नवाझुद्दीनने काही सायको प्रकार केले तर तो अभिनय. आणि स्वप्निलने बेताने केले तरी त्यावर टिका. काय तर म्हणे किस बरोबर नाही घेतली. अहो मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात अशीच किस घेतली जाते. जे पॉर्नमध्ये दाखवले जाते ते प्रत्यक्षात सुहागरातला घडत नाही हे समजून घ्यायला हवे. अन्यथा या न्यायाने सनी लिऑनला शतकातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री घोषित करायला हवे.
मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात
मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात अशी किस घेतली जाते या वाक्याला सप्रमाण सिद्ध करण्यात यावे
सनी लिओनी ही सई ताम्हणकर
सनी लिओनी ही सई ताम्हणकर पेक्षा लाख पटीने चांगला अभिनय करते
आता इथे सई चे नाव घेतले म्हणून खुश नका होऊ
स्वप्नील सारखा दुधी।भोपळा आवडणाऱ्या व्यक्तीला सई आवडते असे कुठं तरी वाचल्याचं आठवलं म्हणून
सनीला पुरेसा वाव मिळाला नाही म्हणून नाहीतर ती लोकप्रियतेच्या बाबतीत शाहरुख वगैरे फोलकटाना केव्हाच मागे टाकेल
पूर्ण बघितली ही मालिका!
पूर्ण बघितली ही मालिका! स्वप्निलचे डोळे बटबटीत वाटतात. पूर्ण माला लिकाभर तसे च डोळे घेवून वावरलाय. दुखत कसे नाहीत?
पण मला खटकलेली गोष्ट म्हणजे, कुमार जेव्हा चिपळुणला पोहचुन रिक्षा करतो तेव्हा रात्र असते, त्याचवेळी त्याच्या मित्राला कुमारची बायको घरी बोलवुन पुरणपोळ्या देते तेव्हा दिवस असतो अन मग लगेच दुसर्या दृष्यात परत कुमार चिपळुणमध्ये असतो अन तीथे परत रात्र असते. मला तरी तो पुपोचा सिन फिलर अन ऊगाच टाकला असे वाटले. >> बरोबर आहे. तो रात्री बर्याच उशीरा बाहेर पडतो. त्यानंतर ती त्याच्या मित्राला पुरणपोळ्या देते. बाहेर स्ट्रीटलाईट चालू दिसतात. मग त्याला काय तिने इतक्या रात्री बोलावले?
एडीटिंग चुकलेय.
स्वप्निलच्या चेहऱ्यावरची चरबी
स्वप्निलच्या चेहऱ्यावरची चरबी कमी झाल्यामुळे त्याचे डोळे आता मूळ स्वरूपात दिसत असतील म्हणजे बटबटीत.
एक एपी पाहिला
एक एपी पाहिला
इथे वाचून मालिका बघितली.
इथे वाचून मालिका बघितली. पहिले २/३ एपिसोड बरे वाटले पण नंतर उगाचच काहींच्या काही आहे. उगाच सस्पेन्स साठी cliche च वापरले आहेत. काही शॉट्स खास ट्रेलर साठी बनवले आहेत. शेवटचा एपिसोड तर एकदम घाई झाल्यासारखा किंवा बजेट संपतंय म्हणून संपवल्यासारखा वाटलं. आणि शेवट बघून तर निराशाच झाली. कादंबरी नक्कीच छान असणार. मी सुशिंच्या बहुतेक वाचल्या आहेत पण ही आठवत नाहीये. मराठीतील वेब सिरीज मधील वेगळा प्रयोग म्हणून ठीक आहे पण अजून बरीच मजल गाठायची आहे .
किस च्या बाबतीत इथे राज आणि आशुचॅम्प ना अनुमोदन. एकतर कथानकाची काही गरज वाटली नाही पण ठीक आहे आता सगळ्याच वेब सिरीज मध्ये घालतात म्हणून घातले असेल. पण कमीतकमी चांगले तरी करायचे. repulsive वाटले. sacred games नन्तर सर्वच शिव्या आता mild वाटतात .
स्वप्नील बारीक झाला आहे पण अभिनय तसाच बोर आहे. त्यापेक्षा मोगरा फुलला मध्ये मला बरा वाटला. हणम्या वाला ऍक्टर आवडला. तेजस्विनी पण ठीकठाक.
मराठी म्हणून एकदा नक्की पाहावी पण ....
पुढचा सीझन कधी येणार? काही
पुढचा सीझन कधी येणार? काही खबरबात?
lockdown च्या काळात अगदी चायनिज सिरीअल्स पण गार वाटतायत. ही तर आपलीच आहे.
Pages