सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग नऊ

Submitted by मुक्ता.... on 20 February, 2020 - 17:21

सरमिसळ एक भयंकारी रोमांच यकथामलिकेच्या अधिच्या भागाचे धागे खाली दिले आहेत

.https://www.maayboli.com/node/73290
2.https://www.maayboli.com/node/73298
3.https://www.maayboli.com/node/73372
4.https://www.maayboli.com/node/73373
5. https://www.maayboli.com/node/73403
6. https://www.maayboli.com/node/73419
7.https://www.maayboli.com/node/73430
8. https://www.maayboli.com/node/73434

सरमिसळ: एक भयंकारी रोमांच भाग नऊ

घर रिकामं असलं की तिथे काहींना काही बदल झालेले दिसत होते...विशेषतः माळ्यावरचा चौरंग...जो नाविनने खाली काढला होता. तो बऱ्याच अंशी एका मोकळ्या कोपऱ्यात सरकला होता. आणि पाटाची जागा बदललेली असायची. वत्सल सध्या नविनच्या विचारात होती. तिच्या नजरेतून हा बदल फारसा लक्षात घेतला गेला नाही. पण देवकी तिच्या हे लक्षात आले होते. "आई, अहो, हा पाट काल तुम्ही ओट्याच्या त्या कोपऱ्यात ठेवला होता ना? का तुम्हीच इथे फ्रीज जवळ ठेवलात? तुम्ही असा कधीच ठेवत नाही आई... काल इकडे बाथरूम जवळ होता..."
आणि हा चौरंग....हा तर माळ्यावर होता....
"आग व्हय, त्यो नवीन ने काढलाय, पर त्यो तर हितं ह्या भाईर च्या खोलीत ठिवला हुता...ह्ये आत कसा काय...आन काय म्हनतीस पाट, त्यो मी ठरिवले त्या जागवरच ठिवती...ह्ये रोज जागा कशी बदललं पोरी? सासू म्हातारी न्हाय येव्हढी का इस्रायला लागली..." वत्सल मिश्किल पणे म्हणाली..
देवकी ओशाळली आणि म्हणाली"आई, मला तसं म्हणायचं नव्हतं..." वत्सल हसू लागली, "आग पोरी...जरा मस्करी केली म्या...."
इतक्यात गंगा या सासवा सूनमध्ये बोलत म्हणाली, "होल्ड होल्ड यु बोथ....देवकी वहिनी , माझ्या स्वीट आत्याला म्हातारी म्हणालीस? ठीक आहे...इट्स अ बिग क्राईम सुनबाई...शिक्षा झालीच पाहिजे...।"
"अहो गंगा वन्स...."
"वन्स? आता तर हंड्रेड परसेन्ट शिक्षा..."
"काय....गंगा..."
"हा हा गुड गर्ल, मला मस्त गरम गरम कांदे पोहे आणि गरम कडक आल्याचा चहा हवाय..."
तिघी हसायला लागल्या....देवकी पोहे आणि चहाच्या मागे लागली...तिघी किचन मध्ये गप्पा मारत बसल्या...इतक्यात नवीन झोपेतून उठला....आणि त्यांच्यात सामील झाला...."काय चालू आहे महिला मंडळ?.....आणि माय मी तासाभरापूर्वी उठलो...पण गोड आवाजात कसली अंगाई म्हटलीस ग? परत झोपलो……तो हा आत्ता उठतोय..."
त्या तिघी एकदम शांत झाल्या। "...आता हे काय नवीन?अरे दादा आत्या कधीही अंगाई म्हणत नसे...आणि आत्या आमच्याबरोबर इकडेच तर होती एव्हढा वेळ...तुला काही स्वप्न पडले होते की काय?"
"नाही ग ......"
""हा हा वहिनी म्हणते वाटतं..... दादा सरळ सांग ना....की वहिनी..."गंगा चिडवायच्या सुरात म्हणाली....
"गंगे तुला ना मी आता....थांब बघतो लहानपणी त्या पाटावर बसवून पाढे म्हणायला लावायचो ना तसच आता ...."
"पाट? नको दादा नको ते पाढे...."
हा हा हा...खूप गोंगाट सूरु होता....देवकी म्हणाली एक मिनिट नवीन, पाट काय? थांब, आहे ना आपल्याकडे, आताच बसव हिला आणि पाढे म्हणायला लाव..."देवकी आपले काळेभोर डोळे मिचकावत म्हणाली..
"ओह नो वहिनी, नाही..."
देवकीने पाट काढला...नवीन ने आणि देवकीने गंगाला पकडायला गेले तर गंगा वत्सलच्या मागे लपली, वत्सल ने गंगाचा कान पकडला.."किती तरास दिलास माज्या सुनेला, म्हन आता पाडे"देवकी पाट घेऊन आली....
अशी मजा चालू असताना " होल्ड ऑन, वहिनी...अगं हा पाट आपल्या गावच्या घरात होता तसा आहे...."
मगाचा हस्यकल्लोळ आता थांबला..."होय ...."
वत्सल म्हणाली" गंगे, काय म्हनतीस, तरीच म्या म्हनत हुते, ह्यो पाट कुटंतरी पाह्यलाय म्या...आग पर ह्यो हितं कसा, ह्यो पाट तर त्या खोलीत हुता....ती खोली...चिमत्कारीक हाय..."

आत्या मी सांगते,हा मी आणलाय पाट....दादाच्या लग्नात मी इथे आणला तो...आत्या....आत्या रागवू नको, पण नविनच्या जन्मदात्या आईची एक आठवण म्हणून तो परत आणि तुझा देवघरातला चौरंग, तुझा आशीर्वाद मी घेऊन आले....."

"बर चला उशीर होतोय...आज दादाचं शेवटचं सेशन आहे...निघुया का? "गंगाने आठवण करून दिली.
"व्हय चला...." वत्सल उठली.
ते सगळे तयारी करून निघाले..."देवकी, चल...."
"नाही, नको नवीन...मला जरा थकल्यासारखं झालंय, मी घरीच थाम्बते...बरं....."
नविनने तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण शेवटी देवकिशिवाय ते निघाले...।
देवकी घरात एकटीच होती...हॉल मध्ये पडून राहिली....
माळ्यावर हळूहळू हालचाल झाली....खस्स फस्स....धडम धडम...आणि बांगड्या किंकीणल्या...देवकीने दचकून डोळे उघडले......किचन मध्ये हालचाल जाणवली....पाट सरकल्याचा आवाज...आणि देवकी सावधपणे उठून बसली...जवळच असलेली फुलदाणी उचलली...आणि किचन कडे हळू हळू सरकली....
धप,
हं हं हं हं....गाण्याचे अंगाईचे सूर...

देवकीला काय सुचलं तिने मोबाईल रेकॉर्डर ऑन केला....

हं हं हं...हं हं हं

निज माज्या लेकरा रं...
कान्हूल्या रं सानुल्या रं...
जोजवते माज्या लेकरा रं..
निज निज सानुल्या रं...

येक वोवी रातीची...
किसनाची अंदाराची रं...
दुसरी वोवी गोकुळीची...
मोरपीसी पाळण्याची रं....
माज्या कान्हूल्या...सानुल्या रं....

देवकीचा घसा कोरडा पडला....पण का कुणास ठाऊक भीती वाटली नाही...इतक्यात पुन्हा पाट सरकल्याचा आवाज आला....काहीतरी सररररररर करून माळ्याकडे गेलं...वाऱ्याने किचन आणि हॉल यांच्यातल्या दरवाजकडचा पडदा हलकेच हलला...देवकीला आता एक आणखीन अदृश्य अस्तित्व जाणवले...पण ते भीतीदायक नव्हते....
इतक्यात बेल वाजली आणि देवकी दार वाजवायला उठणार इतक्यात खिडकीच्या तावदानाजवळ काही हालचाल दिसली...खिडकीच्यात आणि स्वतःत सुरक्षित अंतर ठेवून देवकी बाहेर पाहू लागली तर एक लाल डोळ्याचं काळं मांजर तिथे गुरगुरकरत घिरट्या घालीत होतं....आणि बेल वाजत होती. खिडकीची काच घट्ट बंद असल्याने...ते आत येऊ शकत नव्हते. देवकीला संशय आला...तिने दार उघडलं नाही. कारण नवीनने सांगितलं होतं आम्ही दाराबाहेर आल्यावर वत्सलअत्याच्या मोबाईल वरून फोन करू आणि मग बेल वाजवू. त्याशिवाय दार उघडू नको. दाराजवळ न जाता देवकी तशीच काऊच वर बसून राहिली....इतक्यात माळ्यावर पुन्हा खुडबुड ऐकू आली.....सरररररssssss...देवकीला स्पर्ष करून काहीतरी दरवाज्याजवळ गेल्याचे जाणवले...आणि दाराबाहेरून काठी अपटल्याचा आवाज...
छन छन छम...
आणि सोबत तीच मंजुळ बांगड्यांची किणकिण....
आणि सररररररर परत तोच स्पर्श...आणि खिडकी जवळ काही गेल्याची जाणीव....ते मांजर जीवघेणे केकाटले....रागाने गुर गुर करत एक लाल प्रकाश झोत वेगाने पास झाला....आणि नाहीसा झालेला दिसला....
याचा अर्थ ती काळी मांजर, तिच्यावर लाल प्रकाशाचा अंमल होतातर, आणि हिरवी शक्ती,ती का आली नाही? म्हणजे ती नविनच्या मागावर?....देवकीने तर्क लावला...आईच्या कानावर घालायला हवं हे....म्हणजे आई असतात तेव्हा हे कुणिच इथे येऊ शकत नाहीत....आणि मी आज यांचा सामना करु शकले म्हणजे इथे आणि काही शक्ती जी चांगली आहे ती वावरतेय....जिचा त्या पाटाशी गहिरा संबंध आहे....कोण आहे ते? आणि नविनला अंगाई ऐकू आली तो भास नव्हता....

इकडे हे तिघे डॉक्टर टंडन च्या क्लिनिक मध्ये पोचले...डॉक्टर तसे वेळेच्या बाबतीत काटेकोर होते...पण दिलेल्या वेळेच्या तीस मिनिटे होऊन गेली तरीही ते आले नाहीत म्हणून रिसेप्शनला चौकशी केली तर कळले की ते पुढच्या पंधरा मिनिटात येत आहेत....
डॉक्टर आले, तर त्यांच्या कपाळाला मलमपट्टी केलेली होती आणि कोट मळलेला होता.....आणि ते लंगडत होते...
हे तिघे यामुळे एकदम उभे राहिले...."रिलाक्स यु ऑल...कुछ नही हुआ...छोटासा एकसिडेंट हुआ...मेरी गाडी...खैर छोडीए....आप पाच मिनिटं के बाद...ट्रीटमेंट रूम मे आइये..."
सांगितल्याप्रमाणे नविनची लास्ट सेशन सुरू झाली...वत्सल ला पूर्ण कल्पना होती आज काही विलक्षण घडणार होते...नवीन कडून काही अनपेक्षित कळणार होते...त्या दुष्टांचा काहीतरी परदाफाश होणार होता...

नंतर जे काही रेकॉर्ड झाले त्यातून आलेली माहिती महा धक्कादायक होती..
नवीन हळूहळू त्याच्या लहानपणी पोचला...त्याच्या कळत्या वयात....

तो त्या गावच्या घरात होता....आणि....त्या खोलीसमोर, एक नऊवारी साडीतली, भयाण बाई....

छन छन छम...

आकाशीच पाव्हन येनार रं..
अन ढगात तुला नेणार रं....
जीवाचा ख्येल असा रंगणार रं...

छन छन छन छन..

आणि खोलीच्या आतून एक अस्फुट किंकाळी..
आणि पाट सरकल्याचा आवाज...आणि खिडकीत अंधारात दोन झरत असलेले करुण्यपूर्ण डोळे....

आणि हे रोज होत होतं...नविनच्या मनात...आकाशाबद्दल सर्रास भीती भरवली जात होती.......
नवीन आत्याला बिलगून थरथर कापत होता....त्याची ही बिघडणारी स्थिती पाहून वत्सलने त्या खोलीच्या आसपासचा परीसर येण्याजाण्यासाठी बंद केला....
नवीन कडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. एक दिवस नविनच्या शाळेत गोकुळाष्टमी होती...नवीन कृष्ण बनला होता...छान मोरपिसांचा मुकुट आणि पितांबर, सुंदर दागिने घालून तयार झाला होता...वत्सलने तिच्या आई वडिलांची न्याहारी आटपून घेतली. पडवीत नवीन आत्याची वाट बघत बसला होता. इतक्यात त्याला त्या बंद खोलीच्या जागी काही चमकताना दिसलं. सहा वर्षाचा होता तेव्हा...तो तिथे गेला, दरवाजा उघडला.. आणि सुलल्लल्लल करून काही बाहेर आलं, काळ्या रंगाचं....

ती बाई त्याच्या समोर उभी राहिली....नवीन खूप घाबरला...
छन छन छम...
लै मोटा धोका हाय...
आकाश तुला खानार हाय..
ही ही ही...
चल माज्या संगत....ती नविनला हात लावणार इतक्यात 440 व्हॉल्ट्स चा झटका बसावा तसा ती मागे गेली...नवीन किंचाळत मागे सरकला...त्या मागच्या पडविचा दरवाजा झटक झटक करत मागेपुढे हलत होता....
वत्सल धावत बाहेर आली आणि नविनला कुशीत घेतलं...
ती भयानक बाई या खोलीतून बाहेर आली आणि वत्सलला बघून तिथून नाहीशी झाली....मी परत येईन म्हणून.नंतर मात्र कुणाला दिसली नाही...त्या खोलीच्या जागी मात्र कुणालाही जायची परवानगी त्यापुढे नव्हती...तिथून पुढे नवीन वत्सलच्या कडक निगरणित वाढला...आकाशाची भीती मात्र तशीच राहिली........मोठा झाला. सगळे या घटना विसरून गेले...बाकी आपल्या सर्वांना माहीत आहे...
नविनला हळूहळू रिलॅक्स केले गेले...नवीन परत झोपेच्या अधीन झाला.....
गंगा, वत्सल आत्या आणि डॉक्टर तिघेही थक्क झाले होते.
"वत्सल चाची ये क्या नया माजला है, कौन औरत, ये कौनसी कविता अनाब शनाब सी बोल रहा था नवीन,घुंगरू लाठी...ये सुपरस्टीशीयस मामला है चाची...कितना कुछ दबा था उस्के दिमाग मे...मैं हैरान होगया हूं...कुछ बताओ चाची....नवीनको कुछ मेडिकेशन..."
"न्हाई डागतर सायेब, तुमि कायबी औशिद नगा देऊ, माझं पोर एकदम ठीक हाय, माफी करा तुमि डागतर हायसा ,म्या तुमास्नी काय शिकीवनार, गावाकडली अडाणी बाय...पर रिक्वेष्टी म्हनुन काय सांगन त्ये ऐकूनशान ग्याल?"

"अरे चाची ये कैसी बात कर रही हो आप? अब आप मुझे और शर्मिनदा ना करे...?"
"तुमाला काई सांगायचं हाय, बोलायाच हाय...."
"मैं जल्द ही आपसे मिल्ने आनेवाला हुं"
"या कवाबी, फगस्त येक फोन त्येवढा करा"
"ठिकाय चाची,चालेल....गंगा, मला तुझ्याशिबी डिस्कशन करावं लागेल"
"हां सर जरूर"…गंगाने होकार भरला....
नवीन जागा झाला....."जुनं भग्न मंदिर.."

इकडे नविनच्या घरी
देवकी या पंधरा मिनिटाच्या धडक घडामोडींनंतर रिलॅक्स झाली आणि तिने स्वयंपाक करायला घेतला...नविनच्या आवडीचा......सहज मागे वळून पाहिले तर....माळ्यावर...एक मोरपीस होते..

आज नविनच्या हिप्नॉटिसम च्या ट्रीटमेंट चा शेवटचा सेशन होता...एव्हाना काही माहिती समोर आलीच होती. पण एक की मोमेंट असते. इतके दिवस मात्र सापडत नव्हतं.आज तरी? आज तरी सापडलय का?

अव्या आणि विजय सरांची एन्ट्री कधी होईल? डॉक्टर टंडन टीम मध्ये येणार का? नेक्स्ट भागात जरा आतापर्यंतची समरी घेऊया, तोपर्यंत तुम्ही ओळखा नविनला लहानपणी दिसणारी घाबरवणारी बाई, आधी कधी कथेत आलीय का? तीच नाव काय? देवकीला घरी कुणी जाणवली ते कोण? रहस्य तिथेच संपत आलंय का आणखीन खोल गर्द गुहेत, कुणी वाट बघताय?....छन छन छम....ही ही ही

क्रमशः

"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडक

कथा एकदमच छान आहे आणि I guess नवीन ला घाबरवणारी ती बाई बकुळा असावी आणि ती चांगली शक्ती नवीन ची आई गोदा असावी