सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सहा

Submitted by मुक्ता.... on 17 February, 2020 - 13:43

सरमिसळ एक भयंकारी रोमांच यकथामलिकेच्या अधिच्या भागाचे धागे खाली दिले आहेत
भाग एक
https://www.maayboli.com/node/73290
भाग दोन
https://www.maayboli.com/node/73298
भाग तिन
https://www.maayboli.com/node/73372
भाग चार
https://www.maayboli.com/node/73373

भाग पाच
https://www.maayboli.com/node/73403

सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग सहावा

नवीन शहरात आल्यांनतर त्याला कुठे माहित होत त्याच आयुष्य कुणीतरी व्यापून टाकणार आहे. कुणीतरी त्याचं असं जवळच माणूस त्याला भेटणार होतं . घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर अशा टिपिकल मुंबई रुटीन मध्ये तो फिट झाला होता.त्याच्या आय टी कम्पनीद्वारे एक ट्रैनिंग प्रोग्रॅम ठरवला गेला. न्यूयॉर्क ला जावे लागणार होते.विमान म्हटलं कि नवीनला सॉलिड टेन्शन येत असे.जावं लागणारच होतं . जायच्या दिवशी विमानतळावर जाण्यासाठी त्याने कार पूल केली. शेअर टॅक्सीत, एक मुलगी होती.तिलाही एरपोर्टला जायचं होते.देवकी तीच नाव. नविनने देवकीला पाहिले, खूप सुंदर नाही पण सावळी, नीटस, काळेभोर डोळे, दाट केसांची घट्टमिट्ट वेणी , मध्यम उंची आणि कडक इस्त्रीचा लाईट पिंक ड्रेस...मनात घर करून गेली...देवकीने त्याचे पहाणे फार मनावर घेतले नाही...
टॅक्सी पुढे सुरू राहिली आणि नविनचे देवकीत गुंतणे...
"ओ साहेब, एअरपोर्ट आलाय तुमची फ्लाईट मिस झाली आपल्या नावाने बोंब नाय मारायची....उतरा ना सरळसरळ म्याडमशी बोला.." देवकी हसली तेव्हा त्या सावळ्या तजेलदार चेहऱ्यावर हलके हसू उमटले आणि डाव्या गालावर खळी पाहून नविन आणखीन गुंगला!!
टॅक्सीच्या हॉर्नने दोघे भानावर आली.. नविनसारखा डार्क, हँडसम आणि इतका डिसेंट कोणत्या मुलीला आवडणार नाही, कारण नविनची नजर शुद्ध होती...
दोघे आपापल्या लगेज सहित चेक इन कडे वळले...त्यांना काय माहीत नशिबाने एकाच प्रवासासाठी आणि परीक्षेसाठी त्यांना निवडले होते...
कर्मधर्म संयोगाने ते न्यूयॉर्क च्या फ्लाईट मध्ये बाजूबाजूच्या सीट वर होते....
विमान टेक ऑफ च्या तयारीला लागले, एअर हॉस्टेसनी सर्व सूचना दिल्या , घुईsssszzzz आवाज करत विमान आकाशात उडाले...तशी नवीन आणि देवकी दोघांची गाळण उडाली..
नविनला आकाशाची आणि देवकीला उंचीची भीती वाटायची, मर्यादेच्या पलीकडे....दोघांनि विमानाने जायची पहिलीच वेळ...त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि मुठी आवळल्या....दात एकमेकांवर घट्ट बसले....श्वास घ्यायला त्रास होऊ लागला....एअर हॉस्टेसच्या सूचना ऐकण्याच्या पलीकडे गेले तेव्हा त्यांना ऑक्सिजन लावावा लागला...काही वेळाने दोघे नॉर्मल झाले...भीती....पहिलीच भेट आणि एव्हढा कल्लोळ....देवकी लवकर सावरली पण नवीन? त्याला त्रास होत होता..देवकीने न राहवून त्याला थोपटले हळूहळू नवीन सावरला!! त्याला झोप लागली...पण झोपेत त्याच्या समोर हिरवे पिवळे झोत नाचू लागले आणि लाल रेषा आडव्या जाऊ लागल्या....बीप sssssss असा आवाज आला. देवकीच्या हाताला काही लाल रंगाचे बाण लागतात असे वाटत होते....पण एक दहा सेकंदात हे थांबलं.
विमान न्यूयॉर्कला लँड झाले. आपापले सामान घेऊन दोघेही आपल्या मार्गाला लागले पण चुटपुट लागत होती आपलं कुणी लांब जात असल्याची...जणू काही आत्मीय धागे होते...
देवकी आपलं काम आटपून आठ दिवसांनी मुंबईला परतली. ती फ्री लान्स लँग्वेज ट्रान्सलेटर होती. जुन्या लिपींचा अभ्यास होता मोडी आणि ब्राम्ही...या पुरातन लिपींच्या एका कॉन्फरन्स साठी ती अमेरिकेतल्या एका युनिव्हर्सिटीत आमंत्रित होती.मुंबई विद्यापीठातर्फे तिला पाठवले होते.
देवकी मुंबईत दादरला आपल्या आईबाबा व ती या छोटेखानी कुटुंबात वाढली. मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी असं घर.
आई बाबांनी देवकीला खूप जपले होते, एकुलती एक होती ना....
देवकीने भारतात परत येताच आपल्या आई बाबांना विमानातील विलक्षण घटने बद्दल सांगितले. आणि काही काळाने विसरून गेली पण नविनला मात्र विसरली नाही.
असाच काही काळ गेला. नवीन च्या पुन्हा काही टूर्स झाल्या तेव्हाही त्याला हिरव्या आणि लाल रेषा दिसण्याचे अनुभव आले. त्याने डॉक्टरना विचारले तर आकाशाच्या जवळ गेलात म्हणून भीतीने स्ट्रेस आली असं सांगितलं...काही मेडिकेशन घेतल्यावर नविनला त्यांनी बर झाल्याची पावती दिली. पण त्यांना कुठे माहीत होतं की सुरुवात आहे....
नविनच्या ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट सुरू झाला त्यासाठी बाहेरून लँग्वेज ट्रान्सलेटर्स येणार होते, नविन प्रोजेक्ट हेड होता, हा तोच प्रोजेक्ट ज्याच्या ट्रेनिंग साठी नवीन अमेरिकेला गेला होता.
"किती वाजता मिटिंग आहे चेरी?"
असिस्टंटने शेड्युल सांगितल्यानंतर थोडे काम होते ते संपवून
कॉन्फरन्स रूम मध्ये आला , प्रेझेन्टेशन देणारी मुलगी खूप चुणचुणीत होती. लांबसडक केस आणि डिसेंट फॉर्मल अटायर...नविनला देवकीची आठवण झाली. आणि अंगावर वीज पडावी तशी अवस्था झाली नविनची जेव्हा ती मुलगी मागे वळली...आणि ती मुलगीही जागच्या जागी थांबली...कारण पुन्हा एकदा ते दोघे समोरासमोर होते. भानावर येऊन देवकीने पुन्हा प्रेझेन्टेशन कँटीन्यू केले.
असेच प्रोजेक्ट वर भेटत राहिले, त्यांच्यातली ओढ वाढत राहिली...शेवटी एकमेकांवरील प्रेम व्यक्त झालेच आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला...

देवकीच्या घरून सहज परवानगी मिळाली...पण नविनच्या आईने परवानगी नाकारली आणि आजोबाही...त्यांना देवकी आवडली नाही...आत्या आणि आजोबा यांना देवकी का आवडली नाही हे मात्र नविनला समजले नाही...पण त्याचा निर्णय ठाम होता

नवीनला वत्सल आत्याने परवानगी नाकारल्या मुळे नवल वाटले.....पण त्याने ठामपणे सांगितले की मी देवकीशीच लग्न करणार...नविनच्या या निर्णयाने त्याचे नाराज कुटुंबीय आले नाहीत लग्नाला. फक्त देवकीच्या घरचे आणि गंगा यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला....

वत्सल आत्या च्या आठवणी
गंगा नंतर गावाला गेली...वत्सल आत्याला नविनच्या लग्नाबद्दल सांगितलं....वत्सल गंगावर नाराज झाली...गंगाने त्या विशिष्ट घुंगराच्या ठेक्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला पण वत्सलने ऐकून घेतलं नाही...."गंगे वाईज आल्यास तर तुज्या या मायजवल रहा बर..त्यो नविनच्या लग्नाचा इशय नग, मला तरास हुतो, समजलं न्हवं? न्हायतर मंग बोलू नग माज्या संगत....."
ओके आत्या म्हणत गंगा ने माघार घेतली...आणि ती परत गेली बंगलोरला...

देवकीच्या आठवणी
आणि तो विषय , नवीन च लग्न सगळंच मागे पडलं.
इकडे नवीन सगळा कडवट पणा विसरला....त्याची लग्नानंतर पहिली दोन वर्ष भरभराट झाली, प्रमोशन झालं, सॅलरी वाढली...देवकीलाही उत्तम प्रोजेक्टस मिळत गेले.सगळं उत्तम चाललं होतं. त्यांनी मुंबईच्या मुख्य उपनगरात एका बऱ्यापैकी पॉश टॉवर मध्ये घर घेण्याचा निर्णय घेतला. देवकीला सहाव्या मजल्यावर घर आवडलं.भरपूर उजेड आणि तिला हवा तसा घरातून दिसणारा खालचा व्यु. ज्या दिवशी बुकिंग केलं त्या दिवशी काही कागदपत्र नसल्याने त्यांनी दोन दिवसानी येण्याचे ठरवले. बिल्डर च्या माणसाने फ्लॅट मिळेल अशी खात्री दिली नाही. पण देवकी_नवीन यांचाही नाईलाज होता.

आणि एक दिवस सांगावा आला...देवकीला तिच्या सासूबाईंचा...एकटीने भेटायला येण्याचा आणि नविनला न सांगता येण्याचा...एक पत्र...भेटण्याची जागा सुद्धा पारगावात नाही तर एका जुनाट भग्न मंदिरात....
देवकी ते पत्र घेऊन तिच्या आईकडे गेली. आईला दाखवलं. ते पत्र देवकीच्या आईने बघितलं. तिला ते विक्षिप्त वाटले. तिने देवकीला न जाण्याचा सल्ला दिला. देवकी अक्षराची जाणकार होती.पण त्यावेळेस ती बिथरली होती. आईने विरोध करताच ती तडक ते पत्र तिथेच सोडून निघाली. देवकीच्या आईला विरोध करता आला नाही.कुणालाही काही न सांगता ती पारगावला निघाली.
यावर नविनने देवकी पारगावला जाण्यासाठी निघालेली असतानाचा प्रसंग सांगितला. देवकी म्हणाली एक गाव आहे तिथे जुने दस्तावेज आहेत मोडी लिपीत त्यासाठी तीन दिवस जावे लागेल..हे बोलताना देवकीच्या डोळ्यात लालसर छटा होती....तो तिला पुढे काहीच विचारु शकला नाही..
शेवटी देवकी पारगावला पोचली..तिने नविनच्या घराकडे जाण टाळलं.जसं तिच्या सासूबाईंनी सांगितलं होतं.

देवकी सासूबाईंचा अवतार बघून थरारली,नऊवारी लुगडं, ठसठशीत कुंकू, नाकात पारंपरिक अशी मोठी नथ, करारी पण भीतीदायक डोळे...ते हिरवट डोळे, देवकी खूप हादरली, गर्भगळीत झाली...
"ये, ये...आलीस...नविनशी लगीन केलंस? खूप मोठी चूक केलीस, माझ्याशी वैर घेतलंस, तू घातकी आहेस माझ्या पोरासाठी, पण मी सोडणार नाही तुला...समजलीस? तू माझ्या पोराच्या नशिबात डोकं घालू नकोस, मी आलेय आता, मी बघते माझ्या पोराकडे...."
" तुम्ही माझ्या विषयी कशाच्या आधारावर अशा वल्गना करता आहात? आमचा संसार व्यवस्थित सुरू आहे. सासूबाई तुम्हीच या आता आम्हाला आशीर्वाद द्यायला"
देवकी भारावल्या सारखी बोलली, तिला कळलेच नाही ती असं का म्हणाली...
"असं म्हणतेस? हा हा हा हा हा हा sssssss येईन मग, मला आवताणच हवे होते, येतेच मी...निघ आता, हो आणि घराकडे जायचं नाही, समजलीस का?"
देवकी तिच्या ताब्यात असल्यासारखी सगळं करत होती...

आणि एक आवाज आला...
छन छन छम छन छन छम...

कोसळेल आभाळ..
होईल मोठा कल्लोळ...
येतील विजेचे लोळ..
रंगांची सरमिसळ...

छन छन छम छन छन छम

हवा वाटेल अंधार..
नको प्रकाशाचे दार
धुळदाण होईल पार...
उद्धवस्त सारे घर...

छन छन छम छन छन छम

देवकी भानावर आली..मागे वळून पाहिलं...
मागे पाहिल्यावर तिला जे दिसलं ती भोवळ आली.
डोळे उघडले तेव्हा ती एका दवाखान्यात होती. गावकऱ्यांना ती शेजारील गावाच्या मुख्य रस्त्यावर सापडली.
तिला आपण मोठी चूक केली हे लक्षात आलं.पण उशीर झाला होता.....
ती कशीबशी घरी पोचली. ती त्या दवाखान्यात कशी पोचली तिला आठवत नव्हतं. तिने हे कुणालाच सांगितलं नाही. त्या दिवशी नवीन घरी आला, देवकीने त्याला सगळं सांगण्याचं ठरवलं. "ऐक ना नवीन, मी आज ना...."
इतक्यात दारावरची बेल वाजली. नविनने दार उघडलं...देवकी आत होती...बराच वेळ आवाज आला नाही.म्हणून बघायला गेली तर नवीन दरवाज्यात आकडी येऊन पडला होता.....

नवीन आतापर्यंत दरवाज्यात कोण होतं ते सांगू शकला नव्हता. देवकीनं अजून त्या बाईंबद्दल पुरेशी माहिती सांगितली नव्हती.

कोण आलं होतं? काय झालं दारात?
आणि स्वयंपाक घरातून आवाज आला....

छन छन छम...सुनबाई आलेय मी...म्हटलं ना माझ्या पोरा कडे मी बघेन, यापुढे तू डोकं घालू नकोस....
या त्याच बाई, नऊवारी साडीवाल्या,ज्या देवकीच्या घरात नवीनला झटका आल्यावर दिसत असतं. त्या देवकीचा धीर खचवत होत्या. नवीनच्या तब्येतीत फरक पडत नव्हताच पण पण जास्तच खालावत होती तब्येत.देवकी खचत चालली होती, त्या शक्तीपुढे निष्प्रभ ठरली होती. आशेचा किरण कुठूनच नव्हता..............................................

वत्सलनी डायरी बंद केली. चष्मा काढून एकदा देवकी आणि नवीनला बघून आली. पाच मिनिट शांत बसली. विचार करु लागली, देवकीला बाकी काही स्पष्ट आठवतंय...आणि त्या स्त्रीने केलेल्या कवितेच्या ओळी देखील. किती नकारात्मक.....इथेही त्याच पद्धतीने तशाच ओळी म्हटल्या गेल्या होत्या. वत्सल आली त्या दिवशीही त्या स्त्रीने देवकीला घाबरवायचं घाबरवायचा प्रयत्न केला होता पण नंतर ती दिसली नाही की वत्सल आत्यांसमोर ती आली होती. वत्सल विचार करत होती.... ते लाल आणि हिरवे प्रकाश झोत आणि त्या बाईचा काही सम्बन्ध असेल का?....... नवीन ने त्या बाईच्या दिसण्याचा कधीच उल्लेख केला नाही. म्हणजे त्याला ती दिसत नसेल का? त्या दिवशी पाट काढताना नवीनचा आवाज बदलला होता.....तो पाट....कुठे बघितला ? एक ना अनेक नोंदि करून वत्सल आत्यांची डायरी रंगीबेरंगी दिसत होती. त्या माऊलीच्या कष्टाना पारावर नव्हता. आपल्या लेकरांना या मरण मिठीतुन सोडवण्यासाठी तिची धडपड सुरु होती.

वत्सल आत्यांची लिंक तुटली, ती जोरजोरात दरवाजा ठोकण्याच्या आवाजाने......." आत्या , नवीनदादा, आआआत्या प्लिज लवकर दरवाजा उघड ग आत्या........." धडाम धडाम टिंग टॉंग टिंग टिंग टॉंग...कुणीतरी जोरजोरात बेल वाजवत होतं.....

वत्सल गडबडीने उठताना थोडा तोल गेला..... पाय मुरगळला...देवकी धावत दार उघडायला आली ....पण त्यातही वत्सल उठली ह्ये पोरी थांब vम्या उगडती..... तू हो मागं ..." धीराची वत्सल आत्या म्हणाली....आणि दार उघडलं तर ......तर समोर गंगा होती.....पूर्ण गर्भगळीत.......

वत्सलने दार उघडलं...तिला आत घेतलं.... पाहते तर मागे दोन मांजरी गुरगुरत आल्या होत्या आणि छन छन छम असा आवाज...आणि काठी ठोकल्याचा आवाज....वत्सल जवळ येताक्षणी हे सर्व थांबले.... देवकीला दिसले नाहीत पण आवाज नक्कीच ऐकले होते.... देवकी परत घाबरली...अन मग नवीन आलेला होता.....

बिकट प्रसंग आलेला होता...त्या शक्तींनी आता गंगेवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता....पुन्हा घरातली शांतता ढळली आणि भीतीच कुप्रवेश झाला होता. त्या शक्तींना तेच हवे होते....

गंगा थरथरत होती तिला हे अनपेक्षित होते...वत्सलने तिला शांत केले... देवकी आणि नवीन...नवीनच काय?.......

गंगा थरथरत्या आवाजात म्हणाली .......आत्या ती बाई.....तो घुंगराचा आवाज....नवीन दादाच लग्न......गोदाई......म म म महिपती काका......आत्या......

गंगे.....त्ये समदं नंतर सांग....शांत होऊ....आन म्होरं येई .......या र पोरांनो .......वत्सलने त्या सगळ्यांना एकदा महामृत्युंजयाच महामृत्युंजयाचा जप दिला....आणि थोड्या वेळाने सगळे झोपी गेले.....

दाराबाहेर ती मांजरं निष्फळ घिरट्या घालत बसली...पण आत जाऊ शकत नव्हती...एक प्रश्न होता.....त्यांनी गंगेला त्रास द्यायचा प्रयत्न केला पण वत्सलनी खात्री केली तेव्हा गंगेला ते स्पर्श करू शकले नव्हते...आश्चर्यच होते ते एक....

आता काय? गंगाच्या आठवणीत काय असेल? नविनच्या हिप्नॉटिसम च्या ट्रीटमेंटच काय ? त्यातून काय निष्पन्न होईल...गंगाला रजा मिळेल तशी ती मुंबईत येणार होती ती आली

आपली ऑपरेशन नविनची टीम कोण कोण मेम्बर आहेत, ओळखलं असेल ना तुम्ही? त्यांना पण खूप डोकं लढवाव लागणार आहे....
भग्न मंदिरात भेटलेली बाई कोण होती? गंगाला काय सांगायचंय?

आपला तूर्तास तरी सगळ्यांच्या भूतकाळाचा आढावा घेऊन झालाय.....आता गंगा आलीय...वत्सल आत्यांना पाठबळ द्यायला .....

या भागातील प्रश्नाची उत्तरे...पुढील भागात.....

क्रमश:

sarmisal 6.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users