सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग पाच

Submitted by मुक्ता.... on 16 February, 2020 - 12:28

सरमिसळ एक भयंकारी रोमांच

सरमिसळ एक भयंकारी रोमांच यकथामलिकेच्या अधिच्या भागाचे धागे खाली दिले आहेत
भाग एक
https://www.maayboli.com/node/73290
भाग दोन
https://www.maayboli.com/node/73298
भाग तिन
https://www.maayboli.com/node/73372
भाग चार
https://www.maayboli.com/node/73373

सरमिसळ एक भयंकारी रोमांच
भाग पाचवा धागे भूतकाळाचे...

आपल्याला कथेतील मुख्य व्यक्तिरेखांची आवश्यक ओळख करून घेऊ..भूतकाळ ज्यात या वर्तमान घटनांची मुळे दडलेली असावीत असा वत्सल आत्यांचा अंदाज होता.नविनच्या लहानपणाच्या त्या स्वतः साक्षीदार होत्या.पण त्याच्या लग्नानंतर जे घडलं त्याबद्दल वेगवेगळ्या घटना देवकी आणि नवीनकडून ऐकायला मिळाल्या.

दरम्यान वत्सल आत्याने गंगाला या घटनेविषयी कळवले आणि नविनच्या लग्नाला काय काय घडले ते ही तिला लिहून पाठवायला सांगितले.
आता एक एक करून सगळ्या घटना पहायला सुरुवात करू.

प्रथम वत्सल आत्या....त्यांच्या आठवणीतून नविनचे लहानपण समजून घेऊयात.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं पारगाव हे नवीनच गाव! नवीन एकुलता एक...आई ,वडील, आजा, आजी, पणजी...आणि नविनची लाडकी वत्सला आत्या..नविनच्या आई वडिलांचे पटत नसे एकमेकांशी..त्यांचं शेत होतं चांगलं मोठं आणि हे मोठं घर ,दाराशी दहा दुभती जनावर होती. आर्थिक स्थिती उत्तम होती...नविनच्या वडिलांचे गोदाईशी म्हणजे नविनच्या आईशी लग्न झाले,पण अण्णांनी नी बलजोरी केल्याने! गोदेशी लग्न केलं आणि निसर्गक्रमाने नविनचा जन्म झाला. नविनच्या वडलांना संसारात रस नव्हता,त्यांचे बकुळावर प्रेम होते, ते दिवस रात्र बाहेर असत, या दुःखात गोदाच्या डोक्यावर परिणाम झाल्याने ती नविनकडे पाहत नसे...नवीन झाल्यानंतर नवरा जास्त दुरावला असा काहीसा समज गोदाने करून घेतला..ते तान्हुलं आईच्या स्पर्शाला दिवस दिवस आसुसले, तडपत रडत असे...गोदा त्याच्या जवळ कुणाला येऊ देत नसे.महिपतीची आई देखील नाही..खूप रडल्यानंतर गोदा त्याला कशीबशी पाजत असे ..कुणी काही म्हटलं तर म्हणत असे "मी आहे ना? बघेन माझ्या मुलाकडे, तुम्ही यात डोकं घालू नका"
वत्सल यात लक्ष घालत नसे कितीही जीव तुटला तरी...कारण गोदा जीव द्यायची धमकी देत असे...एकूण त्या घरावर दुःखाची छाया दाटली होती...एक दिवस मात्र हद्द झाली, रडून रडून नवीन एकदम निपचित झाला ...आईचा गलबला ऐकून वत्सल तिथे गेली...
"ग्येलं माज् पोर..."गोदाने नुसता आकांत मांडला , नविनचे श्वास सुरू होते...आणि खोली आतून बंद होती...गोदा एका सागवानी पाटावर बसून गळे काढून रडत होती..."खबरदार कुनी याल तर म्या माजा जीव दिल"
आजा आजी कुणी जाईना , महिपती डोक्याला हात लावून बसला होता...आता मात्र वत्सलच्या डोक्यात तिडीक गेली
"आरं, वयनी येकटी हाय ,आन तुमि चार चार काय घाबरता भैताडावानी आ? तोडा दार आन घुसा आन पकडा गोदेला..म्या बाळाला सांभाळती..."
कुणी उठेना, शेवटी वत्सलने गोदाच्या धमकीला भीक न घालता दार तोडलं धक्के मारून आणि नविनला आपल्या कुशीत घेऊन तडक गावचा दवाखाना गाठला...गोदाला समजलंच नाही काय झालं? कळेपर्यंत वत्सल नविनला घेऊन घराबाहेर पडली होती. ती त्याच क्षणी नविनची "माय" आणि वत्सल आत्या गावासाठी झाली होती...अति रडणे आणि भूक यामुळे नविनच्या तब्येतीची पूर्ण वाताहत झाली होती...नविनला शहरातल्या इस्पितळात दाखल करावे लागले. तिकडे काही महिने उपचार घेतल्यानंतर नवीन सावरला आणि सात महिन्याच्या नविनला परत गावी आणलं गेलं. दरम्यान घरी बरच काही घडलं. गोदा आजारी पडली , तिचा ताप गेला नाही...आणि नविनच्या आठवणीत तिचा आकस्मिक मृत्यू झाला...महिपती आता घराकडे येत नसत....आणि तेही बेपता झाले....आणि बकुळाही....म्हणत असत की बकुळा चांगली नव्हती...बहुतेक तिचा मृत्यू झाला होता. महिपतीच्या संसाराची तिच्यामुळे वाताहत झाली होती. तसच तिच्यामुळे अनेक संसार मोडले होते....विशेष सुबत्ता असणारी घरं तिच्या नजरेत असत, तिने काही संसार धुळीला मिळवले होते...महिपती राव याला बळी पडले...
गावकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्यांनी बकुळेला गावाबाहेर जंगलात नेऊन सोडले, ती परत कुणालाच दिसली नाही...
नवीन मोठा होत होता पण भित्रा , विशेषतः गोदाच्या खोलीकडे जाताना घाबरत असे....असे म्हणत की गोदाचा आत्मा तिथे वावरत असे. तीने कधी कुणाला त्रास दिला नाही. पण त्या खोलीजवळून कधीं कधीं काठी अन घुंगुर अपटल्याचा आवाज येत असे.

ती जिवंतपणी अतिशय कमकुवत असल्यानं बकुळाचा सामना करू शकली नाही. ओटीभरण होईपर्यंत गोदा व्यवस्थित होती , महिपती राव गोदाबरोबर जास्त काळ राहू लागले होते आणि बकुळेला तिचं सावज हातचं निसटत जाताना दिसत होतं. म्हणून गोदा बाईंची कमकुवत मनःस्थती पाहता तिने त्यांना ओटीभरणाच्या दिवशी कानात काही सांगितले...गोदा तेव्हापासून विचित्र वागू लागली...काय सांगितले ते गोदा बाई आणि बकुळाच जाणोत पण त्या दिवसानंतर महिपती राव पण घराबाहेर राहू लागले आणि कुटूंबाला पार दुरावत गेले...नवीन आता अनाथ होता...पण वत्सल ने त्याला पोटच्या पोराप्रमाणे वाढवला...तिने लग्न केले नाही...ती खऱ्या अर्थाने नविनची माय होती...

गोदाला बकुळाने काय सांगितले ते गोदाबरोबर गेले.
काळ थांबत नसतो. जगणार्यांना जगावे लागते. लहानाला मोठे व्हावे लागते.

नवीनच नशीब लहानपणापासून त्याची परीक्षा घेत होतं. पण परमेश्वराने वत्सलची योजना केली होती.असो..
नवीन खूप शिकला, वत्सलने त्याला शहरात पाठवलं, आय टी इंजिनियर झाला, भल्या पगाराची नोकरी लागली...देखणा ,डार्क हँडसम ....तो मध्ये मध्ये गावाला येत होता, लहान पणच सगळं मागे टाकलं. आजी आजोबा, वत्सल आणि गंगू त्यांची लहानपणापासूनची घरात वाढलेली अनाथ मुलगी....तिलाही वत्सलने वाढवली...नविन आणि गंगू एकमेकांवर सख्या बहीण भावासारखे प्रेम करत होते...यथावकाश गंगू खूप शिकली आणि मानसतज्ञा तसच रसायन शास्त्राची तज्ञा झाली....
नविनची भीती ही त्याच्या अंतर्मनात कायम वास्तव्यास राहिली..कधी कधी महत्वाचे निर्णय घेताना तो कोलमडत असे...त्याला आकाशाच्या निर्वात पोकळीची प्रचंड भीती वाटत असे.....

नविनच्या आठवणीतून...जेव्हा पहिल्यांदा वत्सल आत्याने त्याला महामृत्युंजय म्हणून कपाळाला हात लावून ध्यानात नेले...यासाठी आपल्या कथेच्या दुसऱ्या भागाचा संदर्भ आहे.

नवीनची आठवण सुरु होते ती तो नोकरीला लागला तिथपासून...........कारण आधीचे बरेच संदर्भ अगदी ६ ते सात वय असतानाचे ते अत्यंत महत्वाचे असणार.कारण त्याला जे झटके येत होते ते त्याला अंतर्बाह्य नष्ट करत होते. कुणीतरी याचा गैरफायदा घेत होतं हे नक्की.

नवीनला जे लहानपण आठवत होतं ते आणखीन विस्मयकारी होतं. अनुभव त्याच्या अंतर्मनाच्या तळाशी होते. जे जागतेपणी आठवू नयेत म्हणून त्याने मनात कुठेतरी खोल पुरून टाकले. काही आठवत होते. नाही असं नाही.हा स्वभाव त्याच्या जन्मदात्या आईसारखाच होता. त्यामुळे देवकी जेव्हढा तटस्थ आणि सम्यक स्थिर विचार करू शकत होती तेव्हढं नवीनला शक्य नव्हतं. त्याच्या मनातून या लहानपणच्या आठवणी जाणून घेण्यासाठीच डॉक्टर टंडन यांनी हिप्नॉटिसमचा सल्ला दिला होता. तूर्तास नवीनने जेव्हढं आठवलं तेव्हढंच वत्सल आत्यांना सांगितलं.

बकुळाने गोदाबाई म्हणजे नविनची जन्मदात्री आई, त्यांना काय सांगितले? महिपती रावांचे काय झाले? बकुळा नक्की काय झाले तिचे? गंगाकडे काय माहिती असेल? नवीनला आकाशाची भीती की वाटत असे? कुणीतरी म्हटलं आहेच कि कुठलीच कुठलीही घटना ही उगाच घडत नाही. भविष्यातल्या संभाव्य घडामोडींचे द्योतक असते. काळाची चाल समजली ते जिंकले . नाही ते चक्रव्यूहात फसले. अगदी आपल्या नवीन आणि देवकीचे आहे तसेच....

वत्सल अगदी विजय सरानी सांगितल्याप्रमाणं सगळं करत होती. आज एक प्रयोग करायचा होता. जे पाणी वत्सलने लाकडी बॉक्स मध्ये ठेवले होते ते पुन्हा काढायचे होते. त्या प्रकाशमय शक्तींनी घरात प्रवेश करणे बंद केले होते. त्यांना बहुधा काचेपासून अवरोध होता. त्या दिवशी त्या ग्लासातल्या पाण्यावर गायत्री मंत्राचा वत्सलने उपयोग केला होता. ते ग्लास वत्सलने बाहेर काढलं, त्यावर काचेचं झाकण तसाच अवस्थेत ठेवलं. आज त्या ग्लास मधील पाणी बराच वेळ स्थिर होतं. वत्सलने ग्लासवरील झाकण किंचित बाजूला सारले...आणि...पाण्यात थोडी हालचाल पुन्हा जाणवली अगदी सूक्ष्म,वत्सलने पुन्हा झटक्याने झाकण बंद केले. गायत्री मंत्राचा जप पुनः सुरु केला. या खेपेला तिने एक शून्य वॉट चा बल्ब त्या ग्लास जवळ लावला. ग्लासला स्पर्श केला. मंत्रोच्चारण सुरूच ठेवले. पाण्याचा रंग बदलायला लागला निळसर झाक येत ती हिरवट झाली आणि पाणी गोल फिरू लागलं, आणि वत्सलच्या हाताला पाण्याच्या तापमानातील फरक जाणवला. पाण्याचे तापमान किंचित वाढले होते. तीन मिनिटांनी वत्सलने बल्ब बंद केला. पाण्याचा रंग पूर्वस्थितीत आला आणि गायत्री मन्त्र थांबवल्यानंतर गोल फिरणेही, मागच्या वेळेस त्यात हिरवे आणि लाल तरंगणारे कण हळू हळू मोठे झाले होते. यावेळेस तसं काही झालं नाही. वत्सलने ते निरीक्षण नोंदवलं. ग्लास होतं तसंच ठेवलं. इतक्यात आत पाट सरकल्याचा आवाज आला. वत्सल त्या आवाजाच्या दिशेने गेली. तर कुणीच नव्हतं, मात्र आता तिने तो पाट निरखून बघितला तिला कुठेतरी बघितल्यासारखा वाटला..पण कुठे?

वत्सलने ग्लास पुन्हा लाकडी खोक्यात ठेवून होता तीथे ठेवला.

टिक टिक टिक......स्क्याव स्क्याव....

पुन्हा एक सेकंदासाठी काचेच्या तावदानाबाहेर आवाज आला....एक हिरवी प्रकाश शलाका झर्र्कन तिथून पास झाली...

" म्हंजी ह्ये शांत नाय बसलंय.....पन आठ दिसांनी पुन्हा आलया.....म्हंजी ह्यो गिलास आन त्याबरुबर म्या जे क्येलं त्ये त्याला ठाव झालं का काय? का आन कसं? ह्ये अव्याला सांगाया पायजे......" वत्सलने अविनाशला कळवलं.....

एकाच वेळेला भूतकाळाचा वेध घेताना वर्तमानातील घटना आणि या दोन्हीचा एकत्रित संधर्भ लावणं वत्सल आत्यांना फार जड जात होतं. म्हणून तर त्या गंगाची आतुरतेने वाट पाहत होत्या. लवकरात लवकर......

ऑपरेशन नवीन कडे जाणारी आपली टीम वत्सलआत्या, अव्या, गुरु विजय, डॉक्टर टंडन आणि.....कोण असेल? अर्थात गंगा

सध्या आपण भूतकाळात आहोत, त्यामुळे अजून वर्तमानाकडे यायला वेळ आहे. नविनच्या आयुष्यात धुमाकूळ घालणाऱ्या शक्ती जरी गप्प असल्या तरी त्यांचे लक्ष आहे. वत्सलला नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांचे प्लॅन सुरू नसतील ना? कळेलच पुन्हा वास्तवात आल्यावर, वर्तमानात आपल्याला मोठा संघर्ष पहावा लागणार आहे,तयारीत राहूया नाही का?

क्रमशः

चित्र: पिक्सबाय
sarmisal bhag 5.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Superb