सरमिसळ एक भयंकारी रोमांच भागचार

Submitted by मुक्ता.... on 13 February, 2020 - 15:34

सरमिसळ एक भयंकारी रोमांच भाग चार
मिशन नविनची तयारी....

वत्सल आत्या येऊन जवळ जवळ सोळा तास व्हायला आले. एकामागून एक अनाकलनीय घटना, विचित्र अनुभव यांनी प्रत्येक क्षण भरला होता. सगळे मार्ग बंद झाले वाटत असताना वत्सलने त्या घरात प्रवेश केला आणि जरा...होय जरासच वातावरण निवळले होते. वत्सल आत्याना शांत झोप लागली पहाटे तीन च्या सुमारास....आणि एक स्वप्न...बस्स
साधारण सकाळी सात च्या सुमारास, स्वयंपाक घरातील हालचालीने वत्सल जागी झाली. बसल्या बसल्या कानोसा घेतला. दबक्या पावलांनी स्वयंपाकघरात डोकावणार इतक्यात, "आ ssssssssss" देवकी समोरून आली आणि वत्सल दचकून किंचाळली...
देवकीच्या हातातली पिण्याच्या पाण्याची भांडी 'दिन दिन दान दान दान 'करत खाली पडली....त्यांनी गाढ निद्रेत असलेला नवीन बेडरूम मधून धावत बाहेर आला.
"देवकी, माय...काय झालं?"
तिघेही एकदम टकमका एकमेकांकडे बघायला लागले...तिघांचीही छाती ढोल जोरात बडवावे तशी धडधड करत होती...एक अर्ध्या मिनीटाच्या स्तब्धतेनंतर त्यांना हा साधासा गडबडगोंडा लक्षात आला.
तिघेही एकमेकांकडे पाहत एकावेळेला हसत सुटले.....
पोट दाबून हसताना नवीन चा पाय चुकून पडलेल्या भांड्याना लागला. भांडी पुन्हा घरंगळत आवाज करू लागली. पुन्हा काही क्षण स्तब्ध आणि पुन्हा हशा पिकला...
डोळ्यात पाणी येईस्तोवर हसले...तिघेही हसता हसता देवकी आणि नवीन अक्षरशः लहान मुलं धाय मोकलून रडतात तशी वत्सल आत्याना बिलगून रडू लागली....

खूप वेळ झाल्यानंतर, वत्सलआत्यानि दोघांना शांत केले...
"माय, खरच तुझा खूप आधार वाटतो ग, आज कित्येक वर्षांनी सगळ्याच भावना साठलेल्या ओसंडून वाहताहेत! माहीत नाही किती दिवसानी माय....माय....
देवकी किती क्षण गेलेग? तुझे प्रयत्न, कूतरओढ, दिसत होती पण काही करू शकत नव्हतो...असहाय होतो...मला क्षमा करशील ना?"
देवकीने नविनचे हात हातात घेतले..."नवीन प्लिज..असं का म्हणतोस, याला तू कारणीभूत नाहीस, न मी, हा नियतीचा ,नशिबाचा खेळ आहे...मला ओशाळ करू नको...मलाच उलट वाटतं मी कमी पडले...तुला बरं करू शकत नव्हते...आय आम सॉरी रे"
देवकीने झर्त्या डोळ्यांनी मान खाली घातली...
त्यांचं एकमेकांवरील प्रेम, समर्पण आणि त्यागाची भावना पाहून वत्सल गहिवरली, "पोराहो, म्या धन्य झाली ह्ये पिरिम पाह्यलं आन! समदं भरून पावलं...आसच राहा एकमएकांबराबर...ह्ये नविनच्या आय आन बा दोघासनी नाय जमलं बगा...बार आता काई गोस्टि नीट कान द्येउन आयका, या घरातलं पानी वापरायाचं न्हाय....हाय त्ये पानि तसच रहाव द्या...अंगुळी करा पन त्ये पानी तोंडात जाता कामा न्हाय...आन पियाच्या पान्याची यवस्था भैरून करा म्हनते...आन त्ये बी काचच्या भांड्यात..."
नवीन आणि देवकी चकित झाले "पण आई,....."
"पोरी काय बी सांगू शकणार न्हाय मी आताला,यळ आली का मंग व्हईल उलगाडा, इस्वास हाय न्हवं या आयवर?"
"हो हो, आहेच" दोघेही उद्गारले...
वत्सल म्हणाली..."झालं तर मंग"
"आपण जरा भाईर जाऊन येऊ, मला एक तो हात लावत्यात न्हवं त्यो नव्या प्रकारचा फोन दावा आन त्ये हाटेल तितला त्यो मोटा डोसाबी दावा..."
देवकी आणि नवीन पुन्हा चकित झाले...पण त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही....तिघेही अंघोळ करून मॉल ला निघाले....खूप दिवसांनी नवीन आणि देवकिदेखील बाहेर निघाले...फ्रेश मूड...टॉवर मधले लोक त्यांना विशेष तर सावंत काकू, मोहिले अप्पा, किशोर, पद्मिनी वहिनी सगळेच आणि वोचमन भाऊ पण....पुढचे काही दिवस बरे चालले...पाण्याची व्यवस्था बाहेरून होती...नविनच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होत होती, देवकी ऑफिसला जाऊ लागली...पगार येऊ लागल्याने जरा परत स्थिती सुधारली...वत्सल घर आणि नवीन दोन्ही सांभाळत होती...अनाकलनीय गोष्टी आणि त्या प्रकाशमान शक्ती सध्या गायब होत्या...

देवकी आणि नवीन निश्चिन्त होत होते पण वत्सल मात्र शांत होती आणि सावध ही...तिने सर्वांच्या भूतकाळाचा अभ्यास सुरू केला...जुन्या घटना आठवायला सुरुवात केली आणि लिहायला ही...अव्या आणि विजय दोघेही अडीच महिन्यांनी वत्सल आत्याना भेटणार होते....या माहितीची नितांत आवश्यकता होती...विजयने सांगितल्याप्रमाणे देवकी आणि नवीन या दोघांनाही योगाभ्यासाचे धडे वत्सल देत होती...
विजय म्हणजे वत्सलचे गुरू आणि अविनाश यांनी वत्सलआत्याना काही प्रयोग आणि नवीन-देवकीच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना लिहून काढायला सांगितल्या.
तसच वत्सल मुंबईला आल्यानंतर पुढचे अडीच महिने ते तिघे भेटेपर्यंत घडणाऱ्या घडामोडीं टिपून ठेवायला सांगितल्या.

नवीन आणि देवकीने आपापल्या आठवणी प्रमाणे त्यांच्या लग्नाआधीचा आणि लग्नानंतरचा घटनाक्रम वत्सला आत्याना सांगितला. नविनच्या लहानपणापासूनच्या घडामोडींशी वत्सला आत्या स्वतः साक्षीदार होत्या. आता या घटना ,आधी काय घडलं ते पहाणं समजून घेणं आवश्यक आहे.

वत्सलाआत्या स्मार्ट फोन वापरायला शिकल्या, थोडं तोडक मोडकं इंग्रजी येत होतं तेही सुधारलं. म्हणतात ना शिकायचं असेल तो माणूस सबबी सांगत नाही. "कर्मण्ये वाधिकारस्ते"या उक्तीप्रमाणे अशी माणसं असतात. परमेश्वर मग काही खास कार्यांसाठी अशा माणसांची निवड करतो. माणूस मनाने खंबीर हवा. मग कोणत्याही संकटावर तो मात करू शकतो. अव्याने स्मार्टफोन याच करणाकरता सांगितलं की पुन्हा काही जर घडलं तर ते रेकॉर्ड करता यावं. ती रहस्यमय अक्षरं..तो गाणं म्हणणारा आवाज... नविनला येणारे झटके..नवीन पूर्णपणे वत्सलच्या छत्रछायेखाली होता.
योगाचे शिक्षण देत असताना नविनला लहानपणच्या काही आठवणी त्रस्त करत असत. तो खूप काही बरळत असे.
वत्सलने ते व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवलं.
असाच एक रविवार, पूर्ण आठवडा काही विशेष घडलं नाही. नविनला एकदाच फक्त झटका आला. पण अगदी सौम्य.तो लवकर आटोक्यात आला. वत्सलने एक एक करून ज्या ज्या व्यक्तींकडे देवकीने उपचारासाठी संपर्क केला त्यांना भेटायचे ठरवले. त्याबद्दल देवकीशी बोलायचे ठरवले.कारण जास्तीत जास्त माहिती गोळा करणे आवश्यक होते.
कॉफी घेत घेत ते तिघे बोलत होते...वत्सल देवकीला म्हणाली," सुनबाई, लय केलंस माज्या पोरासाटी, काय काय उपाय क्येल्येस..." देवकी ने एक निराश उसासा टाकला..वत्सलचे बोलणे मध्येच तोडत म्हणाली," आई , हो, केलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही....सगले श्रम वाया गेले."
वत्सलला गहिवरून आले," तसं काय बी म्हनू नगस पोरी, आग येकली हुतीस, तरी दगमगली न्हाईस, आनि येक गुष्ट ध्येनात ठिव, या जगात खऱ्या मनाने क्येलेले शरम कदी वाया जात नस्त्यात, आपन असं करू तू ज्येना ज्येना भिटलीस त्येना परत भेटु, मला घिऊन चल,काई म्हायती हवी हाय..."
देवकीने निराश होकार दिला. वत्सलअत्यावर पूर्ण विश्वास असल्याने त्या दोघी मानसोपचार तज्ञ डॉ. टंडन, जोशी गुरुजी, वास्तुतज्ञ मार्को, जुन्या मशिदीतले एक बाबा होते रहीमचाचा....
सगळ्यांना जाऊन दोघी भेटल्या..सगळ्यांना विक्षिप्त अनुभव आले त्यामुळे जिवाच्या भीतीने या सर्वांनी नविनची केस सोडली. या प्रत्येकाचा अनुभव आणि निष्कर्ष ऐकणे रोमहर्षक होते. नवीन पण काही ठिकाणी त्या दोघींबरोबर गेला. त्याला पूर्ण कल्पना आली की आपण खूप मोठ्या संकटात आहोत,पण का हा प्रश्न त्याला राहून राहून त्रास देत होता.
नवीन बरा झालेला बघून त्या सगळ्यांना नवल वाटले. स्पेशली डॉ टंडन जे त्याचे मानसोपचार तज्ञ होते.देवकी आणि वत्सल डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या क्लिनिकमध्ये आल्या.प्रदीर्घ चर्चा झाली. वत्सलने ती इथे आल्यानंतरच्या काही घटना त्यांना सांगितल्या. या केसमध्ये डॉक्टरना निराळाच इंटरेस्ट वाटू लागला." ये एक करिष्मा है...वत्सल चाची अगर आप कीं इजाजत हो तो मैं एकके साथ नविनको ठीक करनेके मिशनमे शामिल होना चाहता हूं"

वत्सल हसली"डागतर साहिब, मी सांगन तुम्हांसनी, मला लागलं तुमची मदत.." देवकीकडे वळून डॉक्टर म्हणाले
" मिसेस नवीन ,जैसे आपके पती काफी संभल गये हैं, मैं आपको हिप्नॉटिसम थेरपी उनके लिये सजेस्ट करता हु, हो सकता है कोई जरुरी बात सामने आये..."
देवकी विचारात पडली,"मुझे इसपर नवीन और माँ से बात करनी होगी"
त्यांचा निरोप घेऊन त्या घरी परतल्या. देवकीने वत्सलला हिप्नॉटिसम विशयी माहिती दिली....पण तूर्तास ते होल्ड वर ठेवलं....यात नविनची परवानगी आवश्यक होती. वत्सलपुढे बरीच माहिती होती ती आता देवकीच्या मदतीने संकलित करायची होती. हिप्नॉटिसम वरून वत्सलला गंगा ची आठवण झाली. गंगा एक अनाथ मुलगी जिला वत्सला अत्यानी वाढवली, मोठी केली. ती रसायनशास्त्रज्ञा आणि एक उत्तम मानसतज्ञा देखील होती. वत्सलने या मिशन मध्ये गंगाला सामील करून घ्यायचे ठरवले..

ही कॉम्प्लिकेटेड केस, आता आपल्या कथेची टीम मोठी व्हायला लागलीय....वत्सल अत्यानी एक डायरी बनवली...त्या डायरीतल्या नोंदी पुढच्या दोन भागात बऱ्यापैकी गुंता सोडवतील....बरेच नवे धागे निर्माण करतील...पुन्हा गुंतायला....

गुंतून रहा...नवीन भाग घेऊन लगेच येतेय, भूतकाळातील रहस्याचा उलगडा वर्तमान रहस्याचं कोडं सोडवायला.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नंबर !!!
फार मस्त, फक्त एक काम कराल का? प्रत्येक नवीन भाग सुरु करण्या आधी, आधिच्या भागाची लिंक देत जा. वाचकाला सोपं पडतं Happy

लवकर लवकर लिहा हो प्लीज. उत्सुकता वाढते आहे.
फार मस्त, फक्त एक काम कराल का? प्रत्येक नवीन भाग सुरु करण्या आधी, आधिच्या भागाची लिंक देत जा. वाचकाला सोपं पडतं >>>+१११