अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://www.star-telegram.com/news/local/crime/article245390460.html

चार वर्षांच्या relentless hate-mongering ला आलेलं विषारी फळ आता भारतिय वंशाच्या लोकांना लक्ष्य करू लागलं आहे. ट्रम्प समर्थक भारतीय आता काय आपण होऊन भारतात परत जाणार की काय!

नॅन्सी पेलोसीने ट्रम्पसमर्थकांना किमान ३-४ दिवसतरी लाइमलाइट बहाल केलेला आहे. टोटल डम्ब. अगदी "You just dropped the world cup, son" लेव्हलचे नसले तरी डेम्स ना आता डॅमेज कंट्रोल करता नवीन काही काढावे लागेल. कारण हे डिफेण्ड करणे म्हणजे आणखी तेल ओतण्यासारखे आहे. या बातमीपेक्षा जास्त चर्चा होईल असे काहीतरी काढावे लागेल.

केवळ पेलोसिने असं केलं म्हणून बायडन कमला ऐवजी तात्याला कोणी स्विच करणार नाही. त्यामुळे dropped the world cup लॉजिक कळलं नाही.

डेम्स वाले कोणी जाणार नाहीत. ते रॅशनलाइज करतील जरी चुकीचे निघाले तरी. पण रिपब्लिकन वोटर्स अनेक आहेत जे कुंपणावर आलेत, ते गमवायची भीती आहे.

हो, कुंपणावरचे मतदार ही थिअरी प्रत्येकच निवडणुकीत असते, त्यानुसार तुम्ही लिहिलंय ते बरोबर आहे.

मला- वैयक्तिक मत- या निवडणुकीपुरती ती थिअरी पटत नाहीये! म्हणजे जर स्पेसिफिकली करोनाव्हायरस हा टॉपिक असेल तर 'मी बायडनला मत द्यायचा विचार करत होतो पण आता पेलोसिने असं केलं म्हणून मग ट्रम्पलाच मत देईन' असं कोणी म्हणत असेल असं वाटत नाही. This time the choices are very stark.
हां पण closet trump supporters ना coming out साठी हे एक excuse वापरता येईल.

coming out साठी हे एक excuse वापरता येईल. >> +१
पलोसी जे वागली तो मूर्खपणा होता. पण त्यामुळे ट्रंपला व्होट देतोय कोणी म्हटलं तर तो मुळात तिकडेच देणार होता. काही तरी कारण शोधत होता इतकंच. ते पलोसीने दिलं. पलोसी तात्याला पुरुन उरते त्यामुळे तिच्यावर रिपचा फारच राग आहेच.

ही इलेक्शन कुंपणावरचे लोक ठरवणार आहेत. कदाचित नेहमीच ठरवतात. असे अनेक लोक आहेत की जे रिपब्लिकन/कॉन्झर्वेटिव्ह विचारसरणी मानतात पण ट्रम्पच्या मागे ते तितक्या खात्रीशीररीत्या नाहीत. लिंकन प्रोजेक्ट, रिपब्लिकन वोटर्स अगेन्स्ट ट्रम्प सारखे अनेक ग्रूप आहेत जे सिरीयसली फेरविचार करत आहेत. यांची मते बायडेनकडे येउ शकतात.

पण जेव्हा असे काही होते तेव्हा ते लोक डळमळीत होतात. हॅनिटी, ट्रम्प व इतर अनेक जणांना झोडल्यावर जेव्हा पेलोसी मास्क शिवाय दिसते***, जेव्हा एका बाजूला ट्रम्पला झोडल्यावर, आणि विशेषतः डेम्स मधले रॅडिकल "वोक" लोक जुन्या गोष्टी अक्षरशः शोधून काढून कॅन्सल कल्चर राबवताना दुसर्‍या बाजूला डीएनसी मधे बिल क्लिंटनला बोलावले जाते, जेव्हा दंगेखोरांना आटोक्यात आणण्यापेक्षा सहानुभूती दाखवली जाते तेव्हा फॉक्स व इतरांना नॅरेटिव्ह सेट करण्याची संधी मिळते, न्यूज सायकल ३-४ दिवस त्यानेच डॉमिनेट होते.

आता हे लोक मुळातच ट्रम्प सपोर्टर होते आणि फक्त वरकरणी आव आणत होते म्हणून "छुपे संघी" छाप शिक्के मारून त्यांना निकालात काढणे सोपे आहे. पण एक मोठी संधी डेम्स घालवतात.

हे पॅटर्न्स इथे आणि भारतात दोन्हीकडे सारखेच आहेत.

*** इथे मास्क शिवाय दिसते मधे प्रत्यक्षात काय झाले हे महत्त्वाचे नाही. पब्लिकला काय दिसले हे महत्त्वाचे. फॉक्स, नॅशनल रिव्यू व इतरांनी काय दाखवले त्यावर ते ठरणार. पेलोसी सारख्या व्यक्तीला ते माहीत हवे.

फारएन्ड,
इन थिअरी तुमचं म्हणणं बरोबरच आहे.

पण at this point, जर फक्त करोनाव्हायरस मध्ये गाजवलेला पराक्रम हा निकष लावला तर ट्रम्प आणि बायडन(with his experience as VP in times of swine flu and Ebola) हे दोघे दोन टोकाला आहेत. त्यात पेलोसीच्या एका चुकीच्या कृत्याने तुळशीपत्र टाकल्यासारखे scales बॅलन्स होतील असं मला व्यक्तिशः वाटत नाही इतकंच.

भारतातलं उदाहरण घ्यायचं तर ज्याला राहुल गांधी आणि मोदी दोघेही खूप खूप आवडतात आणि कोणाला निवडू याबद्दल कुंपणावर आहे असे लोक कमीच असतील. म्हणूनच मोदींना दोन्ही वेळा अगदी एकतर्फी विजय मिळालाय, मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगण्याची वेळ आलीच नाही.

ही इलेक्शन कुंपणावरचे लोक ठरवणार आहेत. कदाचित नेहमीच ठरवतात. अ >> घाई नको. अद्याप दोन महिने बाकी आहेत, ह्याची कोणालाही आठवण राहणार नाही.

>>डेम्स ना आता डॅमेज कंट्रोल करता नवीन काही काढावे लागेल.
अनुमोदन.....................................................
...................................................................

गाळलेल्या जागा भरायला कदाचित नंतर ञेणे होऊ शकेल. Wink

>>या बातमीपेक्षा जास्त चर्चा होईल असे काहीतरी काढावे लागेल.<<
यु बेच्चा! यु आस्क्ड, अँड दे डिलिवर्ड. शाई वाळायच्या आतंच बाय्डन साहेबांनी दुसरा फुल्टॉस दिला. आय कॅनॉट वेट फॉर डुअल ऑफ दि टाय्टन्स ऑन सेप्टेंबर २९... Happy

मागील किती वर्षांचा इतिहास पाहिला तर सलग दोन टर्म्स मिळाल्या नाहीत असा कोणी अमेरिकन अध्यक्ष आहे का?

निक्सनचे भारतियांविरुद्धचे वंशभेदी, अतिशय हीन, बेजबाबदार वाक्ताडन वाचलं का? कुठे लिहावे कळले नाही म्हणुन इथे लिहीत आहे.
https://www.nytimes.com/2020/09/03/opinion/nixon-racism-india.html

The Atlantic मधे आलेल्या विधानाविषयी काय मत आहे? ट्रंपने सैनिकांबद्दल बोलताना लुजर्स आणि सकर्स असे शब्द वापरले होते असे म्हटले आहे. त्याने असे खरोखर म्हटले का? म्हटले असेल तर तो सैनिकांबद्दल अशा प्रकारचा तिरस्कार बाळगून असेल का? आणि डावे लोक जे आजवर प्राणपणाने सैन्यदळाचा विरोध करत आलेत ते सैनिकांचा अपमान झाल्याने आधी गहिवरले आणि मग खवळले हा चमत्कार कसा घडला? अचानक हे सैन्य प्रेम डाव्या बाजूने कसे उफाळून आले?
मला आशा आहे की ट्रंप विरोधकांनी डागलेल्या बाकी अस्त्रांप्रमाणे हेही यथावकाश थंड पडेल.
ट्रंपने ४ वर्षात एकही युद्ध सुरू केलेले नाही. मागच्या दोन्ही राष्ट्राध्यक्षांनी ते केले होते आणि त्याची मोठी किंमत अमेरिकेला मोजावी लागली होती. ट्रंपने दहा पंधरा हजार सैनिक जे जर्मनीत तैनात होते त्यांना परत बोलवणार अशी घोषणा केली आहे.

सैनिक आणि सैन्य समर्थक हे उजव्या बाजूचे बलस्थान असते. त्यामुळे ट्रंप इतका मूर्खपणा करून त्या गटाला दुखावणार नाही अशी आशा.

(एक ट्रंप समर्थक म्हणून मला आजही खात्री वाटत नाही की २०२० ची निवडणूक ट्रंप जिंकेल Sad )

बायडेन प्रो-चीन (चीन धार्जिणा) आहे का? कोणाला काही सज्जड माहीती? त्याचे चीनविषयक धोरण काय आहे?

सनव तुमचा प्रतिसाद चांगला होता. मला तरी आवडला. मी अजुन ट्रंप समर्थक नाहीये. कुंपणावरच आहे. माझ्यासारखेच अनंत लोक आहेत ज्यांना दोन्ही पक्षात तॄटी आढळतात पण ते तडजोड करतील. त्यातल्या त्यात लेसर डेव्हिल.
इन फॅक्ट एवढी उर्जा खर्च करुन तुम्ही मला प्रतिसाद दिलात त्याचे आभार मानायला आले होते. मानले असते नसते अलाहिदा पण मला खूप कौतुक वाटलेले हे नक्की. असो.

धन्यवाद सामो. पण मला पोस्ट लिहिल्यावर वाटलं की काही पॉईंट नाही, निरर्थक आहे चर्चा करणे, म्हणून डिलीट केली.

फ्लॉईड प्रकरणापासून पोलिस खात्याचा खर्च कमी करण्याची मोहिम बी एल एम आणि अँटीफा ह्या मंडळींनी घेतली आहे. डेमोक्रॅट मंडळींचा निदान सुरवातीला तर भरपूर पाठिंबा होता. आता प्रकरण शेकते आहे हे पाहून बायडन प्रभुती हिंसाचाराचा (बहुधा नाईलाजाने) निषेध करत आहेत. ते लोकांना कितपत पटेल ते सांगणे कठिण आहे. शिकागो, न्यू यॉर्क, मिनियापोलिस, सिएटल आणि सर्वांचा शिरोमणी पोर्टलँड ही शहरे पोलिसांचा खर्च कमी केल्यावर ज्या प्रकारे हिंसाचार, लुटालुटीला तोंड देत आहेत ते पहाता कुठला मध्यममार्गी अमेरिकन असल्या प्रकाराला समर्थन देईल असे वाटत नाही.
परंतु ह्या प्रकाराला फक्त फॉक्सच प्रसिद्धी देत आहे की काय असे वाटते. बाकी नेटवर्क सगळे काही सुरळित आहे असे भासवत आहेत. त्याच बरोबर पोर्टलॅंडमधे १०० दिवस सलग निषेध केला जात होता असेही ऐकले.
पीसफुल प्रोटेस्ट हा एक विनोदी शब्दप्रयोग बनू घातला आहे. सी एन एन वर कुठल्यातरी शहरात मोठी आग पेटली आहे. दंगलखोर दंगल करत आहेत आणि शीर्षक आहे "Mostly peaceful protests in xxx city" असे दृश्य पाहिले आहे. अशा प्रत्येक हिंसाचाराबद्दल बोलताना हा प्रोटेस्ट मोस्टली पीसफुल होता हे आधी ठसवण्याची कसरत जवळजवळ प्रत्येक चॅनेल करते ती आता हास्यास्पद वाटू लागली आहे.

आता प्रकरण शेकते आहे हे पाहून बायडन प्रभुती हिंसाचाराचा (बहुधा नाईलाजाने) निषेध करत आहेत. ते लोकांना कितपत पटेल ते सांगणे कठिण आहे. >> त्यात्या जे विकतो ते पटते तर हे पटायला का कठीण आहे हो ?

ट्रंपने सैनिकांबद्दल बोलताना लुजर्स आणि सकर्स असे शब्द वापरले होते असे म्हटले आहे. त्याने असे खरोखर म्हटले का? >> फॉक्स काय म्हणाले ह्याबद्दल हे वाचलेत का ? मग काय निष्कर्ष काढलात ?

ट्रम्प त्या Atlantic वाल्याना sue का करत नाही? म्हणजे त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील तर त्यांना द्यावे लागतील ना.

तात्या हा बीबी वाचतो बहुतेक. बॉब वुडवर्ड फोलाऊट मधून बाहेर पडायला तात्याने आणखी एका मेसेंजर ला शूट केलं. Rofl

Someone needs to remind Donald Trump that Bob Woodward isn't president of the United States

न्यु जर्सी राज्याने कायदा मंजूर केलेला आहे की 'अनडॉक्युमेन्टेड' स्थलांतरीत (इमिग्रन्ट्स) आता नोकरीकरता अप्लाय करु शकतात.
https://scroll.in/global/974075/new-jerseys-raj-mukherji-on-the-states-n...

यावर एका व्हाईट सुप्रामिस्ट नेत्याने राज मुखर्जी या गव्हर्नरचा घरचा पत्ता नेटवरती खुला केला व सांगीतले की या पत्त्यावर जाउन शुभेच्छा द्या. (अर्थात उपरोधिकपणे)

आकड्यांवर विश्वास ठेवायचा तर ट्रंपचे निवडून येणे कठिण वाटते आहे. डिबेट होतात का आणि कशा होतात त्याची उत्सुकता आहे.
बाकी सगळे हात धुवून ट्रंप कसा वाईट्ट आहे ते सांगत आहेत.
फ्लॉईडच्या दंगली शमतात तोच आता ब्रेयोना टेलर प्रकरणी कोर्टाचा निर्णय आवडला नाही म्हणून जाळपोळ, दंगली, लुटालूट वगैरे कार्यक्रम.
कोर्टाने पुरावे वगैरे न बघता लोकभावना बघून निर्णय द्यायचा काय?

निदान RBG च्या जागी नवा न्यायाधीश नेमला गेला तरी पुष्कळ आहे!

Pages