अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लेको, तुम्ही इतर ठिकाणी मला फर्स्ट अमेंडमेंटबद्दल इतकं ऐकवत असता, आणि प्रत्यक्ष प्रेसिडेंटला किंवा चॅलेंजरला म्युट करून त्यांच्या फर्स्ट अमेंडमेंट राईट्सवर गदा आणणार काय? Proud

लोल भा. त्यांच्या कॅम्पेन मॅनेजर्सने हे नियम मान्य केलेले असतात - म्हणजे एका अर्थाने तात्पुरते स्वतः ते हक्क सोडलेले असतात. त्या दोन मिनीटांपुरते Wink

ते मीही वाचलं आहे, पण ते कितपत काँट्रॅक्च्युअल आहे की व्हर्बल आहे, भाषेत किती लवचिकपणा आहे, हे तुम्हाआम्हाला माहिती नाही. उद्या म्युटचा पर्याय ऑफिशिअली देण्यात आला, तर कुठलाही कँडिडेट तो स्वीकारणार नाही, हे मी आत्ता पैजेवर सांगतो.

र्हेटॉरिक प्रश्न आहे हे ही त्याला समजत न्हवतं आणि तो उत्तरं देत होता. Rofl ते ही वॉलिस सांगतोय.
माझ्या आठ वर्षाच्या मुलाला तो फारच फनी पार्ट वाटला.

ऑफ कोर्स. पण ते व्हायला हवे. आणि मॉडरेटर च्या मर्जीवर नव्हे. कारण तेथे भेदभाव होउ शकतो. पद्धतच अशी ठेवायची की तुमचा माइक तुमच्या टॉकिंग टाइम पुरताच चालू राहील.

व्हाईट सुप्रमिस्ट विरुद्ध काहीतरी बोला असा जबरदस्त दबाव आलेला असतानाही ट्रंपने त्याविरुद्ध अवाक्षर काढलेले नाही. त्याने व्हाईट सुप्रामिस्ट ग्रुप्सचा निषेध केलेला नाही.

र्हेटॉरिक प्रश्न आहे हे ही त्याला समजत न्हवतं आणि तो उत्तरं देत होता >>> Lol अ‍ॅक्च्युअली मेट्रिक्स मधे ऑल्मोस्ट सेम लाइन आहे ख्रिस म्हंटला तशी. "Don't try to answer my rhetorical question" - लॉरेन्स फिशबर्न म्हणतो बहुधा.

ऑफ कोर्स. पण ते व्हायला हवे. >>> हे तुलामला वाटू शकेल. पण राजकारणी ब्लँकेट तेसुद्धा प्रयत्न करूनही बोलता येणार नाही अश्या गप्प बसण्याला हो म्हणणार नाहीत. आणि तसं होऊ नये, असंच मला खरंतर वाटतं. एक कारण म्हणजे मग त्या दोघांना समोरासमोर असायचीही काही गरज नाही. नुसतेच त्यांचे प्रश्नांना उत्तरे देण्याचे व्हिडिओज बनवून फिरवता येतील.

म्युट बटन नको. दोघं काय लहान आहेत का. कॉमन कर्टसी आहे प्रत्येकाला २ मिनीटे मिळतात जेव्हा एखाद्याची पाळी असते तेव्हा दुसर्‍याने शांतपणे मुद्दे ऐकून नंतर खंडन करावे. अर्थात हीटेड वादावादीत तेवढे भान रहात नाही पण त्याकरता ख्रिसने, म्युट करणे हे उत्तर नाही.

अरे फक्त २ गुणिले ६ = १२ मिनिटे गप्प बसायचं आहे. उरलेली १३ गुणिले ६ मिनिटे आहेतच की अद्वातद्वा बोलायला.
बायडनने माकडचाळ्यांना, मोरॉन वक्तव्यांना, धादांत निखालस खोट्या कमेंट ना न हसता स्ट्रेट फेस ठेवून ठासून उत्तर द्यायची प्रॅक्टिस करावी पुढच्यावेळी. अन्यथा ट्रंप बोलताना मोठ्ठ्या आवाजात फेक, लाय... अशा माईक समोर येऊन फुसकुल्या सोडाव्या (रिमेंबर २०१६?) . ट्रंपने ते केलं की लुक हु इज टॉकिंग... ए लायर इज टेलिंग मी! असं म्हणावं.
बायडन सभ्य आहे,पलोसी बाईंकडून थोडे धडे घेतले की चिखलात न उतरता मान वर ठेवून स्टीअर करायला जमेल त्याला.
क्लाऊन बरोबर डिबेट मध्ये मुद्दे महत्त्वाचे नाहीचेत. एक दोन मुद्दे हिट झाले तरी त्याला स.त.त उकसवला की बायडनचं काम ट्रंपच करेल.

हंटर बाय्डनचा विषय काढल्यावर, हि जस्ट रॅटल्ड, अँड ऑल्मोस्ट मेल्टेड डाउन. तर ते असो. >> प्रामाणिकपणे बिडेन त्याच्या दिवंगत मुलाबद्दल बोलत असताना मधे हंटर बिडेन बद्दल उचकणे ही अतिशय हिणकस बाब आहे. अर्थात हे अनपेक्षित नाही.

आता या पॉईंटला इतकं सगळं झाल्यावरही कोणी undecided म्हणत असेल तर तो अजून closet मधून बाहेर न आलेला ट्रम्प समर्थक आहे हे धरून चालायला पाहिजे. >> +१ ट्रेव्हर नोआ म्हणतो तसे एंटर्टेनमेंट वॅल्यु च हवी असेल तर सरळ सरळ दोघा म्हातार्‍यांची कुस्ती ठेवावी नि बक्षिस म्हणून हिप रिप्लेसमेंट इनाम Wink

व्हाईट सुप्रमिस्ट विरुद्ध काहीतरी बोला असा जबरदस्त दबाव आलेला असतानाही ट्रंपने त्याविरुद्ध अवाक्षर काढलेले नाही. त्याने व्हाईट सुप्रामिस्ट ग्रुप्सचा निषेध केलेला नाही. >> फुल टॉस दिलेला ख्रीस ने खर तर, हो म्हणून गप्प बसला असता तर सगळा मुद्दच निकाली निघाला असता पण इगो आड आला.

क्लाऊन बरोबर डिबेट मध्ये मुद्दे महत्त्वाचे नाहीचेत. >>> अनुमोदन.... हे फार महत्वाचे आहे.
प्रेसिडेंटचे बुलल्डोझिंग करत बोलत राहणे होणारच हे ऊघडच होते आणि डेम्सना अपेक्षित सुद्धा.... त्यामुळे मुद्द्यांच्या टेक्निकॅलिटीमध्ये न अडकता ( गदारोळात त्या पोहिचवणे अशक्य होते) फक्त गुद्द्यांस्मोर ऊभे राहणे आणि आपणही गुद्दे मारत राहणे हे बर्‍यापैकी जमले.
पुढच्या डीबेटमध्ये जेव्हा थेट लोकांनी विचरलेल्या प्रश्नांना ऊत्तरे द्यावी लागतील तेव्हा मुद्द्यातल्या टेक्निकॅलिटीचा अधिक ऊहापोह बायडेन करतील असे वाटते.

या डिबेटचा खरेच काही फायदा आहे का? फॉक्स न्युज आणि सीएनएन च्या विडोओंवरचे प्रतिसाद पाहिले तर दोन्ही बाजुची लोकं आपापल्या चष्म्यातूनच पाहात आहेत असे दिसते. या डिबेटमधल्या कुठल्याच मुद्द्याने/उत्तराने मतदारांचे परिवर्तन होइल असे वाटत नाही.
इथेच पाहिलेत तर राज यांनी लिहिलेले मत व असामी/फारेंड यांचे बनलेले मत यात टोकाचे अंतर असेल.

>>त्याने व्हाईट सुप्रामिस्ट ग्रुप्सचा निषेध केलेला नाही.<<
काल क्रिस वॉलेसने अनेक प्रयन्त केले, टृंपला कात्रीत पकडायला, त्यातला हा एक. पण ट्रंपचं उत्तर इथे १:०८च्या पुढे पहा, आणि ते दिल्यानंतर क्रिस वॉलेसची रिअ‍ॅक्शन. अगदि "आय गेस आयॅम डिबेटिंग यु, नॉट हिम" च्या तोडिची... Proud

बाय्दवे, मेलइन बॅलटकरता यावेळेस डेम्स इतका आटापिटा का करत आहेत? बॅलट्स अग्रेसिवली मेल्बाक्स मधे धडकत आहेत. एनीबडि नोज, द "रियल" मोटिव? Wink

प्रामाणिकपणे बिडेन त्याच्या दिवंगत मुलाबद्दल बोलत असताना मधे हंटर बिडेन बद्दल उचकणे ही अतिशय हिणकस बाब आहे. >> हो. तिथे मॉडरेटरने 'मॉडरेट' करायला हरकत नव्हती.

अरे फक्त २ गुणिले ६ = १२ मिनिटे गप्प बसायचं आहे. उरलेली १३ गुणिले ६ मिनिटे आहेतच की अद्वातद्वा बोलायला. >>> Lol

बायडन सभ्य आहे,पलोसी बाईंकडून थोडे धडे घेतले की चिखलात न उतरता मान वर ठेवून स्टीअर करायला जमेल त्याला. >>> म्हणूनच म्हणत होतो की तात्यासमोर हॅरिसला उभे करायचे. एण्टरटेनमेण्ट च एण्टरटेनमेण्ट

बाय्दवे, मेलइन बॅलटकरता यावेळेस डेम्स इतका आटापिटा का करत आहेत? >> तुला माहीत नसेल पण सध्या जगभरात कोव्हिड १९ म्हणून एक रोग धुमाकूळ घालतोय जो हवेतून पसरतो नि गर्दीच्या ठिकाणी त्याचा प्रसार होणे सहज शक्य आहे. अर्थात तात्याच जिंकणे लोकांच्या जीवापेक्षा मह्त्वाचे असेल असे म्हणत असशील तर बातच खुंटली Wink

या डिबेटचा खरेच काही फायदा आहे का? फॉक्स न्युज आणि सीएनएन च्या विडोओंवरचे प्रतिसाद पाहिले तर दोन्ही बाजुची लोकं आपापल्या चष्म्यातूनच पाहात आहेत असे दिसते. या डिबेटमधल्या कुठल्याच मुद्द्याने/उत्तराने मतदारांचे परिवर्तन होइल असे वाटत नाही. >>> काल डिबेटमधेही दोघेही एकमेकांशी न बोलता मतदारांशीच बोलत होते.

आणि परिवर्तन वगैरे नो चान्स. पण सगळी इलेक्शन आणि हा सगळा उद्योग त्या ४-५ राज्यांतील कुंपणावरच्या मतदारांकरताच आहे ना? कॅलिफोर्नियामधे हजार लोक डेम्स मधून रिपब्लिकन साइडला गेले किंवा फ्लोरिडामधे रिपब्लिकन मधून डेम्स कडे गेले, तरी काहीच फरक पडत नाही निकालामधे. शेवटी ओहयो, मिशिगन, विस्कॉन्सिन, एनसी वगैरेमधे कोण येतो यावरच ठरणार आहे.

एकूण तात्याचा आविर्भाव "चार लोकांसमोर प्रेसिडेन्शियल वागावे लागते म्हणून गप्प बसतोय. एकदा आयोवाला किंवा फ्लोरिडाला मागाटोपी रॅली मधे ये मग ऐकवतो माझी बकबक" असा होता, तर बायडेन बर्‍यापैकी आक्रमक होता. फक्त त्याचा आवाज सॉफ्ट आहे, ट्रम्प किंवा इतर आवाजांमधून वर चढत नाही. त्याने जेम्स अर्ल जोन्स सारख्या कोणाचातरी प्लेबॅक घ्यायला हवा Happy

>>या डिबेटमधल्या कुठल्याच मुद्द्याने/उत्तराने मतदारांचे परिवर्तन होइल असे वाटत नाही.<< +१
मी इथे मांडलेल्या तीन मुद्द्यांवर काहिच प्रतिक्रिया आली नाहि, यातंच सगळं आलं असं म्हणायचं का? Wink

बाष्कळ, बालबुद्धि (र्हेटरीक, नेम कॉलिंग इ. वर आलेल्या) कामेंटस ऐवजी व्हाइट सुप्रिमसी, मेलइन बॅलटवर आलेल्या मुद्द्यांवर झालेल्या डिबेटवर अनुभवी मतं वाचायला आवडेल...

त्याने जेम्स अर्ल जोन्स सारख्या कोणाचातरी प्लेबॅक घ्यायला हवा >> आता तेव्हढेच उरलय. आधीच बायडन ईअर पीस घालून इतरांचे फीड घेऊन बोलणार अशा बातम्या काल फिरत होत्या , आता उसना आवाज. उद्या म्हणशील कि तात्याने वंडर वुमन चे केस घालून यावे Lol

बाष्कळ, बालबुद्धि (र्हेटरीक, नेम कॉलिंग इ. वर आलेल्या) कामेंटस ऐवजी व्हाइट सुप्रिमसी, मेलइन बॅलटवर आलेल्या मुद्द्यांवर झालेल्या डिबेटवर अनुभवी मतं वाचाय >> तात्याचा समर्थक हे म्हणतो ह्यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकतो . Lol

>>गर्दीच्या ठिकाणी त्याचा प्रसार होणे सहज शक्य आहे. <<
सिरियस्ली? केवळ गर्दिचं कारण आहे? मग ते सहि तपासुनंच (किंवा इतर मार्गे) बॅलट वॅलिडेट करावं याकरता डेम्स विरोध का करत आहेत?

>>तात्याचा समर्थक हे म्हणतो ह्यापेक्षा मोठा विनोद कोणता असू शकतो .<<
अरे बाबा, ते सरळसोट विधान आहे. त्यात कुठल्याहि समर्थकाचा संबंध नाहि. तुझा सार्कॅस्टिक्/सरळसोट इ. वाक्य समजण्याचा घोळ अजुन चालुच आहे काय? उत्तर नसल्याने तुला ते वाक्य झोंबलं असल्यास, दिलगिरी व्यक्त करु कि काय... Lol

सिरियस्ली? केवळ गर्दिचं कारण आहे? मग ते सहि तपासुनंच (किंवा इतर मार्गे) बॅलट वॅलिडेट करावं याकरता डेम्स विरोध का करत आहेत? >> सिरियस्ली? तू असे ऑफिषीयल स्टेटमेंट वाचलस का कुठे ? करा की कोणी नाही म्हटलय पण चार वर्षे मेल इन फ्रॉड आहे हे पुराव्याशिवाय बोंबलल्यावर एकदम हा पुळका का रे बाबा तर त तात्या नि त्याच्या पित्त्यांना ? तुझ्या आवडत्या चॅनेल वरची लिंक बघ
https://www.foxnews.com/politics/democrats-dominate-mail-in-ballot-reque...

दिलगिरी व्यक्त करु कि काय... >> दिलगिरी कशाला, मी हि सरळ्सोट विधान केले होते. तुला झोंबले का ? तसे असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो त्याबद्दल. ( करू का असे न विचारता) Happy

बरे झाले मी निवांत नेट्फ्लिक्स वर थोडा वेळ काहीतरी बघितले नि झोपलो.
नाहीतरी या सगळ्यात नविन काहीच नाही.
गेली ५० वर्षे निरनिराळ्या प्रकारचे राष्ट्राध्यक्ष झाले, कुणिही काहीहि केले तरी ज्याने त्याने तक्रार न करता आपले हित पहावे. तेव्हढी बुद्धि देवाने दिली आहे.

मेलइन बॅलटच्या सिग्नेचर वेरिफिकेशनला डेम्स ने विरोध केला नाहि , त्यात फ्रॉडला वाव नाहि, अन्सॉलिसिटेड बॅलट्सचं कार्पेट बांबिंग केलं जात नाहि इ. म्हणत असशील तर जरा वाचन वाढब, मग बोलु...

परत तू असे ऑफिषीयल स्टेटमेंट वाचलस का कुठे ? असेल तर लिंक दे. मला माहित नाही. कृपया सोशल मिडिया फोरवर्ड्स देऊ नकोस.

गुगल इट फॉर रिलेटेड न्युज. अँड यु एक्स्पेक्ट डेम्स टु रिलीज अ‍ॅन ऑफिशियल स्टेटमेंट ब्लॉकिंग सिग्नेचर वेरिफिकेशन विच इज ए प्रायमरी डिटरंट फॉर बॅलट हारवेस्टिंग? जीझ. कालच्या डिबेटमधे स्कोट्स नामिनेशन, लॉ अँड ऑर्डर एंडॉर्स्मेंट इ. वर बाय्डनचं बाणेदार उत्तर ऐकलंस ना?..

एनीवेज मंडळी, मी सुरुवातीच्या पोस्टमधे मांडलेल्या मुद्द्यांवर काहि सेंसिबल रिस्पाँस आला तर हि कालच्या डिबेट वरची चर्चा पुढे नेउया. अजुन एक-दोन मुद्दे आहेत, पण ते नंतर... Wink

अँड यु एक्स्पेक्ट डेम्स टु रिलीज अ‍ॅन ऑफिशियल स्टेटमेंट ब्लॉकिंग सिग्नेचर वेरिफिकेशन विच इज ए प्रायमरी डिटरंट फॉर बॅलट हारवेस्टिंग? जीझ. >> मग हा डेम चा स्टान्स आहे हे तू कशाच्या भरवशावर छातीठोकपणे ठासून सांगतोस ? 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' एव्हढे साधे सोपे सरळ आहे. जर कोणी तरी कुठे तरी असे म्हणाला असेल तर हा समस्त पार्टीचा स्टान्स ह्या न्यायाने सगळे तपासायचे का ? मुद्दा तू मांडला आहेस तेंव्हा प्रूफ द्यायची जबाबदारी तुझी आहे. मीवर लिंक दिली आहे कि हा मुद्दा एकदम तात्या ला का परत भयंकर कळीचा वाटायला का लागलाय हे दाखवायला.

>'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' एव्हढे साधे सोपे सरळ आहे.<<
हि घे क्लार्क काउंटि, वेगसच्या प्रायमरीजची बातमी. हा फार्मुला त्यांना नोव्हेंबर मधे वापरायचा आहे. आता त्या प्रायमरीत काय गोंधळ उडाला हे माहित नसेल तर गूगल कर. मग मेलइन बॅलटचा पाठपुरावा कुठला बाप करतंय हे समझेल, आणि त्याचं श्राद्ध हि घालता येईल...

Pages