अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रंप... पॉझीटिव्ह फॉर कोव्हिड-१९.. मार्केट गडगडले.. डिबेट वगैरे रद्द.. सगळ्या मॉडरेटर्सनी सुटकेचा निश्वास टाकला असेल.

खरंच आहे का पॉझिटिव्ह? की नवीन नाटक आहे? आणि असला तरी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि ब्लीचच्या मदतीने झटक्यात बरा होईल की! उगाच घाबरतात लोक!

तो हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन रोज दोन घोट घ्यायचाच ना?
आता मी कसा स्टाँग आहे आणि कसा झटक्यात बरा झालो आणि हा कोव्हिड कसा होक्स आहे अशा सुरस कहाण्या ऐकायला तयार रहा.

पेन्सने रॉचेस्टर मिनेसोटा येथील मेयो हॉस्पिटलमध्ये आला होता तेव्हासुद्धा मास्क घातला नव्हता. आता घालतो का पाहू.

आता बायडन म्हातारं हजारो दुकानांची लूटमार्/जाळपोळ , पोलिसांच्या गाड्यांची मोडतोड, साताठ खून, अब्जावधी टॅक्सपेयर डॉलर्सचं नुकसान करणार्‍या अँटिफा/बीएलेम चा निषेध करणार का?
बाई दवे सो-कॉल्ड 'व्हाईट सुप्रिमसिस्ट' प्राऊड बॉय्ज चा लीडर स्वतः लॅटिनो आहे. लिबरटांच्या मते त्यांना विरोध करणारा प्रत्येकजण व्हाईट सुप्रिमसिस्ट! पहा बुवा, रेप्सना मत द्याल तर तुम्हीसुद्धा व्हाईट सुप्रिमसिस्ट गणले जाल!

ट्रंपने व्हाईट सुप्रामिस्टचा निषेध केला. >> त्याला डिबेट च्या वेळी म्हणे प्राऊड बॉईज कोण ते माहित नव्हते ( त्याचेच मिनेसोटामधले शब्द) Lol

च्च च्च. असामी त्याला सांगितले होते पण त्याला पर्सन, वूमन, मॅन, कॅमेरा, टीव्ही शिवाय इतर काहीहि आठवत नाही.
त्याला बरेच काही काही सांगत असतात, पण लक्षात कोण ठेवतो?

>>बायडेन ला जी दोन मिनीटे दिली आहेत त्यात बोलायची काय गरज आहे.<<
हो, बरोबर आहे. परंतु ट्रंप बोलत असताना बाय्डन इंटर्जेक्ट करत होता ते वॉलेस आणि बाय्डनच्या चाहत्यांना मान्य आहे. आपला तो... Wink

>>ट्रंपने व्हाईट सुप्रामिस्टचा निषेध केला.<<
>> अब्जावधी टॅक्सपेयर डॉलर्सचं नुकसान करणार्‍या अँटिफा/बीएलेम चा निषेध करणार का?<<
असं कसं, फार-लेफ्ट ऑर्गनायझेशन्सनी लिबरल्सच्या नांवाखाली केलेली हिंसा - डझंट काउंट. पिरियड.

मंडळी, बरोबर ना... Proud

>>बायडेन ला जी दोन मिनीटे दिली आहेत त्यात बोलायची काय गरज आहे.<<
हो, बरोबर आहे. परंतु ट्रंप बोलत असताना बाय्डन इंटर्जेक्ट करत होता ते वॉलेस आणि बाय्डनच्या चाहत्यांना मान्य आहे. आपला तो... >>>

असेल, त्या त्या बाजूचे चाहतेच तेच म्हणणार. पण रूल दोघांना लावायचा आहे ना? मग काय अडचण आहे.

रुल बदलायची गरजंच का पडली आहे? मॉडरेटरने आपला जॉब नि:पक्षपात पाळुन केला, दोघांना इंटर्जेक्ट करतानाच ताबडतोब झापलं तर पुढे प्रश्नंच उद्भवणार नाहि. पण वॉलेसचा अजेंडा वेगळाच होता, आणि त्यात भर म्हणुन ट्रंप टिक्ट्ड हिम ऑफ बाय सेइंग धिस...

As much as I support right wing, आपल्या विरोधात सगळं जग कारस्थानं करून राह्यलंय (आपणच सत्तेत असताना), हा पावित्रा पटण्यासारखा नाहीये. तितकंच, दीवार लॉजिक (जाओ, पहले उस आदमी का साईन लेके आओ) पण तकलादू बचाव आहे.

केलीअ‍ॅन कॉनवे, अध्यक्ष, फर्स्ट लेडी.. आता गव्हर्नर ख्रिस्टी.. या सगळ्यात मला गव्हर्नर ख्रिस्टीची मरण्याची भिती जास्त वाटते.. फारच ओबीस आहे तो.. हा व्हायरस फार विचित्र आहे.. कोणाची बॉडी कशी रिअ‍ॅक्ट करेल व कोण मरेल याचा भरवसा नाही.. आतातरी अध्यक्षांनी डॉक्टरांचे ऐकावे. गेल्या शनिवारच्या सुप्रीम कोर्ट जजच्या नॉमिनेशन समारंभात हे सगळेच मास्कशिवाय आले होते.

मला हे सगळं नाटक वाटतंय. डिबेटमध्ये आपण बायडनची बोलती बंद करू तसंच तो senile असल्याचं प्रूव्ह करू अशी ट्रम्पला आशा होती. पण बायडनने त्याच्या समर्थकांनाही अपेक्षा नसेल इतकं बरं परफॉर्म केलं. त्यामुळे आता डिबेट्स नकोतच यासाठी हा सगळा बनाव वाटतोय. पेन्स कमला डिबेट पण रद्द झाली का?
करोनावर मी कशी मात केली आणि कसा गॉड माझ्या बाजूने आहे असं बोलून सिपंथी वोट्स घेणारे तो.
खरं तर याचीही गरज नाही. रेसिस्ट ट्रम्प समर्थक ट्रम्पला भरभरून मतं देणार आणि तो जिंकणार हे उघड असताना इतकं नाटक कशाला?

>> रेसिस्ट समर्थक ट्रंपला भरभरून मत देणार.

इथे ट्रंपला मत देतात म्हणून रेसिस्ट असा सरळसोपा फॉर्म्युला आहे का कुठली वेगळी कसोटी लावून त्यांना रेसिस्ट ठरवले जात आहे?
आणि हो, दोनदा ओबामा हाही भरभरून मते मिळवून निवडून आला. त्या दोन निवडणुकांच्या वेळी हे भरभरून असणारे रेसिस्ट लोक कुठे होते? रेसिज्मचे ट्रेनिंग घेत होते का?

इथल्या सिस्टिम्स इतक्या करप्ट असतील की सगळ्यांना मॅनेज करून ट्रंपला खोटं कोव्हिड पॉझिटीव्ह दाखवतील असं मला वाटत नाही. असल्या कन्स्पिरसी थिअरीज निरर्थक वाटतात.

ट्रंप ला मते देण्यासाठी अनेक कारणे आहेत. रेसिस्ट हे कारण नाही कारण बायडेन पण गोराच आहे.
न्यू यॉर्क, कॅलिफोर्निया इ देशात जास्तीत जास्त मते डेमोक्रॅट्स नाच मिळतात.
पण बरेच लोक शिकलेले नाहीत, म्हणून त्यांना काय वाटेल ते सांगून चिथावले जाते. ते बायडेनच्या लोकांना जमत नाही.
जे शिकलेले आहेत त्यांची कारणे इतर अनेक. धार्मिक कल्पनांचा पगडा अजून बर्‍याच लोकांच्या मनावर आहे, त्यांना LGBTQ, Gay, Abortion वगैरे प्रकार अजिबात मान्य नाहीत. या उलट डेमोक्रॅट्सना यांचा फारच पुळका आहे, काळ्यांचा सुद्धा.
डेमोक्रॅट्सना सगळ्या लोकांना फुकट वैद्यकीय मदत मिळावी असे वाटते,
जरी त्यांच्या येशूने गरीबांना मदत करा सांगितले असले तरी त्या बाबतीत रिपब्लिकन उदासिन आहेत. जरी त्यांच्या येशूने गरीबांना मदत करा सांगितले असले तरी त्या बाबतीत ते उदासिन आहेत कारण त्यांना असे वाटते की सगळे काही माझे मी केले, मग इतरांनी का करू नये, मी का माझे पैसे त्यांना द्यायचे? मी माझ्या टॅक्स मधले पैसे इतरांसाठी का खर्च करायचे?
असले काही काही बरेच आहे.
नि भारतात जसे कट्टर काँग्रेसवादी नि कट्टर भाजपा वाले आहेत, तसेच इथेहि. त्यामुळे मुद्दा कुठलाहि असो, प्रचार कुणिहि करो, ते त्यांच्या पक्षालाच मत देणार.

>>
जरी त्यांच्या येशूने गरीबांना मदत करा सांगितले असले तरी त्या बाबतीत रिपब्लिकन उदासिन आहेत. जरी त्यांच्या येशूने गरीबांना मदत करा सांगितले असले तरी त्या बाबतीत ते उदासिन आहेत कारण त्यांना असे वाटते की सगळे काही माझे मी केले, मग इतरांनी का करू नये, मी का माझे पैसे त्यांना द्यायचे? मी माझ्या टॅक्स मधले पैसे इतरांसाठी का खर्च करायचे?
असले काही काही बरेच आहे.
<<
येशू बिशू काय लाख सांगेल. पण एखादा माणूस आपले आरोग्य संभाळत असेल. आहार, व्यायाम सगळे व्यवस्थित विचार करून करत असेल तर तो निरोगी राहील. उलट एखादा माणूस बेजबाबदार वागत असेल. व्यायाम नाही, वाट्टेल ते फास्टफूड वगैरे खाणे असे करत असेल तर. त्याला व्याधी जडणार. आता सरकारने दुसर्‍या माणसाच्या सगळ्या महागड्या उपचारांवर पहिल्याच्या टॅक्स डॉलरवर करणे कितपत योग्य आहे? नैतिक आहे?

ज्या भारतीय वंशाच्या लोकांना ट्रम्पला सपोर्ट करायचं आहे त्यांनी ते करताना उगाच ट्रम्प भारतासाठी चांगला आहे वगैरे थापा मारू नयेत.
पहिल्या(बहुधा शेवटच्या) डिबेटमध्ये ट्रम्पने दोनदा भारताचा अपमान केलाय.

https://www.livemint.com/news/india/trump-biden-debate-india-references-...

अमेरिकेत मतदान करताना एखाद्या उमेदवाराची भारताविषयीची मतं विचारात घेतली जात नसावी / जाऊ नये. that’s not relevant.

ट्रंप मेला तर निवडणुकीचे काय होउ शकते? कारण माझ्यासारख्या मिलिअन्स ऑफ लोकांनी ऑलरेडी मतदान केले आहे. इथे कोणी अमेरिकन कॉन्स्टिट्युशनचा स्कॉलर आहे का जो यावर प्रकाश पाडु शकेल?

ट्रम्प चांगला ठणठणीत आहे. नवनवीन व्हिडियोज बनवून टाकतो आहे. त्याला जगातील बेस्ट मेडिकल केअर उपलब्ध आहे. तो काही मरत बिरत नाही.
In fact, तुम्ही जर अलीकडचा अमेरिकन प्रेसिडन्टसचा इतिहास पाहिलात तर निक्सननंतरचे सर्वच प्रेसिडन्ट हे दीर्घायुषीच आहेत. काय सिक्रेट अमृत पितात देव जाणे.

>>
`पहिल्या(बहुधा शेवटच्या) डिबेटमध्ये ट्रम्पने दोनदा भारताचा अपमान केलाय.
<<
भारतासाठी चांगला म्हणजे काय? भारताचे नाव काढताच परदेस मधल्या अमरीश पुरीसारखा गहिवरून जाणारा असे वाटले काय आपणास?

अहो तुलनेने चांगला. राजकीय दृष्ट्या चांगला. इस्लामी दहशतवादाला ठणकावून इस्लामी म्हणू शकणारा. चार वर्षात एकही नवे युद्ध न सुरू करणारा.
दुसरी बाजू कशी आहे? त्यांचे वैचारिक व्यासपीठ ज्या चांडाळ चौकडीच्या हातात आहे त्यातल्या दोघी इस्लामिक अपोलोजिस्ट आहेत. त्या
इस्लामी दहशतवाद इस्लामी नाहीच असा ओबामा स्टाईलचा हेका धरून आहेत. त्यांना शरिया परमप्रिय आहे. कश्मिर वगैरे मुद्द्यावर अशा विचारांचे लोक कुणाची बाजू घेतील हे ओळखणे अवघड नाही.
ज्या विषयात भारताविषयी निंदा करणारे ट्रंप बोलला ते दोन्ही विषय खरेच आहेत. कोविड भारतात अजूनही थैमान घालतोच आहे. आणि प्रदूषण ह्या क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. दिल्ली वगैरे भागात नोव्हेंबर, डिसेंबरमधे काय भयंकर प्रदूषण असते ते गेले चार पाच वर्षे दिसतेच आहे. बाकी ट्रक, बस वगैरे वाहने प्रचंड प्रमाणात काळा धूर सोडून वातावरण खराब करत असतात हे सर्वांनी अनुभवले आहे. तेव्हा तो काही चुकीचे बोलला नाही.

<<<आता सरकारने दुसर्‍या माणसाच्या सगळ्या महागड्या उपचारांवर पहिल्याच्या टॅक्स डॉलरवर करणे कितपत योग्य आहे? नैतिक आहे?>>
बरोबर आहे. नैतिक आहे की नाही महित नाही.
येशूने फक्त सर्वांवर प्रेम करा म्हंटले होते, पैसे द्या असे म्हंटले नव्हते. म्हणून इथे एकच पुरुष अनेक बायकांवर अन एकच बाई अनेक पुरुषांबर भरपूर प्रेम करतात, पैसे द्यावे लागत असतील तर मात्र विचार करतील.
खरे तर माझ्या करा मधून पोलीस, रस्ते बांधणी इ साठी का खर्च करावा? माझ्या घरी चोरी होणारच नाही, माझ्यावर कुणि हल्ला करतच नाही, गावातल्या कित्येक रस्त्यांवर मी कधीहि जात नाही - मग या गोष्टींसाठी तरी कर का द्यावा?

खाजगी आरोग्यविमा कंपन्या तेच करतात - एकाच्या पैशावर दुसर्‍याला मदत. त्यांना मुकाट्याने म्हणतील तेव्हढे पैसे देऊ.

<<<आरोग्य संभाळत असेल. आहार, व्यायाम सगळे व्यवस्थित विचार करून करत असेल तर तो निरोगी राहील. >>>
नक्कीच. अश्या लोकांना विमा तरी घ्यायची काय गरज आहे? म्हणूनच ओबामा ने सक्तीने विमा घ्या म्हंटले होते , ते आता काढून टाकले आहे.
कारण अश्या लोकांना अपघात झाला नि विमा नसेल तर भरपूर पैसे देऊन एक वकील करावा नि अपघात्तात चूक दुसर्‍याची होती म्हणून सिद्ध करून नुकसान भरपाई घ्यावी.
तेंव्हा विमा कंपन्यांचे शेअर घ्यायला, लठ्ठ फी घेणारा वकील करायला पैसे नसतील तर तो तुमचा दोष आहे. - अपंग असाल, पैसे कमावता येत नसतील तर मरून जा. बापाचा पत्ता नसेल नि आई जन्म देताना मेली म्हणून पोरके झालात तरी तुमच्या आरोग्याची काळजी आम्ही का घ्यावी?

ट्रंपसारख्या लोकांनी चॅरिटीज काढल्या होत्या, तश्या चॅरिटिज काढाव्यात लोकांनी, तिथे पैसे देऊ आम्ही.

तर असे वादविवाद कितीहि वेळ केले तरी काही फरक पडणार नाही. १० -१२ मिलियन डॉलरला एक या दराने कायदे करणारे लोक विकत घेतले जाऊ शकतात. तसे करावे नि आपल्याला हवे ते कायदे करून घ्यावेत. वादविवाद, नैतिकता, सभ्यता, योग्य, अयोग्य या सगळ्या फालतू गोष्टी आहेत, त्या राजकारणात नसतात.
म्हणून मी म्हणतो, बक्कळ म्हणजे बक्कळ पैसा कमवा नि नुस्ती मज्जा करा - बाकीच्या गोष्टी गेल्या खड्ड्यात. करमणूक म्हणून बर्‍या असतात मधून मधून. कुठल्याहि कायद्याचा तुम्हाला त्रास होणार नाही ट्रंपएव्हढे हुषार व्हा नि अगदी कमी कर द्या.

Pages