अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बुवा, इकॉनॉमी फेबपर्यंत होती बुमिंग. आता काय होणार माहीत नाही. आता तात्या सगळ्यांना सोशालिस्ट पद्धतीने पैसे वाटणार म्हणे.

बायडनची व्हीपी कोण असणार याची चर्चा आज डेम्स करत नाहीयेत. ते करोना वगैरे बिनमहत्वाचे विषय बोलत बसलेत. पण ट्रम्प समर्थकांना तो विषय इतका महत्वाचा का वाटतोय?
तसंही ट्रम्पच जिंकणार आहे.मग कोणि का असेना व्हीपी. हिलरीचा तो कोण एक बदाम गोटू रनिन्ग मेट होता त्याचं नाव तरी आठवतं का कोणाला आज?

ट्रंप आहे बेजबाबदार समजा. कोरोनाचा, आउटब्रेक होण्याआधी नाही त्याने काही कृती केली. पण मग विरोधी पक्ष काय झोपला होता का? त्यांचं कर्तव्य नाही दबाव आणणे? सगळं खापर ट्रंपवर सोडून निवांत.

>>ट्रंप वैयक्तिक आयुष्यात काय करतो याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तो एक राष्ट्रपती म्हणुन कसा आहे, किती खमका आहे, हे मला महत्वाचे वाटते.>>
कुठलाही नेता वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो त्याचे प्रतिबिंब त्याच्या सार्वजनिक आयुष्यावर पडतेच. शेवटी आडात असेल तर पोहोर्‍यात येणार. रहाता राहीला भाग खमकेपणाचा तर त्यात निर्णयांची पूर्ण जबाबदारी घेणेही येते. यश मिळाले की माझे एकट्याचे आणि अपयशाची चाहूल जरी लागली तरी लगेच इतरांकडे बोट दाखवून मोकळे होणे याला मी तरी खमकेपणा म्हणणार नाही. अशा वागण्याला काय म्हणतात ते 'आतुन' सगळ्यांनाच माहीत आहे.

>>बाकी सिटीझनशिप नव्हती तोवर ट्रंपचा राग यायचा कारण भीती. आता राग येत नाही. >.
तुम्ही इथे लिगली होतात तर मग भीती कसली? आता सिटीझन झाल्यावर लगेच भीतीही गेली आणि रागही गेला? सिटीझन झाल्याचा आनंद समजू शकते पण कागदोपत्री 'आतले' असणे आणि 'आतले' असल्याप्रमाणे वागणूक मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. वायरसला व्यवस्थित नाव असताना त्याला विशिष्ठ वंशाने संबोधणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर मग पुढल्यावेळी असेच काही निगेटिव तुमच्या वंशाशी निगडीत केल्यावर काय करायचे याचाही विचार करुन ठेवा.
बाकी इल्लिगली इथे कुणी येवू नये हा विचार योग्यच. मात्र इल्लिगली आलेले कोण हे वंशावरुन, बाह्यरुपावरुन नाही ठरवता येत. केवळ कॉकेशियस दिसत आहेत म्हणून 'आतले' किंवा लिगली इथे आलेले, हे चुकीचे अनुमान काढून वर दोन पिढ्या इथे राहीलेल्यांना 'बाहेरचे' म्हणून हेट क्राईमची झळ लागते तेव्हा तुम्हाला भीती वाटते का?

>ट्रंप आहे बेजबाबदार समजा. कोरोनाचा, आउटब्रेक होण्याआधी नाही त्याने काही कृती केली. पण मग विरोधी पक्ष काय झोपला होता का? त्यांचं कर्तव्य नाही दबाव आणणे? सगळं खापर ट्रंपवर सोडून निवांत.>
सामो,
कमांडर इन चिफ कडून काही अपेक्षा असतात, खास करुन आपत्तीकाळात. बेजबबदार समजा वगैरे हे विधान एक जबाबदार नागरीक म्हणून अजिबातच शोभत नाही. त्या शिवाय आधी जरा अमेरीकन लोकशाही कशी चालते ते समजून घ्या आणि मग विरोधी पक्षाकडे बोट दाखवा. सिटीझन झाला आहात तर फंक्शनिंग डेमॉक्रसीची अपेक्षा करा. शेवटी लोकशाहीत काय योग्य याचे भान जनतेनेच राखायचे.

इथे बिल क्लिंटन यांचा मुद्दा निघालाच आहे तर, तेव्हा इकॉनॉमी हॉट नसती तर त्यांनाही पायउतार व्हावे लागले असतेच. त्याशिवाय जेव्हा प्रकरण उघड झाले तेव्हा डेमोक्रॅट्सनी कडक शब्दात नाराजीही व्यक्त केली.

>>>>>>तुम्ही इथे लिगली होतात तर मग भीती कसली?>>>>>>> काही वैयक्तिक भीती नसू शकतात का? औषध व वैद्यकिय किंवा नोकरी संदर्भात?
>>>>>आता सिटीझन झाल्यावर लगेच भीतीही गेली आणि रागही गेला? >>>> हो गेला. काय करणार त्याबद्दल आता? बरच भावनिक स्वास्थ्य नागरीकत्व मिळण्यावर अवलंबून होते. त्याबद्दल फासावर जायचं का आता?
>>>> वायरसला व्यवस्थित नाव असताना त्याला विशिष्ठ वंशाने संबोधणे तुम्हाला योग्य वाटत असेल तर मग पुढल्यावेळी असेच काही निगेटिव तुमच्या वंशाशी निगडीत केल्यावर काय करायचे याचाही विचार करुन ठेवा.>>> चीन्यांबद्दल मला पुळका नाही.

>>>>>>>>त्या शिवाय आधी जरा अमेरीकन लोकशाही कशी चालते ते समजून घ्या आणि मग विरोधी पक्षाकडे बोट दाखवा. सिटीझन झाला आहात तर फंक्शनिंग डेमॉक्रसीची अपेक्षा करा. शेवटी लोकशाहीत काय योग्य याचे भान जनतेनेच राखायचे.>>>>>> विरोधी पक्षाचे कर्तव्य नाही- सत्ताधारी पक्षाला चूका दाखवुन देणे? इम्पिच करण्यात सगळी उर्जा खर्च केली ना. मग कोरोनाच्या वेळी आधीच सडकून टीका का नाही केली.
>>>>>>> 'बाहेरचे' म्हणून हेट क्राईमची झळ लागते तेव्हा तुम्हाला भीती वाटते का?>>>> भीती वाटून उपयोग आहे का? डेमोक्रॅटस आले की हेट क्राईम कमी होणारे का? त्यांनी काही तशी पावले उचलली असल्यास माझ्या वाचनात नाहीत. असल्यास सांगा.
__________________
असो कोणाला मत द्यायचे ते माझे ठरलेले आहे. चर्चेत शून्य रस आहे. तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे अमेरिकन लोकशाही कशी चालते याचे वाचन वाढवले पाहीजे. सुमार माहीती व आय क्यु आहे माझा (नाही खरच! उपरोध नाही. अर्थात गर्वही नाही.). माबोवर मी हुषार लोकांची मते ऐकून रेडीमेड स्पून फीडींग करुन घेण्यासाठीच येते. (अर्थात मी का येते त्यात तुम्हाला ना रस आहे ना .... हे माहीत आहे)_पुढे?

>>कोरोनाच्या वेळी आधीच सडकून टीका का नाही केली.>> केवळ सडकून टीका केल्याने काय साध्य होणार? त्यापेक्षा चर्चा करुन त्यानुसार प्लॅन मांडणे महत्वाचे. त्यादृष्टीने बिल्स मांडली जातच आहेत.
>>चीन्यांबद्दल मला पुळका नाही.>>
पुळका असण्याची गरजही नाही. आक्षेप आहे तो जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीच्या चुकीच्या शब्द प्रयोगाने विशिष्ठ वंशाच्या नागरीकांकडे विनाकारण बोट दाखवले जाते त्याला.
>>डेमोक्रॅटस आले की हेट क्राईम कमी होणारे का?>>
हे रिपब्लिकन-डेमॉक्रॅट्स असे नाही तर एक उच्च पदावरील व्यक्ती म्हणून आहे. ओबामा आणि बुश या दोघांच्या काळाशी तुलना करता परीस्थिती वाईट आहेच.

>>>विनाकारण बोट दाखवले जाते त्याला>>> ओके.
>>>>त्यादृष्टीने बिल्स मांडली जातच आहेत.>>> हे वाचायला हवे.
धन्यवाद स्वाती.

>>आधी जरा अमेरीकन लोकशाही कशी चालते ते समजून घ्या <<
मलाहि जाणुन घ्यायचं आहे अमेरिकन लोकशाहि तुमच्या मताप्रमाणे कशी चालते ते. प्लीज जरा विस्ताराने सांगा...

अमेरिकन प्रेसिडेंटने बेजबाबदार विधानं (अगदि आउट्रेजस कॅटेगोरीत मोडणारी) करु नये हा निकष असेल तर कुठुन सुरुवात करु ते सांगा - जेफरसन/लिंकन पासुन केली तर चालेल?..

ट्रम्प आल्यापासून आमच्या बॅकयार्डमधले डास पण एकाएकी फार वाढले. ओबामाच्या टायमाला नसायचे एवढे.

मलाहि जाणुन घ्यायचं आहे अमेरिकन लोकशाहि तुमच्या मताप्रमाणे कशी चालते ते. प्लीज जरा विस्ताराने सांगा...>>
राज ,
मी सामो यांच्या पोस्टला दिलेल्या उत्तरातला थोडासाच भाग का देताय? त्यांनी केलेले विधान वर आहे आणि त्याला मी दिलेले उत्तरही. मला काय म्हणायचे आहे ते मी तिथे मांडलेले आहे.

अमेरीकन प्रेसिंडेटने बेजबाबदार विधान करु नये ही माझी अपेक्षा आहे आणि एक स्वतंत्र मतदार म्हणून मला ती रास्तही वाटते. प्रेसिडेंटची पार्टी कुठलीही असली तरी माझी अपेक्षा तिच असणार. अमुक पार्टीच्या नेत्याने बेजबाबदार विधान केले म्हणून त्याचे सामान्यांवर होणारे परीणाम कमी असे नसते ना!

>>अमुक पार्टीच्या नेत्याने बेजबाबदार विधान केले म्हणून त्याचे सामान्यांवर होणारे परीणाम कमी असे नसते ना!<<
परिणाम तेंव्हा होतात जेंव्हा लोक ओवररिअ‍ॅक्ट होतात. सुदैवाने, यापुर्वि आणि आताहि अमेरिकन जनता अतिशय मचुअर असल्याने तसल्या विधानांचा परिणाम (काहिंच्या भाषेत पोलिटिकल माय्लेज) होत नाहि...

>>मी सामो यांच्या पोस्टला दिलेल्या उत्तरातला थोडासाच भाग का देताय?<<
तो भाग मी अ‍ॅड्रेस केलाय वरंच, जेफर्सन/लिंकनचं उदाहरण देऊन. तोच मुद्दा आहे ना तुमचा?..

तात्याला जरा चांगलं म्हणावे तर तेवढ्यात काहीतरी गोच्या करतो. उशीरा का होईना पण बरोबर स्टेप्स घेतल्या जात आहेत असे चित्र दिसू लागले आहे. इव्हन फॉक्स ने पेलोसीवर टीका न करता सगळे एकत्र काम करत आहेत वगैरे लिहायला सुरूवात केली आहे Wink ,म्हणजे एकदम सर्सी आणि डॅनी गळ्यात गळे घालून कोरोनारूपी नाइटकिंग विरूद्ध निघाल्या आहेत. पण तेव्हढ्यात तात्याने हे चायनीज व्हायरस चे काढले. त्याने तसे म्हणेपर्यंत जगात कोणीही या व्हायरसला तसे म्हणत नव्हते. एरव्ही उगाच पीसीपणा टाळणे ठीक आहे पण हे मुद्दाम उकरून काढल्यासारखे आहे. त्याने त्याला इलेक्टोरल फायदा काहीही नाही आणि उगाच चायनीज लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे.

@शेंडेनक्षत्र, grab them चा मुद्दा मी महिला अत्याचाराबद्दल लिहिला होता. बिल-मोनिका प्रकरण कितीही स्टुपिड असलं तरी ते परस्परसंमतीने घडलेलं होतं. Consent हा महत्वाचा फॅक्टर असतो.

बाकी आता तात्यांनी राश्यांतर करुन लेफ्ट राशीत सोशालिस्ट नक्षत्रात प्रवेश केलेला दिसतोय. सगळ्यांना पैसे वाटेन. कंपन्या बेल आउट करण्यासाठी त्यात सरकार इक्विटी घेईल. राष्ट्रीयीकरण, बिग गव्हर्नमेंट,फ्री मनी, हेल्थकेअर फॉर ऑल, ओबामा बेलआउट रिपिट, इत्यादी.
आणि समर्थक म्हणतायत वा वा वा.

अमेरिकन जनता अतिशय मचुअर>> हे सामान्य परीस्थितीत. जेव्हा आपण एक देश म्हणून आपत्तीला तोंड देत असतो तेव्हा नेत्याचे शब्द फार महत्वाचे असतात. जसे पॉझिटिव आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोकांतील चांगले भरभरुन बाहेर येते तसेच चुकीच्या शब्दाचा वापर आणि वाईट वर्तनही घडते.
बाकी माझा दुसरा मुद्दा- लोकशाही कशी चालते याबद्द्ल होता तो कमांडर इन चिफ असताना विरोधी पक्षाकडे बोट दाखवणे झाले म्हणून होता. अशा प्रकारच्या संकटात नेहमी एकत्र येवूनच काम करावे लागते आणि तसे ते केलेही जाते, मात्र शेवटी लिडर प्रेसिडेंट असतो, विरोधी पक्ष नाही.

>>> हे मुद्दाम उकरून काढल्यासारखे आहे. त्याने त्याला इलेक्टोरल फायदा काहीही नाही
नाही कसा? 'आम्ही आणि ते' या मथळ्याखाली नवनवीन गोष्टी अ‍ॅड करत गेलं की लोक खूष होतात - हा 'आमचा' माणूस म्हणून.

Yakzaktlee... वर चायनीज लोकांबद्दल पुळका नाही पोस्ट आलीच आहे. Sad

>>
@शेंडेनक्षत्र, grab them चा मुद्दा मी महिला अत्याचाराबद्दल लिहिला होता. बिल-मोनिका प्रकरण कितीही स्टुपिड असलं तरी ते परस्परसंमतीने घडलेलं होतं. Consent हा महत्वाचा फॅक्टर असतो.
>>
खाजगीत स्त्रीचा अश्लाघ्य भाषेत उल्लेख म्हणजे थेट महिलेवर अत्याचार? अजब आहे तर्क!! इथे त्या स्त्रीशी संबंध ठेवताना तिची संमती नव्हतीच असे कसे म्हणता येईल?

उच्चपदस्थाचे कनिष्ठ पदावरील कर्मचार्‍याशी लैंगिक संबंध ठेवणे हे कुठल्या खाजगी उद्योगात पूर्णतः, १००% निषिद्ध आहे. जर कुठल्या कंपनीतले Anti Harassment Training वगैरे अनुभवले असेल तर त्यात हे नि:संदिग्धपणे म्हटलेले असते. कारण इथे सत्तेचा, पदाचा गैरवापर हा गृहितच धरलेला असतो. संमती वगैरे असली तरी उच्चपदस्थ व्यक्तीकडे असलेली सत्ता आणि कनिष्ठ पदावर असणार्‍या व्यक्तीची मिंधेपण ह्यामुळे त्या संमतीतील असमतोल हा उघड दिसतो.
जर खाजगी उद्योगांचे हे धोरण असेल तर सरकारी संस्थेचे का नसावे?

>>बाकी माझा दुसरा मुद्दा....<<
सध्याच्या या पॅडेमिक्स सिचुएशन मधे ट्रंप ब्लेमगेम खेळतोय हा तुमचा मुद्दा आहे का? "चायनीज व्हायरस" म्हणुन त्याने चायना वर ठपका ठेवला आहे, विच इज एंटायरली नॉट अनट्रु. विरोधी पक्षाच्या पोलिटिसाइझ करण्याच्या प्रयत्नाला त्याने हाणुन पाडणे हे प्रेसिडेंशियल आहे. कि त्यालाच ब्लेमगेम म्हणतांय? डेम्सची या आउटब्रेक नंतर दिसलेली कामगिरी (आयॅम ग्लॅड टु सी कुमो फॉलिंग इन लाइन) अशीच अमेरिकन लोकशाहि तुम्हाला अपेक्षित आहे का?..

>>सध्याच्या या पॅडेमिक्स सिचुएशन मधे ट्रंप ब्लेमगेम खेळतोय हा तुमचा मुद्दा आहे का? "चायनीज व्हायरस" म्हणुन त्याने चायना वर ठपका ठेवला आहे, विच इज एंटायरली नॉट अनट्रु. >>
ब्लेम गेम नाही, असंवेदनशिलता ! चायना वर ठपका असे मी म्हटलेले नाही, अमेरीकेतील चायनिज वंशाच्या, किंवा तशा दिसणार्‍या लोकांबद्दल मी बोलतेय. चीन देशाचा मुद्दा कुठून आला? Uhoh
प्रसंगी देशाच्या हिताच्या निर्णयात बायपार्टिसन पार्टनरशिप करणारी अमेरीकन डेमॉक्रसी मला अपेक्षित आहे. याआधीही बर्‍याच प्रसंगी अशी पार्टनरशिप झाली होतीच. प्रेसिडेशिअल कॅंडीडेट म्हणून विरोधी पक्षाच्या प्रयत्नांना हाणून जरुर पाडावे, ती रणनीती झाली पण त्याचवेळी आपण 'सगळ्या ' देशाचे कमांडर इन चिफ आहोत हे भान कायम हवे.

चीन देशाचा मुद्दा कुठून आला? >>>>
थोडक्यात तुम्हाला त्या विधानाचा संदर्भ माहित देखिल नाही. 'चीनने वुहानचे खापर यु एस मिलिटरीवर फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून मी मुद्दाम चायनीज व्हायरस असा उल्लेख केला', असं खुद्द ट्रंप म्हणतोय. चायनीज = चीन देशातून आलेला व्हायरस, यात चिनी वंशीय नागरिकांचा काडीचाही संबंध नाही. पण लिबरल मिडियाने मुद्दम त्याला वांशिक स्पिन दिला, आणि सि एन एन, एमेसएनबीसी यांच्यासारख्या स्कँडल शीट्स वचून मत बनवणारे गलिबल लिबरल व्होटर्स ते खरं मानताहेत.
अँड दे लाफ अ‍ॅट फॉक्स व्ह्युअर्स.

बिल-मोनिका प्रकरण कितीही स्टुपिड असलं तरी ते परस्परसंमतीने घडलेलं होतं. Rofl Rofl Rofl

हिलरीकाकूंची पण सहमती होती बरं!

उद्या कुणी वाईनस्टाईन प्रकरण परस्परसंमतीने घडलेलं होतं म्हटलं नाही म्हणजे मिळवली!!

>>आपण 'सगळ्या ' देशाचे कमांडर इन चिफ आहोत हे भान कायम हवे.<<
बिंगो! आता या सिचुएशन मधे कमांडर-इन-चिफ या अधिकारात ट्रंपने कुठली लाइन क्रॉस केली हे सांगु शकाल का? अमेरिका फर्स्ट हे तर त्याचं सुरुवाती पासुनचं धोरण आहे. ती फ्रेज ट्रंपने ग्रँड स्किम ऑफ थिंग्जच्या अर्थाने वापरली तर इथल्या चायनीज सदृश दिसणार्‍या नागरिकांना त्याचा उपद्रव होइल अशी भिती बाळगतांय? हटकेश्वर, हटकेश्वर...

>>तुम्हाला त्या विधानाचा संदर्भ माहित देखिल नाही. 'चीनने वुहानचे खापर यु एस मिलिटरीवर फोडण्याचा प्रयत्न केला म्हणून मी मुद्दाम चायनीज व्हायरस असा उल्लेख केला', असं खुद्द ट्रंप म्हणतोय.>>
हे स्पष्तीकरण आता उशीरा आलेले. तो संदर्भ मला माहीत नाही असे तुम्ही समजून चालताय. ब्रिफिंगचा फोटो दिलाय ना! त्यात आहे की शब्द खोडलेले.
https://www.cnn.com/world/live-news/coronavirus-outbreak-03-19-20-intl-h...

>>> हे मुद्दाम उकरून काढल्यासारखे आहे. त्याने त्याला इलेक्टोरल फायदा काहीही नाही
नाही कसा? 'आम्ही आणि ते' या मथळ्याखाली नवनवीन गोष्टी अ‍ॅड करत गेलं की लोक खूष होतात - हा 'आमचा' माणूस म्हणून.>>>>> अगदी तेच लिहणार होतो. हे असली विधानं केली की मग लोकांना “ट्रंप जस्सं आहे तस्सं बोलतो बाई अगदी“ ही पुंगाटबाजी करायला निमित्त मिळतं.

बिंगो! आता या सिचुएशन मधे कमांडर-इन-चिफ या अधिकारात ट्रंपने कुठली लाइन क्रॉस केली हे सांगु शकाल का? अमेरिका फर्स्ट हे तर त्याचं सुरुवाती पासुनचं धोरण आहे. ती फ्रेज ट्रंपने ग्रँड स्किम ऑफ थिंग्जच्या अर्थाने वापरली तर इथल्या चायनीज सदृश दिसणार्‍या नागरिकांना त्याचा उपद्रव होइल अशी भिती बाळगतांय? हटकेश्वर, हटकेश्वर...>>>>>>>>> This is something I wanted to tackle for a while. I too was stumped a bit when I tried to think why his constant name calling felt wrong. It’s beyond just being unpresidential. It shows what your priority is. Presidents who choose to not to use these situations as opportunities to bash are not just being decent or diplomatic but are demonstrating they understand the issue is precisely not that (virus being from China) at that moment. A responsible and mature person will know that the bigger issue at hand is to do something about this crisis. Bashing China is going to do what? Prevent future occurrences? And what does calling China out have anything to do with America first?
Also, he has not used that term to describe the grand scheme of things. He knows exactly what he is doing. The funny part here is his followers are eating up this trivial shit from the palm of his hand. Honestly, I am not against Trump. He is a product of this crazy time and situation. He is just saying out loudly what plenty of American citizens routinely think.
Finally, about worrying for people of Chinese descent. Why shouldn’t a president think more before he/she makes a statement? If his statements are somehow resonating with racist people and if that results in harming anyone, why not? He may not identify himself with them but a lot of far right groups have voiced support and liking to Trump. He knows this but he will not acknowledge it. He will shamelessly use whatever support he will get from whoever irrespective of what they stand for.

कुणीही ढुढ्ढाचार्य सर्वज्ञानी असल्याचा आव आणून चीनी व्हायरस असे म्हणणे कसे मुत्सद्दीपणाला धरून नाही आणि त्यातून अमेरिकेतील चिनी व चिनी दिसणार्‍या लोकांचा नरसंहार कसा सुरु होऊ शकतो वगैरे लेख पाडतात.
जर हा रोग चीनमधे जन्मला आणि फोफावला आणि चीनने अनेक प्रकारे हा रोग लपवायचा प्रयत्न केला आणि आता चोराच्या उलट बोंबा म्हणून अमेरिकेला दोष देत असेल तर प्रतिहल्ला करणे चूक कसे?
ट्रंप अमुक म्हणाला आता अमेरिकेतील अल्पसंख्य मोठ्या प्रमाणात मारले जाणार वगैरे छातीठोक भाकिते पूर्वीही ऐकली आहेत. असे काहीही घडलेले नाही. जे काही तुरळक वंशद्वेष्टे हल्ले झाले ते पूर्वीही होतच होते. ट्रंपमुळे त्यात प्रचंड वाढ झाली असे मला तरी दिसलेले नाही. त्यामुळे ट्रंप चिनी व्हायरस म्हणाला म्हणून लगेच तमाम बिगर चिनी अमेरिकन चिनी अमेरिकन्सचे गळे घोटू लागतील हा बिनडोक निष्कर्ष आहे.

त्याचं काय आहे, स्पाइनलेस नेतृत्वाचा हँगओवर इतका जबरदस्त आहे कि पोलिटिकल करेक्ट बोलणं म्हणजेच प्रेसिडेंशियल अशी काहिंची धारणा झालेली आहे. त्यामुळे ट्रंपचा रोखठोकपणा अशांना झेपणार नाहि. मुसलमान टेररिस्टने तुमच्या घरासमोर बाँब फोडला तरी त्याला "रॅडिकल इस्लाम" म्हणायला यांची तंतरते, यांना ट्रंपचं प्रेसिडेंशियल डिमिनर अवाक करणारंच...

शिवाय चायनीज अमेरिकन लोकांचा त्या कामेंटवर कुठेहि उद्रेक झालेला दिसला नाहि. मिडिया आणि काहि नमुने सालाबाद प्रमाणे "बेगानी शादि मे..." होण्याची धडपड करताना दिसत आहेत. चालायचंच, अपनी अपनी सोच...

कसं आहे शेंडे, कदाचित तुमच्या आप्तांवर किंवा मुलांवर अजून असलं काही शेकलेलं नाही म्हणून तुम्हाला खुर्चीत बसून हे ट्रिवियलाईज करायला काही जात नाही. अमेरिकेतला वर्णद्वेष हा पुर्णपणे आजिबातच गेलेला नाही हे आपण सगळेच जाणतो. ट्रंप आल्या पासून व्हईट प्रिविलेज वाल्यांना खुप जोर आलेला आहे. इथे जन्माला आलेल्या ब्राउन स्किन मुलांना तुमच्या देशात परत जा हे असले शेरे, थ्रेट्स येतात तेव्हा त्या क्लियरली ह्या ट्रंपच्या असल्या विधानांमुळे प्रोत्साहन मिळाल्यामुळेच येतात. लगेच कत्तल वगैरे होत नाही लोकांची पण काही लोकांना जरी त्रास होत असेल, हानी होऊ शकेल आणि त्या विधानांनी खरं तर पॉलिसी मध्ये काहीच फरक पडत नसेल तर काय फायदा आहे हे बोलायचा?
फायदा आहे -- तो म्हणजे आपण काहीतरी रॅडिकल करतोय जे आधीच्या स्पाईनलेस नेतृत्वाला आजिबातच जमलेलं नाही हे भासवणं. मग फक्त असली शेरेबाजी करणे म्हणजे खुपच खमका आणि जबरदस्त असणे असा बाळबोध समज असलेले लोकं त्याला वा वा करत मतं देतात. एखादा माणूस बोलायला फटकळ असणे आपण समजू शकतो पण त्याच्या कामामध्ये तरबेज असेल तर ते पण चालून जातं. इथे म्हणजे नुसतीच हवा अन बिन्बुडाचे वाट्टेल ते इन्फ्लेटेड क्लेम्स. माझ्यामुळे हरभरा टारारून वर. Lol

ट्रंप आल्या पासून व्हईट प्रिविलेज वाल्यांना खुप जोर आलेला आहे. >>

यांचे पूर्वज ५०० वर्षापूर्वी युरोपातून आले. ते इलिगलीच आले. जगभरात युरोपियन्सनी आजार नेले. जिथे जिथे हल्ला करायला (याला 'सेटल' करायला असं गोंडस नाव दिलंय) गेले तिथे तिथे या सेटलर्स उर्फ इलिगल हल्लेखोरांमुळे स्थानिक लोकसंख्येत ते रोग पसरले. या रोगांची इम्युनिटी स्थानिकांमध्ये नसल्यामुळे त्यांचे मृत्यु होत गेले. हा पॅटर्न लक्षात आल्यावर मुद्दामहून रोग पसरवले गेले. अर्ली बायोलॉजिकल वॉरफेअर. अगदी मूळ अमेरिकन्सना ब्लँकेट्स देऊ करणं पण ती स्मॉल पॉक्सने इन्फेक्टेड ब्लँकेट्स मुद्दाम देणं असे प्रकार झाले. मला नक्की आठवत नाही पण बहुधा गन्स, जर्म्स अँड स्टील मध्ये सविस्तर आहे. सेपियन्स मध्येही काहीतरी आहे.

त्यामुळे जगाच्या इतिहासात जणू काही पहिल्यांदाच काही संसर्गजन्य रोग आलाय आणि तो 'चायनिज' आहे हा व्हाईट सुप्रिमसीवाल्यांचा माज खटकतोय.

Pages