अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गेम ओवर, अपॅरंटली?

ओह बाय्दवे, कॅन समबडि चेक ऑन तुल्सी व्हॉट शी इज अप्टु? आय थिंक शी इज बूटेड आउट फ्रॉम नेक्स्ट डिबेट... Proud

> असे तुम्हाला का वाटते >
एक किंवा अनेक व्यक्तींनी स्वतःच्या शरीराबद्दल, आयुष्य जगायच्या पद्धतीबद्दल घेतलेल्या निर्णयाला, इतर समाजाने आपल्या स्वघोषित उच्चनीतिमत्तेने गुन्हेगारी घोषित करणे/करायचा प्रयत्न करणे-> हा प्रकार इथे होतोय म्हणून.

त्या व्यक्तीने किंवा समूहाने कोणत्या परिस्थितीत, काय विचार करून, इतर बाह्य दबाव नसताना हा निर्णय घेतला आहे का हे माहीत नसताना, ती परिस्थिती बदलण्यासाठी काही सोल्युशन ऑफर करू शकत नसताना, संख्याबळाचा वापर करून एका अम्ब्रेला कायद्याखाली सगळ्यांना गुन्हेगार ठरवणे चूक आहे.

एकेक क्रमाने बघू
• गर्भपात - समजा एक २६ आठवडे गर्भार बाई डॉक्टर कडे आली मुल नकोय म्हणून. समाजाला इथे आपली नितिमत्ताफुटपट्टी लावायची असेल तर आधी त्याने आपल्या पैशातून अशी सोय करावी की त्या बाईच्या राहण्या-खाण्या-औषधोपचाराची सोय उरलेला गर्भार+रिकव्हरी काळ होईल, त्या जन्मलेल्या बाळाची इतर कोणीतरी भविष्यात सांभाळायची सोय होईल आणि मगच गर्भपातावर आक्षेप घ्यावा; जर नवीन जन्मलेल्या बाळामध्ये समाजाचा स्टेक असेल तर. यापैकी काहीही करत नसताना नक्की कोणत्या पायावर गर्भपाताला आक्षेप घेतला जातोय, किंवा बंदी घातली जातीय?

• इन्सेस्ट - यातून जन्मणारी मुलं शारीरिकमानसिक विकलांग असायची शक्यता जास्त म्हणून आक्षेप असेल तर इतर नॉनइन्सेस्ट नात्यातून जन्मणाऱ्या विकलान्ग मुलांचं काय? जर विकलांग मुलं हाच प्रश्न असेल तर त्यावर गर्भावस्थेत ते शोधून मुल अबोर्ट करणे हा जास्त योग्य उपाय आहे.
पालकमुलं वयातला फरक, लेव्हल प्लेयिंग ग्राउंड, ग्रुमिंग वगैरे मुद्दे बरोबर आहेत. पणहेच सगळे मुद्दे असूनही वूडी ऍलन आणि सु की परवीन यांचे लग्न गुन्हा ठरत नाहीय! त्याचं काय? वयात भरपूर फरक असून लंचबॉक्स ही छानछान प्रेमकथा समजली जातीय.
तेच Patrick Stuebing आणि Susan Karolewski हे भाऊबहीण, वयात फरक नाहीय, एकत्र वाढले नाहीयत तरी ते गुन्हेगार ठरताहेत.
म्हणजे प्रश्न रक्तनात्याचा नसून वयातील फरकाचा आहे तर मग त्यालाच आक्षेप घ्याव ना!

• समलैंगिकता, पोलिग्मी/अँड्री, ग्रुप लग्न - एक पुरुष आणि एक स्त्री सेक्स-मोनोग्मी-पुनरुत्पादन या पायावर एकत्र आले आणि त्याला कुटुंब म्हणून समाजमान्यता मिळाली. मला वाटतं हा 'पाया' काढून टाकून कुटुंबाची व्याख्या बदलायची वेळ आलीय. एकमेकांवर आर्थिक अवलंबून असलेला + एकत्र मुलं वाढवणारा लोकांचा समूह म्हणजे कुटुंब. म्हणजे मग या व्याख्येत एक समलैगिक भाऊ, त्याची बायलैगिक बहीण, त्याचं सरोगसीतून झालेलं मुलं, तिचं वन नाईट स्टॅन्डमधून झालेल मुलं हेदेखील सरकारी दृष्टीने कुटुंबच असेल आणि सध्याच्या 'लग्न' किंवा सिव्हिल युनियन कायद्यातून ज्या सोयी सुविधा सध्याच्या कुटुंबाना मिळताहेत त्याच यांनादेखील मिळतील. समलैंगिकता, पोलिग्मी/अँड्री, ग्रुप लग्न देखील यातूनच कव्हर होतील.

महिला आणि बाकी अल्पसंख्यांच्या हक्काबाबत जागरुक असणारे डेमोक्रॅट तुलसीला इतकी वाईट वागणूक देत आहेत की खरे वाटणार नाही.
ऐनवेळी डिबेटचे नियम बदलून तिला चर्चेतून वगळण्यात आले.
कदाचित ती एकमेव अशी उमेदवार आहे जिचे डोके ठिकाणावर आहे म्हणून असा सापत्न भाव दाखवला जात आहे!
असो. बायडन ट्रंपला पुन्हा निवडून देणार असे ठामपणे सांगत असेल तर त्याचे स्वागत आहे. पण आपण असे म्हणालो हे त्याला उद्या आठवेलच ह्याची काय खात्री? असो.

>>कदाचित ती एकमेव अशी उमेदवार आहे जिचे डोके ठिकाणावर आहे म्हणून असा सापत्न भाव दाखवला जात आहे!<<
याबाबत काहि भाष्य करण्या इतका माझा अभ्यास नाहि. तरिहि, आजतोवर तिला मिळालेला सपोर्ट पहाता - जीझ, शी नीड्स टु रिप दि बँड-एड ऑफ नाव...

रक्तनात्याचा नसून वयातील फरकाचा आहे तर मग त्यालाच आक्षेप घ्याव ना! ---- अवघड आहे जर वयाचा प्रश्न हाच प्रॉब्लेम आहे असे वाटतं असेल तर, बापरे!

>>
रक्तनात्याचा नसून वयातील फरकाचा आहे तर मग त्यालाच आक्षेप घ्याव ना! ---- अवघड आहे जर वयाचा प्रश्न हाच प्रॉब्लेम आहे असे वाटतं असेल तर, बापरे!
>>
वैयक्तिक संस्कार वगैरे गोष्टी असल्यामुळे अशा गोष्टी सर्रास होतील अशी भीती मला तरी वाटत नाही. पण कायद्याने ह्यावर बंदी घालणे पटत नाही. जर लग्न एक स्त्री आणि एक पुरुष ह्यांचेच होते ही कल्पना कालबाह्य झाली म्हणून काही सगळे पुरुष दुसरा पुरुष जोडीदार निवडत नाहीत. पण कायद्याने अशा गोष्टीत दखल देऊ नये. धर्माचा दाखला देऊन अशा गोष्टींना मान्यता देऊ नये.
संततीचा प्रश्न असेल तर एखादे जोडपे आम्ही एखादे बालक दत्तक घेऊ असे ठरवू शकते. किंवा मूल होऊ देणारच नाही असेही ठरवू शकते.

एक अधोगामी म्हणून ट्रंप आणि इव्हांकाचे तसे काही नसेल असे मी समजतो. अशी खात्री बाळगतो. पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे गेलेल्या पुरोगाम्यांना असे काही असेल तर आक्षेप घेण्याचा काय नैतिक अधिकार आहे? असो.

आ.रा.रा., मायबोलीवर किती वर्षं आहात? धागा कशावर आहे त्याचा काय संबंध?! Proud

काही गरज नसताना ट्रंपचा आपल्या मुलीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा वाईट आहे हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला म्हणून चर्चेला वेगळे वळण मिळाले. माझ्या बाजूने यापुढे ह्या विषयाची चर्चा होणार नाही.

लैंगिकता जर आपल्या जगण्याचा भाग आहे तर त्या संबंधीत चर्चा इलेक्शनच्या धाग्यावर का नसावी?
अमेरीकेत अध्यक्षिय निवडणूक ही सिप्रीम कोर्टाचे जज देखील ठरवते. त्यांचे निवाडे हे जगणे बदलतात. गर्भपात, प्रजननसंस्थेचे आरोग्य आणि त्यासंबंधीत विम्याचे मुद्दे, LGBTQ, सॅनिटरी प्रॉडक्ट्स वरील टॅक्स, पेड मॅटर्निटी लिव वगैरे अनेक बाबी यात येतील.

रहाता राहीला मुद्दा ट्रंप यांनी केलेल्या वक्तव्याचा तर माझ्यामते इतर कुठल्यातरी गंभीर/अडचणीत आणणार्‍या मुद्द्यावरुन लक्ष घालवण्यासठी अशी प्रक्षोभक विधाने करणे हे ते मुद्दाम करतात.

मी एक स्वतंत्र मतदार आहे. आमचे स्टेट निळे अपवादानेच होते. त्यामुळे तसेही माझ्या मताला फार किंमत आहे अशातला भाग नाही. मात्र आमच्या भागाचा विचार करता ना आश्वासन दिले गेले तश्या नोकर्‍या आल्या ना अमेरीका ग्रेट वाटावे असे काही झाले. भिंतीसाठी पैसा पेंटॅगॉन मधून गेला, मेक्सिकोने दिला नाही. प्रत्येकवेळी इमर्जन्सी ज्या पद्धतीने हाताळली गेली ते निराश करणारे.
स्थानिक पातळीवर मी माझ्या चांगल्या डेमॉक्रॅटिक शेजार्‍या ऐवजी रिपब्लिकन उमेदवाराला पुन्हा निवडले कारण माझ्या गावाच्या प्रगतीसाठी ती व्यक्ती योग्य होती. याच न्यायाने ट्रंप यांना दुसरी टर्म का द्यावी हे कुणी इथे मांडेल का?

स्वाती तुम्ही जो ' लहानपणीच्या मॅनिप्युलेशनचा' मुद्दा मांडलेला आहे त्याचे खंडन माझ्याकडे आहे पण इथेच थांंबते आहे कारण काहींच्या मते इन्सेस्ट या विषयामुळे चर्चा डिरेल होते आहे.

२०१६ साली जर ट्रंप निवडून आला तर वॉल स्ट्रीटवर भूकंप आल्यासारखी पडापड होईल. ब्रेक्सिट मुळे जसे ब्रिटनच्या/लंडनच्या स्टॉक एक्स्चेंजमधे मोठी घसरण झाली तसे काहीतरी होईल असे भाकित काही अभ्यासक मांडत होते. ते तर झाले नाहीच. उलट बहुतांश काळ बाजार विक्रमी उंचीवर होता. ह्या सगळ्या उधाणाबद्दल ट्रंपला श्रेय देणार नसलात तरी निदान अभ्यासकांच्या अंदाजाप्रमाणे वाटोळे तर नक्कीच नाही केले.
बेकारी गेल्या काही दशकातील नीचांकावर आहे. ट्रंपने परकीय देशांतून सैनिक काढून घेतले आहेत. चिरंतन काळ चालणारी खर्चिक युद्धे कितीतरी कमी केली आहेत. ज्या देशांना अमेरिका संरक्षण पुरवते त्यांच्याकडून योग्य ती किंमत वसूल करण्याचा करदात्यांच्या हिताचा निर्णय ट्रंपने घेतला आहे. अनेक अतिरेकी लोकांचा निकाल लावला आहे. (इराणच्या सेनापतीला मारले तेव्हा आता ट्रंपमुळे तिसरे महायुद्ध होणार वगैरे भाकिते छातीठोकपणे मांडली गेली. पण तसे काही घडले नाही. घडणार नव्हतेच!)
दुसर्या बाजूकडे काय आहे? ट्रंप हा एक नंबरचा शत्रू आहे. त्याचा नायनाट करायचा. मग त्याकरता अर्थव्यवस्था ओलिस ठेवली तरी हरकत नाही. बेकायदा घुसखोरांना पूजनीय मानायचे. त्यांनी गुन्हे केले तरी पाठीशी घालायचे. फार तर बारिकसारिक शिक्षा करायची. बहुतेक भारतीय व्यक्ती ह्या ५, १ ०, १५ वर्षे एच १, ग्रीन कार्ड, नागरिकत्व वगैरे प्रकारात घालवतात. सगळे नियम काटेकोरपणे पाळूनही अशा उच्चशिक्षित लोकांचे अर्ज फेटाळले जातात. असे असताना बेकायदा घुसखोरांना मात्र पायघड्या. ही विसंगती भारतीयांना तरी खटकली पाहिजे असे मला वाटते. पण काही कारणाने तसे होत नाही. ट्रंप ह्याबाबतीत योग्य बाजूला आहे असे माझे मत.

ट्रंपने भिंत बांधायचे अनेक प्रयत्न केले. पण डेमोक्रॅट लोकांनी शक्य तितका विरोध केला. हाउस, कोर्ट सगळे वापरुन त्याला थोपवले गेले. मग त्याने संरक्षण विभागाचा पैसा वापरला. मेक्सिको पैसे देणार हा एक जुमला होता. लोकांना खुश करायला. व्यक्तिशः मला त्यात दम वाटत नव्हता. पण निदान बेकायदा घुसखोरी थांबवण्याकरता भिंत बांधली पाहिजे इतके ठणठणीत म्हणणारा कुणीतरी अध्यक्ष आहे हे मला आवडते. त्यातील १०% भिंत बांधली गेली तरी मला आनंद आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाने गेले काही वर्षे जे उद्योग चालवले आहेत ते बघता त्यांना मत का द्यायचे असा प्रश्न पडतो. निव्वळ ट्रंपद्वेष बाकी काही नाही. काँग्रेसच्या कामगिरीवर अमेरिकेतील प्रत्येक चार व्यक्तीमागे जेमतेम एक व्यक्ती समाधानी आहे.

कुणीही डेमोक्रॅट सत्तेवर आला तर तो वा ती कर वाढवणार ही काळ्ञा दगडावरची रेघ आहे. बर्नी आला तर काय विचारू नका!

इतकी कारणे निवड करायला पुरेशी आहेत.

>>याच न्यायाने ट्रंप यांना दुसरी टर्म का द्यावी हे कुणी इथे मांडेल का?<<
वर शेंन यांनी चांगला आढावा घेतला अहे, त्यावर माझे २ सेंट्स -

१. ट्रंप काय बोलतो, ट्विट करतो याकडे सोयिस्कर रित्या कानाडोळा करायला शिकलं पाहिजे. सो लाँग अ‍ॅज इट डझंट हर्ट, लाँग टर्म... Wink
२. डुड इज रिसोर्सफुल. रॉडमनचा उपयोग ट्रंपने केला कि नाहि हा वादाचा (किंवा गमतीचा) विषय होउ शकतो, बट दि बॉटम लाइन इज - ट्रंप हॅज पुट किम जांग-अन ऑन लिश, टु ए सर्टन एक्स्टेंट..
३. इराणच्या सोलेमानीचा वध. अमेरिका डोंट लेट एनीमी ऑफ दि स्टेट गो स्कॉट फ्री. एमिनंट थ्रेट इज रिस्पांडेड विथ मिलिटरी अ‍ॅक्शन. ओसामाला मारायला ओबामांनी जवळजवळ वर्ष घेतलं होतं, आणि क्लिंटन साहेबांनी केवळ लिप सर्विस बजावली - युएसएस कोल हल्ल्याच्या वेळी. यात नवल अजिबात नाहि, कारण हाच डेम्सचा डिएनए आहे.
४. डाव जोन्स जर एकनामिकल ग्रोथचा इंडिकेटर धरला तर '१५ मधे जो १६-१७००० च्या आसपास घुटमळत होता तो आज २५००० च्या घरात आहे. गो फिगर...
५. भिंतीच्या बाबतीत ट्रंप प्रशासनाने थोडं सौम्य धोरण अवलंबलं असं वाटतंय. बट गेस व्हॉट, नाफ्टा (न्यु) अग्रीमेंट इज ए झिरो सम गेम, फेवरिंग अमेरिका.

आणि ट्रंपचे विरोधी उमेदवार कोण, तर बर्नी आणि जो. पहिला डेसोचा पुरस्कर्ता, सरकारी तिजोरी रिकामी करुन देशाला भिकेला लावणारा, अणि दुसरा - ज्याची वॉर, एकनामिक पॉलिसी, हेल्थकेर, क्लायमेट चेंजबाबतची धोरणं अगदि ट्रंपच्या तुलनेतहि रिग्रेसीव. हटकेश्वर, हटकेश्वर... (झक्कि, यु लिसनिंग?)

मग योग्य उमेदवार (लेसर ऑफ टु इविल) कोण, हे सांगा बरं... Proud

सध्या जग एकूणात हवालदिल झालं असलं तरी तात्या व समर्थक खुशीत दिसत आहेत. बॉर्डर्स क्लोज करणे व त्याला विरोध न होणे, चायना खलनायक असणे, कदाचित निवडणूक होऊ न शकणे- whats not to like! रिसेशन झालं तरी बरंच कारण त्यामुळे इमिग्रेशन आपोआप कमी होईल.
बाकी pandemic ची चिंता करायचं कारण नाही कारण मीडियाने उगाच अफवा उठवल्या आहेत, एप्रिलमध्ये जादू झाल्यासारखा गायब होणार आहे आणि तात्या लव्हज धिस स्टफ, ही रियली गेट्स इट.

ट्रंप वैयक्तिक आयुष्यात काय करतो याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तो एक राष्ट्रपती म्हणुन कसा आहे, किती खमका आहे, हे मला महत्वाचे वाटते. बर्नी चॅरीटी इन्स्टिट्युट करतोय देशाची, काश्मीर प्रश्नात ढवळाढवळ करतोय. बाकी सिटीझनशिप नव्हती तोवर ट्रंपचा राग यायचा कारण भीती. आता राग येत नाही. हाच ट्रेनमध्ये चढून आत जागा मिळवलेल्या व अजुनही बाहेर स्ट्रगल करत असलेल्यांच्या मेंटॅलिटीतील फरक आहे खरा. बाकी ज्याला त्याला नावे ठेवणे, डि-मॉरलाइझ, अपमान करणे, एखाद्याचा मानभंग करणे करणे या मध्ये ट्रंपचा हात कोणी धरु शकत नाही हे खरे. त्या वागणुकीला सपोर्ट आहे असेही नाही.

खरंय सामो. घाबरायची गरज फक्त फलाटावरच्या लोकांनाच आहे. ट्रेनमध्ये चढून आत जागा मिळवलेल्या देसी लोकांना नक्कीच नाही.
त्यांना नंतर व्हाईट नॅशनलिस्ट 'घाण वास येतोय, मागच्या डब्यात जाऊन बस, किंवा उभा राहा- आम्हाला बसू दे, किंवा खूप वेळ बसलास चल उतर आता की ढकलून देऊ'- असं नक्कीच म्हणणार नाहीत कारण ते रेसिस्ट नाहीयेत काही.

समजा ढकललच तर मोदी व इतर सर्वजण ( Happy )आम्हाला आत घेणारेत का? मग काल्पनिक भीतीचा बागुलबुवा करुन घेण्यात तरी काय अर्थ आहे?
.
मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'

मोदी नक्कीच आसरा देतील पण मोदी स्वतः एअर फोर्स घेऊन न्यायला आले तरी डर्टी इंडियात जाण्यापेक्षा ज्येन्यूईन ट्रम्प समर्थक नरकसुद्धा प्रिफर करतील.

If ifs and buts were candy and nuts,
we'd all have a merry Christmas.
If ifs and ands were pots and pans,
there’d be no work for tinkers’ hands

ट्रम्प समर्थक जी कारणं देत होते आजवर- ती खरी मानायला काहीच हरकत नव्हती-
he is so great with economy.
he is resolutely protecting the country.
he has upper hand in China negotiations.
he is so smart and pragmatic that he knows every problem's solution.
He is tough on all kinds of terror attacks and external threats.
His racism resonates with me.
करोना ज्या प्रकारे हाताळला गेलाय त्यात ही वरची कारणं पुसून गेली आहेत फक्त शेवटचं सोडून.
सो ट्रम्प समर्थक असणं इज फाईन पण वरची कारणं यापुढे देण्यात अर्थ नाही,शेवटचं सोडून.

>>>>डर्टी इंडियात >>>
डर्टी वगैरे काही गंभीर मुद्दे नाहीत. फक्त 'जातीपातीने पोखरलेल्या, स्त्रियांवर गर्दीत, एकटेपणी, कुटुंबात अत्याचार होणार्‍या' - हे शब्द मी वापरेन.

आयडी नाही हॅक झालाय Happy
मी बसल्याबसल्या खूप msnbc cnn बघितल्यामुळे असेल पण फारच चिडचिड होते आहे. हे चॅनल फार बघत नाही पण सध्या लेटेस्ट इन्फो तिथेच दिसतोय. ते लोक पुन्हापुन्हा तात्यांची सगळी आधीची स्टेटमेंट्स दाखवत आहेत.
जादू होईल. व्हायरस आपोआप जाईल. फ्लूने माणसं मरतात हे मला माहीतच नव्हतं. (काय गंमत!) फ्लू जास्त डेंजर आहे. आता लवकरच केसेस शून्यावर येतील.
आणि आता सगळं बंद करून वर म्हणे मला पहिल्यापासूनच माहीत होतं हे असंच होणारे.
Is he that incompetent or is he doing this purposely?
युरोप, एशीया सगळे अमेरिकेला फॉलो करतात. महासत्ता म्हणून काही जबाबदारी नाही का? अमेरिकेने सिरियसली घेतलं असतं तर जगभर त्या स्टेप्स कॉपी झाल्या असत्या.

हिलरीने काय केलं असतं माहीत नाही पण आज वाटतं की ओबामा तिथे हवा होता आत्ता.

भेदभाव अमेरिकेतही होतातच की- जात काय वंश काय. आणि गरीब देशात होतात ते बायकांवर अत्याचार. राष्ट्राध्यक्षाने grab them by the .. म्हणणं हा मात्र त्याचा हवाहवासा वाटणारा खमकेपणा.

थोडक्यात काय, ट्रम्प समर्थन जरूर करा. त्याच्या दुसऱ्या टर्मची पार्टी इथे जरूर द्या. पण उगाच जन्मदत्त भेदभावाची किंवा महिलांना नीट न वागवल्याची ऍलर्जी असल्याचा आव नका आणू.

तुम्हीच लिहिलंय की वरती-ट्रंप वैयक्तिक आयुष्यात काय करतो याच्याशी काहीही देणं घेणं नाही. तो एक राष्ट्रपती म्हणुन कसा आहे, किती खमका आहे, हे मला महत्वाचे वाटते.

त्याच्या रेसिझमची झळ तुम्हाला पोचणार नाही असं तुम्हाला वाटतं म्हणून आता त्याचा राग तुम्हाला येत नाही. ती झळ इतरांना पोचली तर तुम्हाला त्याच्याशी देणंघेणं नाही.

असं असताना उगाच तुम्ही भारतातील जातीपाती आणि महिला अत्याचाराबद्दल बोलणं दुटप्पीपणाचं वाटलं इतकंच. कारण तुम्हाला स्वतःला त्रास झाला तरच या गोष्टी तुम्हाला नकोशा वाटतात अन्यथा फरक पडत नाही व राग येत नाही.

भारताची परंपरा आहे की भारत सोडून गेलेल्या लोकांना जर ते त्या देशात अल्पसंख्य म्हणून त्रास भोगत असतील तर विमानं पाठवून evacuate केलं जातं. नागरिकत्व देता येतं. भारतात डब्याच्या आतले लोक फलाटावरील लोकांना नाक मुरडत नाहीत तर डीडीएलजे स्टाईल हात देऊन आत ओढून घेतात. त्यामुळे मोदी आम्हाला आत घेणारेत का हा प्रश्न काल्पनिक म्हणूनसुद्धा आक्षेपार्ह वाटला.

बाकी तात्यांच्या करोना हाताळणीबद्दल काही बोलायलाच नको.

सनव Lol
मला नाही माहित तुम्ही काय वाचलं किंवा पाहिलं जेणेकरुन तुम्ही एकदम पुसून वगैरे टाकली पण समजून घ्यायला आवडेल.
I am not saying other presidents have done better but would love to know what exactly Trump has done to make this economy so great other than just making unsubstantiated claims?
His hardline stances in a lot of aspects are mainly geared towards earning the in house (country) votes and that does not mean all stances have really resulted in great benefits for America. That’s just a rhetoric he is using to manipulate people.

आणि हो, व्हाईट नॅशनलिस्ट लोकं रेसिस्ट नाहीयेत म्हणजे काय नेमकं?

मी पोस्ट लिहू पर्यंत तुमच्या नवीन पोस्टी आल्या. आता मी कन्फुज झालोय. Lol

तर मंडळी, हॅरीसबाई डेम्स व्हिपि टिकेटकरता फ्रंटरनर आहेत अशी चर्चा आहे. आठवत असेल तर, तुल्सीने हॅरीसची वाट लावली होती, गेल्या वर्षी एका डिबेटमधे. असुमिंग शी गेट्स दि टिकेट, शी विल गेट नुक्ड इन डिबेट्स अगेंन्स्ट पेन्स. तुम्हाला काय वाटतं, बाय्डन विल पिक हर अप डिस्पाइट द फॅक्ट दॅट शी ग्रिल्ड हिम ऑन द बसिंग इशु?..

>>. राष्ट्राध्यक्षाने grab them by the .. म्हणणं हा मात्र त्याचा हवाहवासा वाटणारा खमकेपणा.
जेव्हा ट्रंप हे आक्षेपार्ह बोलला तेव्हा तो राष्ट्रपती काय राजकारणीही नव्हता. जे काही बोलला ते आक्षेपार्ह होते. पण ते एक खाजगी संभाषण होते जे कुणीतरी रेकॉर्ड केले होते. हे चूक होते. पण म्हणून ट्रंप कुणालाही आवडता कामा नये. आणि आवडत असल्यास त्याला ही भाषा रुचत असणार असे मानणे आततायी आहे.

याउलट बिल क्लिन्टनने सत्तेतील विविध स्थानांवर असताना अनेक बायकांशी संबंध ठेवले आहेत. मोनिका लुइन्स्कीशी त्याचे वागणे कुठल्या खाजगी कंपनीत झाले असते तर त्याची केव्हाच हकालपट्टी झाली असती. पण असा नरपुंगव डेमोक्रॅटिक कन्वेन्शनमधे मोठ्या रुबाबात वावरत होता, भाषणे ठोकत होता. हिलरी कशी आदर्श उमेदवार आहे हे सांगत होता ते कसे चालले? मग तमाम डेमोक्रॅट लोकांना त्याचे स्त्रियांशी वागणे अनुकरणीय वाटते असे समजायचे का?

Pages