Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमा.. तुम्ही पाहता पहाता
अमा..
तुम्ही पाहता पहाता नोट्स काढता का? इत के बारीक पॉइंट्स लक्षात राहता ते.......!
ग्रॉस ब्रेक इन प्रोटोकॉल!!!
मी ही आत्ताच पाहीला एपिसोड
भरलाय भरलाय!!! ..माझ्याही डोक्यात गेलं!!!!!!!
आज ऑपरेशन नंतर अरु ला शुद्ध
आज ऑपरेशन नंतर अरु ला शुद्ध आलेली आहे. डॉक्ट्र बाई पण तिच्या प्रेमातच अस्ल्यासारख्या चौकशी करतात व आराम करायला सांगतात. मग भावुक म्युझिक आहे. अनघा रात्री थांबलेली आहे.
नीलिमा विमलच्या तक्रारी करत आहे. तेल जास्ती वापरते. सर्व स्वयंपाक तुपात करावा असे सुचवते. अरु ने पोट गी घेतलेली नाही ते पैसे आहेतच ते वापरुया असे सुचवते. तीन लिटर दूध मागव असे सांगते. ती पूर्ण दुधची कॉफी पिते चार पाच वेळा ते कमी कर असे आजी सांगते.
अवी लाल माठ निवडा यला सुचवतो. घरात पैसे देइन असे म्हणतात तर निलीमा कशाला असे विचारते.
अभी घरी फोन करून ऑपरेशन झाले असे सांगतो. व तिला घरीच आण असे आजी म्हणते. अनिरुद्ध पण चौकशी करतो. तिला इथेच आणा असे अवि सुचवतो. तर संजना ऑब्जेक्षन घेते व घर सोडुन जाण्याचा शो केला म्हणते. आजी तिला चोंबडे पणा करू नकोस असे सुचवते. व मी तुझ्याशी चांगली वागू शकत नाही तशी अपेक्षा ठेउच नकोस असे तिला सांगते मग विचित्र म्युझिक आहे. तेव्हा अनिरुद्ध संजना मूक अभिनय आहे. तो तिला प्रत्युत्तर देण्या पासून थांबवतो. व आईकडे नजर टाकतो व सं आणि अ निघून जातात.
कट टु रात्रीचा चंद्र व अभि अनघा संवाद. मी तुला विसरू शकत नाहीस असे अभि म्हणतो. मी अरुंधतीच्या प्रेमापो टीच इथे आहे बाकी काही नाही असे ती सांगते. व दोन्ही नाती वेगळी आहेत. मी कायम अरु बरोबर आहे असे ती सांगते. मग सिरीअस व्हायोलिन संगीत व प्रेमाचे संगीत
कारण अभि पण हात पुढे करतो व मला एक संधी दे असे सांगून डोळ्यात अश्रु आणून बघतो. मग अनघाला साखरपुड्याच्या वेळची घालमेल घडामोडी आठवतात. व ती शांतपणे खोली बाहेर निघून जाते.
हे सर्व आई बघून आणिक व्यथि त होते. व डोळे मिटुन घेते. अभि हाता कडे बघतो व हात मागे घेतो.
आता अवि व यश चा यश च्या करीअर संबंधित टीपी सीन आहे. थोडे आईचे कौतूक होत असताना अनिरुद्ध येतो व कुचकट बोलतो.
हा ड्रेसिन्ग करून इंट्रव्य्हु ला चालला आहे भीक मागायला
कट टू डिस्चार्ज सीन आज डिस्चार्ज मिळतो आहे. अनघा तिला घरी घेउन जाईन म्हणते. अरू मी माझ्या घरी जाईन म्हणते. इथे हे फारच छोटे अहे हॉस्पिटल. डॉक्टरच ऑपरेशन करते व डिस्चार्ज पेपर्स तयार करते डिपार्टे मेंट नाही का पण सासु सासर्यां समोर मी झोपून राहणे मला बरे वाटत नाही असे अरु म्हणते. डोंबिवलीलाच जायचे म्हणते
क्ट टू आधी वाला सीन यश अरु डाँब्ज ला जायचे आहे असे फोन वर ऐकतो. व घरात सांगायला जातो. अवि त्याला काय तो निर्णय विचार करून घे बेस्ट लक म्हणून साम्गतो.
पुढील भागात आजी कुठेतरी गायब असते ती येते दारात व तिच्या मागून अशक्त असल्याची अॅक्टिन्ग करत अरू घरात पाय ठेवत असते व अनिरुद्ध तिला मदत करू बघतो. हे संजना बघते व नेहमी प्रमाणे चिडते.
जय हिंद जय महा राष्ट्र.
अमा...... किती तो उत्साह!!
अमा......
किती तो उत्साह!!
हो ना
हो ना
अगदी music सकट बारकाईने लक्ष असतं अमा..
खूप छान लिहिता
अमा भारीच !!
अमा भारीच !!
माझ्या प्रश्नाच उत्तर द्या की कोणीतरी. (सोज्वळ बायकांचा तुळशीला पाणी घालतानाचा ड्रेस / केस कोड बद्दल चा )
डॉक्ट्र बाई पण तिच्या
डॉक्ट्र बाई पण तिच्या प्रेमातच अस्ल्यासारख्या चौकशी करतात व आराम करायला सांगतात>>>
होना. आणि गरजेपेक्षा जास्तच भोचक पण आहे डॉक्टर बाई. मला वाटलं आता लगेच अभिला परत अभिनंदन करते की काय अनघा सोबत बघून. मागे जसं अंकिता सोबत असताना करून मोकळी झाली होती.
रावी, हो बहुतेक ते तसंच असेल, तोच ड्रेसकोड असेल, पण स्वयंपाकाचा जो असेल त्यात केस मोकळे च असतात या सगळ्या बयांचे
संजनाचा कालच्या भागातला ड्रेस छान होता कलर कॉम्बीनेशन. तिची कीव यायला लागलीये आता , खरंच किती ती धडपड तिथे जाण्याची जिथे ती कोणालाच नकोय. काय मिळवणार आहे ही नक्की? सरळ वेगळं भाड्याचे घर घेऊन राहता येत नाही का अनिरुद्ध सोबत? बाकी यावरून अन्याला पुन्हा चान्स मारायला( सुटकेचा) चान्स आहे , की बाई , तुला मी हवा आहे की माझं घर?
ते ड्रेस कोड चं असं असावं >>
ते ड्रेस कोड चं असं असावं >> अंघोळ करून सोवळ्याने तुळशीची पूजा करायची. म्हणून केसा भोवती टावेल. ओलेत्या नेच करायची असावी. मग स्वतःधुतलेली सुती काठ पदराची साडी नेसून दूध गरम करायला ठेवायचे व नाश्ता बनवायला घ्यायचा. मग जसे मेंबर उठून येतील तसे चहा कॉफी दूध हेते सर्व्ह करत राहायचे.
वर्किन्ग गर्ल म्हणजे पारोश्याने सर्व कामे करून मग अंघोळ करून तयार होउन घराबाहेर!!! कंप्लिट उलटा प्रोटोकॉल.
शुभ प्रभात.
शुभ प्रभात.
अरु बाई आजारातुन हळू हळू चालत आईच्या घरी आल्या. निहार अभि अनघाचा साखरपुडा झालाच आहे असे गृहित धरतो. व बोलत राहतो.
मध्येच यश व गौरी आणी संजना चे एक आर्गुमेंत होते. अरु कशी गरीब असायचे नाटक करते व गरजेला सर्व गोतावळा भोवती जमव्ते( कावेबाज निव्व्वळ!!!) असे मांडते.
मग अरू दिवा णा वर पडून आराम करत असते. निहार तिला शोधून औषधे देतो. तो कॅरम खेळा यला गेल्यावर अरू पट्टी चालू करते
भावाला तू लग्न कर असे बौध्हीक घेउ लागते. पण तो माझी प्रायोरिटी निहार व त्याचे शिक्षण आहे असे सांगून ती पिडा दूर सारतो. आई तू दिवानावर झोप मी झोपते खाली असे म्हणून अरू बलिदानाची पराकाश्ठा करते.
आता घरी आजोबा उठून कांचन कांचन कर्तात. विमल येते. मग चहा उपमा कोणी कसा करायचा चर्चा होते. इशा आपली फर्माइश जाहीर करते.
कांचन दिसत नाही म्हणून आजोबा अस्वस्थ होतात. अभी पण बाहेर गेला आहे. मग एकदम ढां मुझीक. आजी येते व मागून थकलेल्या आवाजात अरू पण येते ( हे पुढील भागाचे पुढील भागातच बघा!!) काय वेळ काढू एपिसोड. घरातले सर्व लोक्स एकदम लाडावलेलेच आहेत असे फील्स येते. कोनीही कसलीच जबाबदारी घेत नाही. आजोबा पण अगदी लाडावलेले दिसतात. हट्ट करत असतात बायको एक क्षण ही आपल्याला न सांगता बाहेर जाउ शकते हे समजू शकत नाहीत.
जय हिंद जय महाराष्ट्र
वर्किन्ग गर्ल म्हणजे
वर्किन्ग गर्ल म्हणजे पारोश्याने सर्व कामे करून मग अंघोळ करून तयार होउन घराबाहेर!!! कंप्लिट उलटा प्रोटोकॉल.>>> हो, नाही तर फोडण्यांचे, मसाल्याचे वास येतात.
कांचन ने तिला माहेरी जाऊन
-
कांचन ने तिला माहेरी जाऊन
कांचन ने तिला माहेरी जाऊन कंविंस केले का?
इतक्या दूर जाऊन लगे परत आली सुद्धा?..
अमा..
पण तो माझी प्रायोरिटी निहार व त्याचे शिक्षण आहे असे सांगून ती पिडा दूर सारतो.......
हे मस्त!!!!
मस्त अपडेट्स
मस्त अपडेट्स
अजुनी अरुचा हेअर कट वाला मेकओव्हर झाला नाही का?
मेकओअव्हर नाही झाला अजुन.
मेकओअव्हर नाही झाला अजुन. अजुन हे स्वयंपाकातच अडकलेत.
अमा मस्त अपडेट्स.
अमा मस्त अपडेट्स.
डोंबिवलीचं घर एका खोलीचं आहे.
डोंबिवलीचं घर एका खोलीचं आहे. एका भिंतीशी ओपन किचन. एकच पलंग. बैठी चाळ.
काल अप्पा " कांचन कांचन" म्हणून हाका मारतात त्या सीनमध्ये इशा आणि अविनाश त्यांच्या अगदी जवळ उभे राहूनही किती मोठ्याने बोलत होते!
डोंबिवलीचं घर एका खोलीचं आहे.
डोंबिवलीचं घर एका खोलीचं आहे. एका भिंतीशी ओपन किचन. एकच पलंग. बैठी चाळ.>> मी अश्या घरात राहिलेले आहे. ते कपाटाच्या साइड ला उशी टेकवून बस्णे आणि पुस्तके वाचणे वाटीत घेउन शेंगादाणे खाणे हे केले आहे.
मी सिनियर कॉलेजमधे जाईपर्यंत
मी सिनियर कॉलेजमधे, एस. वाय. ला जाईपर्यंत डोंबिवलीत आम्ही कौलारु बैठ्या चाळीत दीड खोलयात रहायचो (एका खोलीचं एक घर होतं चाळीत पहीलंच ओपन किचनवालं). आमचं ओपन किचन नव्हतं मात्र. तेव्हा अशा अनेक चाळी होत्या, अजुनही आहेत म्हणा पण जुन्या असलेल्या पाडून बिल्डींग्ज झाल्यात.
शुभ प्रभात.
शुभ प्रभात.
आज अरुंधती सकाळची जागून उशीला टेकून बसली आहे. तिची आई तिला हातात चहा देते. मग झोपे वरून एक संभाषण. भाउ सुट्टी घेउन घरी थांबायचे ठरवतो पण त्याचे पैसे कापले जातील म्हणून बहिनाबाई त्याला हपिसला पाठवते. तो मी लवकर येइन असे सांगून पळतो.
आई आजी मशीन मधून कपडे काढून बादली त ठेवतात व वाळत घालायच्या मोहिमेवर निघतात. पन गुढग्यात कळ येते . मग अरु च्या
हृदयात कळ येते. आजी थोडे थोडे करून घालीन म्हणतात तर यश येउन मदतीचा हात देतो व सासू आजी पण येतात. मग लडिवाळ आर्गुमेंट होउन तिला घरी घेउन जायचे ठरते. उभयपक्षी चांगुलपणाची परा कास्ठा.
संजना वेडिन्ग प्लॅनर शी बोलते. डेट फायनल झाली आहे लग्नाची. हे सर्व ती घरीच जाउन अनाउन्स करणार आहे असे म्हणते
मग कट टू घर पार्ट विनोदी . अन्या पेपर वाचत बसलेला आहे. अवि स्वयंपाक घरात. अप्पा बायकोला घ्यायला मंदिरात जायचे बघतात. सासू आज्जी दारात उभी राहते. मग एकदम आनंदी संगीत. म्हातारा आजीवर ओर डतो पण मागून अरू अशक्त पणॅ पावले टाकत येते. सर्व आनंदी होतात. मागे संजना आपल्याच घरातून जळते. अरूचे स्वागत फुलांनी होते.
संजना भडकली आहे. का तर अन्या हात धरून अरू ला आत घेउन येतो. हे तर मी कोणत्याही आजारी माण्सासाठी करेन. अरु ला थोडा थकवा आहे असे ती कबूल करते. नीलीमा मैत्रीणीं बरोबर बाहेर भटकायला गेली आहे आजी श्रीखंड बनवायचा बेत करतात. व आप्पाना चक्का बांधायचे काम देतात. अविमुळे आपल्याला पण इतक्या वर्सांनंतर किचन मध्ये पाठ वते आहे म्हणून तक्रार करतात. किती ती एंटायटल मेंट.
अरु उठून वर जायला निघत्ते व अशक्त पणा मुळे धडपडते तर अन्या पण एक हाताने धरतो. तर संजना डोळे मोठे करून एंट्री घेते. एकदम खंग्री संगीत दिले आहे.
पुढील भागातः संजना आई अप्पाना लग्नाचे आमंट्रण देते. अरु ची पण मदत होईल म्हणते व विटनेस म्हणून तिला सही देशील ना विचारते.
हिला बेडरेस्ट आहे घरी आजारपण आहे हे तसे कोणाला कळत नाही असे दिसते.
पुढील भाग सोमवारी सकाळी.
अमा.. खंग्री!!!हिला बेडरेस्ट
अमा..
खंग्री!!!
हिला बेडरेस्ट आहे घरी आजारपण आहे हे तसे कोणाला कळत नाही असे दिसते........ आता किती दिवस ते आजारपणाचे दळण दळणार? सिरीअल मधे फार काळ कुणी दु:खात राहू शकत नाही...! लगेच आता अन्या - संजनाचे लग्न, नाच गाणी- आनंदी वातावरण वगैरे दाखवतील.....!!
धडपडते तर अन्या पण एक हाताने
धडपडते तर अन्या पण एक हाताने धरतो. तर संजना डोळे मोठे करून एंट्री घेते. >>> तेव्हा अन्या घाबरतो, आपली चोरी पकडली असा लूक देतो.
त्या अरु चे माहेर म्हणजे थ्री
त्या अरु चे माहेर म्हणजे थ्री इडियट्स मधल्या शर्मन जोशीचे ब्लॅक अँड व्हाइट हाउस आहे , घरातली प्रत्येक व्यक्ती ट्रॅजेडीने वाकलेली, आत्ता बॅक्ग्राउंडला ट्यर्ंssss म्युझिक लागेल असं वाटत
शुभ प्रभात.
शुभ प्रभात.
आज एकदम पहिल्या सेकंदा पासूनच फटाके आहेत.
संजना आत येते. अरू ला बरी आहेस ना विचारते. व किती दिवस मुक्काम म्हणते. आपल्या लग्ना साठीच ती आली आहे आनंदच आहे लग्नाच्या तयारीत मदत होईल म्हण ते. यश तिला म्हणतो ती आजारी आहे मदत नाही करू शकणार.
यश म्हणतो आता ती नाही मदत करणार.
इशा म्हणते वर चल हिच्या कडे लक्ष देउ नकोस.
संजना म्हणते परवाच लग्न आहे. अन्या म्हणतो एवढी घाई का? तर काका म्हणतो भीती वाटत असेल तुझे मत बदललेतर.
अरु ला तू माझी विटनेस होशील का म्हणून विचारते. अरु आनंदाने करेल म्हणते. संजना आनंदाने खूप तयारी करायची आहे अनिरुद्ध
द काउ ट डाउन बिगिन्स म्हणून नाचत बाहेर जाते. खंग्री म्युझीक आहे.( यश ने दिलेले असावे)
अरू बसते. खूप वेळ उभी असते तर.
अन्या संजना वादः संजना तिला गाडी दिल्या बद्दल उखडते. रिक्षेत बसून गेली असती की म्हटली. तू तिला हात धरून आधार दिलास
ही सगळी नाटके आहेत म्हणते. डिवोर्स घेउन गेली ना मग आता परत का आली विचारते. तू तिच्या बद्दल जास्तच काळजी करत आहेस
असे ती अन्याला म्हणते. अन्या म्हणतो तू स्ट्रॉन्ग व स्वतंत्र मुलगी आहेस तू मॅनेज करू शकते स अ
सारखे लग्न लग्न करून अन्या वैतागला आहे. तुझा काय भरोसा पळून गेलास तर . लग्न झाले की मी कोणाला असे येउ देणार नाही असे धमकाव्ते. लग्न होणारच म्हणा ते. आजी ला म्ह णते रजिस्ट्रार नौ वाजता येइल अन्याला म्हणते दहा वाजता येइल ये क्या है? एक पे रहो.
तिकडे निहार आत्या निघून गेली म्हणून वैतागतो. तिच्याशी फोन वर बोलतो. आजी त्यालाच घरी राहायला बोलवते दोन चार दिवस.
तो आत्याला परत बोलावतो. अरू आजारी पणाचे अॅक्टिन्ग करत बोलते.
अवि आठवण काढतो. आजी पूर्वी डबे भरून्न चिरोटॅ अनारसे पाठवत असत. अजूनही करतात का?! मग अरू अगदी अजी जीने नाही आता जमत साधेच फराळाचे पदार्थ बनवते म्हणते. अवि व यश अरूला खुर्चीत बस्वून वर नेतात. त्या ऐवजी खालच्याच खोलीत का नाही झोपवत.
मग खोलीत सेटल होणे औषधे घेणे यश पुढे मागे करतो. मग गौरी येते मी पण आले असते विचारायला वगैरे म्हणते.
अरू तिला आजीच्या मदतीस पाठवते. श्रीखंडाचा बेत असेल. बेड रेस्ट बेड रेस्ट करून सारखे सगळे तिला डिस्टर्र्ब करतात.
यश काका आला ते बरं झालं म्हणतो बाबा असले की कायम टेन्शन म्हणतो ते अन्या ऐकतो. व खोलीत येउन अरु ची चौकशी करतो.
तुमचे लग्न होउन जाउदे( एकदाचे ) असे अरू त्याला म्हणते असे पुढील भागात दाखवले आहे.
गौरीला संजनाच्या वागण्याचे टेन्शन आले आहे.
संजना याआधी बर्याच वेळा
संजना याआधी बर्याच वेळा सेन्सिबल बोलताना दाखवली आहे. पण लग्न आणि अरुंधतीबद्दल भलतीच इन्सेक्युअर दाखवताहेत.
रूपाली भोसलेला पाहताना तिचा बिग बॉसमधलावा वर आठवतो. तिथे ती कोणाचीच खरी मैत्रीण होऊ शकली नाही. तसंच इथेही होतंय संजनाचं.
Her character arc is of a
Her character arc is of a person who intentionally hurts people and rather enjoys it. Best thing in the circumstances would have been to stay away from the sick person trying to recover. How can anyone who is on bed rest help in marriage preperation? There are such women though.
सगळे एकमेकाशी प्रचन्ड मोठ्या
सगळे एकमेकाशी प्रचन्ड मोठ्या आवाजात का बोलतात?, सन्जनाच लग्न लग्न एकून खुप बोअर होत, तिची लग्नाची खरेदी आवडली होती,मन्गळसुत्रही छान आहे, एकदरित सन्जनाचा वॉर्डरोब चान्गलाच आहे,गौरी डिझायनर असुन एकदम अॅव्हरेज राहते.
काका झालेला तो मोघे भयकर पिळ अॅक्टिन्ग करतोय.
खरे तर अरु ला इकडे येऊन कसली
अनिरुद्ध अचानक बराच सॉफ्ट कसा काय वागू लागला?
अविनाश ला फारच footage दिलं आहे..आधी तर कुणी उल्लेखही करत नसत.....
एकंदरित बायकांच्या ऑडियन्स
एकंदरित बायकांच्या ऑडियन्स मध्ये अरुंधती बद्दल सहानुभूती निर्माण करण्यात सिरीयलवाले यशस्वी झाले आहेत असे दिसते.
१. प्रत्येकाला वेगळा नाष्टा बनवणारी गृहिणी चांगली आणि कॉर्नफ्लेक्स खायला घालून कामाला जाणारी बाई वाईट.
२. तिकडे बाई डॉक्टर/ एखाद्या कंपनीत CEO जरी असली तरी घरच्या लोकांना भाजी पोळी भात हे तिने बनवलेच पाहिजे हा अट्टाहास. असे नाही झाले की ती बाई कुटूंबासाठी वाईट.
३. एकंदरीत अरुंधती जर आदर्श गृहिणी आहे तर मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवे होते ना? पण आळशी आणि लाडवलेली मुलगी, बेजबाबदार यश आणि चंचल मोठा मुलगा असे मुलांच्या बाबतीत बिघडलेले गणित दिसते. हा, आता मुलांवर संस्कार करायची जबाबदारी फक्त आईचीच का? असा प्रतिप्रश्न येऊ शकतो पण मग आई हे पण नाही करणार तर करणार काय?
बाकी मालिकांशी तुलना केली तर ही मालिका त्यातल्यात्यात जरा सेन्सिबल वाटते.
बायकांना ठरावीक साच्यात बसवत , गृहिणीना समोर ठेऊन बनवल्या गेलेल्या ह्या मालिकांकडे स्वतंत्र/ फेमिनिस्ट बायका कसे पाहतात हे वाचायला आवडेल.
ही सिरीयल एवढी वाढवत का बसलेत
ही सिरीयल एवढी वाढवत का बसलेत तेच कळत नाही. सगळं काही सेम हिंदी सारखं कॉपी करण्याची गरजच नव्हती. अरूंधती स्वत:चा वेगळा मार्ग शोधून समाधानाने राहते एवढ्या नोटवर संपायला हवी होती, या नंतरच्या फापट पसाऱ्याला काय अर्थ आहे?
संजना याआधी बर्याच वेळा सेन्सिबल बोलताना दाखवली आहे. पण लग्न आणि अरुंधतीबद्दल भलतीच इन्सेक्युअर दाखवताहेत>>>> हो तर. या आधी मला तिची बाजू खरं म्हणजे कधीच पूर्णपणे चुकीची वाटली नाही कारण ती एकटी जबाबदार नव्हती तेव्हा. पण आता जे काय चाललंय सारखं लग्न लग्न , खरंच वेड लागल्यासारखे दिसतं ते. आणि अरुंधतीने परत तिथे जायचंच कशाला ? झाली आहे ना बाई आता वेगळी, मग पुन्हा त्या रस्त्याला कशाला? किती ते सीन्स क्रियेट करायला मटेरियल आहे यांना , खरंच कमाल आहे . मान गये.
एकंदरीत अरुंधती जर आदर्श गृहिणी आहे तर मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवे होते ना? पण आळशी आणि लाडवलेली मुलगी, बेजबाबदार यश आणि चंचल मोठा मुलगा असे मुलांच्या बाबतीत बिघडलेले गणित दिसते. हा, आता मुलांवर संस्कार करायची जबाबदारी फक्त आईचीच का? असा प्रतिप्रश्न येऊ शकतो पण मग आई हे पण नाही करणार तर करणार काय? >>> खरंय. म्हणूनच तसे नाव असावे, आई कुठे काय करते?
, या सिरियल मध्ये कोणीही पूर्णपणे बरोबर किंवा चूक नाहीये, अरु सुध्दा नाही.
एकंदरित बायकांच्या ऑडियन्स मध्ये अरुंधती बद्दल सहानुभूती निर्माण करण्यात सिरीयलवाले यशस्वी झाले आहेत असे दिसते.>>> त्यामुळे मलतरी तिच्यासाठी प्रत्येक वेळी सहानुभूती वाटत नाही, काही वेळा ठिके.
तर मुलांवर चांगले संस्कार
तर मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवे होते ना? पण …… संस्कार करायची जबाबदारी फक्त आईचीच का?>>> त्यावर पण एका भागात चर्चा अरू, अन्या आणि सासूबाईंची चर्चा झाली होती. अरू सांगते त्यांना कि बऱ्याचवेळा तुला काय कळते म्हणत तिला गप्प केले जायचे, मुलांचे फाजील लाड केले जायचे. पण त्यांचे काही चुकले कि दोष मात्र तिलाच दिला जातो.
मुले आळशी मात्र अरूमुळेच झाली आहेत. सगळं हातात आणून देणारी आई ही प्रथा या मालिकेने मोडायला हवी होती.
तसेच बऱ्याच मालिकांमधे स्वयंपाकाची आवड नसणाऱ्या किंवा नयेणाऱ्या बायका कुचक्या/आळशी/कजाग/कामचुकार दाखविल्या आहेत. म्हणजे स्वयंपाक करत नाही मग तिच्यात दुसरे कोणतेही चांगले गुण नाहीतच. तसे नसते!!
तसेही सिरीयल मधे रिलेट
तसेही सिरीयल मधे रिलेट करण्यासारखं कुठलच कॅरॅक्टर नाही, एक देविका सोडली तर !
मेलोड्रामॅटिक सिन्स करायलाच बनवलाय प्लॉट , अरु जर फक्त ४५ दाखवली आहे, या पिढीतल्या शहरात रहाणार्या बायका मी तरी घरात साडी नेसून वावरताना पाहिलेल्या नाहीत, या जनरेशन मधल्या बायकांच्या ६५-७० वयाच्या सासू सुध्दा सुटसुटीत सलवार कमीझ घालतात आजकाल , (अगेन शहरां मधे !)
अरु-संजाना दोघीही स्वाभिमान नसल्या सारख्या वागतात मोस्ट ऑफ द टाइम्स..
सगळ्यात अनॉयिंग सतत हातात खायला प्यायला मागणारी ताडमाड वाढलेली घोडी मुलं आहेत .
Pages