भिंगनिरपेक्षता, उरोगामी आणि फेक्युलॅरिझम

Submitted by नोझिपा मरारे on 18 November, 2019 - 13:50

कित्येक वर्षे झाली.
भारावलेल्या अवस्थेत मायबोलीवर माझा वावर भिरभिरत असे. तसे कुठे कधी वावगे लिहीले जाणार नाही याची काळजी मी घेत असे.

म्हणजे आपण काहीच लिहायचे नाही हा काळजी घेण्याचा सर्वोत्तम उपाय. कधी कधी आपण आपल्या मनातले काहीच लिहीत नाही याचे वैषम्य वाटायचे. पण थोड्याच दिवसात आपण असे काही लिहीले असते तर आपले थोबाड कसे फुटले असते याचे प्रात्यक्षिक इतरांच्या बाबत पहायला मिळत असे.

स्त्रीवादी लेखांवर जोरकस प्रतिक्रिया द्यायचा मोह तर खूपदा व्हायचा. पुरूषांना शहाणपणा शिकवणा-या स्त्रीधाग्यांवर अन्नू मलिकने ये मोह मोह के धागे हे गाणे बनवले आहे अशी माहितीही मिळाली होती. तरीही तो मोह टाळल्याचा इतका फायदा झाला की बस्स. कुठे कुणी चुकला की मधमाश्यांचं पोळं फुटावं तशा कुठून कुठून फेमिनिस्ट लेडीज बायकांचा थवा येऊन दंश करून जायचा. नंतर ते उत्साही प्रोफाईल विव्हळत पडलेलं दिसायचं. काहीच लिहायचं नाही या धोरणाचा मायबोलीवर प्रचंड फायदा होत गेला. मध्यंतरी कुणी तरी मूकवाचका जागा हो म्हणून आमीषही दाखवलं. पण ते मूषकवाचका असेच वाचल्याने त्याचा उपयोग झाला नाही.

मग आला कठीण परीक्षेचा पेपर..
पुढारी महिलांनी पुरूषांच्या परीक्षा घ्यायला सुरूवात केली. भिंगनिरपेक्षता म्हणून एक उपक्रम चालवला गेला होता. त्यात विविध विषय होते. यात तुमच्या बायकोचा मित्र तुम्हाला चालेल का ? भिंगनिरपेक्षता म्हणजे काय इत्यादी प्रश्न होते.
पुरोगामी प्रमाणपत्रसाठी हपापलेल्या आणि स्त्रीवाद्यांच्या शाबासकीला आसुसलेल्यांनी मग या यज्ञात उड्या घेतल्या. कधीही आपली ओळख जाहीर होऊ न देणा-या एका वैदुने तर आमच्या घरात कसे शतकानुशतके प्रागतिक वातावरण होते आणि आम्ही ते कसे अजून पुढे नेले असा स्वतःचीच पाठ खाजवणारा लेख सादर केला. काहींनी तर आम्ही घरात कसे मुलांचे पालनपोषण करतो, तिच्यावर कामाचा ताण असेल तर मी मुलांना सांभाळतो इत्यादी लिहीले.

गंमत म्हणजे ही मंडळी मुळातून ओळखीची. घरी गेल्यावर तंगड्या पसरून बसणा-या आणि बायकोला चहाची ऑर्डर देणा-या मित्राचा बायकोला मदत हा लेख वाचताना तर आम्ही खाली पडून हसत होतो. पहिल्यांदाच न लिहीण्याचा हा फायदा एंजॉय करता आला. मग भिंगनिरपेक्षतेवर चर्चा सुरू झाली. त्यात २४ कॅरटच्या सोन्याने उडी घेतली. आणि मग काठावरचे आणि पाण्यात पोहणारे असे सर्व पुरूष वेड्यात निघताना पाहून आपले जहाज बुडत नाहीये कारण आपण काठावर सुद्धा नाही आहोत याचा कोण आनंद झालेला.

अरेच्चा ! स्वयंपाक हे काम बायकांचे ही भिंगनिरपेक्षता नाही तर. बायकांना काय अपेक्षित होते आणि पुरूष काय काय डिंगा मारत होते. त्यातल्या त्यात आमचे संस्कृतीरक्षक मात्र प्रामाणिक निघाले. ते थेट वाद घालत होते. आपण उघडे पडू याची पर्वा न करता आपणास जे वाटते ते प्रांजळपणे मांडत होते. त्यांची जी फसगत होत होती त्यामुळे ते आमचे अमिताभ बच्चन झाले होते. पडद्यावरचा अँग्री यंग मॅन आपल्याला पाहीजे ते सर्व करतो आणि शेवटी गोळी लागून मरतो, पण आपण जिवंत राहतो हा अनुभव इथेही मिळाला.

तसा या पुढारीण बायांचा दरारा मायबोलीवर कायमच राहिला. त्यातल्या त्यात "अहो अ‍ॅडमिनला" तर टरकूनच रहावे लागे. बाई वादाला एकच नंबर आणि एका वाक्यात वाट लावायलाही. शिवाय भयंकर आक्रमक असल्याने शेपूट घातले तरच बरे असे वाटत असे. काही फॉरेनच्या इंडीयन बायकाही अधून मधून थव्याथव्याने उतरत असत. तरी बरं त्यांच्यात एकवाक्यता नव्हती ( हे खूप उशिरा समजले).
(कंसात लिहीण्याचे कारण नारायण धारपांची शैली हे नसून कथेचा भाग नसला तरी महत्वाचा आहे म्हणून )

मग हळूहळू पाककला विभागात चक्कर टाकणे होऊ लागले. हो, कारण पाककला निपुण नसणारा पुरूष हा गाढव आहे हे समजले होते. भिंगनिरपेक्षता जोपासायची तर पाककला ठाऊक असायला हव्यातच. हळूहळू पुढारीण बाईंच्याच पाककला खूप असतात असे दिसून यायला लागले. हे जाम कंन्फ्युजिंग होते. म्हणजे ज्यांना भिंगनिरपेक्षता ठाऊक आहे त्या स्वतःच्या घरी कशाला ना स्वयंपाक करत असतील असा साधारण विचार मनात आलेला. त्यातून दोघे कमावते असतील तर पुरूषाने का सांभाळू नये हे मौक्तिक स्वानुभवातून आल्याशिवाय का आले असावे असे विचार मनात येत..

मग विपूत डोकावल्यावर तर यांच्या ह्यांना हे आवडते म्हणून ही पाकृ पाठव अशा प्रेमळ गप्पा पहायला मिळाल्या. अगं बघ ना मुलगा घरी आला की भूक भूक करतो, तेव्हां नेमकं काही सुचत नाही, आणि नव-याचीही वेळ होतच आलेली असते. मग पुन्हा भिंगनिरपेक्षतेचे मोह मोह के धागे पुन्हा वाचून काढले. डोक्याचं दही झालेलं.

मग एकदा घरकाम करणा-या बाईच्या धाग्यावर एका प्रागतिक भिंगनिरपेक्षता वादी महीलेने आपण घरात कशी स्वच्छता करतो आणि टॉयलेट सुद्धा कसे रोज साफ करतो हे अभिमानाने लिहीले. याच महीलेच्या टॉयलेट नव-याने देखील साफ केले पाहीजे या वाक्याचा केव्हढा तरी परिणाम झालेला होता आपल्यावर हे आठवले.

बाकी आस्तिक नास्तिक, धार्मिक पुरोगामी तर काही बोलूच नका.
मारूतीचे शेपुट संपणारच नाही..

फक्त आपल्याला दोन मोठे कान उगवले असून पाठीमागे एक शेपूट देखील आहे आणि आपण हात टेकवून चालत असताना मायबोलीवरचा प्रत्येक जण आपल्याकडे पाहून जोरजोरात हसत आहे असे भास सतत होत असतात. स्वप्नं देखील पडत असते. एकदा तर कुणी तरी मला ए पुरोगामी गाढवा अशी हाक मारल्याने दचकून जागा झालो तेव्हां भिंगनिरपेक्षतेचा धागा समोर येऊन वाकुल्या दाखवत होता.

शिवसेक्युलरवादी सरकारच्या काळात तरी आपल्याला इथे चांगली वागणूक मिळेल या अपेक्षेने पहिल्यांदा आपली व्यथा आपल्यासमोर मांडत आहे. जर आपण मोठ्या मनाने समजून घेतली नाही तर

मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन

( अश्लीललतेचा आरोप होऊ नये यासाठी ल च्या जागी भ घेतला आहे इतकेच काय ते )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्दभसाहेब तुमी लिवत जावा. उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभाः शान्तिपाठकाः परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः॥

Lol Lol

उपरोधिक विनोद अतिशय आवडलेले आहेत आणि आताशा संदर्भ समजायला लागले आहेत.

टीप : अरे बाप रे ! आता मला चाहती व्हावे लागेल की काय? पण मग उलटी म्हण नाही मराठी मध्ये.

साधं घरगुती उदाहरण शी समजात ,समाज माध्यमात व्यक्त
होण्याची पद्धत कशी बदलते हे तुलना करूया.
समजायला सोप जाईल.
आपण घरात जेव्हा एकटेच असतो तेव्हा अंडर pant वरच घरात वावरू शकतो .
मुल असतील घरात तर half pant घालतो.
बनियन नाही घातले तरी चालते.
पण घराच्या बाहेरील कोण्ही व्यक्ती आल्या की tshirt सुधा घालावा लागतो.
Under pant वर असतो
म्हणजे पूर्ण उघडे असतो तुमचे सर्व चांगले वाईट विचार स्वतः माहीत असतात.
Half pant
म्हणजे मुलांसमोर तुमचे काही गुण तुम्ही लपवून ठेवलेले असतात त्यांना ते माहीत नसतात.
T shirt
म्हणजे
शेजाऱ्यांना तुम्ही काय चीज आहत ह्याची जवळपास जाणीव असते पण पूर्ण नाही.
बाहेर जाताना पूर्ण कपडे घालून जाता
म्हणजे जगाला तुमचे वाईट गुण दाखवत नाही
ते लपवून ठेवता
तसेच विचारांचे सुधा घरात वेगळेच विचार असतात,मित्र मंडळी मध्ये वेगळेच आणि समाज माध्यमावर तर अजूनच वेगळे.
एकच व्यक्ती एकाच विषयावर वेगवेगळ्या स्थिती मध्ये वेगवेगळे विचार व्यक्त करण्याचे प्रमाण हे नक्कीच जास्त आहे
बाहेर स्त्री मुक्ती वर भाषण देणारी स्त्री . घरात पारंपरिक स्त्री ची सर्व काम करत असते .
किंवा स्त्री ला सन्मान दिला पाहिजे असे बाहेर घासा बसे पर्यंत सांगणारे घरात स्त्रियांना गुलाम सरखं वागवत असतील .

आणि स्त्रीने आपली पायरी सांभाळावी, चूल अन मूल सांभाळावे असे बाहेर म्हणणारे स्वतः चूल अन मूल सांभाळून घरात स्त्रियांना पूर्ण मोकळीक देत असतील.

लेख प्रचंड आवडला आहे. सगळे पंचेस मस्त जमलेले आहेत.

शीर्षक वाचुन उरोगामी व फेक्युलरबद्दलही वाचायला मिळेल असे वाटले होते पण भिंगनिरपेक्षतेतच ते सामावले आहेत हे थोड्या उशिरा लक्षात आले.

छानच...
पुढचे पण दोन्ही विषय उरकून टाका तेवढे लगोलग Wink Wink Wink

राहिलेल्या दोन विषयात हात घातला तर चारी बाजूंनी सैन्य रणगणावर
उतरेल .
आगदी ख्रिस्त पूर्व काळातील समाज जीवन पासून उत्क्रांतीच्या सिद्धांताचे सुद्धा तीन तेरा वाजवले जातील.

उत्खनन करून अनेक पुरावे सादर केले जातील .
आणि तुम्ही कधीच न ऐकलेल्या इतिहासाची उजळणी चालू होईल.
सोपे नाहीत ते 2 विषय.
वरती स्वर्गात असलेल्या
अनेक दिग्गज लोकांना रोज रोज पृथ्वी वर येवून साक्ष द्यावी लागेल .

आलोच
काल सापडला असता हा धागा तर ऋन्मेषचा धागा वर काढावा लागला नसता.