भारत आणि चीन या देशांच्या लोकसंख्या अवाढव्य झाल्याने तो एक चिंतेचा विषय असतो. चीनने काही काळ सक्तीचे धोरण राबवून लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडच्या खुल्या लोकशाहीमुळे आपण जोडप्यांच्या अपत्यांच्या संख्येवर काही निर्बंध घालू शकत नाही. थोडक्यात याबाबत्त आपण राष्ट्रीय असे सक्तीचे धोरण काही ठरवू शकत नाही. त्यामुळे शेवटी हा प्रश्न प्रबोधनाने सोडवावा या निष्कर्षावर आपण येतो. सुशिक्षित वर्ग यासंदर्भात खूप जागरूक आहे आणि असे बरेच लोक आता ‘एकच मूल पुरे’ हे धोरण पाळताना दिसतात. मात्र काही सुशिक्षित जोडप्यांचा ‘एकाला दुसरे भावंड हवेच’ यासाठी आग्रह असतो आणि तो पुरा करून ते या विषयाला पूर्णविराम देतात. अशिक्षितांची आणि काही प्रमाणात ग्रामीण लोकांची याबाबत विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तूर्त मी या विचारभिन्नतेला बाजूस ठेवत आहे. काही सुशिक्षित लोक या मुद्द्याबाबत किती संवेदनशील असू शकतात याची काही उदाहरणे मी देणार आहे. किंबहुना तोच या लेखाचा हेतू आहे.
माझ्या माहितीत एक कुटुंब आहे. त्यांचा दरवर्षी १५ ऑगस्टला एक कौटुंबिक मेळावा असतो. त्यातील एक आकर्षण म्हणजे या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तेव्हा त्या वर्षीचा एक ‘संकल्प’ जाहीर करतो आणि पुढे वर्षभरात तो अमलात आणतो. हा संकल्प कुठल्या ना कुठल्या विधायक कामाशी निगडीत असतो. या कुटुंबात दोन विवाहित भाऊ आहेत. त्यापैकी काही वर्षांपूर्वी मोठ्या जोडप्याने केलेला संकल्प असा होता.
या जोडप्याला स्वतःची पहिली मुलगी आहे. लोकसंख्येच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याने आपल्याला दुसरे मूल होऊ देणे त्यांना काही पटत नव्हते. त्याचबरोबर आपल्या मुलीस भावंड हवे असेही त्यांना वाटे. या प्रश्नावर त्यांनी एक तोडगा काढला. दुसऱ्या अपत्यास जन्म देण्याऐवजी त्यांनी दुसरे मूल अनाथालयातून दत्तक घेण्याचा संकल्प केला आणि तो लवकरच अमलातही आणला. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी मुलगीच दत्तक घेतली. त्यांच्या या निर्णयाचे बरेच कौतुक झाले.
या घटनेला दोन वर्षे उलटली. त्या दरम्यान धाकट्या भावाचे लग्न झाले. तोही मोठ्याप्रमाणेच याबाबत संवेदनशील. तेव्हा त्यांच्या वार्षिक संकल्पदिनी तोही त्याचा संकल्प जाहीर करण्यास उत्सुक होता. याबाबत बहुधा त्याने लग्न करतानाच होणाऱ्या बायकोशी त्याचे धोरण स्पष्ट केले असावे. त्याला आपल्या भावाच्या पुढे एक पाउल टाकायचे होते. तेव्हा त्याने जाहीर केले की, ते दांपत्य स्वतःला एकही मूल होऊ देणार नाही. पण त्याचबरोबर लग्नाचे पहिल्या वाढदिवशी अनाथालयातून एक मुलगीच दत्तक घेईल. त्याच्या पत्नीनेही या निर्णयास पूर्णपणे पाठींबा दिला. त्यांनी तो निर्णय यथावकाश अमलात आणला हे वेगळे सांगायला नकोच.
आता या घटनेला बरीच वर्षे उलटलीत. दोघाही भावांचे संसार उत्तम चालू आहेत. मोठ्याचे कुटुंबात दोन्ही मुलींना अगदी समान वागणूक व प्रेम मिळते. एखाद्या परक्या व्यक्तीस त्या दोन्ही मुली या सख्ख्या बहिणी नाहीत, अशी पटकन शंकाही येत नाही.
आता पाहू पुढचे उदाहरण. हा एक अभियंता आहे. आर्थिक स्थिती उत्तम. जसा तो स्थिरस्थावर झाला तसा त्याच्या पालकांनी त्याच्यामागे लग्नाचा लकडा लावला. २-३ वर्षे त्याने “बघू सावकाश, काय घाई आहे”, असे म्हणत तो विषय टाळला. पुढे त्याची तिशी उलटली. आता त्याचे पालक तर अधीर पण तो एकदम निवांत ! अखेर त्याने त्याचा मानस पालकांपुढे उघड केला. लोकसंख्येच्या विषयावर तो खूप संवेदनशील होता. त्यामुळे लग्न करायला हरकत नाही, पण मूल अजिबात नको हा त्याचा निर्धार होता. शक्यतो त्याला दत्तकच्याही फंदात पडायचे नव्हते. या निर्णयाला पाठींबा असलेली मुलगी तो लग्नासाठी शोधत होता. पण अद्याप त्याला यश येत नव्हते. त्याने संपर्क केलेल्या मुलींनी “एकतरी हवेच”, “दत्तक अजिबात नको”, अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्याने यावर खोलवर विचार केला. एक गोष्ट त्याला जाणवली की पुरुष जितका याबाबत निरिच्छ होऊ शकतो तेवढे स्त्रीचे सोपे नसते. त्यामुळे जर त्याच्या विचाराची मुलगी मिळत नसेल तर त्याला अविवाहित राहायला आवडेल. आता पुढची १-२ वर्षे त्याचा पालकांशी वैचारिक संघर्ष झाला. पण तो त्याच्या विचारांशी ठाम होता. त्याला अपेक्षित अशी वधू काही मिळाली नाही. आता त्याने कायम अविवाहित राहण्याचे ठरवले आहे.
त्याच्या सारख्याच विचाराचे एक अविवाहीत माजी सैन्याधिकारी माझ्या पाहण्यात आहेत. आता ते सत्तरीचे आहेत. एकदा त्यांच्याशी या विषयावर निवांत गप्पा झाल्या. त्यांच्या तरूण वयात ते देशभक्तीने झपाटले होते. त्यात भर म्हणजे लोकसंख्येच्या विषयावर अति संवेदनशील. ते म्हणाले, “ ४० वर्षांपूर्वी लग्न हवे पण मूल नकोच असा विचार असणारी मुलगी मिळणे खूप अवघड होते. त्यात मीही दुसऱ्या बाजूने विचार केला. मूल असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ आवड असते. स्त्रीच्या शरीरधर्मानुसार मूल असल्याचे काही फायदेही तिला मिळतात. तेव्हा उगाच आपले विचार एखादीवर लादायला नकोत. त्यापेक्षा मी एकटा सुखी राहीन”.
मध्यंतरी एका प्रकल्पाच्या निमित्ताने काही कॉलेजच्या मुलांशी अनौपचारिक गप्पा झाल्या. आपल्याकडील गरीबी, बेरोजगारी इ. विषयांवर बोलता बोलता गाडी स्वाभाविकच लोकसंख्येवर घसरली. त्यातले एकदोघे आता अधिकच तावातावाने बोलू लागले. मग एकजण उपरोधाने म्हणाला, “ खूप बाबतीत आपण अजून परावलंबी आहोत. साऱ्या जगाला लाजवेल असे आपले एकच उत्पादन आहे, ते म्हणजे आपली लोकसंख्या निर्मिती !” शिक्षण संपल्यावर या तरुणांची परदेशात स्थायिक व्हायची इच्छा आहे. पुढे जाऊन ते म्हणाले, “ जर का आम्हाला एखाद्या समृद्ध देशात स्थायिक होता आले तरच आम्ही एखाद्या मुलास जन्म द्यायचा विचार करू. पण जर का भारतातच राहावे लागले, तर उगाचच अजून मुले जन्मास घालण्यात काय अर्थ आहे?”
...
वर उल्लेखिलेले सर्वजण सुशिक्षित आणि शहरी आहेत. आपली लोकसंख्या बेसुमार होण्यास कोण जबाबदार आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्या आपापल्या घरांत गेल्या पिढीत कुटुंबनियोजनाचा अवलंब झालेला आहे. त्यांना एखादेच भावंड आहे. तरीसुद्धा ते या विषयावर खूप संवेदनशील आहेत. त्यांच्यासारखे विचार असणारे लोक आपल्या देशात अजून तरी अल्पसंख्य आहेत. अशा मूठभर लोकांनी एखाददुसऱ्या अपत्यास जन्म दिला तर देशावर काही आभाळ कोसळणार नाही. तरीसुद्धा त्यांना असे वाटते. इतर बहुसंख्य कसे का वागेनात, पण आपण स्वतःवर निर्बंध घालावा असे त्यांना मनोमन वाटते. आपल्याकडून आपण निदान एकने तरी लोकसंख्या वाढू दिली नाही तरी त्यांना त्याचे समाधान आहे. म्हणून मला ही सर्व मंडळी वैशिष्ट्यपूर्ण वाटली.
आपण सुशिक्षित जेव्हा या विषयावर चर्चा करतो, तेव्हा त्याचा सूर साधारण असा असतो. आपली लोकसंख्या खूप वाढवण्यास आर्थिक-सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ लोक, विशिष्ट विचारांचे लोक आणि ‘वंशाचा दिवा’ असल्या मागास विचारांचे लोक हे जबाबदार आहेत. ते जर विचारांनी सुधारत नसतील तर आपण फार गांभीर्याने कशाला विचार करायचा? आपण तशीही मोजूनमापूनच मुले जन्मास घालत असतो. त्यामुळे खरे दोषी ‘ते’ लोक आहेत. विशिष्ट लोकांनीच नियोजन करीत राहिल्यास सामाजिक असमतोल होतो ......वगैरे वगैरे.
लेखात उल्लेखिलेल्या मंडळींनी या ठराविक चर्चेस छेद दिला आहे. जे आपल्याकडून होण्यासारखे आहे ते आपण का करू नये असा सवाल ते उपस्थित करतात. त्यांचे विचार अतिरेकी वाटू शकतील, ते योग्य की अयोग्य यावरही काथ्याकूट होऊ शकतो. मला ते वेगळे वाटले एवढेच.
तुम्हाला काय वाटते?
चीनमध्ये लोकसंख्या वाढीसाठी
चीनमध्ये लोकसंख्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
https://www.reuters.com/world/china/xi-says-china-will-seek-lift-birth-r...
चीनमध्ये लोकसंख्या वाढीसाठी
.
भारताची 2021ची जनगणना अजून
भारताची 2021ची जनगणना अजून का रखडली?
https://www.bbc.com/marathi/articles/cxrnv0wx5ryo
जनगणना दर दहा वर्षांनी होणे
जनगणना दर दहा वर्षांनी होणे महत्वाचे आहे.
२०२१ मधे जनगणना न होण्याचे कारण कोरोना असेल, पण आता तरी घेण्याचे काही प्रयत्न होणार आहेत का?
2023 मध्ये तरी वाटत नाही होईल
2023 मध्ये तरी जनगणना वाटत नाही होईल
तीन बातम्या - ओझरत्या
तीन बातम्या - ओझरत्या पाहिल्या.
१ सिक्कीम राज्य सरकार अधिक मुलांना जन्म द्यायला प्रोत्साहन देत आहे.
२. चीनची लोकसंख्या या दशकात (की वर्षात?) घटली. करोनाचा उपयोग त्यांनी लोकसंख्या घटवायला केला का अशी शंका आली. अशक्त, वृद्ध लोक या निमित्ताने कमी झाले तर बरं असा विचार काही विचारसरणीचे लोक, अगदी सरकारेही करू शकतात असं एका मित्राचं म्हणणं होतं.
३. बहुधा भारताने चीनची लोकसंख्या नुकतीच ओलांडली आहे.
इथे जनगणनेची चर्चा सुरू आहे
इथे जनगणनेची चर्चा सुरू आहे त्यामुळे लोकसत्तेत आलेल्या लेखाची लिंक देतो.
https://www.loksatta.com/sampadkiya/columns/yogendra-yadav-targets-modi-...
**"बहुधा भारताने चीनची
**"बहुधा भारताने चीनची लोकसंख्या नुकतीच ओलांडली आहे.
>>> असं मीही कुठेतरी वाचले होते.
जपानला वृद्धां च्या वाढत्या
जपानला वृद्धां च्या वाढत्या आणि मोठ्या प्रमाणातल्या संख्येचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यावर एका प्राध्यापकाने सामूहिक आत्महत्यांचा उपाय सुचवला आहे.
https://www.businessinsider.in/international/news/a-yale-professor-sugge...
>>>>प्राध्यापकाने सामूहिक
>>>>प्राध्यापकाने सामूहिक आत्महत्यांचा उपाय >>>
बापरे भयंकर आहे हे.
भारताने (142.9 कोटी) चीनला
भारताने (142.9 कोटी) चीनला (142.57 कोटी) लोकसंख्येत मागे टाकले
United Nations data
https://www.msn.com/en-in/news/other/india-overtakes-china-becomes-most-...
या विषयावरील एक चांगला लेख:
या विषयावरील एक चांगला लेख:
मनुष्यबळ कुशल हवं !
https://www.esakal.com/amp/saptarang/anjali-radkar-writes-manpower-shoul...
...लोकसंख्येच्या आकड्याविषयी आपण न्यूनगंड बाळगून जगायची गरज नाही. आपली ही जी शक्ती आहे, जे मनुष्यबळ आहे, ते आपण कुशल मनुष्यबळ मात्र बनवायला हवे.....
कुमार ह्यांचे विचार योग्य
कुमार ह्यांचे विचार योग्य आहेत.
आपण ठरवून पण लोकसंख्या वाढणार नाही.
ना आपण ठरवून ती कमी होणार आहे.
प्रतेक गोष्टी ची उच्च value असते त्या पुढे वाढ होत नाही.
जसे प्रकाशाचा वेग ही वेगाची उच्च स्थीती आहे त्या पेक्षा जास्त वेग असू च शकत नाही.
जेव्हा आपण जास्त लोकसंख्या
जेव्हा आपण जास्त लोकसंख्या वाढली कमी केली पाहिजे असे म्हणतो तेव्हा.
त्याचा संदर्भ देशाच्या लोकसंख्या शी असतो.
पण वाढत्या लोकसंख्येचे जे दुष्परिणाम होतात .
ते संदर्भ सर्व ठिकाणी लागू होतात.
शहरात एकवट नारी प्रचंड लोकसंख्या आणि त्या मुळे निर्माण होणाऱ्या समस्या ह्या पण त्याच स्वरूपाच्या असतात.
भारताची लोकसंख्या ७० कोटी वर आली आणि मुंबई ची लोकसंख्या दोन ची तीन करोड झाली तर .
समस्या आहे तिथेच असतात.
त्या बदलत नाहीत.
भारताची लोकसंख्या 1947 ते
भारताची लोकसंख्या 1947 ते 1981 ह्या 34 वर्षात double झाली .
71 करोड 1981.
पण 1981 ते 2023 ह्या 42 वर्षात double झाली .
म्हणजे वेग तर कमी होत आहे .
पुढील दहा वर्षात अजून वेग कमी होईल.
Pages