लोकसंख्या

दोन, एक की शून्य ?

Submitted by साद on 3 October, 2019 - 09:54

भारत आणि चीन या देशांच्या लोकसंख्या अवाढव्य झाल्याने तो एक चिंतेचा विषय असतो. चीनने काही काळ सक्तीचे धोरण राबवून लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडच्या खुल्या लोकशाहीमुळे आपण जोडप्यांच्या अपत्यांच्या संख्येवर काही निर्बंध घालू शकत नाही. थोडक्यात याबाबत्त आपण राष्ट्रीय असे सक्तीचे धोरण काही ठरवू शकत नाही. त्यामुळे शेवटी हा प्रश्न प्रबोधनाने सोडवावा या निष्कर्षावर आपण येतो. सुशिक्षित वर्ग यासंदर्भात खूप जागरूक आहे आणि असे बरेच लोक आता ‘एकच मूल पुरे’ हे धोरण पाळताना दिसतात.

विषय: 
शब्दखुणा: 

लोकसंख्येवर ( लिहून) बोलू काही.

Submitted by परत चक्रम माणूस on 25 July, 2019 - 00:52

आपल्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटींवर गेली आहे. सद्यस्थितीत आणखी बऱ्याच कोटींची भर पडली आहे. पुर्वीचं एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती येऊन दशकं लोटली. आता प्रत्येकाला स्वतंत्र घर हवं असतं. एका घरात स्वतंत्र खोल्या हव्या आहेत. स्वतंत्र गॅजेट्स, वाहनं असे स्व मालकीचं असावं यासाठी सगळा आटापिटा चाललेला दिसतोय.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लोकसंख्या