भारत आणि चीन या देशांच्या लोकसंख्या अवाढव्य झाल्याने तो एक चिंतेचा विषय असतो. चीनने काही काळ सक्तीचे धोरण राबवून लोकसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण आपल्याकडच्या खुल्या लोकशाहीमुळे आपण जोडप्यांच्या अपत्यांच्या संख्येवर काही निर्बंध घालू शकत नाही. थोडक्यात याबाबत्त आपण राष्ट्रीय असे सक्तीचे धोरण काही ठरवू शकत नाही. त्यामुळे शेवटी हा प्रश्न प्रबोधनाने सोडवावा या निष्कर्षावर आपण येतो. सुशिक्षित वर्ग यासंदर्भात खूप जागरूक आहे आणि असे बरेच लोक आता ‘एकच मूल पुरे’ हे धोरण पाळताना दिसतात. मात्र काही सुशिक्षित जोडप्यांचा ‘एकाला दुसरे भावंड हवेच’ यासाठी आग्रह असतो आणि तो पुरा करून ते या विषयाला पूर्णविराम देतात. अशिक्षितांची आणि काही प्रमाणात ग्रामीण लोकांची याबाबत विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. तूर्त मी या विचारभिन्नतेला बाजूस ठेवत आहे. काही सुशिक्षित लोक या मुद्द्याबाबत किती संवेदनशील असू शकतात याची काही उदाहरणे मी देणार आहे. किंबहुना तोच या लेखाचा हेतू आहे.
माझ्या माहितीत एक कुटुंब आहे. त्यांचा दरवर्षी १५ ऑगस्टला एक कौटुंबिक मेळावा असतो. त्यातील एक आकर्षण म्हणजे या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तेव्हा त्या वर्षीचा एक ‘संकल्प’ जाहीर करतो आणि पुढे वर्षभरात तो अमलात आणतो. हा संकल्प कुठल्या ना कुठल्या विधायक कामाशी निगडीत असतो. या कुटुंबात दोन विवाहित भाऊ आहेत. त्यापैकी काही वर्षांपूर्वी मोठ्या जोडप्याने केलेला संकल्प असा होता.
या जोडप्याला स्वतःची पहिली मुलगी आहे. लोकसंख्येच्या प्रश्नावर संवेदनशील असल्याने आपल्याला दुसरे मूल होऊ देणे त्यांना काही पटत नव्हते. त्याचबरोबर आपल्या मुलीस भावंड हवे असेही त्यांना वाटे. या प्रश्नावर त्यांनी एक तोडगा काढला. दुसऱ्या अपत्यास जन्म देण्याऐवजी त्यांनी दुसरे मूल अनाथालयातून दत्तक घेण्याचा संकल्प केला आणि तो लवकरच अमलातही आणला. त्यातही कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी मुलगीच दत्तक घेतली. त्यांच्या या निर्णयाचे बरेच कौतुक झाले.
या घटनेला दोन वर्षे उलटली. त्या दरम्यान धाकट्या भावाचे लग्न झाले. तोही मोठ्याप्रमाणेच याबाबत संवेदनशील. तेव्हा त्यांच्या वार्षिक संकल्पदिनी तोही त्याचा संकल्प जाहीर करण्यास उत्सुक होता. याबाबत बहुधा त्याने लग्न करतानाच होणाऱ्या बायकोशी त्याचे धोरण स्पष्ट केले असावे. त्याला आपल्या भावाच्या पुढे एक पाउल टाकायचे होते. तेव्हा त्याने जाहीर केले की, ते दांपत्य स्वतःला एकही मूल होऊ देणार नाही. पण त्याचबरोबर लग्नाचे पहिल्या वाढदिवशी अनाथालयातून एक मुलगीच दत्तक घेईल. त्याच्या पत्नीनेही या निर्णयास पूर्णपणे पाठींबा दिला. त्यांनी तो निर्णय यथावकाश अमलात आणला हे वेगळे सांगायला नकोच.
आता या घटनेला बरीच वर्षे उलटलीत. दोघाही भावांचे संसार उत्तम चालू आहेत. मोठ्याचे कुटुंबात दोन्ही मुलींना अगदी समान वागणूक व प्रेम मिळते. एखाद्या परक्या व्यक्तीस त्या दोन्ही मुली या सख्ख्या बहिणी नाहीत, अशी पटकन शंकाही येत नाही.
आता पाहू पुढचे उदाहरण. हा एक अभियंता आहे. आर्थिक स्थिती उत्तम. जसा तो स्थिरस्थावर झाला तसा त्याच्या पालकांनी त्याच्यामागे लग्नाचा लकडा लावला. २-३ वर्षे त्याने “बघू सावकाश, काय घाई आहे”, असे म्हणत तो विषय टाळला. पुढे त्याची तिशी उलटली. आता त्याचे पालक तर अधीर पण तो एकदम निवांत ! अखेर त्याने त्याचा मानस पालकांपुढे उघड केला. लोकसंख्येच्या विषयावर तो खूप संवेदनशील होता. त्यामुळे लग्न करायला हरकत नाही, पण मूल अजिबात नको हा त्याचा निर्धार होता. शक्यतो त्याला दत्तकच्याही फंदात पडायचे नव्हते. या निर्णयाला पाठींबा असलेली मुलगी तो लग्नासाठी शोधत होता. पण अद्याप त्याला यश येत नव्हते. त्याने संपर्क केलेल्या मुलींनी “एकतरी हवेच”, “दत्तक अजिबात नको”, अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्याने यावर खोलवर विचार केला. एक गोष्ट त्याला जाणवली की पुरुष जितका याबाबत निरिच्छ होऊ शकतो तेवढे स्त्रीचे सोपे नसते. त्यामुळे जर त्याच्या विचाराची मुलगी मिळत नसेल तर त्याला अविवाहित राहायला आवडेल. आता पुढची १-२ वर्षे त्याचा पालकांशी वैचारिक संघर्ष झाला. पण तो त्याच्या विचारांशी ठाम होता. त्याला अपेक्षित अशी वधू काही मिळाली नाही. आता त्याने कायम अविवाहित राहण्याचे ठरवले आहे.
त्याच्या सारख्याच विचाराचे एक अविवाहीत माजी सैन्याधिकारी माझ्या पाहण्यात आहेत. आता ते सत्तरीचे आहेत. एकदा त्यांच्याशी या विषयावर निवांत गप्पा झाल्या. त्यांच्या तरूण वयात ते देशभक्तीने झपाटले होते. त्यात भर म्हणजे लोकसंख्येच्या विषयावर अति संवेदनशील. ते म्हणाले, “ ४० वर्षांपूर्वी लग्न हवे पण मूल नकोच असा विचार असणारी मुलगी मिळणे खूप अवघड होते. त्यात मीही दुसऱ्या बाजूने विचार केला. मूल असणे ही स्त्रीची निसर्गसुलभ आवड असते. स्त्रीच्या शरीरधर्मानुसार मूल असल्याचे काही फायदेही तिला मिळतात. तेव्हा उगाच आपले विचार एखादीवर लादायला नकोत. त्यापेक्षा मी एकटा सुखी राहीन”.
मध्यंतरी एका प्रकल्पाच्या निमित्ताने काही कॉलेजच्या मुलांशी अनौपचारिक गप्पा झाल्या. आपल्याकडील गरीबी, बेरोजगारी इ. विषयांवर बोलता बोलता गाडी स्वाभाविकच लोकसंख्येवर घसरली. त्यातले एकदोघे आता अधिकच तावातावाने बोलू लागले. मग एकजण उपरोधाने म्हणाला, “ खूप बाबतीत आपण अजून परावलंबी आहोत. साऱ्या जगाला लाजवेल असे आपले एकच उत्पादन आहे, ते म्हणजे आपली लोकसंख्या निर्मिती !” शिक्षण संपल्यावर या तरुणांची परदेशात स्थायिक व्हायची इच्छा आहे. पुढे जाऊन ते म्हणाले, “ जर का आम्हाला एखाद्या समृद्ध देशात स्थायिक होता आले तरच आम्ही एखाद्या मुलास जन्म द्यायचा विचार करू. पण जर का भारतातच राहावे लागले, तर उगाचच अजून मुले जन्मास घालण्यात काय अर्थ आहे?”
...
वर उल्लेखिलेले सर्वजण सुशिक्षित आणि शहरी आहेत. आपली लोकसंख्या बेसुमार होण्यास कोण जबाबदार आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्या आपापल्या घरांत गेल्या पिढीत कुटुंबनियोजनाचा अवलंब झालेला आहे. त्यांना एखादेच भावंड आहे. तरीसुद्धा ते या विषयावर खूप संवेदनशील आहेत. त्यांच्यासारखे विचार असणारे लोक आपल्या देशात अजून तरी अल्पसंख्य आहेत. अशा मूठभर लोकांनी एखाददुसऱ्या अपत्यास जन्म दिला तर देशावर काही आभाळ कोसळणार नाही. तरीसुद्धा त्यांना असे वाटते. इतर बहुसंख्य कसे का वागेनात, पण आपण स्वतःवर निर्बंध घालावा असे त्यांना मनोमन वाटते. आपल्याकडून आपण निदान एकने तरी लोकसंख्या वाढू दिली नाही तरी त्यांना त्याचे समाधान आहे. म्हणून मला ही सर्व मंडळी वैशिष्ट्यपूर्ण वाटली.
आपण सुशिक्षित जेव्हा या विषयावर चर्चा करतो, तेव्हा त्याचा सूर साधारण असा असतो. आपली लोकसंख्या खूप वाढवण्यास आर्थिक-सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ लोक, विशिष्ट विचारांचे लोक आणि ‘वंशाचा दिवा’ असल्या मागास विचारांचे लोक हे जबाबदार आहेत. ते जर विचारांनी सुधारत नसतील तर आपण फार गांभीर्याने कशाला विचार करायचा? आपण तशीही मोजूनमापूनच मुले जन्मास घालत असतो. त्यामुळे खरे दोषी ‘ते’ लोक आहेत. विशिष्ट लोकांनीच नियोजन करीत राहिल्यास सामाजिक असमतोल होतो ......वगैरे वगैरे.
लेखात उल्लेखिलेल्या मंडळींनी या ठराविक चर्चेस छेद दिला आहे. जे आपल्याकडून होण्यासारखे आहे ते आपण का करू नये असा सवाल ते उपस्थित करतात. त्यांचे विचार अतिरेकी वाटू शकतील, ते योग्य की अयोग्य यावरही काथ्याकूट होऊ शकतो. मला ते वेगळे वाटले एवढेच.
तुम्हाला काय वाटते?
. स्त्रियांचं सबलीकरण होऊन
. स्त्रियांचं सबलीकरण होऊन लोकसंख्यावाढीचा वेग आटोक्यात आलेला तुम्हांला नकोय का?
हा सर्वोत्तम मार्ग आहे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचा मान्य आहे .
पण ह्या कारणाचा उपयोग वेळकाढू पना करण्या साठी होतोय हे पण थोडफार सत्य आहे .
तुम्ही जी मार्ग सांगितला आहे महिला सबलीकरणाचा त्याला १००% यश येण्यासाठी अजुन 100 वर्ष पण कमी पडतील .
मी माझा मुद्दा रेटत नाही तुमच्या vicharnacha
सुद्धा आदर आहे .
बरं. समोर असलेल्या
बरं. समोर असलेल्या आकडेवारीपेक्षा तुमच्या धारणांवरच तुमचा अधिक विश्वास आहे.
दोन, एक की शून्य ?..मला वाटले
दोन, एक की शून्य ?..मला वाटले होते कुठली तरी नवीन मालिका येतिये
लोकशाहीमधे ज्याचा त्याचा प्रश्न. लोकशाही देशांमधे महिला सबलीकरण लवकर अॅचिव्ह होते.
हुकुमशाहीमधे वरुन आदेश येतील तसे.
> Submitted by भरत. on 4
> Submitted by भरत. on 4 October, 2019 - 09:47 > +१
> Submitted by साद on 4 October, 2019 - 10:13 > कोणी डॉक्टर हे कन्फर्म करेल का?
प्रश्न ज्याचा त्याचा.
प्रश्न ज्याचा त्याचा.
त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची जबाबदारी सरकारची .
आणि त्रास स्वयं शिस्त असलेल्या आणि जबाबदारीची , आणि प्रश्नाची तीव्रता समजणाऱ्या समाजाला .
लोकशाही मध्ये नक्कीच हे अपेक्षित नाही
लोकशाही - कोणावरही कोणताही
लोकशाही - कोणावरही कोणताही निर्णय न लादणे.
तुम्ही त्यांना persuade करू शकता. कमी मुलांना जन्माला घालण्यात फायदा दाखवून तो पोचवू शकता. त्यांचं प्रबोधन करू शकता.
स्वयं शिस्त असलेल्या आणि
स्वयं शिस्त असलेल्या आणि जबाबदारीची , आणि प्रश्नाची तीव्रता समजणाऱ्या समाजाला ...कोणे एके काळी हा समाज देखील दहा दहा मुले जन्माला घालत होता. शिक्षित झाला तसे आपोआप त्यांनी लोक्संख्या आटोक्यात आणली. इतरांना शिक्षण द्याल तर ते देखील ह्या समजुतदार समाजात येतील.
एकाला दुसरा असावा म्हणजे
एकाला दुसरा असावा म्हणजे दुप्पट.शून्य मध्ये कुटुंhiबाच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे एक ठीक. भावंडांची हौस ही कम्युनिटी लाइफ वर भागवता येते
हायला, संजय गांधी जगते अजून
हायला, संजय गांधी जगते अजून काही वर्षं, तर लोकसंख्येचा प्रश्न कधीच सुटला असता. पण बिचाऱ्यांना फार कमी आयुष्य मिळाले.
पण बिचाऱ्यांना फार कमी आयुष्य
पण बिचाऱ्यांना फार कमी आयुष्य मिळाले.
त्यांच्या मृत्यू वर खूप लोकांनी संशय व्यक्त केला होता
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
तुम्ही उत्तरसहित प्रश्न उपस्थित kelat.
ही एकाधिकार shahi झाली .
प्रश्न पण तुमचं आणि उत्तर पण तुमचेच .
Just joke
प्रत्येक जण प्रत्येकाकडे
प्रत्येक जण प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने बघतो आता त्या मुळे कम्युनिटी लाईफ अस्तित्वात नाही.
अशी स्थिती का निर्माण झाली ह्याचा संबंध सुधा लोकसंख्या वाढ ह्या प्रश्र्नाशी जोडता येईल
Submitted by साद on 4 October
Submitted by साद on 4 October, 2019 - 10:13 > कोणी डॉक्टर हे कन्फर्म करेल का?
>>>>
स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढवणारे घटक :
१. पाळी १३ वर्षे वयाच्या आत सुरु होणे
२. अजिबात मूल न होणे
३. पहिले गरोदरपण बरेच उशीराच्या वयात येणे
४. रजोनिवृत्ती उशीराने होणे .
या सर्वांना Risk factors म्हणतात.
धन्यवाद डॉक.
धन्यवाद डॉक.
पण एक मुलाऐवजी दोन मुलं असल्याने स्तनकर्करोगचा धोका कमी होतो का?
दोन ऐवजी तीन असल्यास तो अजून जास्त कमी होतो का?
अॅमी,
अॅमी,
चांगला प्रश्न. तुमच्या प्रश्नाचे सर्वसाधारणपणे उत्तर “हो” असे आहे.
आता ते का ते समजून घेऊ.
स्त्रीमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेसटेरॉन ही २ हॉर्मोन्स असतात. त्यातील इस्ट्रोजेनचा प्रभाव अति आणि दीर्घकाळ राहिल्यास स्तन-कर्करोगाची शक्यता वाढते. त्यामुळे अशी एक स्त्री नजरेसमोर आणा :
• पाळी ११व्या वर्षीच सुरु + एकही मूल नाही + रजोनिवृत्ती ५५ व्या वर्षी .
तर तिच्यात इस्ट्रोजेनचा प्रभाव नको इतका दीर्घकाळ राहतो. >>> रोगाचा धोका वाढतो.
म्हणूनच, मूल होणे, नैसर्गिक प्रसूती होणे, अंगावर व्यवस्थित पाजणे या सर्व गोष्टी स्त्रीचे आरोग्यास हितकारक आहेत.
(नैसर्गिक प्रसूतीचा फायदा अन्य प्रकारे आहे. कर्करोगाशी संबंध नाही.)
डॉक्टर ,
डॉक्टर ,
अनेक धन्यवाद. उपयुक्त माहिती दिलीत.
डॉक्टर ,
ड पो
जास्त मुलं जन्माला घालणं
जास्त मुलं जन्माला घालणं स्त्रीच्या आरोग्याला चांगले आहे हे म्हणताना, आपण नैसर्गिक जीवन पद्धती मागे टाकून बरंच कृत्रिम जीवनशैली कडे वळलो आहोत. जन्म घेतलेल्या माता पिता यांच्यापासून ते आजूबाजूचा निसर्ग, समाज यावर मुलांचं भवितव्य अवलंबून असतं. दरिद्री आई-बाप, शेतीवाडी, घर जमीन जुमला नाही अशा परिस्थितीत मुलांना किती संघर्षाला तोंड द्यावे लागते याची कल्पनाच केलेली बरी.
सोमा,
सोमा,
तुमचा मुद्दा बरोबर आहे. त्यामुळे ‘जास्त मुले’ याचा अर्थ आपण ‘दोन पुरे’ इतकाच घेऊया !
गरीब कु टुंबांत हे खर्च नगण्य
गरीब कु टुंबांत हे खर्च नगण्य असतात. मुलं लहान वयातच काम करू लागतात. ती उत्पन्नात भर घालतात >> हो, हेच कारण असणार कितीही दुर्दैवी असले तरी.
भरत, निम्नवर्गाला इथे कोणी हिणवले आहे असे वाटले नाही, तुम्हाला असे का वाटले?
वरच्या दुव्यात जननदर सध्या कमी आहे हे आत्तातरी अनुकुलच आहे कारण बहुतेक समस्या अफाट लोकसंख्येशी निगडीत झाल्यात.
आणि अजुन एक गोष्टही, श्रीमंत देश जास्त उधळपट्टी करतात. या देशात पाहिलंय. आहे, रिसायकल आहे, पण तरीही जो प्लास्टिक कचरा कचर्यात जातोय तो पाहुन हळहळ वाटण्याशिवाय काहीही करता येत नाही. एक एक उदाहरण.
सुनिधी , तुम्ही हिणवले नाही.
सुनिधी , तुम्ही हिणवले नाही. पण इतर पोस्ट्स आहेत.
आपल्या लोकसंख्यावाढीचा दर
आपल्या लोकसंख्यावाढीचा दर खाली आला पण प्रत्यक्ष लोकसंख्या वाढायची थांबलेली नाही. वरवर विरोधाभासी दिसणाऱ्या या विधानाचे छान स्पष्टीकरण या लेखात आहे:
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/to-preven...
Dr कुमार
Dr कुमार
बरोबर आहे .
मी पण लेखात जे लिहल आहे तेच सांगायचं प्रयत्न केला होता वरील दोन पोस्ट मध्ये .
पण मला ते नीट मांडता आले नाही .
पूर्ण देशाच्या
लोकसंख्येची सरासरी काढून लोकसंख्या वाढीचा दर ठरवू नका .
ज्या राज्यांची लोकसंख्या प्रचंड आहे तेच आकडे गृहीत धरावेत .
तीच लोक देशभर विखुर तात आणि कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांची आकडेवारी मध्ये भास निर्माण करतात .
फक्त तरुण लोकसंख्या जास्त असली की विकास होत नाही ती शिक्षित आणि स्किल्स develop झालेली असावी तशी नसेल तर अजुन गरिबी मध्ये भर पडेल .
हे सर्व माझ्या पोस्ट मध्ये होत
@ डॉ. कुमार,
@ डॉ. कुमार,
दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे सध्याचा २.२ हा जननदर २.१ किंवा त्याहून कमी झाल्यास लोकसंख्या स्थिरावणार असे त्या लेखात म्हटले आहे.
@ राजेश १८८,
तुमचाही मुद्दा समजला.
धन्यवाद !
<<< श्रीमंत लोकांसाठी. लग्न,
<<< श्रीमंत लोकांसाठी. लग्न, एकच जोडीदार असणे, संपत्ती, वाटणी हे सगळंच अनैसर्गिक आहे. >>>
अनैसर्गिक? म्हणजे काय?
<<< उगाचच अजून मुले जन्मास घालण्यात काय अर्थ आहे?” >>>
का अर्थ नाही? माझ्या समाधानासाठी मी ०, १, २ किंवा १० मुले जन्माला घातली तर काय प्रॉब्लेम आहे? हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक चॉईस आहे.
<< आपल्या लोकसंख्यावाढीचा दर खाली आला पण प्रत्यक्ष लोकसंख्या वाढायची थांबलेली नाही. >>>
याचे कारण मूळ लोकसंख्याच इतकी प्रचंड आहे. १ लाखावर २ टक्के व्याजसुद्धा १००० वर ५ टक्क्यांपेक्षा जास्त असते, तसेच काहीसे.
> Submitted by कुमार१ on 4
> Submitted by कुमार१ on 4 October, 2019 - 16:31 > धन्यवाद डॉक्टर.
> अनैसर्गिक? म्हणजे काय? >
"संपत्ती कमी लोकांत विभागली गेली तर -> निसर्ग बघुन घेईल की! सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट हा दांडुका सगळी कडे समान बसतो.
∆ हा रिस्की विचार वाटतोय श्रीमंत लोकांसाठी. लग्न, एकच जोडीदार असणे, संपत्ती, वाटणी हे सगळंच अनैसर्गिक आहे." <- या सर्व वाक्यांचा एकत्रित अर्थ "लग्न, एकच जोडीदार, संपत्ती, वाटणी(वारसा) या सर्व मानवनिर्मित पद्धती (त्यामुळे अनैसर्गिक)आहेत. त्या पद्धती/नियम वापरून, एखाद्या अनैसर्गिक सिस्टीमचा भाग बनून मग नंतर 'निसर्ग बघुन घेईल की! सर्वायव्हल ऑफ फिटेस्ट हा दांडुका सगळी कडे समान बसतो' असा विचार करणे हे श्रीमंतांसाठी रिस्की आहे.
>>>>>.लग्न, एकच जोडीदार असणे,
>>>>>.लग्न, एकच जोडीदार असणे, संपत्ती, वाटणी हे सगळंच अनैसर्गिक आहे." >>>>
वरील चर्चेत ‘लग्न ही अनैसर्गिक व्यवस्था आहे’, हा मुद्दा आलेला आहे. हे विधान अगदी नैसर्गिक आहे आणि वाचायला छान वाटते. पण, संततीची आर्थिक जबाबदारी या महत्वाच्या गोष्टीसाठी ती व्यवस्था जगभरात आणली गेली. संततीचे पालनपोषण ही स्त्री-पुरुषाची संयुक्त जबाबदारी आहे याचे भान विवाह-कायद्याने आले.
आता लग्नाविना सहजीवन या व्यवस्थेत जर मुले जन्माला घातली तर मुलांच्या पालनाबाबत सामाजिक गोंधळ होऊ शकतो. तसा होऊ न देण्यासाठी वेगळे कायदे करावे लागतील. म्हणजे पुन्हा एक कायद्याची ‘ अनैसर्गिक’ व्यवस्था स्वीकारावी लागते.
तसेही लग्नाचे किमान वय १८ व २१ हे शरीरधर्मानुसार अनैसर्गिकच आहे. पण मुले पोसायची आर्थिक सक्षमता या मुद्द्यावर अनैसर्गिक कायदा करावा लागतो.
मटातल्या त्या लेखातलं फक्त
मटातल्या त्या लेखातलं फक्त एकच वाक्य का उचलायचं ?
हेही पहा : कौशल्याने आणि शिक्षणाने विकसित पिढ्या निर्माण झाल्यावर लहान कुटुंबाची संकल्पना मूळ धरेल आणि टिकेल. हेच प्रयत्न लोकसंख्यावाढीचा प्रश्न सोडवायला मदत करतील. (हेच मी कितीदा लिहिले )
अविकसित राज्यांत शिक्षण आणि आरोग्यसेवेचा अभाव आहे. बालमृत्यूदर अधिक आहे. कुपोषणही. ही जननदर अधिक असण्याची कारणे आहेत.
<जेव्हा लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा सर्व संसाधनांवर अतिरिक्त ताण येतो हे सर्वज्ञात आहे.> संपत्तीच्या असमान वाटपामुळेही संसाधनांचा अयोग्य आणि अतिरिक्त वापर होतो.
अनेकांनी सक्तीच्या कुटुंबनियोजनाला पसंती दर्शवली आहे. पण यामुळे स्त्री भ्रूणहत्या आणि बालिकाहत्येचे प्रमाण वाढेल. चीनमध्ये याबरोबरीनेच मुलींना टाकून देण्याचे प्रमाणही वाढले होते? हे व्हायला हवे आहे का?
कुटुंबनियोजन ही बाब वैयक्तिक,
कुटुंबनियोजन ही बाब वैयक्तिक, खासगी व नाजूक असल्यामुळे कुटुंबाचा आकार किती असावा, हा निर्णय दाम्पत्याने विचारपूर्वक घ्यायचा असतो. म्हणूनच ‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ हा कायदा मवाळ, मृदू, संथ स्वरूपाचा आहे. पण चीनमध्ये दुर्दैवाने अत्यंत कठोरपणे, कडक स्वरूपात याची अंमलबजावणी केली जात आहे. आपल्याकडे आणीबाणीनंतर भारतात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्या पराभवामागील महत्त्वाचे कारण होते आणीबाणीत झालेल्या कुटुंबनियोजन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत झालेला अतिरेक, जबरदस्ती, सक्ती. त्यामुळे त्यानंतर कोणतेही शासन शहाणपणाने त्या उपायांचा उच्चार, विचार, प्रसार करायला धजत नाही आणि यापुढे धजणार नाही. आणीबाणीचा हा महत्त्वाचा धडा होता. हे विसरून चालणार नाही. लोकशाहीत हे घडते, घडू शकते.
‘एक दाम्पत्य-एक अपत्य’ धोरणामुळे चीनच्या लोकसंख्येतील काम करणाऱ्यांची, श्रमजीवींची (वर्क फोर्सची) संख्या घटत आहे. प्रगती, विकास करू इच्छिणाऱ्या श्रमजीवींची मोठी संख्या ही कोणत्याही देशाचे सामर्थ्य असते. घटत जाणारी श्रमशक्ती व श्रम करू न शकणाऱ्या वृद्धांची वाढती संख्या, हे आजच्या चीनपुढील लोकसंख्याशास्त्रीय संकट आहे.
अर्थात ज्यांना लोकशाहीच मंजूर नाही, त्यांच्यासाठी हे लिहून उपयोग नाही.
धागालेखकाच्या व
धागालेखकाच्या व प्रतिसादकांच्या मताचा आदर करून एक मुद्दा मी इथे मांडू इच्छितो . मुले नकोत अथवा कमी हवीत अशा मताची पांढरपेशा हिंदू कपल्स वाढत आहेत हे लोकसंख्यावाढ अथवा पर्यावरण इत्यादी दृष्टिकोनातून योग्य भासत असले तरी या सगळ्याला एक दुसरी बाजू आहे . या प्रकाराने येणाऱ्या काळात फक्त हिंदून्ची लोकसंख्या कमी होत जाणार असून कथित शांतताप्रिय दाढीवाल्या गोलटोपीधारी समाजाची लोकसंख्या अतोनात वाढत आहे . त्यांच्यात असे कथित पर्यावरणवादी किंवा लोकसंख्या अन पृथ्वीचा विचार करणारे नवमतवादी अस्तित्वात नाहीत अथवा कुणी तसा विचार मांडला तर त्याला चिरडले जाते .
यामुळे लोकसंख्येचा असमतोल निर्माण होवून सध्याचे कथित अल्पसंख्याक भविष्यात बहूसंख्य होवून राज्यकर्ते बनण्गाचा धोका संभवतो . व तसे झाल्यास शरियत आणि जिझिया चे मध्ययुगीन अडाणी नियम पाळावे लागतील व हिन्दू धर्म पृथ्वीतलावरून नाहीसा होईल अशी सार्थ भीती आहे ....
ता. क . युरोपमध्ये ही भीती खरी होताना दिसत आहे .
यास्तव हिंदूनी किमान २ ते ३ मुले जन्मास घालावीत व त्यातील एक सैन्यात भरती करावे असा माझा आग्रहयुक्त सल्ला असेल .
Pages