ग्रेटा थन्बर्ग-पृथ्वीची वकील

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 01:27

ग्रेटा थन्बर्ग. एक अवघ्या सोळा वर्षांची चिमुकली. तिचे नाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. अगदी युरोपातील राजकारण्यांपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या पर्यावरणाबाबतच्या धोरणांतील चुकांवर तिने बोट ठेवले आहे. जगभरातील लाखो मुले आज तिच्या पाठिशी आहेत. कोण आहे ही ग्रेटा?
---

पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय, पृथ्वी धोक्यात आहे, अशी बोंब आपण नियमित मारत असतो. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणबाजीतून. पण, त्यासाठी नेमके काय करायचे आणि कोणी करायचे, याबाबतीत आपल्या कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह असते. हे सर्व एक तर सरकारने करावे, किंवा शास्त्रज्ञांनी त्यावर काहीतरी मार्ग काढावा अशी आपली अपेक्षा असते. सोशल मीडियावर व्यक्त होणे, थोडीबहुत आंदोलने करणे याव्यतिरिक्त आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीत आपण जगत असतो. पण, पृथ्वीवर आलेले हे संकट एका चिमुकलीला सहन झाले नाही. चोवीस तास ती त्याचाच विचार करू लागली. कोणी काही करेल याची वाट न पाहता तिने स्वत:पासून सुरुवात केली. तिचे हे आंदोलन इतके व्यापक बनले की आज जगभरातील लाखो मुले शाळा बुडवून तिच्या ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभागी होत आहेत. आज तिच्या आंदोलनाने जागतिक स्वरुप प्राप्त केले असून, जगभरातील देशांना, त्यातील राजकारणी, उद्योगपती, तज्ज्ञांना तिची दखल घेणे भाग पडले आहे. या चिमुकलीचे नाव आहे ग्रेटा थन्बर्ग.
स्वीडनमधील एका कलाकार दाम्पत्याची ही अवघी सोळा वर्षांची मुलगी. आई मलेना अर्नमान एक ऑपेरा सिंगर तर वडील लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माता. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाने ‘हवामान बदल’ हा शब्द प्रथम ऐकला. मानव प्रगत झाला पण त्यासाठी त्याने अवलंबलेल्या मार्गांनी पर्यावरणाची अतोनात हानी सुरू केली. वेगवेगळे कारखाने, वाहने यांतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातोय. त्याचे प्रमाण मर्यादेपलिकडे गेलेय. जंगलांना आगी लागताहेत. त्यात दुर्मिळ निसर्गसंपदा नष्ट होतेय, यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडलाय. ती याबद्दल वाचन करीत गेली. तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
ज्या वयात हसायचे, बागडायचे त्या वयात तिला पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पण, एक नववीतील मुलगी काय करू शकणार होती? तिला कदाचित माहिती होते की आपण फेकलेला दगड आभाळाला भेदू शकणार नाही. पण, पूर्ण ताकदीनिशी दगड भिरकावण्यास काय हरकत आहे? पुढच्याच महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरला स्वीडनमधील निवडणुका होत्या. निवडणुका होईपर्यंत शाळेतच जायचे नाही, असा तिने निर्णय घेतला. ती रोज घरून निघायची आणि स्वीडिश संसदेसमोरील एका झाडाखाली येऊन बसायची. हातात ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ असा स्वत:च लिहिलेला फलक घेऊन ती शाळेच्या वेळेत संसदेबाहेर बसू लागली. आधी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, तिने हार मानली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना हस्तलिखित पत्रके वाटू लागली. ‘तुम्ही माझे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात, म्हणून मला हे आंदोलन करावे लागतेय’ असा मजकूर त्यात लिहिलेला होता. जंगलांना लागलेल्या आगी आणि त्यामुळे वातावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यामुळे गेल्या वर्षी स्वीडनमध्ये २६२ वर्षांतील सर्वाधिक तप्त उन्हाळा पडला. स्वीडिश सरकारने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि पॅरिस कराराचे पालन करावे या तिच्या मागण्या होत्या.
सुरुवातीला तिने इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिच्या आंदोलनाचा फोटो टाकला. हळूहळू तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. तिच्या विषयाचे गांभीर्य लोकांना पटू लागले. पर्यावरण रक्षण या विषयावर काम करणारी सोशल मीडिया कंपनी ‘वुई डोन्ट हॅव टाइम’चा फोटोग्राफर इंगमर रेन्टझॉग याने तिचे फोटो त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले. त्याला हजारो व्ह्यूज मिळाल्या. नंतर त्याने तिचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर चालवले. लोकांमध्ये तिच्या आंदोलनाची चर्चा होऊ लागली. वृत्तपत्रे आणि चॅनलने तिच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि तिची ही मोहीम व्यापक बनली. स्वीडनच्या निवडणुका झाल्यानंतरही तिने दर शुक्रवारी आंदोलन सुरू ठेवले. सुरुवातीला तिला वेड्यात काढणारे तिचे मित्र-मैत्रिणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ लागले. देशोदेशीच्या माध्यमांनी तिची दखल घेतली. शाळांमध्ये चर्चा होऊ लागली. तिच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुले दर शुक्रवारी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेऊ लागली. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत २७० शहरांतील सुमारे २० हजार मुलांनी तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही युरोपपासून ते जपानपर्यंत लाखो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. भारतातही काही शाळांमधील मुले तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
ग्रेटा काही दिवसांतच अघोषित लीडर बनली. संपूर्ण युरोपात तिची कीर्ती पोहोचली. तिला मोठमोठ्या परिषदांमध्ये भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोवर वाढले. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगने आता इतके गंभीर रूप धारण केले आहे की मानवजातीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. तिच्या वयाच्या पिढीचे भविष्य बरबाद करण्यासाठी तिच्या पालकांच्या वयाची पिढीच जबाबदार आहे, असा तिचा स्पष्ट आरोप आहे. लंडनच्या संसदेत बोलताना तिने परखडपणे आपला मुद्दा मांडला. ‘तुम्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार आपल्याकडे चुका सुधारण्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल की आपले कोणतेच उपाय कामी येणार नाहीत.’
तिने हेही निदर्शनास आणून दिले की, पॅरिस करारानुसार विविध देशांनी मान्य केलेली ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची मर्यादा दरवर्षी १.५ सेल्सिअस आहे. ती अपुरी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. २०२० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसेस निर्मिती पूर्णपणे थांबली पाहिजे. ब्रिटिश संसदेत बोलताना तिने सरकारला अक्षरशः शब्दांत पकडले. ब्रिटनने ‘उत्सर्जन कमी करणे’ (lowering emmissions)असा शब्द वापरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी ते पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे तिने सुनावले. ‘युरोपियन इकॉनॉमिक अँड सोशल कमिटी’पुढे बोलताना तिने युरोपियन युनियनने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०३० पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत रोखण्याचा मुद्दा मांडला.
ग्रेटाच्या या कार्याबद्दल तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शालेय पुरस्कारांबरोबरच विविध संस्थांनी तिच्या कार्याची दाखल घेतली. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाने जगातील २५ सर्वात प्रभावी टीनएजरमध्ये तिची निवड केली. गेल्या मार्चमध्ये महिला दिनी तिला स्वीडनमधील ‘सर्वात महत्त्वाची महिला’ हा बहुमान प्राप्त झाला. यासह विविध पर्यावरण संस्था, वृत्तपत्रांनीही तिला गौरविले. तिच्या कार्याची सर्वात मोठी दखल म्हणजे स्वीडिश संसद आणि नॉर्वेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तिची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. याबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. एप्रिल २०१९ मध्ये ‘टाइम’ मासिकाने तिचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ब्रिटिश व्होग मासिकाच्या सप्टेंबर २०१९च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या १५ महिलांमध्येही तिचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण जागृती तर झालीच पण जगभरातील राजकारणी, धोरणी मंडळीलाही आपल्या चुका कळल्या आणि त्यांनी त्या मान्यही केल्या. याला ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हटले जात आहे. ज्या-ज्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन होईल, त्याचा वापर टाळण्याच्या तिच्या आग्रहामुळे अनेकांनी सायकली, रेल्वेचा वापर सुरू केला. ग्रेटाला २३ जानेवारी रोजी डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला. प्रसिद्ध टॉक शो टेडएक्स स्टॉकहोमद्वारे तिने आपले विचार जगभर पोहचविले. बर्लिनमध्ये तिला २५ हजार लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. तिला जर्मनीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. युरोपिअन पार्लमेंट, ऑस्ट्रेलियन वर्ल्ड समिट आर ट्वेंटीमध्येही तिला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात न्यूयॉर्क आणि चिली देशांत होणाऱ्या पर्यावरण परिषदेसाठी तिला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी तिने खास सोलर पॅनलवर चालणाऱ्या तराफ्यातून तब्बल १४ दिवसांचा प्रवास करीत अॅटलांटिक समुद्र पार केला, पण विमान किंवा मोटरबोट वापरली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवे तिने एक व्हिडीओ पोस्ट करीत भविष्यातील धोक्यांची कल्पना दिली. ‘प्रिय मोदी, पर्यावरणीय समस्यांवर तुम्ही आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे, नुसते बोलण्याची नाही. तुम्ही बोलता खूप पण प्रत्यक्ष परिणाम खूपच कमी दिसून येतो. तुम्ही पर्यावरण रक्षणात अपयशी होत आहात. असेच राहिले तर तुम्ही या जगातील सर्वात दुष्ट खलनायक ठराल, जे तुम्हाला कधीच नको असेल,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेटाने बुधवारी, दि. १८ सप्टेंबरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांची भेट घेतली. ओबामांना तिने आपल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ओबांनी तिच्यासाठी उच्चारलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकार दीड वर्षे कायदे स्थगित ठेवायला तयार आहे तर पूर्णपणे मागे का घेत नाही ?

दीड वर्षे स्थगित ठेवण्याच्या खेळीला आंदोलक भुलले नाहीत. नाहीतर या फसव्या खेळीला भुलून आंदोलन मागे घेतले असते तर पुन्हा असे आंदोलन उभारणे सोपे नाही. सरकारलाही दीड वर्षे आंदोलन उभे राहू नये यासाठी क्लूप्त्या करायला वेळ मिळाला असता. आणि आजचे मरण दीड वर्षाने पुढे ढकलले गेले असते इतकेच.

सरकारने फक्त हमी भावाचा समावेश कायद्यात करायला अथवा वेगळा कायदा करून या तीनही कायद्यांना हमीभाव लागू होईल असा मार्ग काढायला काय हरकत आहे ? सबुरीची भाषा करून आंदोलक आडमुठे आहेत असे भासवणे ही पण युक्तीच आहे. सरकार देखील आडमुठे करतेय हे पण कबूल करायला हवे ना ?
आणि खलिस्तानी कुठून आलेत ? त्याचा पुरावा तरी आहे का ?
टिकैत २०१४ साली जाटलॅण्ड मधले सर्वात मोठे हिंदू नेते होते. त्यांच्या सक्रीय सहभागामुळे आणि मुझफ्फरपूर दंग्यांमुळे भाजपला सत्ता मिळाली होती. आता तेच खलिस्तानी असतील तर हे सरकार खलिस्तानवाद्यांचे आहे का ?

ग्रेटा असेल किंवा रिहाना किंवा दिशा (जर ती प्लाण्ट केलेली नसेल तर) या मुलींचे वय आणि त्यांची समज पाहता त्यांच्याबद्दल आदरच असायला हवा. ग्रेटाचे शारीरिक वय मोजण्याची चूक तर मी कधीही करणार नाही. शाळेत जाण्याच्या वयात तिने केलेली कामगिरी असाधारण आहे.

हा शेवटचा

जर हे शेतकरी खलिस्तानी आहेत तर यांच्या विरोधात जे पोलीस उभे केले आहेत ते यांच्या लंगर मधे येऊन रोजच्या रोज का जेवतात ? पोलिसांनी खलिस्तान्यांकडून असे लाभ घेणे सरकारला चालते का ? त्यांच्यावर कारवाई नको का व्हायला ? हे रिपोर्ट्स सरकारचा गुप्त वार्ता विभाग नाही का कळवत सरकारला ?

https://www.youtube.com/watch?v=Fa_z6VsOpRI

बरं पोलीस तर खलिस्तान्यांसोबत जेवतातच.
पण सरकार पण त्यांच्या सोबत चर्चा करतं आणि दीड वर्षे कायदे पुढे ढकलण्याची घोषणा करतं. जर आंदोलक खलिस्तानी आहेत आणि कायदे शेतक-यांच्या भल्याचे आहेत तर सरकारने बॅकफूटवर का यावं ?
( आता मागचे प्रतिसाद फाट्यावर मारून पुन्हा दीड वर्षे मागे घेतले म्हणजे सरकार अमूक तमूक आणि आंदोलक अडेलतट्टू हा पाढा चालू होईल. त्यामुळे पुढच्या सर्व प्रश्नांना आगाऊ पास).

मला खरोखर या तीन मुलींचे आभार मानायचे आहेत. मी इथे लिहायला एक वेळ घाबरले होते. पण एक आपल्यापेक्षा ६/७ वर्षांनी लहान मुलगी जेलमधे जायला तयार होते आणि आपल्याला भीती वाटते याची शरम वाटली.

Greta advised the Chinese government to ban use of chopsticks to save trees. The Chinese asked her to go back to school because chopsticks are made from bamboos which are a grass. They advised her to stop using toilet tissues because they are made from trees. हे आत्ताच वाचले व येथे टाकावेसे वाटले.

हसं वाचलंत? आता हे पण वाचा
https://www.reuters.com/article/uk-factcheck-greta-thunberg-chopsticks-i...

There is no evidence teen climate activist Greta Thunberg made this statement about chopsticks. The claim has been circulating online since January 2020
-----
भाजप समर्थकांचे मेंदू काढून तिथे गोमेयाचे गोळे बसवले आहेत, असे आताच वाचले आणि इथे लिहावेसे वाटले.

एका सतरा अठरा किंवा फारतर एकोणीस वर्षाच्या मुलीच्या नादाला एका देशाचे सरकार इतपत नादाला लागत असेल आणि तिला असे उर्मट सल्ले देत असेल तर असल्या सरकारमधल्या नीच लोकांना तिथल्या जनतेनेच धडा शिकवायला हवा. मी चीनबद्दल बोलतेय. ग्रेटाने असा सल्ला दिला असेल तरी ती जीवनशैलीबद्दल बोलतेय. तिचे म्हणणे समजून घेण्याची कुवत नसलेल्या हुकूमशाहीला असे समजावून सांगणे म्हणजे भिंतीवर धडका मारण्यासारखे आहे. चॉपस्टीक पेक्षा हाताने खाणे (यात भारताचा गौरव नाही का ?) किंवा काट्या चमच्याने खाणे हे बांबूचे संवर्धन केल्यासारखेच आहे. निसर्गाची हानी नको असे तिचे म्हणणे आहे. तिला टॉयलेट पेपरचा मुद्दा पटेल. भारतीयांच्या सवयी तिला मार्गदर्शन वाटतील. कारण ती ओपन आहे.

मात्र ग्रेटा कशी मूर्ख आहे हे सांगण्यासाठी आपण ज्यांच्या मोबाईलवर बंदी घालायचे आवाहन करतो त्या देशाचे दाखले द्यावेसे वाटत असतील तर मग पुढे काय बोलायचे ? चीन वाईट आहे की ग्रेटामुळे हिरो आहे ?
मला तर काही समजेनासेच झालेय.

भाजप समर्थकांचे मेंदू काढून तिथे गोमेयाचे गोळे बसवले आहेत, असे आताच वाचले आणि इथे लिहावेसे वाटले.>>> कोणाविशयी काहीहि माहिती नसताना त्याना भाजप समर्थक व त्यान्चे मेन्दु शेणाने भरलेले आहेत असे लिहणे आपण सुसन्स्क्रुत नाही असे मात्र दाखवते.

https://pbs.twimg.com/media/EuTAX2kXMAIuo3l?format=jpg&name=large
ब्रिटनमधील भारतीय दूतावास ब्रिटिश नागरिकांना सांगतोय , फार्म लॉजबद्दल तुमच्या काही शंका असतील तर त्या दूर करायला आम्ही उत्सुक आहोत.

ब्रिटिश नागरिकांनी भारताच्या अंतर्गत बाबींत नाक खुपसण्याचे स्वागत केले जात आहे.

सचिन व लता मंगेशकर यांची चौकशी करण्याची धमकी देण्यासोबत महाविकास आघाडी सरकारने अजुन एक पाऊल उचललं आहे.
काँग्रेस पक्षाने आता अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना धमक्या दिल्या आहेत.
Maharashtra Congress chief Nana Patole has threatened that unless Bollywood superstars Amitabh Bachchan and Akshay Kumar criticise the BJP-led central government over rising prices of fuel, screening, shooting and release of their films in the state will not be allowed.

<< https://pbs.twimg.com/media/EuTAX2kXMAIuo3l?format=jpg&name=large
ब्रिटनमधील भारतीय दूतावास ब्रिटिश नागरिकांना सांगतोय , फार्म लॉजबद्दल तुमच्या काही शंका असतील तर त्या दूर करायला आम्ही उत्सुक आहोत.

ब्रिटिश नागरिकांनी भारताच्या अंतर्गत बाबींत नाक खुपसण्याचे स्वागत केले जात आहे.
>>

-------
ब्रिटनमधील भारतीय दूतावासाने अशी योजना भारतातही सुरु करावी जेणेकरुन फार्म लॉजबद्दल भारतातल्या नागरिकांच्या (विशेषत: दिल्ली / पंजाब/ हरियाणा/ उ. प्र/ बिहार/ महाराष्ट्र... येथे आंदोलन करणार्‍या लाखो शेतकर्‍यांचे) मनात असलेले गैरसमज दुर होतील.

लोकसभेत तसेच राज्यसभेत कुठलिही चर्चा न करता असे बिल पास करवून घेणे हे देशाला महागात पडत आहे. अर्थात who cares?

<< सचिन व लता मंगेशकर यांची चौकशी करण्याची धमकी देण्यासोबत महाविकास आघाडी सरकारने अजुन एक पाऊल उचललं आहे.
काँग्रेस पक्षाने आता अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांना धमक्या दिल्या आहेत. >>

----- अमिताभ / अक्षय यांच्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे.

लता मंगेशकर आणि सचिन यांना केंद्राने धमकावल्यावर त्यांनी ताबडतोड ट्विटले होते...

असे भारतरत्नांना तसेच फिल्म क्षेत्रातल्या दिग्गजांना धमकावणे योग्य नाही. निषेध.

असे भारतरत्नांना तसेच फिल्म क्षेत्रातल्या दिग्गजांना धमकावणे योग्य नाही. निषेध.

नवीन Submitted by उदय on 21 February, 2021 - 11:31

>>>>>>>>
सहमत,निषेध.

Screenshot_2021-02-21-12-27-26-869_com.android.chrome.png

>>>>>>
मान्य आहे त्याने ट्विट केले होते,पण धमकावणे योग्य नाही.
आता त्याला पेट्रोल महाग वाटत नसेल किंवा आणखी काही कारण असेल. त्यात तो भारताचा नागरिक नसल्याने त्याच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही.(भाजपच्या लॉजिक प्रमाणे)

BJP चा minority cell mumbai च अध्यक्ष च बांगलादेशी.
पदरी पडले आणि पवित्र झाले.
बहुतेक गो मूत्र शिंपडून त्याला पवित्र करून भारतीय केले असेल.

नवीन Submitted by Hemant 33 on 21 February, 2021 - 13:17
>>>>>>>
काय सांगता?

भाजप आणि त्यांच्या समर्थकांना नक्की कोणत्या गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिला आता?

<< नवीन Submitted by Hemant 33 on 21 February, 2021 - 13:17
>>>>>>>
काय सांगता?

भाजप आणि त्यांच्या समर्थकांना नक्की कोणत्या गोष्टीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिला आता?
>>

-------- बोलण्यासाठी नैतिक अधिकार लागतो हेच त्यांना मान्य नसेल तर ? Happy

Pages