ग्रेटा थन्बर्ग-पृथ्वीची वकील

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 01:27

ग्रेटा थन्बर्ग. एक अवघ्या सोळा वर्षांची चिमुकली. तिचे नाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. अगदी युरोपातील राजकारण्यांपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या पर्यावरणाबाबतच्या धोरणांतील चुकांवर तिने बोट ठेवले आहे. जगभरातील लाखो मुले आज तिच्या पाठिशी आहेत. कोण आहे ही ग्रेटा?
---

पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय, पृथ्वी धोक्यात आहे, अशी बोंब आपण नियमित मारत असतो. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणबाजीतून. पण, त्यासाठी नेमके काय करायचे आणि कोणी करायचे, याबाबतीत आपल्या कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह असते. हे सर्व एक तर सरकारने करावे, किंवा शास्त्रज्ञांनी त्यावर काहीतरी मार्ग काढावा अशी आपली अपेक्षा असते. सोशल मीडियावर व्यक्त होणे, थोडीबहुत आंदोलने करणे याव्यतिरिक्त आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीत आपण जगत असतो. पण, पृथ्वीवर आलेले हे संकट एका चिमुकलीला सहन झाले नाही. चोवीस तास ती त्याचाच विचार करू लागली. कोणी काही करेल याची वाट न पाहता तिने स्वत:पासून सुरुवात केली. तिचे हे आंदोलन इतके व्यापक बनले की आज जगभरातील लाखो मुले शाळा बुडवून तिच्या ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभागी होत आहेत. आज तिच्या आंदोलनाने जागतिक स्वरुप प्राप्त केले असून, जगभरातील देशांना, त्यातील राजकारणी, उद्योगपती, तज्ज्ञांना तिची दखल घेणे भाग पडले आहे. या चिमुकलीचे नाव आहे ग्रेटा थन्बर्ग.
स्वीडनमधील एका कलाकार दाम्पत्याची ही अवघी सोळा वर्षांची मुलगी. आई मलेना अर्नमान एक ऑपेरा सिंगर तर वडील लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माता. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाने ‘हवामान बदल’ हा शब्द प्रथम ऐकला. मानव प्रगत झाला पण त्यासाठी त्याने अवलंबलेल्या मार्गांनी पर्यावरणाची अतोनात हानी सुरू केली. वेगवेगळे कारखाने, वाहने यांतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातोय. त्याचे प्रमाण मर्यादेपलिकडे गेलेय. जंगलांना आगी लागताहेत. त्यात दुर्मिळ निसर्गसंपदा नष्ट होतेय, यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडलाय. ती याबद्दल वाचन करीत गेली. तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
ज्या वयात हसायचे, बागडायचे त्या वयात तिला पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पण, एक नववीतील मुलगी काय करू शकणार होती? तिला कदाचित माहिती होते की आपण फेकलेला दगड आभाळाला भेदू शकणार नाही. पण, पूर्ण ताकदीनिशी दगड भिरकावण्यास काय हरकत आहे? पुढच्याच महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरला स्वीडनमधील निवडणुका होत्या. निवडणुका होईपर्यंत शाळेतच जायचे नाही, असा तिने निर्णय घेतला. ती रोज घरून निघायची आणि स्वीडिश संसदेसमोरील एका झाडाखाली येऊन बसायची. हातात ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ असा स्वत:च लिहिलेला फलक घेऊन ती शाळेच्या वेळेत संसदेबाहेर बसू लागली. आधी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, तिने हार मानली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना हस्तलिखित पत्रके वाटू लागली. ‘तुम्ही माझे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात, म्हणून मला हे आंदोलन करावे लागतेय’ असा मजकूर त्यात लिहिलेला होता. जंगलांना लागलेल्या आगी आणि त्यामुळे वातावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यामुळे गेल्या वर्षी स्वीडनमध्ये २६२ वर्षांतील सर्वाधिक तप्त उन्हाळा पडला. स्वीडिश सरकारने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि पॅरिस कराराचे पालन करावे या तिच्या मागण्या होत्या.
सुरुवातीला तिने इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिच्या आंदोलनाचा फोटो टाकला. हळूहळू तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. तिच्या विषयाचे गांभीर्य लोकांना पटू लागले. पर्यावरण रक्षण या विषयावर काम करणारी सोशल मीडिया कंपनी ‘वुई डोन्ट हॅव टाइम’चा फोटोग्राफर इंगमर रेन्टझॉग याने तिचे फोटो त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले. त्याला हजारो व्ह्यूज मिळाल्या. नंतर त्याने तिचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर चालवले. लोकांमध्ये तिच्या आंदोलनाची चर्चा होऊ लागली. वृत्तपत्रे आणि चॅनलने तिच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि तिची ही मोहीम व्यापक बनली. स्वीडनच्या निवडणुका झाल्यानंतरही तिने दर शुक्रवारी आंदोलन सुरू ठेवले. सुरुवातीला तिला वेड्यात काढणारे तिचे मित्र-मैत्रिणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ लागले. देशोदेशीच्या माध्यमांनी तिची दखल घेतली. शाळांमध्ये चर्चा होऊ लागली. तिच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुले दर शुक्रवारी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेऊ लागली. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत २७० शहरांतील सुमारे २० हजार मुलांनी तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही युरोपपासून ते जपानपर्यंत लाखो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. भारतातही काही शाळांमधील मुले तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
ग्रेटा काही दिवसांतच अघोषित लीडर बनली. संपूर्ण युरोपात तिची कीर्ती पोहोचली. तिला मोठमोठ्या परिषदांमध्ये भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोवर वाढले. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगने आता इतके गंभीर रूप धारण केले आहे की मानवजातीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. तिच्या वयाच्या पिढीचे भविष्य बरबाद करण्यासाठी तिच्या पालकांच्या वयाची पिढीच जबाबदार आहे, असा तिचा स्पष्ट आरोप आहे. लंडनच्या संसदेत बोलताना तिने परखडपणे आपला मुद्दा मांडला. ‘तुम्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार आपल्याकडे चुका सुधारण्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल की आपले कोणतेच उपाय कामी येणार नाहीत.’
तिने हेही निदर्शनास आणून दिले की, पॅरिस करारानुसार विविध देशांनी मान्य केलेली ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची मर्यादा दरवर्षी १.५ सेल्सिअस आहे. ती अपुरी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. २०२० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसेस निर्मिती पूर्णपणे थांबली पाहिजे. ब्रिटिश संसदेत बोलताना तिने सरकारला अक्षरशः शब्दांत पकडले. ब्रिटनने ‘उत्सर्जन कमी करणे’ (lowering emmissions)असा शब्द वापरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी ते पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे तिने सुनावले. ‘युरोपियन इकॉनॉमिक अँड सोशल कमिटी’पुढे बोलताना तिने युरोपियन युनियनने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०३० पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत रोखण्याचा मुद्दा मांडला.
ग्रेटाच्या या कार्याबद्दल तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शालेय पुरस्कारांबरोबरच विविध संस्थांनी तिच्या कार्याची दाखल घेतली. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाने जगातील २५ सर्वात प्रभावी टीनएजरमध्ये तिची निवड केली. गेल्या मार्चमध्ये महिला दिनी तिला स्वीडनमधील ‘सर्वात महत्त्वाची महिला’ हा बहुमान प्राप्त झाला. यासह विविध पर्यावरण संस्था, वृत्तपत्रांनीही तिला गौरविले. तिच्या कार्याची सर्वात मोठी दखल म्हणजे स्वीडिश संसद आणि नॉर्वेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तिची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. याबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. एप्रिल २०१९ मध्ये ‘टाइम’ मासिकाने तिचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ब्रिटिश व्होग मासिकाच्या सप्टेंबर २०१९च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या १५ महिलांमध्येही तिचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण जागृती तर झालीच पण जगभरातील राजकारणी, धोरणी मंडळीलाही आपल्या चुका कळल्या आणि त्यांनी त्या मान्यही केल्या. याला ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हटले जात आहे. ज्या-ज्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन होईल, त्याचा वापर टाळण्याच्या तिच्या आग्रहामुळे अनेकांनी सायकली, रेल्वेचा वापर सुरू केला. ग्रेटाला २३ जानेवारी रोजी डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला. प्रसिद्ध टॉक शो टेडएक्स स्टॉकहोमद्वारे तिने आपले विचार जगभर पोहचविले. बर्लिनमध्ये तिला २५ हजार लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. तिला जर्मनीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. युरोपिअन पार्लमेंट, ऑस्ट्रेलियन वर्ल्ड समिट आर ट्वेंटीमध्येही तिला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात न्यूयॉर्क आणि चिली देशांत होणाऱ्या पर्यावरण परिषदेसाठी तिला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी तिने खास सोलर पॅनलवर चालणाऱ्या तराफ्यातून तब्बल १४ दिवसांचा प्रवास करीत अॅटलांटिक समुद्र पार केला, पण विमान किंवा मोटरबोट वापरली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवे तिने एक व्हिडीओ पोस्ट करीत भविष्यातील धोक्यांची कल्पना दिली. ‘प्रिय मोदी, पर्यावरणीय समस्यांवर तुम्ही आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे, नुसते बोलण्याची नाही. तुम्ही बोलता खूप पण प्रत्यक्ष परिणाम खूपच कमी दिसून येतो. तुम्ही पर्यावरण रक्षणात अपयशी होत आहात. असेच राहिले तर तुम्ही या जगातील सर्वात दुष्ट खलनायक ठराल, जे तुम्हाला कधीच नको असेल,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेटाने बुधवारी, दि. १८ सप्टेंबरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांची भेट घेतली. ओबामांना तिने आपल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ओबांनी तिच्यासाठी उच्चारलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भक्त अक्षयकुमारही कॅनडाचा नागरीक आहे. तो खलिस्तानी आहे का?

याचे उत्तर नाहि असेल, तर खलिस्तानी, भक्त, पुरोगामी, सामान्य जनता असे वेगवेगळे सबसेट कॅनडात अस्तित्वात आहेत एवढं बेसिक कळत नाही का? एका सबसेटमुळे इतरांनाही लस मिळु नये अशी इच्छा करणारे लोक "सर्वे संन्तु निरामयः" अशी प्रार्थना करणारे हिंदु आहेत का खरोखर? की उगाच धर्माच्या नावाखाली फक्त हाणामार्या करू बघणारे बदमाश?
हिंदुधर्म फाॅलो करायचा नाही, भारत सोडून अमेरिकेत पळून जायचं आणि तरी भारतीय हिंदुंना चिथवायचं, असले बदमाश हे!

"चाचाजान जर इतके ग्रेट होते तर त्यांच्या पक्षाला सत्ता का टिकविता आली नाही याचाही विचार करावा."
एकाच पक्षाची, वंशाची, घराण्याची सत्ता दशकानुदशके टिकत नसते. एखाद्या पक्षाचा प्रभाव साठ वर्षे टिकला तर तो खूप मोठा काळ मानायला हवा.
सध्याच्या आणि त्या आधीच्या सरकारला फारसा विरोध होत नाहीय. जो काही थोडाफार होतोय तो विकृतीकरण करून टिंगलीसाठी मॅग्निफाय होतोय सोशल मीडियावर, मुळे आणि कडून. आणि जेव्हा विरोध प्रबळ आणि प्रखर होतोय अशी स्थिती होते, तेव्हा मीडियाची मुस्कटदाबी केली जाते.

सुप्रसिद्ध औषधनिर्माणशास्त्र तज्ज्ञ मृदुला बेळे यांनी 'सिप्ला ' ह्या औषधी कंपनीवर एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. ते नुकतेच प्रकाशित झाले आहे. "अशीही एक झुंज", राजहंस प्रकाशन.
यात एकंदरीतच भारताच्या औषध निर्यातीसंबंधीच्या परराष्ट्रीय धोरणाचा उहापोह केला आहे. अविकसित राष्ट्रांना स्वस्तात जीवनदायी औषधे पुरवण्याची भारताची धोरणे पूर्वीपासूनच आहेत आणि आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत त्यामुळे कितीतरी जणांचे प्राण वाचले आहेत.
पुस्तक ओळखीसंबंधी लेखिकेचा एक लेख सध्या व्हॉट्स Ap वर आला आहे. वाचनीय आहे.

माझ्यासाठी खलिस्तानवादी वायले आणि कॅनडाचे नागरिक ज्यांना या लसीमुळे फायदा होणार आहे ते वायले.//

हे बेसिक माणुसकी असलेल्या सगळ्यांचंच मत असेल ना. माझ्या लिखाणात कुठे तुम्हाला कॅनडाचे नागरिक बेग करत होते असा उल्लेख आणि आनंद, त्यांना लस मिळू नये अशी इच्छा - असं दिसतंय का?
मी स्पेसिफिकली ट्रूडोबद्दल लिहिलं आहे ज्याने आपला खलिस्तानवादी कल दाखवला आहे. त्याचाच खलिस्तानवादी मंत्रीही आहे. विरोधी पक्षाकडून प्रेशर आल्यावर त्याने फोन केला, अन्यथा त्याला खलीस्तानप्रेमापुढे आपल्या लोकांना लस मिळते की नाही याचं प्राधान्य नव्हतं.

सनव, उगीच शब्दांचा खेळ नको. कॅनडाचे नागरिक काही मोदींना फोन करून लस मागणार नाहीत. मग सध्या जे त्यांचे पंतप्रधान आहेत भलेही ते खलिस्तानी लोकांना बढावा देणारे असतील त्यांनाच लसीविषयी बोलणी करायला लागणार. त्यात केवळ सध्या पंतप्रधान असलेला माणूस आपल्याला धार्जीणी धोरणं असलेला नाही म्हणून कॅनडाच्या नागरिकांना लस मिळू नये अशी अडवणूक भारत करत नाहीये हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि हेच मी मांडले आहे. अटी आणि शर्तींची भाषा तुमचीच आहे.

ट्रुडे रडत रडत मोदीजींना फोन करताहेत व मोदीजी "तुम भी क्या याद करोगे !" असे म्हणून लस्त पाठवत आहेत असे दृष्य डोळ्यासमोर आले !

जिज्ञासा,
गळे चिरणे वगैरे भाषा तुम्ही वापरली आहे, मी नाही. तसं काहीही भारताने केलेलं नाही. भारत फक्त स्वतःला डिफेन्ड करत आहे.
जसं ट्रम्पची खोड मोडल्याचा आनंद म्हणजे तमाम अमेरिकन लोकांबद्दल शत्रुत्व असा होत नाही तसाच ट्रूडोची खोड मोडल्याचा आनंद म्हणजे सामान्य कॅनेडियन लोकांना विरोध असा होत नाही.;

ट्रम्पची खोड , ट्रूडोची खोड Lol
हे सगळं वाचून ट्रम्प, ट्रूडो, मोदी वगैरे मंडळी सनव यांचे दीर, दाजी आणि मेव्हणे ( respectively) आहेत आणि सनव आपल्याला त्यांच्या घरातल्या गोष्टी सांगत आहे असं वाटतं.
Lol Lol

लस न देता खोड कशी मोडणार बरं? गळे चिरणे हे मी कोणत्या संदर्भात वापरलं आहे ते प्लीज पुन्हा एकदा वाचा - ही भाषा मी अमेरिका आणि चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलताना वापरली आहे आणि भारताने अशी धोरणे कधीही राबवू नयेत असाच विचार मी सतत मांडला आहे. ही खोड मोडली वगैरे वाटणे ही गळेकापू नीतीची पहिली पायरी असते. भारताच्या सुदैवाने तुमच्या या मताशी अजून तरी भारताचे धोरण सहमत नाही. देव करो आणि हे असेच राहो.

त्याला मोदींना फोन करावा लागला, भारतच आपल्याला लस देतोय हे आपल्या देशात सांगावं लागलं, विरोधी पक्षांनी प्रश्न विचारले. हेही 'खोड मोडणं' प्रकारातच येतं.
मोदींनी तरीही लस द्यायला नको होती असं मी लिहिलं असतं तर गोष्ट वेगळी. पण तसं काही कोणीच लिहिलेलं नाही.

ही खोड मोडली वगैरे वाटणे ही गळेकापू नीतीची पहिली पायरी असते. ////
हसू का रडू कळत नाही. ट्रम्पची खोड मोडली असं जगभरात अनेकांना वाटलं. ते सगळे काय अमेरिकेचा गळा कापायची परराष्ट्र नीती बनवतायत का? मतलब कुछ भी!

सनव.., तुमचे विचार फार वेगळे आहेत. असू देत. त्यांचाही आदरच आहे. पण माझी समजावण्याची शक्ती आत्तापुरती तरी संपली आहे. Rather I don't feel like making any more efforts to convince you. But I still believe in my philosophy and here let's really agree to disagree.

ओके.
आपली मतं भिन्न असली तरी तुम्ही सुसंस्कृत सभ्य भाषेत चर्चा करता (जे इथे फार कमी जणांना येतं!) याबद्दल धन्यवाद आणि आदर आहेच Happy

दोन मोठ्या देशांमधे एका वेळी ८-१० चर्चेचे धागे सुरू असतात. सरकारची विविध खाती त्यात असतात. त्यात कोणत्याही सरकारला आपल्या देशातील influential गटांच्या मागण्यांवर काहीतरी पोश्चरिंग करावेच लागते. जोपर्यंत यातील एखादा चर्चेचा धागा फार मोठा होत नाही तोपर्यंत हे स्वतंत्रपणे चालते. आता यावेळेस कॅनडाने आंदोलनाबद्दल काही बोलणे भारत सरकारला रूचले नाही - परराष्ट्र खात्याने त्याबद्दल नाराजी नोंदवली. लगेच आज कॅनडाकडून खुलासा आला की भारत सरकार आंदोलकांशी चर्चा करत आहे हे चांगले आहे. आता हे त्यांना आधी माहीत नव्हते का? ट्विट करणार्‍यांचे सोडा पण सरकारी पातळीवर थोडीफार पार्श्वभूमी माहीत करून घेतात. पण अशी वक्तव्ये नाराजी कमी करायला वापरली जातात.

आता यामुळे भारताने व्हॅक्सिन रोखली असती का? माहीत नाही. शक्यता कमी आहे. तशी वेळ आलीच तर कॅनडा एकवेळ व्हॅक्सिन मिळाली नाही तरी चालेल पण लोकशाही तत्त्वांशी आम्ही तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका घेइल का? त्या देशांतर्गत कोणते प्रेशर सरकारवर जास्त आहे यावर ते ठरेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात एक धोरण कायम व सगळ्या बाबतीत लागू असे कधीच नसते.

याचा संबंध आंदोलनाशी जोडता - कोणत्याही दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनात आपल्याकडे जत्रेत म्हणतात तसे हौशे, नवसे, गवसे - अनेक प्रकारचे लोक असतात. या आंदोलनातही खलिस्तानी आहेत, डावे आहेत, भाजप विरोधी आहेत. पण त्यांच्यापेक्षाही जास्त संख्येने स्वतःच्या मागण्या घेउन आलेले साधे भारतीय नागरिक आहेत. यातील काहींची मुले देशाकरता लष्करात आहेत. यांच्या मुलाखती ऐकल्या तर सरकार विरोध हा मुख्य मुद्दा नाही. सरकारने आमच्याशी बोलावे असेच बहुतांश लोक म्हणत आहेत. पण जर सरकार कायदे दीड वर्ष स्थगित करायला तयार आहे तर ते का मान्य नाही कल्पना नाही.

दुसरीकडे टिकैत यांचा भर किमान हमी किमतीवर आहे - हे कायदे त्यात थेट बदल करत नाहीत पण उद्या शेतकर्‍यांना हमी किमतीपेक्षा कमी दराने पीक विकावे लागू नये म्हणून आता ते महत्त्वाचे झाले आहे. असेही वाचले की आताही अनेकदा हमी किमतीच्या खाली माल विकावा लागतो. काल मोदी लोकसभेत म्हंटले की हमी किंमत राहणार आहे. त्यावरच्या प्रतिक्रिया अजून वाचल्या नाहीत.

आंदोलक=खलिस्तानी, आंदोलक=श्रीमंत शेतकरी, आंदोलक= मधल्या मधे गब्बर होणारे अडते/दलाल - इतके सुलभीकरण करणे खूप सोपे आहे. पण इतर असंख्य लोक आहेत. भाजपचे मतदार आहेत, अकाली दलाचे आहेत - जे इतके दिवस भाजप बरोबरच होते व कदाचित पुढेही असतील.

सनवला अमेरिकेत राहून ट्रम्पची खोड मोडल्याचा आनंद होत असेल तर त्यांच्याच लाॅजिकने ट्रम्प समर्थकांनी त्यांना देशद्रोही ठरवायलाही हरकत नसावी.
कारण भारतीयांपैकी ज्यांना मोदीजींविषयी तशी फीलींग आहे त्याना त्या स्वतः अमेरीकन असून भारतद्रोही ठरवतात.
कशाच्या बळावर इतका माज यैतो की स्वतः भारतातून पळून जायचं आणि जे भारतीय नागरीक आहेत त्यांनाच देशद्रोही ठरवायचं.वर ज्या देशात गेले तिथेही एकनिष्ठ नाहीच. आणि वर तिथून भारतासारख्या स्वतःच सोडून दिलेल्या परदेशात हस्तक्षेप करायचा, चिथवण्या करायच्या. किती लेवलवर निष्ठेला तिलांजली दिलीय? असो. द्वेषाचं जहर पिऊन तरारलेत.. लाॅजिक, तत्व, निष्ठा गेल्या खड्ड्यात.

या लोकांचं वागणं मला काहिकाही कावेबाज बायकांसारखं वाटतं ज्या सासरीही नीट नांदत नाहीत आणि माहेरीही आईभावजयीत काड्या करतात. एकुण कुठेच शांती नांदु नये एवढाच मतलब.

या लोकांचं वागणं मला काहिकाही कावेबाज बायकांसारखं वाटतं ज्या सासरीही नीट नांदत नाहीत आणि माहेरीही आईभावजयीत काड्या करतात. एकुण कुठेच शांती नांदु नये एवढाच मतलब.
++११

<< इकडून तिकडून व्हाट्सए फेसबुक फॉरवर्ड्स आणून इथे ओतण्यासाठी आहे का हा धागा???
घरात गोशेणाने बनवलेल्या वस्तू वापरल्या की तामसी वृत्ती वाढते असा फॉरवर्ड आला आज. शोधून टाकतो इथे. >>

------- स्वत: कडे काही नसले का इकडचे तिकडचे उचलतात ते.
फेसबूक वरुन दुसर्‍याचे कॉपी पेस्ट ठापून... अख्खा धागाच सुरु केला होता. नंतर अ‍ॅडमीन यांनी उडविला.

<< मोहनदास गांधींच्या हत्येचा विनाकारण संघ आणि भाजपाला दोष देणारे स्वतःच्या कर्माने मेलेल्या इतर तीन गांधींच्या मृत्यूचा दोष मात्र संघ भाजपाला देऊ शकत नाहीत ही त्यांची नामुष्की आहे. >.

------- ज्यांनी संघावर बंदी घातली होती (याच फेब महिन्यात... १९४८ मधे)... त्याच लोह पुरुषाचा, देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभ भाई पटेलांचा, उंच पुतळा आज statue of unity दिमाखात उभा आहे.

नेहरु यांनी बोटचेपे धोरण अवलंबिले होते.... पण पटेल बधले नाहीत. सबळ पुराव्या अभावी कटाचे एक महत्वाचे आरोपी माफिविर सावरकर दोषमुक्त झाले.

शेवटी या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत येते तेव्हा ती गोची अजून सुटायची आहे ना? केरळने आपल्या विधानसभेत हे कायदे लागू होणार नाहीत असे काहीतरी विधेयक बहुमताने पास करून सुद्धा घेतले म्हणे!

Submitted by जिज्ञासा on 12 February, 2021 - 08:31

पंजाबी शेतकरी आंदोलन का करत आहेत? पंजाबात काँग्रेस सत्तेवर आहे ना?

Rahul Gandhi ने बता दिया किसानों को आंदोलन क्यों खत्म कर देना चाहिए| Satya With Sushant Sinha :>>>>> Proud पप्पुडा ग्रेट आहे.

Meena Harris sold clothes and books that used the name and face of her aunt, the vice president.
Biden transition lawyers reportedly told Harris she should stop profiting from her aunt's name.
The Phenomenal Woman campaign has now stopped stocking products relating to Kamala Harris.
Lawyers for President Joe Biden told Meena Harris to stop using her aunt, Vice President Kamala Harris, in her business ventures, the Los Angeles Times reported.

Lol
ही मीना म्हणजे एकदम 'चाचा विधायक है हमारे' कॅटेगरी होती. चला बायडननेच गप्प केलं तिला.

कमर्शियल उद्योगांत आँटचे नाव वापरु नका म्हणजे गप्बस होय?

पण अमेरिकेचं कौतुक आहे. टीएम आणि जियो साठी आमचे पंतप्रधान मॉडेलिंग करतात.

त्या रिहानाने ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर- वर ट्वीवट्वीव केली. इतकंच काय अध्यक्षीय निवडणुकांमध्ये ढवळाढवळ केली. पण ट्रंपयात्यांनी सेरेना विल्यम्स , जेनेट जॅक्सन इत्यादींना सांगून तिला उत्तर देववलं नाही.

"चाचा विधायक है मेरे" हे मीनाला लागू होत नाही. ती जय शहा नाही. त्या नंतरही तिने दिशा च्या समर्थनार्थ रीट्वीट केले आहे.
"चाचा विधायक है मेरे" हे मुनव्वर चा प्रोग्रॅम बंद पाडणार्‍याला मात्र लागू होते.

ही निकिता जेकब 2012/13 मध्ये आमच्याकडे इंटर्न होती. कालच तीच इंटर्नशिपच टाईमशीट बघितलं, मी काय काय काम असाईन केलं होतं ते बघण्यासाठी Happy रिसर्च मध्ये चांगली होती. हे असं काही तिच्या बाबतीत होईल असं वाटलं नव्हतं.

Rihanna Sparks Fresh Row as She Poses Naked with Lord Ganesha Pendant for Lingerie Shoot

नो कमेंट्स.

पाचव्या पानापर्यंत प्रतिसाद वाचले. पुढचा अंदाज आला. हा धागा ग्रेटाबद्दल आहे. याचाही शेतकरी धागा होत चालला आहे. कदाचित धागाकर्त्याला धागा बंद व्हावा अशी विनंती प्रशासकांना करावी लागेल का अशी शंका वाटतेय.

ग्रेटा थनबर्गचं वय, तिचं कार्य आणि तिची प्रामाणिक तळमळ पाहता ती एका आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असल्याचा रंग देणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. शेतक-यांच्या मागण्या या न्याय्य हक्कांसाठी आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाच्या हक्काविरूद्ध कुणी येऊ नये ही अपेक्षा म्हणजे आंतरराष्ट्रीय कट, खलिस्तान हे आता हसू येण्याच्या पलिकडचे आहे.

आणि तिला आमच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही हे अचानक अनेकांनी सांगणेही. भाजपा यात दोन भारतरत्नांना पुढे करून त्यांच्या अवमानाचा बागुलबुवा करतेय.
मुळात ७२ दिवस चाललेल्या आंदोलनाबद्दल, त्यात झालेल्या मृत्यूबद्दल या मंडळींना ट्वीट करणे गरजेचे वाटले नसेल तर ग्रेटाची किमान माहिती तरी आपल्या दोन आदरणिय भारतरत्नांनी घ्यायला हवी होती. तिने काय भारत देशाविरूद्ध युद्ध पुकारले आहे का ?
या न्यायाने मोदीजींनी अमेरीकेत जाऊन अमेरिकन नागरिकांना अब की बार ट्रंप सरकार असे आवाहन केल्यावर तिकडच्या अमेरिकारत्नांना त्यांना ठासून सुनावायला हवे होते.
लोकशाहीचा अर्थ कुणाला नीट समजला आहे हे पण पहायला हवं.

तीन कायद्यांमधे काय वाईट आहे हे ज्यांना समजत नाहीये त्यांनी अशाच कायद्यांविरूद्ध स्वर्गीय सुषमा स्वराजजी आणि स्वर्गीय अरूणजी जेटली यांची २०१४ पूर्वीची लोकसभेतील भाषणे काढून ऐकावीत.

त्या वेळी काँग्रेस सरकार परदेशी भांडवलदारांना शेतीत मुक्त प्रवेश देत होती. आताचे सरकार देशी उद्योगपतींना. त्यामुळे त्यांच्या भाषणात एफडीआय, अ‍ॅमेझॉनच्या इथे फक्त नावे बदलून ऐका. सगळे संदर्भ क्लीअर होतील. ज्यांना हे नेते पसंत नसतील त्यांनी आताच्या नेत्यांची भाषणे ऐका.

मला फक्त एक सोपी गोष्ट अद्याप समजलेली नाही. शेतकरी आडमुठे आहेत ही एक प्रचाराची बाजू झाली. याची दुसरी बाजू काय ?
तर सरकार पण आपली बाजू बदलत नाहीये. दर वेळी तोच प्रस्ताव सरकार पाठवतंय. त्या प्रस्तावाला शेतकरी नेते पुन्हा तेच उत्तर देताहेत. अशा अकरा नाही अकराशे फे-या झाल्या तरी मार्ग निघणार नाही.

शेतकरी नेत्यांना जेव्हां सचिव पातळीवरून हमी भाव राहील असे सांगितले तेव्हां त्यांनी ते कायद्यात टाका असे सांगितले. यावर मंत्रीपातळीच्या बैठकीत असे सांगितले की आम्ही तुम्हाला लेखी देतो.
शेतकरी नेत्यांचे म्हणणे होते की जर लेखी देत असाल तर कायद्यात टाकायला काय हरकत आहे ?

शेतकरी नेते बावळट नाहीत.
सरकारने लेखी देणे आणि कायदा बनवणे यात फरक आहे.
लेखी दिले तर ते आश्वासन फक्त सरकार आणि शेतकरी यांना लागू राहील. ते मंड्यांमधे.
तीन चार वर्षे जर मंड्यांच्या बाहेरच सौदे झाले तर मार्केट यार्डासारख्या मंड्या उद्ध्वस्त होतील. तिथे कुणीही व्यापारी आपले दुकान लावणार नाही. कारण बाहेर जास्त किंमत मिळत असल्याने मार्केट यार्डात, बाजार समित्यात शेतकरी जाणार नाही. चार वर्षात बाजार समित्या, मंड्या उद्ध्वस्त झाल्या की शेतक-यांना बाहेरच्या व्यापा-यांच्या अटीवर आपले धान्य नाही का विकावे लागणार ?

हे ते कधीचे सांगू पाहताहेत. पण त्यांचा आवज ऐकूच येणार नाही अशा पद्धतीने ढोल पिटले जात आहेत.
जर कायद्यातच हमी भाव आला तर तो मंडीच्या बाहेर या व्यापा-यांना पण लागू होईल. सरकारने लेखी दिलेले आश्वासन सध्या कोणत्या कायद्याच्या कलमाद्वारे या व्यापा-यांना बाध्य आहे याचा जाणकारांनी खुलासा करावा.

कायद्यात काय लिहीलेय या पेक्षा कायद्याचे परिणाम काय होतील यावर बोला. तो भाग फाट्यावर मारून चर्चेचे रतीब घातले तरी उपयोग होणार नाही.
मी ना भाजपच्या बाजूची आहे, ना काँग्रेसच्या. ना कम्युनिस्ट आहे.
सुरूवातीलाच शेतकरी नेत्यांनी सांगितले होते की कायद्यात हमी भाव टाका आम्ही घरी जाऊ. पण ती वेळ सरकारने गमावली आहे. आता आडमुठेपणामुळे त्यांना माघारी येता येत नाही. अशात आंदोलकांनी कायदेच मागे घ्या ही भूमिका घेतली आहे. उद्या सरकार चर्चेला तयार झाले तर दोन पावले पुढे येऊन फक्त हमी भावाचा समावेश करण्याला सरकारने तयारी दाखवली तर आंदोलन पण कायदे मागे घेण्याच्या मागणीवर अडून बसणार नाहीत. तरच मार्ग निघेल.

सरकार ही सोपी गोष्ट का करत नाही ? मग शंका येणे स्वाभाविक नाही का ?
ते टूलकीट वगैरे हास्यास्पद मुद्दे काढून आंतरराष्ट्रीय कट दाखवण्यापेक्षा हे सोपे नाही का ?
या टूलकीट वरून पकडलेल्या दिशा नावाच्या २२ वर्षीय मुलीचे आई वडील भाजपचे समर्थक आहेत असे सांगणारा तिचाच एक जुना व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. याचा दुसरा अर्थ काय निघतो ते सांगण्याची गरज नाही. पहिला अर्थ मुलं आईवडीलांचं ऐकत नाहीत हा निघतो. जी गोष्ट मला मान्य आहे. दुसरा अर्थ आपापल्या बुद्धीप्रमाणे घ्यावा.

उद्या मायबोलीवर शेतक-यांच्या बाजूने लिहीले म्हणून मला पण अटक करतील. माझी तयारी आहे त्याला पण. फक्त आंतरराष्ट्रीय कटात सामील असल्याचा आरोप नका ठेवू एव्हढीच विनंती. जी कामं मिळू लागलीत ती पण नाही मिळायची. Lol

Pages