ग्रेटा थन्बर्ग-पृथ्वीची वकील

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 01:27

ग्रेटा थन्बर्ग. एक अवघ्या सोळा वर्षांची चिमुकली. तिचे नाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. अगदी युरोपातील राजकारण्यांपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या पर्यावरणाबाबतच्या धोरणांतील चुकांवर तिने बोट ठेवले आहे. जगभरातील लाखो मुले आज तिच्या पाठिशी आहेत. कोण आहे ही ग्रेटा?
---

पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय, पृथ्वी धोक्यात आहे, अशी बोंब आपण नियमित मारत असतो. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणबाजीतून. पण, त्यासाठी नेमके काय करायचे आणि कोणी करायचे, याबाबतीत आपल्या कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह असते. हे सर्व एक तर सरकारने करावे, किंवा शास्त्रज्ञांनी त्यावर काहीतरी मार्ग काढावा अशी आपली अपेक्षा असते. सोशल मीडियावर व्यक्त होणे, थोडीबहुत आंदोलने करणे याव्यतिरिक्त आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीत आपण जगत असतो. पण, पृथ्वीवर आलेले हे संकट एका चिमुकलीला सहन झाले नाही. चोवीस तास ती त्याचाच विचार करू लागली. कोणी काही करेल याची वाट न पाहता तिने स्वत:पासून सुरुवात केली. तिचे हे आंदोलन इतके व्यापक बनले की आज जगभरातील लाखो मुले शाळा बुडवून तिच्या ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभागी होत आहेत. आज तिच्या आंदोलनाने जागतिक स्वरुप प्राप्त केले असून, जगभरातील देशांना, त्यातील राजकारणी, उद्योगपती, तज्ज्ञांना तिची दखल घेणे भाग पडले आहे. या चिमुकलीचे नाव आहे ग्रेटा थन्बर्ग.
स्वीडनमधील एका कलाकार दाम्पत्याची ही अवघी सोळा वर्षांची मुलगी. आई मलेना अर्नमान एक ऑपेरा सिंगर तर वडील लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माता. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाने ‘हवामान बदल’ हा शब्द प्रथम ऐकला. मानव प्रगत झाला पण त्यासाठी त्याने अवलंबलेल्या मार्गांनी पर्यावरणाची अतोनात हानी सुरू केली. वेगवेगळे कारखाने, वाहने यांतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातोय. त्याचे प्रमाण मर्यादेपलिकडे गेलेय. जंगलांना आगी लागताहेत. त्यात दुर्मिळ निसर्गसंपदा नष्ट होतेय, यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडलाय. ती याबद्दल वाचन करीत गेली. तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
ज्या वयात हसायचे, बागडायचे त्या वयात तिला पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पण, एक नववीतील मुलगी काय करू शकणार होती? तिला कदाचित माहिती होते की आपण फेकलेला दगड आभाळाला भेदू शकणार नाही. पण, पूर्ण ताकदीनिशी दगड भिरकावण्यास काय हरकत आहे? पुढच्याच महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरला स्वीडनमधील निवडणुका होत्या. निवडणुका होईपर्यंत शाळेतच जायचे नाही, असा तिने निर्णय घेतला. ती रोज घरून निघायची आणि स्वीडिश संसदेसमोरील एका झाडाखाली येऊन बसायची. हातात ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ असा स्वत:च लिहिलेला फलक घेऊन ती शाळेच्या वेळेत संसदेबाहेर बसू लागली. आधी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, तिने हार मानली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना हस्तलिखित पत्रके वाटू लागली. ‘तुम्ही माझे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात, म्हणून मला हे आंदोलन करावे लागतेय’ असा मजकूर त्यात लिहिलेला होता. जंगलांना लागलेल्या आगी आणि त्यामुळे वातावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यामुळे गेल्या वर्षी स्वीडनमध्ये २६२ वर्षांतील सर्वाधिक तप्त उन्हाळा पडला. स्वीडिश सरकारने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि पॅरिस कराराचे पालन करावे या तिच्या मागण्या होत्या.
सुरुवातीला तिने इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिच्या आंदोलनाचा फोटो टाकला. हळूहळू तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. तिच्या विषयाचे गांभीर्य लोकांना पटू लागले. पर्यावरण रक्षण या विषयावर काम करणारी सोशल मीडिया कंपनी ‘वुई डोन्ट हॅव टाइम’चा फोटोग्राफर इंगमर रेन्टझॉग याने तिचे फोटो त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले. त्याला हजारो व्ह्यूज मिळाल्या. नंतर त्याने तिचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर चालवले. लोकांमध्ये तिच्या आंदोलनाची चर्चा होऊ लागली. वृत्तपत्रे आणि चॅनलने तिच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि तिची ही मोहीम व्यापक बनली. स्वीडनच्या निवडणुका झाल्यानंतरही तिने दर शुक्रवारी आंदोलन सुरू ठेवले. सुरुवातीला तिला वेड्यात काढणारे तिचे मित्र-मैत्रिणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ लागले. देशोदेशीच्या माध्यमांनी तिची दखल घेतली. शाळांमध्ये चर्चा होऊ लागली. तिच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुले दर शुक्रवारी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेऊ लागली. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत २७० शहरांतील सुमारे २० हजार मुलांनी तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही युरोपपासून ते जपानपर्यंत लाखो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. भारतातही काही शाळांमधील मुले तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
ग्रेटा काही दिवसांतच अघोषित लीडर बनली. संपूर्ण युरोपात तिची कीर्ती पोहोचली. तिला मोठमोठ्या परिषदांमध्ये भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोवर वाढले. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगने आता इतके गंभीर रूप धारण केले आहे की मानवजातीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. तिच्या वयाच्या पिढीचे भविष्य बरबाद करण्यासाठी तिच्या पालकांच्या वयाची पिढीच जबाबदार आहे, असा तिचा स्पष्ट आरोप आहे. लंडनच्या संसदेत बोलताना तिने परखडपणे आपला मुद्दा मांडला. ‘तुम्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार आपल्याकडे चुका सुधारण्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल की आपले कोणतेच उपाय कामी येणार नाहीत.’
तिने हेही निदर्शनास आणून दिले की, पॅरिस करारानुसार विविध देशांनी मान्य केलेली ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची मर्यादा दरवर्षी १.५ सेल्सिअस आहे. ती अपुरी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. २०२० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसेस निर्मिती पूर्णपणे थांबली पाहिजे. ब्रिटिश संसदेत बोलताना तिने सरकारला अक्षरशः शब्दांत पकडले. ब्रिटनने ‘उत्सर्जन कमी करणे’ (lowering emmissions)असा शब्द वापरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी ते पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे तिने सुनावले. ‘युरोपियन इकॉनॉमिक अँड सोशल कमिटी’पुढे बोलताना तिने युरोपियन युनियनने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०३० पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत रोखण्याचा मुद्दा मांडला.
ग्रेटाच्या या कार्याबद्दल तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शालेय पुरस्कारांबरोबरच विविध संस्थांनी तिच्या कार्याची दाखल घेतली. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाने जगातील २५ सर्वात प्रभावी टीनएजरमध्ये तिची निवड केली. गेल्या मार्चमध्ये महिला दिनी तिला स्वीडनमधील ‘सर्वात महत्त्वाची महिला’ हा बहुमान प्राप्त झाला. यासह विविध पर्यावरण संस्था, वृत्तपत्रांनीही तिला गौरविले. तिच्या कार्याची सर्वात मोठी दखल म्हणजे स्वीडिश संसद आणि नॉर्वेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तिची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. याबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. एप्रिल २०१९ मध्ये ‘टाइम’ मासिकाने तिचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ब्रिटिश व्होग मासिकाच्या सप्टेंबर २०१९च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या १५ महिलांमध्येही तिचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण जागृती तर झालीच पण जगभरातील राजकारणी, धोरणी मंडळीलाही आपल्या चुका कळल्या आणि त्यांनी त्या मान्यही केल्या. याला ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हटले जात आहे. ज्या-ज्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन होईल, त्याचा वापर टाळण्याच्या तिच्या आग्रहामुळे अनेकांनी सायकली, रेल्वेचा वापर सुरू केला. ग्रेटाला २३ जानेवारी रोजी डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला. प्रसिद्ध टॉक शो टेडएक्स स्टॉकहोमद्वारे तिने आपले विचार जगभर पोहचविले. बर्लिनमध्ये तिला २५ हजार लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. तिला जर्मनीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. युरोपिअन पार्लमेंट, ऑस्ट्रेलियन वर्ल्ड समिट आर ट्वेंटीमध्येही तिला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात न्यूयॉर्क आणि चिली देशांत होणाऱ्या पर्यावरण परिषदेसाठी तिला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी तिने खास सोलर पॅनलवर चालणाऱ्या तराफ्यातून तब्बल १४ दिवसांचा प्रवास करीत अॅटलांटिक समुद्र पार केला, पण विमान किंवा मोटरबोट वापरली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवे तिने एक व्हिडीओ पोस्ट करीत भविष्यातील धोक्यांची कल्पना दिली. ‘प्रिय मोदी, पर्यावरणीय समस्यांवर तुम्ही आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे, नुसते बोलण्याची नाही. तुम्ही बोलता खूप पण प्रत्यक्ष परिणाम खूपच कमी दिसून येतो. तुम्ही पर्यावरण रक्षणात अपयशी होत आहात. असेच राहिले तर तुम्ही या जगातील सर्वात दुष्ट खलनायक ठराल, जे तुम्हाला कधीच नको असेल,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेटाने बुधवारी, दि. १८ सप्टेंबरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांची भेट घेतली. ओबामांना तिने आपल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ओबांनी तिच्यासाठी उच्चारलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी राज्यसभेत जे बोलले किंवा तोमर आत्ता ज्या पद्धतीने बोलतायत ते त्यांना खुप आधी आणि उलगडून सांगता आले असते.... स्पष्टीकरणेही देता आली असती.
पण त्यांनी मुद्दाम या मुद्द्यावर बऱ्यापैकी मौन धारण केले होते आणि सगळ्या विरोधकांना या कायद्याच्या विरोधात जायला पुरेसा स्कोप दिला.... सरकार बॅकफूटवर जातय म्हंटल्यावर विरोधकातले भलेभले त्या ट्रॅपमध्ये फसले आणि चेव चढल्यासारखे बोलू लागले.
त्या सगळ्यांना आता एका कड्यावर आणून उभे केलेय मोदींनी... पुढे जावे तरी पंचाईत आणि मागे फिरावे तरी पंचाईत!
नाहीतर मोदी शहासारखे चाणाक्ष लोक आंदोलनाचा फुगा इतका फुगा देतात हेच नवल आहे!

अर्थात हा आपला अंदाज म्हणा किंवा राजकारणातल्या अल्पमतीप्रमाणे आकलन Happy

त्या सगळ्यांना आता एका कड्यावर आणून उभे केलेय मोदींनी... पुढे जावे तरी पंचाईत आणि मागे फिरावे तरी पंचाईत//

+100
कायदे योग्यच आहेत, फक्त आंदोलन हाताळण्याची पद्धत चुकली असं आता हे लोक म्हणू लागले आहेत. पण आता उशीर झाला आहे. ज्या गरीब शेतकऱ्यांना मोदींमुळे चार जास्तीचे पैसे मिळू शकतात ते मतपेटीतून व्यवस्थित व्यक्त होणार आहेत.

{{{ त्यात एका म्हाताऱ्या बाईंची दोन मुले म्रत्युमुखी पडली होती त्यामुळे तीचा वंश बुडाला.
त्यावेळी केंद्रात इंदिरा गांधी यांचे सरकार होते}}}

इंदिरा गांधींना त्या माऊलीचा तळतळाट भोवला असणार. संजयचे आधीच अपघाती निधन झाले होते नंतर स्वतः इंदिरा आणि राजीव यांचीही अत्यंत नृशंस हत्या झाली.

मोहनदास गांधींच्या हत्येचा विनाकारण संघ आणि भाजपाला दोष देणारे स्वतःच्या कर्माने मेलेल्या इतर तीन गांधींच्या मृत्यूचा दोष मात्र संघ भाजपाला देऊ शकत नाहीत ही त्यांची नामुष्की आहे.

मोहनदास गांधींच्या हत्येचा विनाकारण संघ आणि भाजपाला दोष देणारे
गोडसेची रोज पाया पडून आरती करत असाल ना तुम्ही. अनाजीच्या पिलावळीला घरभेदी करणारेच पूजनीय असणार.

बिपीनचंद्र यांनी दिलेल्या वाटसप ज्ञानानुसार ट्रम्प आणि मोदी मिळून इल्युमिनाटीचा खातमा करणार आहेत म्हणे. चला ट्रम्प-मोदी दोस्त आहेत आणि एकाच बाजुला आहेत एवढं तरी कबुल केलं.

बोलू नये असा नाही. जपून बोल असा सल्ला दिला. वाक्याची तोडामोड करून दिशाभूल करणे हा गुण इतिहासापासून आहे.

>>> यातला जातीपातीवरचा रोख दुर्लक्षित करूनसुद्धा- यात कोणाची मक्तेदारी नाही. १४० शब्दांच्या ट्विट्स मधून गेल्या २-३ दिवसांत विविध पब्लिकने काढलेले अर्थः
- रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे (सत्यः रिहानाने सरकारने इण्टरनेट ब्लॉक करण्याबद्दल "आपण याबद्दल का बोलत नाही?" इतकेच म्हंटले आहे.)
- सचिनने शेतकरी आंदोलनाला विरोध केला आहे (सत्यः सचिनने भारताचे प्रश्न भारत सोडवेल. इतरांनी पडायचे कारण नाही. भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड नाही इतकेच लिहीले आहे)
- लताने शेतकर्‍यांच्या विरोधात ट्विट केले आहे (सत्यः "एक भारतीय म्हणून माझा विश्वास आहे की भारताचे जे काही प्रश्न आहेत ते भारतीय लोक सोडवतील" - इतकेच लिहीले आहे)

हे सगळे सुद्धा दिशाभूलच आहे. वाक्ये आपल्याला पाहिजे तशी वाकवून नॅरेटिव्हज सेट केले जातात आणि मग लोक खातरजमा न करता ते उचलून नाचतात. सचिन व लता च्या ट्विट मधे काही चुकीचे नाही. त्यांनी स्वतःहून लिहीले असेल किंवा त्यांना लिहायला भरीस घातले गेले असेल, तरी ट्विट मधे काही चुकीचे नाही, आंदोलकांच्या विरोधात नाही आणि शेतकर्‍यांच्या तर अजिबात नाही. त्यांनी इतके दिवस भारतातील प्रश्नांबद्दल का लिहीले नाही? त्यांचा प्रश्न आहे.

आता यांची चौकशी होणार म्हणे? कशाबद्दल? आणि अगदी असे निष्पन्न झाले की सरकारने सांगितले म्हणून यांनी केले? बरं मग? त्यात काही गुन्हा नाही. उद्या त्यांनी तक्रार केली तर ठीक आहे.

भाजप आणि सरकार समर्थकांची भाषा आणि हॅशटॅग सचिन आणि लतादीदी यांचे सारखेच असल्याने लोकांचा गैरसमज झाला असावा की सचिन चा आंदोलनाला विरोध आहे

आता त्या जॉर्ज सोरोस पोस्टचे संत्रे सोलू.

जॉर्ज सोरोस हा जन्माने ज्यू माणूस:
- एकाच वेळी अमेरिकेतील इव्हँजेलिकल (म्हणजे प्रॉटेस्टंट) ख्रिश्चनांच्या विरूद्ध व भारतातील हिंदूंच्या विरूद्ध काड्या करतोय.
- त्यातही हिटलर व मुसोलिनी च्या अ‍ॅक्सिस पॉवर कडून लढलेल्या इटालियन व्यक्तीच्या मुलीची - ते ही जन्माने रोमन कॅथलिक असलेल्या सोनिया गांधींची मदत घेतोय.
- त्याला कम्युनिस्ट रशियन, चीनी व मुस्लिम पाकी सामील आहेत.

भारताचे माहीत नाही, पण भारताच्या शत्रूंमधे सर्वधर्मसमभाव नक्कीच वाढीस लागला आहे. ८०ज मधल्या बॉलीवूडी चित्रपटांतही लॉजिक इतके रानोमाळ हरवलेले नसायचे. या वरच्या धार्मिक व राजकीय गटांचे एकमेकांशी सख्य, त्यांचे इण्टरेस्ट कशाचा कशाशी ताळमेळ नाही. ज्यू आणि अ‍ॅक्सिस पॉवर, रोमन कॅथलिक्स आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चन्स, लोकशाहीवादी देश आणि कम्युनिस्ट्स, कम्युनिस्ट्स आणि मुस्लिम, ज्यू आणि मुस्लिम यांचे एकमेकांशी सख्य जगजाहीर आहे. ज्यू लोक भारताविरूद्ध, हिंदू विरूद्ध कधीच नव्हते व आता तर असायचे कारणच नाही.

तेव्हा जरा चौफेर गोळीबार करण्याआधी थोडे लॉजिक लावावे. हे व्हॉट्सअ‍ॅप मधेही फिरत आहे. मी पाठवणार्‍या पब्लिकला विचारले तर "काय असेल बुवा, आले तसे पाठवून दिले" असेच उत्तर आले. मोदींबद्दल काहीतरी चांगले, आणि सोनिया/राहुल बद्दल काहीतरी वाईट आहे ना? मग बास झाले असाच अनेकांचा अ‍ॅप्रोच असावा. लगान मधला तो राजेश विवेक त्या एलिझाबेथचे नाव नीट समजले नाही, तरी "अच्छा है, जो भी है" म्हणतो तसेच.

मोदी जे काय चांगले वाईट करत आहेत ते त्या त्या मेरिट वर तपासा. असल्या कल्पनेच्या भरार्‍या मारण्याचे कारण नाही.

फारएन्ड, चांगल्या पोस्ट्स.
मला त्या सोरोस पोस्टमधला तो 'एकजरी गोळी सुटली असती तर अमुक तमुक लाईव्हज मॅटर आंदोलन करायची पूर्ण तयारी होती' हा मुद्दा मात्र पटला.
ट्रम्पने police brutality चा निषेध सोडाच वर समर्थन केलं, वेडसर ट्विट्स करून आगीत तेल ओतलं.
मोदी शाह एकदम contrast. त्यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे.

Screenshot_2021-02-10-00-02-42-108_com.facebook.lite_.png
______________________________________________________

हा परदेशी माणूस आमच्या गोष्टीत का नाक खुपसत आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही भारतीय
समर्थ आहोत.

फारेंड +१
> मोदी शाह एकदम contrast. त्यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे.

काहीही ! अर्थात ते फॉरवर्ड मोदीभक्तीत चिंब भिजलेल्या माणसानेच तयार केलेले असल्याने अफाट मोदीस्तुती Par for the Course.

असो मनदीप सिंग ला आत टाकून नाईलाजाने बाहेर सोडल्यावर आता न्यूजक्लिक नावाच्या छोट्याशा ऑनलाईन पेपर वर ईडी ची धाड टाकली अहे.

सचिन आणि लतादिदीची चौकशी करणार म्हणे महाकास आघाडी, चान्गलय! आता सेनेला मराठी अस्मिता वैगरे च आणी व्यकि स्वातत्र्य वैगरेच तथाकथित पुरोगाम्याना विस्मरण झालेल दिसतय.

हम्म; मिडियाने सरकारच्या विरोधात आवाज उठवला (प्रापगँडा केला) तर तो अनकूल असतो, पण सरकारनेच सेलेब्रिटिजच्या माध्यमातुन प्रापगँडा केला कि तो कूल ठरतो. आणि मिडियाने सरकारच्या वतिने प्रापगँडा केला कि तो कूल असतो, पण एखाद्या सेलेब्रिटिने सरकारच्या विरोधात आवाज उठवला कि तो अनकूल ठरतो. थोडक्यात, सरकारच्या समर्थनात केलेलं भाष्य म्हणजे अनकंडिशनली कूऽऽऽल. असो...

माझ्या माहिती नुसार या बिलातली साधारण २०% कलमं संदिघ्न आहेत, जी सामोपचाराने सिंप्लिफाय करता आली असती. पण मोदि सरकारचा "माय वे, ऑर हायवे" अ‍ॅटिट्युड, आणि या प्रकरणाला विनाकारण हवा दिल्याने मिळालेल्या कवरेजमुळे हा आता बीजेपीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. उद्या चौकशीतुन सेलेब्रिटिजना ट्विट करायला भाग पाडलं असं समोर आलं तर सरकारची नाचक्कि होणार नाहि का? काय गरज आहे सरकारला या आपल्याच अंतर्गत मामल्यात सोशल मिडियामधे प्रॉक्झी वॉर खेळण्याची?..

सध्यातरी मला मोदि सरकारची लिडरशीप या प्रकरणात कुठेच दिसुन येत नाहि. अ‍ॅब्सोलुट मेजॉरिटीचा अर्थ अ‍ॅब्सोलुट मनमानी होउ शकत नाहि, याचा उलगडा मोदि सरकारला झाला नसल्यास लवकरंच होइल अशी आशा करुया...

या धामधुमीत खा. महुआ मोइत्राचं लोकसभेतलं भाषण सद्यपरिस्थितीवर प्रखर प्रकाश टाकणारं आहे. जरुर ऐका...

माझ्या माहिती नुसार या बिलातली साधारण २०% कलमं संदिघ्न आहेत, जी सामोपचाराने सिंप्लिफाय करता आली असती. पण मोदि सरकारचा "माय वे, ऑर हायवे" अ‍ॅटिट्युड, आणि या प्रकरणाला विनाकारण हवा दिल्याने मिळालेल्या कवरेजमुळे हा आता बीजेपीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. //

Lol
किती थापा माराल! वास्तविक मोदी सरकार आधीपासूनच चर्चेला तयार आहे. पण चर्चा नकोच, पूर्ण कायदाच मागे घ्या अशी माय वे हायवे भूमिका आंदोलक घेत आहेत.

उद्या चौकशीतुन सेलेब्रिटिजना ट्विट करायला भाग पाडलं असं समोर आलं तर सरकारची नाचक्कि होणार नाहि का? //

म्हणजे लताबाई आणि सचिन यांची चौकशी करण्याला तुमचा जोरदार पाठिंबा दिसतो. छान छान.

>>पण चर्चा नकोच,...<<
इथेच खर्‍या लिडरशिपचा कस लागतो, जो मला अजिबात दिसला नाहि हे मी वर लिहिलेलं आहे. पण जाउद्या, तुम्हाला ते समजणार नाहि...

याच जॉर्ज सोरोसने काही वर्शापूर्वी ब्रिटनच्या पाऊन्ड या चलनावर हल्ला केला होता व त्याची किम्मत ढासळवली होती. हे आपण उगीच केले असे तो त्यावेळी म्हणाला होता. इतकी याची आर्थिक शक्ती आहे. यावरून तरी तो त्याच्या सम्पत्तीचा उपयोग फक्त देशाना अस्थिर करण्यासाठी वापरतो असे दिसते.

तुमची खऱ्या लीडरशिपची व्याख्या म्हणजे सचिन तेंडुलकर आणि लताबाईंची चौकशी करणं आणि मुकेश अंबानीना पदमविभूषणसाठी केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनातर्फे रेकमेंड करणं - इतकं समजलं आणि ते पुरेसं आहे. Lol

हमी रक्कम सक्तीची करण्यात सरकारला काय अडचण आहे - ते ही अजून समजले नाही.>>> क्रुशी मन्त्री टोमर व पन्तप्रधान मोदी म्हणाले आहेत की MSP होती, आहे व राहील. याचा अर्थ होतो की सरकारला यात काही अडचण नाही.

खरीखुरी लीडरशिप Happy

EfJMXn3UwAAU41W.jpeg

या मंडळींना भारतरत्न नाही तर किमान महाराष्ट्ररत्न किंवा मराठीबाणारत्न देऊन टाका. आणि ऑफ़कोर्स, लताबाईंच्या घरी पोलीस पाठवा.

Whataboutism !

लताजी आणी सचिन यांची चौकशी करण्याचा निर्णय आततायी व मूर्खपणाचा आहे. गृहमंत्र्यांना फारशी कामे नसावीत, म्हणूनच ते कंगनाशी ट्विटर वर भांडण करणे, ही चौकशी करणे असली फालतू कामे करत असावेत.

हे सर्व असले तरीही लताजी व सचिन यांनी ते ट्वीट उत्स्फूर्ततेने केले यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही. आदरणीय राज ठाकरे यांनी म्हणले ते योग्यच आहे.

आपणच पाठवलेल्या दंगेखोरांवर कोण कशाला गोळ्या झाडील?
दंगेखोरांना दिल्ली पोलिस स्टँडिंग ओव्हेशन देताना जे एन यू, शाहीन बाग (इथला पिस्तुलधारी तर काही तासांसाठी का होईना उघडपणे भाजप सदस्य करून घेतला होता , २८ जानेवारीचे तथाकथित स्थानिक त्रस्त दिल्लीवासी... )

चौकशी लता आणि सचिनची नाही तर त्यांना ट्वीट करायला कोणी सांगितलं याची आहे. त्यांना प्रेशराइज केलं गेलं होतं का?
लतादीदींनी तर चक्क एक स्क्रीनशॉट ट्वीट केलाय. महाराष्ट्राला आणि देशाला भूषणास्पद असलेल्या व्यक्तींना असली कामं करायला लावणारेच त्यांचा अपमान करताहेत. त्यांना भाजपच्या आय टी सेलमध्ये भरती केल्यासारखं आहे हे

हेमामालिनीने इन्व्हर्टेड कॉमासहित ट्वीट केलं होतं.

ट्वीट करणार्‍या एकाने भाजपच्या एका पदाधिकार्‍याला टॅग केलं होतं. सुनील शेट्टी बहुतेक.

ग्रेटा थनबर्ग आणि इतर मान्यवरांची ट्वीटस उस्फूर्त आहेत का? - एक भाबडा प्रश्न!
त्याबद्दल कुणाची चौकशी करणार?

ते म्हणतात ना की "हमाम मे सब .... " इत्यादि इत्यादि!

रिहाना इ.नी पैशासाठी ट्वीट केलं असा दावा करून भाजपवाले जगभर आपलं हसं करून घेत आहेत. बरं त्या मीना हॅरिसबद्दल कोणी का बोलत नाहीए? अमेरिकेत तर लोकशाही पुन्हा प्रस्थापित झालीय. नागरिकत्व धोक्यात नाही यायचं त्यांच्याबद्दल बोलून.

क्ष ने ट्वीट केलं - ती पॉर्न एक्ट्रेस आहे.
य ने ट्वीट केलं - ती पैसे घेते
ज्ञ ने ट्वीट केलं - ही ड्रग अ‍ॅडिक्ट आहे.
इति ओप इंडिया.

लताजी आणी सचिन यांची चौकशी करण्याचा निर्णय आततायी व मूर्खपणाचा आहे. गृहमंत्र्यांना फारशी कामे नसावीत, म्हणूनच ते कंगनाशी ट्विटर वर भांडण करणे, ही चौकशी करणे असली फालतू कामे करत असावेत.//

हा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या दृष्टीने पाहिलं तर मूर्खपणाचा नाही. कारण त्यांच्या समर्थकांना अतिशय आवडलेला निर्णय आहे. (एक approval चं उदाहरण इथे वरच आहे.) जेव्हा लताबाईंच्या घरी पोलीस पोचतील किंवा सचिनला पोलीस स्टेशनला नेलं जाईल तेव्हा तर समर्थकांना हर्षवायूच होईल.
राष्ट्रवादीच्या लीडरशिपला मानलं पाहिजे. आपले समर्थक कोण आहेत, कसा विचार करतात , त्यांना काय हवंय- हे त्यांना अचूक कळलं आहे.

लताजी किंवा सचिन या दोघांनाही देव मानणारे लोक आहेत आणि आपले देव कुणा ऐर्यागैर्याच्या इशार्यावर नाचत आहेत हे पहाणे दुःखद आहे.

लता आणि सचीन दोघांनीही जे ट्विट केले आहे त्यात काही आक्षेपार्ह नाही. मराठी माणसाला हुजरेगिरी फारशी जमत नाही. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हे त्या दोघांना खूप आधीपासूनच कळले असावे असे वाटते.

सचीन काँग्रेस काळात राज्यसभेचा खासदार बनला होता. (त्याची सदनातली हजेरी किंबहुना गैरहजेरी ही देखील बातमीविषय ठरली होती त्यावरून तरी त्याला स्वतःला खासदार बनण्याची हौस नव्हती असेच दृगोचर होते.)
अनेक वर्षे जाहीर कार्यक्रम करणे थांबवलेल्या लताने त्या मोठ्या गॅपनंतर शिवसेनेकरता काहीही पैसे न घेता कार्यक्रम केला होता. त्यानंतरही तिने असे जाहीर कार्यक्रम केलेले नाहीत.

त्यावेळी जसे वागले त्याच्या सुसंगतच त्यांचे आताचेही वागणे आहे.
आताही त्यांना मधे ओढू नये, दोष देऊ नये असे वाटते.

हो. त्यांच्यावर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले करू नयेत. अशा सेलिब्रिटींच्या मतप्रदर्शनाने सरकार किंवा विरोधी पक्ष कोणासही बळ मिळते अथवा त्यांची त्यांची बाजू खरी ठरते असे नव्हे. सहमती नसेल तर दुर्लक्ष्य करावे हे उत्तम.

Pages