ग्रेटा थन्बर्ग-पृथ्वीची वकील

Submitted by टोच्या on 22 September, 2019 - 01:27

ग्रेटा थन्बर्ग. एक अवघ्या सोळा वर्षांची चिमुकली. तिचे नाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सुचविले गेले आहे. अगदी युरोपातील राजकारण्यांपासून ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्या पर्यावरणाबाबतच्या धोरणांतील चुकांवर तिने बोट ठेवले आहे. जगभरातील लाखो मुले आज तिच्या पाठिशी आहेत. कोण आहे ही ग्रेटा?
---

पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, ग्लोबल वॉर्मिंग वाढतेय, पृथ्वी धोक्यात आहे, अशी बोंब आपण नियमित मारत असतो. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणबाजीतून. पण, त्यासाठी नेमके काय करायचे आणि कोणी करायचे, याबाबतीत आपल्या कपाळावर मोठे प्रश्नचिन्ह असते. हे सर्व एक तर सरकारने करावे, किंवा शास्त्रज्ञांनी त्यावर काहीतरी मार्ग काढावा अशी आपली अपेक्षा असते. सोशल मीडियावर व्यक्त होणे, थोडीबहुत आंदोलने करणे याव्यतिरिक्त आपण भले आणि आपले काम भले या वृत्तीत आपण जगत असतो. पण, पृथ्वीवर आलेले हे संकट एका चिमुकलीला सहन झाले नाही. चोवीस तास ती त्याचाच विचार करू लागली. कोणी काही करेल याची वाट न पाहता तिने स्वत:पासून सुरुवात केली. तिचे हे आंदोलन इतके व्यापक बनले की आज जगभरातील लाखो मुले शाळा बुडवून तिच्या ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभागी होत आहेत. आज तिच्या आंदोलनाने जागतिक स्वरुप प्राप्त केले असून, जगभरातील देशांना, त्यातील राजकारणी, उद्योगपती, तज्ज्ञांना तिची दखल घेणे भाग पडले आहे. या चिमुकलीचे नाव आहे ग्रेटा थन्बर्ग.
स्वीडनमधील एका कलाकार दाम्पत्याची ही अवघी सोळा वर्षांची मुलगी. आई मलेना अर्नमान एक ऑपेरा सिंगर तर वडील लेखक, कलाकार आणि चित्रपट निर्माता. वयाच्या आठव्या वर्षी ग्रेटाने ‘हवामान बदल’ हा शब्द प्रथम ऐकला. मानव प्रगत झाला पण त्यासाठी त्याने अवलंबलेल्या मार्गांनी पर्यावरणाची अतोनात हानी सुरू केली. वेगवेगळे कारखाने, वाहने यांतून वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साइड सोडला जातोय. त्याचे प्रमाण मर्यादेपलिकडे गेलेय. जंगलांना आगी लागताहेत. त्यात दुर्मिळ निसर्गसंपदा नष्ट होतेय, यामुळे निसर्गाचा समतोलच बिघडलाय. ती याबद्दल वाचन करीत गेली. तिने आई वडिलांना स्पष्ट बजावले की, घरातील कोणीही वाहन वापरायचे नाही. विमानाने प्रवास करायचा नाही. मांसाहारातून मिथेनचे उत्सर्जन होते, त्यामुळे मांसाहार वर्ज्य. संपूर्ण कुटुंब शाकाहारी बनले. आई-वडिलांना पायी-सायकलवर प्रवास करण्याचा तिने दंडकच घालून दिला. पण, तिच्या एका कुटुंबाने जीवनशैली बदलल्याने काही फरक पडणार नव्हता. त्यासाठी देशाचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांनी याची दखल घेणे गरजेचे होते.
ज्या वयात हसायचे, बागडायचे त्या वयात तिला पृथ्वीच्या भवितव्याच्या चिंतेने ग्रासले. बरोबर वर्षभरापूर्वी म्हणजे २० ऑगस्ट २०१८ रोजी तिने यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. पण, एक नववीतील मुलगी काय करू शकणार होती? तिला कदाचित माहिती होते की आपण फेकलेला दगड आभाळाला भेदू शकणार नाही. पण, पूर्ण ताकदीनिशी दगड भिरकावण्यास काय हरकत आहे? पुढच्याच महिन्यात म्हणजे ९ सप्टेंबरला स्वीडनमधील निवडणुका होत्या. निवडणुका होईपर्यंत शाळेतच जायचे नाही, असा तिने निर्णय घेतला. ती रोज घरून निघायची आणि स्वीडिश संसदेसमोरील एका झाडाखाली येऊन बसायची. हातात ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ असा स्वत:च लिहिलेला फलक घेऊन ती शाळेच्या वेळेत संसदेबाहेर बसू लागली. आधी तिच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मात्र, तिने हार मानली नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांना हस्तलिखित पत्रके वाटू लागली. ‘तुम्ही माझे भविष्य उद्ध्वस्त करीत आहात, म्हणून मला हे आंदोलन करावे लागतेय’ असा मजकूर त्यात लिहिलेला होता. जंगलांना लागलेल्या आगी आणि त्यामुळे वातावरणात वाढलेले कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण यामुळे गेल्या वर्षी स्वीडनमध्ये २६२ वर्षांतील सर्वाधिक तप्त उन्हाळा पडला. स्वीडिश सरकारने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि पॅरिस कराराचे पालन करावे या तिच्या मागण्या होत्या.
सुरुवातीला तिने इन्स्टाग्राम, ट्विटरवर तिच्या आंदोलनाचा फोटो टाकला. हळूहळू तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष जाऊ लागले. तिच्या विषयाचे गांभीर्य लोकांना पटू लागले. पर्यावरण रक्षण या विषयावर काम करणारी सोशल मीडिया कंपनी ‘वुई डोन्ट हॅव टाइम’चा फोटोग्राफर इंगमर रेन्टझॉग याने तिचे फोटो त्याच्या कंपनीच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले. त्याला हजारो व्ह्यूज मिळाल्या. नंतर त्याने तिचे व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर चालवले. लोकांमध्ये तिच्या आंदोलनाची चर्चा होऊ लागली. वृत्तपत्रे आणि चॅनलने तिच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आणि तिची ही मोहीम व्यापक बनली. स्वीडनच्या निवडणुका झाल्यानंतरही तिने दर शुक्रवारी आंदोलन सुरू ठेवले. सुरुवातीला तिला वेड्यात काढणारे तिचे मित्र-मैत्रिणी या आंदोलनामध्ये भाग घेऊ लागले. देशोदेशीच्या माध्यमांनी तिची दखल घेतली. शाळांमध्ये चर्चा होऊ लागली. तिच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मुले दर शुक्रवारी ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेऊ लागली. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत २७० शहरांतील सुमारे २० हजार मुलांनी तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत ‘स्ट्राइक फॉर क्लायमेट’मध्ये सहभाग घेतला. त्यानंतरही युरोपपासून ते जपानपर्यंत लाखो मुले पर्यावरण रक्षणासाठी रस्त्यावर उतरली. भारतातही काही शाळांमधील मुले तिच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
ग्रेटा काही दिवसांतच अघोषित लीडर बनली. संपूर्ण युरोपात तिची कीर्ती पोहोचली. तिला मोठमोठ्या परिषदांमध्ये भाषणांसाठी निमंत्रणे येऊ लागली. सोशल मीडियावर तिचे लाखोंनी फॉलोवर वाढले. ग्रेटाच्या म्हणण्यानुसार ग्लोबल वॉर्मिंगने आता इतके गंभीर रूप धारण केले आहे की मानवजातीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. तिच्या वयाच्या पिढीचे भविष्य बरबाद करण्यासाठी तिच्या पालकांच्या वयाची पिढीच जबाबदार आहे, असा तिचा स्पष्ट आरोप आहे. लंडनच्या संसदेत बोलताना तिने परखडपणे आपला मुद्दा मांडला. ‘तुम्ही आमच्याशी खोटे बोलता. तुम्ही आमच्या पिढीला खोटा विश्वास देता. आमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगता. पण, वास्तव फार निराळे आहे. आमच्या पिढीचे भविष्य तुम्ही अंध:कारात ढकलत आहात.’
ती म्हणते, ‘आपल्याला आता खडबडून जागे होण्याची आणि आपल्या सवयी तत्काळ बदलण्याची गरज आहे. कारण अगदी लहान लहान गोष्टींतूनच मोठमोठ्या समस्यांवर उत्तर मिळू शकते. राजकारणी आणि धोरणे बनविणाऱ्यांनी आता शास्त्रज्ञांचे ऐकण्याची गरज आहे. ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्या अहवालानुसार आपल्याकडे चुका सुधारण्यासाठी केवळ बारा वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल की आपले कोणतेच उपाय कामी येणार नाहीत.’
तिने हेही निदर्शनास आणून दिले की, पॅरिस करारानुसार विविध देशांनी मान्य केलेली ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची मर्यादा दरवर्षी १.५ सेल्सिअस आहे. ती अपुरी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. २०२० पर्यंत ग्रीन हाऊस गॅसेस निर्मिती पूर्णपणे थांबली पाहिजे. ब्रिटिश संसदेत बोलताना तिने सरकारला अक्षरशः शब्दांत पकडले. ब्रिटनने ‘उत्सर्जन कमी करणे’ (lowering emmissions)असा शब्द वापरला आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी ते पूर्णपणे थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे तिने सुनावले. ‘युरोपियन इकॉनॉमिक अँड सोशल कमिटी’पुढे बोलताना तिने युरोपियन युनियनने कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण २०३० पर्यंत ८० टक्क्यांपर्यंत रोखण्याचा मुद्दा मांडला.
ग्रेटाच्या या कार्याबद्दल तिला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शालेय पुरस्कारांबरोबरच विविध संस्थांनी तिच्या कार्याची दाखल घेतली. प्रतिष्ठित ‘टाइम’ मासिकाने जगातील २५ सर्वात प्रभावी टीनएजरमध्ये तिची निवड केली. गेल्या मार्चमध्ये महिला दिनी तिला स्वीडनमधील ‘सर्वात महत्त्वाची महिला’ हा बहुमान प्राप्त झाला. यासह विविध पर्यावरण संस्था, वृत्तपत्रांनीही तिला गौरविले. तिच्या कार्याची सर्वात मोठी दखल म्हणजे स्वीडिश संसद आणि नॉर्वेतील तीन पदाधिकाऱ्यांनी तिची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. याबाबत तिने कृतज्ञता व्यक्त केली. एप्रिल २०१९ मध्ये ‘टाइम’ मासिकाने तिचा जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश केला. ब्रिटिश व्होग मासिकाच्या सप्टेंबर २०१९च्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या १५ महिलांमध्येही तिचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाने प्रभावित होऊन अनेक शाळकरी मुलांमध्ये पर्यावरण जागृती तर झालीच पण जगभरातील राजकारणी, धोरणी मंडळीलाही आपल्या चुका कळल्या आणि त्यांनी त्या मान्यही केल्या. याला ‘ग्रेटा इफेक्ट’ म्हटले जात आहे. ज्या-ज्या माध्यमातून कार्बन उत्सर्जन होईल, त्याचा वापर टाळण्याच्या तिच्या आग्रहामुळे अनेकांनी सायकली, रेल्वेचा वापर सुरू केला. ग्रेटाला २३ जानेवारी रोजी डावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. ती तब्बल ३२ तासांचा रेल्वे प्रवास करून या ठिकाणी पोहोचली. मात्र, येथे आलेले विविध देशांचे प्रतिनिधी तब्बल १५०० चार्टर्ड विमानांनी येथे दाखल झाले होते. हा विरोधाभास लक्षात आल्यावर तिने तेथेच सर्वांना करणी आणि कथनीतील फरक लक्षात आणून दिला. प्रसिद्ध टॉक शो टेडएक्स स्टॉकहोमद्वारे तिने आपले विचार जगभर पोहचविले. बर्लिनमध्ये तिला २५ हजार लोकांसमोर आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली. तिला जर्मनीतील वार्षिक चित्रपट महोत्सवात ‘गोल्डन कॅमेरा’ हा विशेष पुरस्कार देण्यात आला. युरोपिअन पार्लमेंट, ऑस्ट्रेलियन वर्ल्ड समिट आर ट्वेंटीमध्येही तिला सन्मानाने निमंत्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात न्यूयॉर्क आणि चिली देशांत होणाऱ्या पर्यावरण परिषदेसाठी तिला निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी तिने खास सोलर पॅनलवर चालणाऱ्या तराफ्यातून तब्बल १४ दिवसांचा प्रवास करीत अॅटलांटिक समुद्र पार केला, पण विमान किंवा मोटरबोट वापरली नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवे तिने एक व्हिडीओ पोस्ट करीत भविष्यातील धोक्यांची कल्पना दिली. ‘प्रिय मोदी, पर्यावरणीय समस्यांवर तुम्ही आताच ठोस पावले उचलण्याची गरज आहे, नुसते बोलण्याची नाही. तुम्ही बोलता खूप पण प्रत्यक्ष परिणाम खूपच कमी दिसून येतो. तुम्ही पर्यावरण रक्षणात अपयशी होत आहात. असेच राहिले तर तुम्ही या जगातील सर्वात दुष्ट खलनायक ठराल, जे तुम्हाला कधीच नको असेल,’ अशा स्पष्ट शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ग्रेटाने बुधवारी, दि. १८ सप्टेंबरला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांची भेट घेतली. ओबामांना तिने आपल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ओबांनी तिच्यासाठी उच्चारलेले शब्द अत्यंत महत्त्वाचे होते. ते म्हणाले, तुझ्यासारख्या नेतृत्वाची गरज आता गरज आहे. तू या पृथ्वीसाठी लढणारी सर्वश्रेष्ठ वकील आहेस. यातच तिच्या सर्व कार्याचा सार आला. ग्रेटाची ही लढाई चालूच आहे. आपणही आपल्या जीवनशैलीत बदल करून आपल्या पृथ्वीला वाचविण्याच्या लढाईत सहभागी होण्याची गरज आहे.
(महाराष्ट्र टाइम्सच्या नाशिक आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

> ट्वीट करणार्‍या एकाने भाजपच्या एका पदाधिकार्‍याला टॅग केलं होतं. सुनील शेट्टी बहुतेक.

त्यात काय एवढे ? आम्हीही बॉस ने सांगितलेले काम झाल्यावर जिरा मध्ये त्याला टॅग करतो !

रोहित पवार आणि रितेश विलासराव देशमुख यांनी मोदींबद्दल सकारात्मक ट्विट्स केली आहेत. असं करण्यासाठी कोणाचा दबाव तर नाही ना, चौकशी करावी.

दुसरीकडे संसदेत म्हणे काँग्रेसच्या एका खासदाराने योगेंद्र 'सलिम' यादववरच गंभीर आरोप केलेत. Wasn't this yogendra yadav one of the leaders of the andolan???

दुसरीकडे संसदेत म्हणे काँग्रेसच्या एका खासदाराने योगेंद्र 'सलिम' यादववरच गंभीर आरोप केलेत. >>रवनितसिन्ग बिट्टु

Narendra Modi
@narendramodi
Was happy to receive a call from my friend
@JustinTrudeau
. Assured him that India would do its best to facilitate supplies of COVID vaccines sought by Canada. We also agreed to continue collaborating on other important issues like Climate Change and the global economic recovery.

अर्रर्रर्र! जस्टिंदर ट्रूडोसिंग ला पण मोदींना फोन करावा लागला मेक-इन-इंडिया कोविड वॅक्सिन मागायला.
म्हणजे आंदोलनजीवी क्यानडावर विसंबून आहेत आणि जस्टीन्डर मोदींवर विसंबून आहे. मजाच आहे.

Rihanna’s luxury Fenty fashion house closes down after two years
Label hit by supply chain issues and travel restrictions during pandemic – as well as possible teething problems

Wed 10 Feb 2021//

रिहाना काही आमची शत्रू नाही. तिच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्या यासाठी शुभेच्छा.

दुसर्‍या एका धाग्यावर एका आयडीने रिहानाचे रेहाना केलं. इथे जस्टिन टुडोंचं बारसं केलं गेलं. Do you hear the dog whistle?

भक्त मंडळी असे नाचत आहे जसे मोदींनीच संशोधन करून लस शोधून काढली आहे. नेहेरुंनी पाया घातला म्हणून हे शक्य झाले. नेहेरुंनी पंचगव्यावरच लक्ष केंद्रित केले असते तर हे शक्य नव्हते.

भक्त आणी गोदी मेडिया टृडे च्या अधिकृत निवेदनातील हे वाक्य खुबीने टाळत आहेत.
The leaders discussed Canada and Indias commitment to democratice principles , recent protests and the importance of resolving issues through dialogue.

नेहेरुंनी पाया घातला म्हणून हे शक्य झाले.//

ऑफ़कोर्स. पंडितजी म्हणजे ग्रेटच हे वेगळं सांगायला कशाला हवं Happy

भक्त आणी गोदी मेडिया टृडे च्या अधिकृत निवेदनातील हे वाक्य खुबीने टाळत आहेत.//

यात दखल घेण्यासारखं काही नाही. फार्मर्स प्रोटेस्टबद्दल कॅनडा डिसेंबर पासून कुईकुई करत आहे. पण आता vaccine साठी मुकाट्याने फोन करावा लागला.

रिहानाने अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांबद्दल अनेकदा ट्वीट केलं. त्याआधी जॉर्ज फ्लॉयडबद्दल ट्वीट केलं. तेव्हा ट्रंपने तिच्यावर आपले पित्ते सोडल्याचं ऐकिवात नाही.
भारतीय सेलिब्रिटींनी ब्लॅक लाइव्ह्ज मॅटरबद्दल ट्वीट केलेलं चालतं.
इतर वेळी आम्ही वसुधैव कुटुम्बकम् म्हणतो. पण कोणी आमच्या देशातल्या इश्युबद्दल बोललं की ते चुलीत घालतो.

पण आता vaccine साठी मुकाट्याने फोन करावा लागला.
फोन केला म्हणून भक्त एवढे खुश का होत आहेत? "मुकाट्याने फोन करावा लागला" ह्यात टिपिकल मध्यमवर्गीय गॉसिपस मेंटेलिटी डोकावत आहे.

{{{ - त्यातही हिटलर व मुसोलिनी च्या अ‍ॅक्सिस पॉवर कडून लढलेल्या इटालियन व्यक्तीच्या मुलीची - ते ही जन्माने रोमन कॅथलिक असलेल्या सोनिया गांधींची मदत घेतोय. }}}

या लॉजिकला काही अर्थ नाही. कारण भाजपविरोधक भाजपला हिटलर समर्थक मानतात. मग या (जर्मनी + इटली भाई भाई) न्यायाने भाजप देखील सोनिया समर्थकच ठरेल का? तसेच भाजपला इस्त्राईलसमर्थकही ( अमेरिकेतली ज्यूलॉबी) मानतात. प्रत्यक्षात हिटलरने ज्यूंची हत्या केली होती. तेव्हा उगाच जुन्या काळचे संदर्भ आज लावणे कालबाह्य आहे.

नेहेरुंनी पाया घातला म्हणून हे शक्य झाले.//

नेहरुंनी स्वतः किती केले? आणि इंग्रजांकडून त्यांना रेडिमेड किती गोष्टी (पायाभूत सुविधा इत्यादी) मिळाल्या?

असं तर प्रत्येकाच्या कामाचं श्रेय त्याच्या पूर्वसूरींनाच द्यावे लागेल? तसे करता येईल काय? ही एक रिले रेस आहे. प्रत्येक जण मागच्याने आणून दिलेली बॅटन पुढे नेत आहे. तुम्ही तुमच्या हातात बॅटन आल्यावर ती किती काळात किती पुढे नेली हे पाहावे लागेल. नेहरुंना १६ + वर्षे मिळालीत. मोदींना आता ६+ झाली आहेत. मोदींना किती विरोधाचा सामना करावा लागत आहे? नेहरूंना किती विरोध होता? अनेक बाबी तपासाव्या लागतील.

चाचाजान जर इतके ग्रेट होते तर त्यांच्या पक्षाला सत्ता का टिकविता आली नाही याचाही विचार करावा.

पण आता vaccine साठी मुकाट्याने फोन करावा लागला. >> हा अमेरिकन मुजोरपणा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणात जर डोकावू लागला तर ते भारताचे मोठे अपयश ठरेल. भारताने जगाचे नेतृत्व करावे पण ते अमेरिकेसारखे नव्हे. भारतीय संस्कृतीचा मान राखला जाईल अशाप्रकारे. जगापुढे ज्या भीषण समस्या उभ्या आहेत त्या सोडवण्यासाठी अमेरिका किंवा चीन सारख्या विनाशकारी नेतृत्वापेक्षा कित्येक पटीने चांगले नेतृत्व भारत नक्कीच देऊ शकेल जर आपण आपल्या तत्वज्ञानाशी प्रामाणिक राहू शकलो तर.

हा attitude दाखवताना आपली औषधे निर्यात करण्याची क्षमता आहे पण त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी आपण संपूर्णपणे चीनवर अवलंबून आहोत हे आपण विसरून चालणार नाही.

हा अमेरिकन मुजोरपणा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणात जर डोकावू लागला तर ते भारताचे मोठे अपयश ठरेल. //

यात मुजोरपणा कॅनडाकडून होतो आहे. अनेक वर्षे कॅनडा खलिस्तानी टेररिस्टना आश्रय देतो आहे. कॅनडाचा पासपोर्ट असलेले लोक दिल्लीत येऊन आंदोलन करत आहेत. निष्पाप लोकांचे जीव घेण्याचा इतिहास असलेले खलिस्तानीज हा एक मुद्दा झाला.
कॅनडा डाळींचा मोठा प्रोड्युसर आहे आणि भारत त्यांचं मोठं गिऱ्हाईक आहे. मोदी सरकारने कॅनेडियन डाळींवरचा dependence कमी करू, भारतात डाळी पिकवू अशी भूमिका घेतली व त्यानुसार पावलं टाकली आहेत. (हे Canadian शेतकरी सीख आहेत असंही वाचलं.)
थोडक्यात -एका देशाचं फार्म रिलेटेड धोरण दुसऱ्या देशासाठी नुकसानकारक असू शकतं सो Canada ला भारताच्या फार्म रिलेटेड इश्यूमध्ये किती नाक खुपसू द्यायचं?

हे खूपच far fetched argument वाटत आहे. हे शेतकरी कायदे न लागू झाल्याने डाळींच्या import export policy वर कसा परिणाम होईल? डाळींच्या आयातीवर बंदी घालायला हे कायदे लागू व्हावेत ही अट आहे का? असे नसेल तर याचा काही संबंध नाही. आणि डाळी आयात करून आपला water footprint वाचणार असेल तर आपण कदाचित फायद्यात राहू.

सनव काकांच काहीच्याकाही लॉजिक. कॅनडाची अर्थव्यवस्था फक्त डाळींवर अवलंबून आहे काय की भारताने जरा शेती धोरण बदलले की लगेच कॅनडाला अशी कुरघोडी करण्याची गरज पडली. ज्या राष्ट्रांनी शेतकरी आंदोलना बद्दल काळजी व्यक्त केली त्या राष्ट्रांना शत्रू गटात टाकून त्याच्या विरोधात गरळ ओकत राहणे एवढेच जमते भक्त लोकांना.

जिज्ञासा,

शेती क्षेत्रात structural reforms झाल्यामुळे त्या क्षेत्रात प्रगती होऊन डाळी इम्पोर्ट करण्याची गरज कमी होणार नाही का?
मोदी सरकार आल्यापासून कॅनडाची डाळीच्या मुद्द्यावरून कुरकुर सुरू आहे.
https://economictimes.indiatimes.com/news/economy/agriculture/canada-rai...

बाकी कॅनडाचं खलिस्तानी अतिरेक्यांना हार्बर करणं आणि भारताच्या शेतकरी कायद्यांत नाक खुपसणं हे तुम्हाला मान्य आहे का? या दोन गोष्टी जर मुजोरी वाटत नसेल आणि तर let's agree to disagree!
मोदींनी कॅनडाच्या फोनची वाट न बघता vaccine पोचत्या करायला हव्या होत्या, ऍग्री ट्रेड पॉलिसीजच्या कॉपी कॅनडाला पाठवून 'सर तुम्ही अप्रुव्ह करत असाल तरच संसदेत मांडतो' असं म्हणायला हवं होतं- अशी काही अपेक्षा होती का?

असं बोलताय जसं काही कॅनडा कृषीप्रधान देश आहे व त्याचं उत्पन्न पुर्णपणे भारतानी त्यांची डाळ खरेदी करण्यावर अवलंबून आहे Lol

जिज्ञासा,
To add to previous commment-

राकेश टिकेत हे मिनिमम प्राईस सपोर्ट ची मागणी करत आहेत. सरकार मिनिमम प्राईस सपोर्ट कंटिन्यू करायला कटिबद्ध आहे असं स्वतः पीएम मोदींनी सांगितलं आहे.
पण मोदींच्या याच भारतीय शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करण्याच्या धोरणाला कॅनडाचा विरोध आहे कारण त्यात त्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे.
वरच्या ET च्या लिन्कमध्ये डिटेलमध्ये आहे.

Canada's dual stance on Minimum Support Price exposed
https://www.wionews.com/india-news/canadas-dual-stance-on-minimum-suppor...

कॅनडात डाळी प्रोड्युस करणारे शेतकरी शीख आहेत. मोदी सरकारने कॅनेडियन डाळींवरचा dependence कमी केला त्यामुळे या Canadian शेतकर्यान्चे उत्पन्न कमी झाले आहे. कॅनडात अनेक खलिस्तानी शीख आहेत. मागे Canadian पन्तप्रधानाबरोबर आलेल्या एका शीख मन्त्र्याला भेटायला पन्जाबचे मुख्यमन्त्री अमरिन्दर सिन्ग यानी तो मन्त्री खलिस्तान समर्थक आहे म्हणून नकार दिला होता. असे खलिस्तान समर्थक Canadian शीख या क्रुशी कायद्याचे विरोधक आहेत व तेच या आन्दोलना मागे आहेत व या लोकानीच रिहाना, गेटा व मिया याना पैसे देऊन या कायद्यान्च्या विरोधात ट्वीट करायला उद्युक्त केले असे आरोप केले जात आहेत. खरे खोटे लवकरच बाहेर येईल.

सनव, भारताने कॅनडाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नयेत पण आपण अमेरिका किंवा चीन सारखे एका हाताने मदत करायची आणि दुसऱ्या हाताने गळा चिरायचा असे परराष्ट्र धोरण कधीही ठेवलेले नाही. Vaccine चा पुरवठा आणि शेतकरी आंदोलनात कॅनडाच्या काही नागरिकांचा कथित सहभाग या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या तशाच रहाव्यात एवढेच माझे म्हणणे आहे. तुमच्या मूळ पोस्टमधे जो सूर आहे तो चुकीचा आहे.
डाळींची आयात - कॅनडातले शीख शेतकरी -खलिस्तान ह्या लिंक्स फारच कमजोर आहेत माझ्यासाठी. त्यामुळे त्यावर आधारित विधानांवर माझा विश्वास नाही. शेवटी या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत येते तेव्हा ती गोची अजून सुटायची आहे ना? केरळने आपल्या विधानसभेत हे कायदे लागू होणार नाहीत असे काहीतरी विधेयक बहुमताने पास करून सुद्धा घेतले म्हणे!

सनव, भारताने कॅनडाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नयेत पण आपण अमेरिका किंवा चीन सारखे एका हाताने मदत करायची आणि दुसऱ्या हाताने गळा चिरायचा असे परराष्ट्र धोरण कधीही ठेवलेले नाही.//

Huh??भारताने कोणाचा गळा चिरला? भारताने कॅनडाच्या अंतर्गत बाबतीत नाक खुपसलेलं नाहीये.

Vaccine चा पुरवठा आणि शेतकरी आंदोलनात कॅनडाच्या काही नागरिकांचा कथित सहभाग या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या तशाच रहाव्यात एवढेच माझे म्हणणे आहे. तुमच्या मूळ पोस्टमधे जो सूर आहे तो चुकीचा आहे.//

फक्त काही नागरिकांचा सहभाग इतकाच मर्यादित मुद्दा नाहीये. कॅनडा सरकारची आक्षेपार्ह स्टेटमेंट, खलिस्तानवादी तिथे मंत्रीपदावर असणं हे थेट सरकारला गोवणारं आहे. भारताने हमीभाव देऊ नये असा हट्ट एकीकडे कॅनडा करतंय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना हमीभाव द्या म्हणत आंदोलनाला फूस देतंय हे contradictory नाही का? किती ढवळाढवळ करणार? हमीभाव काढून टाकण्याची मागणीही काही कथित नागरिकांनी नाही तर त्यांच्या सरकारने केली होती.

त्यातूनही भारत vaccine द्यायला तयार आहेच.
पण जस्टीन ट्रूडोला त्यासाठी फोन करणंही जड जात होतं. शेवटी विरोधी पक्षाकडून प्रश्न विचारले जाऊ लागले की आपल्याला लस हवी आहे तर ती मिळवण्यासाठी ट्रूडो मोदींना फोन का करत नाही? कारण त्यांच्या जीवाचा प्रश्न होता. तेव्हा राजकीय दबावाखाली शेवटी त्याने फोन केला.

नेहमीप्रमाणे एखाद्याने न उच्चारलेले शब्द त्याच्या तोंडी घुसडण्याचा प्रकार चालू आहे.
जस्टिन ट्रूडोंनी पीसफुल प्रोटेस्ट , डेमोक्रॅटिक - ह्युमन राइट्स, नीड फॉर डायलॉग असे शब्द वापरले आहेत.
१ त्यांचं पहिलं स्टेटमेंट
२. दुसरं स्टेटमेंट

सनव, आत्ताच्या केसमध्ये भारताने काही वावगं केलं नाहीये. पण तुमच्या मूळ पोस्टमधे जो सूर आहे तो he came begging for vaccine तो सूर चुकला आहे. अशा सुरात जर राजकारण घडवले तर ते अमेरिका आणि चीनच्या सारखे bullying होते. Let's keep vaccine supply separate from anti-farm laws protests. मला एवढेच म्हणायचे आहे.
बाकी तुमच्या लेटेस्ट पोस्ट वरून कॅनडाचा अंतर्गत प्रश्न उगीच शेतकरी आंदोलनाशी जोडला जातो आहे असं वाटलं. Are we reading into things too much?

मोदी ट्रुडो फोन संभाषणाबाबत दोन्ही देशांनी जारी केलेल्या पत्रकांतही फरक आहे.
१. कॅनडाचं पत्रक
२. भारताचं पत्रक

मोदी - बिडेन संभाषणाबाबत दोन्ही देशांनी जारी केलेल्या पत्रकांतही असाच फरक आहे.
१. अमेरिकेचं पत्रक
The President underscored his desire to defend democratic institutions and norms around the world and noted that a shared commitment to democratic values is the bedrock for the U.S.-India relationship
२. भारताचं पत्रक They noted that the India-US partnership is firmly anchored in a shared commitment to democratic values and common strategic interests.

किमान आधारभूत मूल्यांबाबत विकसित आणि विकसनशील देशांत मतभेद आहेत. याबाबत कॅनडा आणि अमेरिकेची मतं एकसारखीच आहेत.

जस्टीन ट्रूडोला त्यासाठी फोन करणंही जड जात होतं.
त्यांनी तुम्हाला चहा पितानी हे सांगितलं का? का हे मनाचे श्लोक आहेत?

वर रिहानाच्या आर्थिक अडचणींबद्दल लिहिलं गेलंय म्हणून.
https://www.elle.com/culture/celebrities/a31851253/rihanna-clara-lionel-...
Rihanna's Foundation Just Donated $5 Million To The COVID-19 Response Efforts

इथे रिहानाला डिफेंड करायचा हेतू नाही. त्याची गरजही नाही. पण राइट विंगर्स आपल्या विरोधात कोणी बोलला की त्याच्या मागे कसे हात धुवून लागतात आणि असंबद्ध गोष्टीं वरही पिच्छा पुरवतात हे दाखवायचं आहे. रिहानाला तिच्या बॉयफ्रेंडमुळे डोमेस्टिक व्हायोलेंस सहन करावा लागला याबद्दल या मंडळींनी ( इथे नव्हे) आनंद व्यक्त केलाय.

Susan Sarandon ने शेतकरी आंदोलनाबद्दल मत व्यक्त केलं.
Corporate greed & exploitation knows no bounds, not only in the US but worldwide. While they work w/ corp. media & politicians to silence the most vulnerable, we must let India’s leaders know the world is watching & we #StandWithFarmers! #FarmersProtests
तिने शेअर केलेल्या आर्टिकलचं शीर्षक आहे
Free speech under threat as India clamps down on farmer protests

As farmers camp out for months against new farm laws, mainstream and social media come under unprecedented attacks by the government.

यावरच्या ओप इंडिया च्या बातमीचं शीर्षक
Susan Sarandon, addicted to powerful psychedelic drugs, comments on farmer protests in India

सनव, आत्ताच्या केसमध्ये भारताने काही वावगं केलं नाहीये. पण तुमच्या मूळ पोस्टमधे जो सूर आहे तो he came begging for vaccine तो सूर चुकला आहे.//

भारताने काही वावगं केलेलं नाहीये हे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
आता पोस्टच्या सुराबद्दल- खलिस्तानचा इतिहास रक्तरंजित आहे. त्यांच्याबद्दल मलातरी सहानुभूती नाही. त्यामुळे खलिस्तानवादीना काहीही करू दे, भारताने तरीही त्यांना, त्यांच्या लोकांना पाठीशी घालणाऱ्याना आनंदाने vaccine द्यावी - no terms and conditions- याबद्दल let's agree to disagree.

Yes, let us agree to disagree here. I don't want to hate in plural. माझ्यासाठी खलिस्तानवादी वायले आणि कॅनडाचे नागरिक ज्यांना या लसीमुळे फायदा होणार आहे ते वायले.

Pages