नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.
यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.
सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.
मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!
परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!
मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील
गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!
संयोजकांनी तिकडे स्पर्धांचे
संयोजकांनी तिकडे स्पर्धांचे निकाल लावले आणि ईकडे वाचकांनी संयोजकांचा निकाल लावला असे दिसते आहे.
एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते! >>> ह्या संयोजकांनी वर केलेल्या पोकळ दाव्यातले फोलपण आंणि मुद्रित शोधणाच्या चुका) किती ऊघडपणे दिसत आहेत ते सांगतो.
प्रत्येक सदस्याने एकेक स्पर्धेची आणि ऊपक्रमाची कल्पना आणि मसुदा मांडला. सायफाय कथा, हास्य कथा, आणि शशक ह्या कल्पना कोणी मांडल्या असतील ते ओळखणे अगदीच सोपे आहे.
गझलेशी दुरान्वये संबंध आलेल्या एका सदस्याने (ह्याला आपण हौशी गझलनवाझ म्हणू) गझल स्पर्धा घ्यावी असा प्रस्ताव मांडला. बाकी सदस्यांनी भीडेखातर ह्या प्रस्तावाला फारसा विरोध केला नाही. (सदस्यात नवखेपणा असणे आणि आपली जबाबदारी नक्की काय आहे ते माहित नसणे, एका ऑथोरिटीव आवाजाचा अभाव किंवा आपली जबाबदारी फक्त आपण प्रस्ताव मांडलेल्या स्पर्धेपुरतीच आहे ही भावना अशी एक ना अनेक कारणे).
बर आजवर कधीही गझल स्पर्धा झाली नसल्याने (अपवाद कार्यशाळा, ज्यात अनेक दिग्गज गझलकार मेंटॉर्/मॉडरेटर होते) ह्या स्पर्धेचे परिक्षण कसे करायचे असा प्रश्न समोर आला. कारण ९०% वाचकांना गझलेचे तंत्र आत्मसात नसते त्यामुळे मतदान घ्यावे तर नेमकी फसलेली गझल निवडून यायची त्यामुळे हौशी गझलनवाझ मीच परिक्षण करणार असे म्हणाले. सगळ्या स्पर्धेंसाठी मतदान आणि एकासाठी परिक्षण असे कसे चालेल ? म्हणून मग सगळ्याच सदस्यांनी संयोजकच परिक्षण करतील ही कल्पना सगळ्यांनी ऊचलून धरली. ( ह्याची कारणे - हौशी गझलनवझांच्या आग्रहाला बळी पडणे म्हणा किंवा आपल्या कल्पनेचा कंट्रोल आपल्या हातात ठेऊन बाकी सदस्य होकार भरण्यापुरतेच असूदे असा विचार सर्वांच्या मनात रुजल्याने म्हणा). स्पर्धेशी सबंधित नसलेल्या बाकी सदस्यांना एकेका ऊपक्रमाची जबाबदारी मिळाली.
तर झाले काय, मी गझलेच्या धाग्यावर एकंदर स्पर्धेबद्दल आणि परिक्षणाबद्दल प्रश्न विचारल्याने आणि शंका ऊपस्थित केल्याने (मला खरेच गझल लिहिण्याची खूप ऊत्सुकता आणि ईच्छा होती) अचानक "संयोजक = परिक्षक" असण्यातला फोलपणा संयोजकांच्या लक्षात आला.
ईथे आपली मनमानी आणि त्यामागून होणारी फजिती ऊघडी पडणार म्हणून संयोजकांनी तो गझलेचा धागाच ऊडवला.
पण बाकी स्पर्धांना 'संयोजक= परिक्षक' हे कमिट करून झाले होते. मी "गझलेचा धागा कुठे आहे" हा प्रश्न लाऊन धरल्याने नाईलाजाने संयोजकांना तो धागा पुन्हा आणावा लागला. धागा गायब होण्याबद्दलचे स्पष्टीकरण सुद्धा संयोजकांनी न देता अॅडमिन-टीम ने दिले. (हाऊ ईंट्रेस्टिंग?). तर गझलेचा धागा पुन्हा आल्यानंतर त्यात सगळेच बदलले होते. ना ती स्पर्धा नवख्या गझलकारांसाठी होती ना त्यात गझल कार्यशाळेची लिंक होती ना परिक्षणाबद्दल चकार शब्द होता. थोडक्यात ज्यांना चांगली गझल लिहिता येते त्यांनीच भाग घ्या. (बरं मग संयोजकांनी नियमित गझल लिहिणार्यांना आवताण, आठवण, जाहिरात वगैरे करावे ना तर तसेही काही दिसले नाही)
तर आता बॅकग्राऊंडमध्ये काय झाले ते बघू. गझल स्पर्धेचा असा फज्जा ऊडाल्याने, "संयोजक=परिक्षक" हा हट्ट वाचकांनी/स्पर्धकांनी व्यक्त केलेल्या रोषामुळे आपल्या अंगाशी आल्याने आणि धागा/माहिती/ प्रतिसाद ऊडवण्यासारख्या अनएथिकल गोष्टी कराव्या लागल्याने गझल स्पर्धेचा प्रस्ताव मांडणार्या हौशी गझलकाराबरोबर ऊभे राहण्यास व ह्या ऊडालेल्या फज्जाची जबाबदारी घेण्यास ऊर्वरित संयोजक मंडळाने नकार दिला. ज्याचे पर्यावसान हौशी गझलकाराने संयोजनापासून फारकत घेण्यात झाले. मग त्या गझल सर्धेला कोणी वालीच ऊरला नाही.
एकेका स्पर्धेची जबाबदारी एकेका सदस्यावर असल्याने आणि जोवर तो सदस्य काही अॅक्शन घेत नाही, स्पर्धकांच्या प्रश्नांना/शंकाना ऊत्तर देत नाही तोवर ऊर्वरित सदस्यांनी त्या स्पर्धेची कुठलीही जबाबदारी ऊचलली नाही. त्यामुळेच वाचकांना सगळीकडे नगण्य किंवा ऊशिराने प्रतिसाद मिळत राहिला.
आपल्या स्वतःच्या कथा/ललितं लिहिणे, समितीतल्या दुसर्या सदस्यांचे जुने लेख काढून त्यावर लांगूलचालन करणे, परिक्षण करावयाच्या कथांवरच आपल्या प्रतिक्रिया देणे वगरे अनप्रोफेशनल कामे सदस्य करत राहिले. त्यांना शेवटपर्यंट संयोजक म्हणून आपली काय जबाबदारी आहे ते कळालेच नाही.
मायबोली ट्राफिक गणेशोत्सोव स्पर्धा आणि ऊपक्रमांकडे वळवण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित असतांना संयोजन सदस्य एकमेकांचे जुने धागे काढून ट्राफिक दुसरीकडे आणि काही तर फेसबुकवर वगैरे वळवण्यात मग्न होते. हे मुद्दाम केले गेले की असे केल्याने काय होईल हे न ऊमगल्याने, हे सांगणे मात्र अवघड आहे.
This is plausible.
This is plausible.
पण आता जाऊ द्या.
गरिबाला सोडा.
आपल्या स्वतःच्या कथा/ललितं
आपल्या स्वतःच्या कथा/ललितं लिहिणे, समितीतल्या दुसर्या सदस्यांचे जुने लेख काढून त्यावर लांगूलचालन करणे, परिक्षण करावयाच्या कथांवरच आपल्या प्रतिक्रिया देणे वगरे अनप्रोफेशनल कामे सदस्य करत राहिले. त्यांना शेवटपर्यंट संयोजक म्हणून आपली काय जबाबदारी आहे ते कळालेच नाही.
अनप्रोफेशनल काय आहे त्यात? आय मिन सिरियसली? कोणता जुना लेख एखाद्या सदस्याने वाचून त्यावर प्रतिक्रिया लिहू नये? कारण तो संयोजक मंडळात आहे म्हणून? "ट्रॅफिक" तिकडे वळतो म्हणून? आर यू किडींग मी? ट्रॅफिक हा निकष असेल तर हे संयोजक विनर आहेत कारण तुफान रिस्पॉन्स मिळाला त्यांच्या उपक्रमांना.
कथेवर प्रतिक्रिया देण्यामागे उद्देश लेखकाला एनकरेज करणे हा पण असू शकतो ना. ते पण संयोजक मंडळाचं काम नाही का? आणि स्वतः कथा लिहायला काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी स्वतःला बक्षीस पात्र म्हणून निवडलं आहे का कुठेही? तसं नसेल तर त्यांनी कोणी लिहिलं एखादं शशक तर तितकाच ट्रॅफिक नाही का वाढला ?
जबरदस्त झाला यावेळचा माबो
जबरदस्त झाला यावेळचा माबो गणेशोत्सव!
वरती आलेले अनेकांचे आक्षेप रास्त आहेतच. पण त्या एका गोष्टीवरून अनेक चांगल्या गोष्टी दुर्लक्षित होउ नयेत. संयोजकांना त्यांच्या मेहनतीबद्दल आणि अनेक वेगवेगळ्या कल्पना राबवल्याबद्दल धन्यवाद. दहा-बारा दिवस जबरदस्त "buzz" होता माबोवर गणेशोत्सवाशी संबंधित लेखांचा. रोज पहिल्या पानावर अनेक नवीन लेख दिसत.
तुरळक गप्पा मारणारे, वाहत्या पानांवर लिहीणारे अनेक लोक 'लिहीते' झाले हे या वेळचे सर्वात मोठे यश आहे. सगळेच्या सगळे वाचलेले नाही, पण बहुधा 'शशक' ला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला असावा. अनेक आवडल्या, अनेक अगम्य होत्या पण भरघोस प्रतिसाद होता हे महत्त्वाचे.
या उत्सवाची पहिली चाहूल म्हणजे रिक्षा. बरीच चित्रे मस्त होती या पोस्ट्स मधली. तसेच प्रशस्तीपत्रेही चांगली जमली आहेत. त्याकरता 'अज्ञानी' यांचे अभिनंदन.
एकूणच उपक्रमांची 'रेंज' खूप होती. गावे ओळखा वगैरे बर्यापैकी सोप्या, तर चंद्र अर्धा राहिला वगैरे सारख्या अत्यंत क्लिष्ट स्पर्धांमधून वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या आवडीच्या विषयावर लिहायची संधी मिळाले. जुने ते सोने, चित्रपट्/गाणे ओळखा पाहू वगैरे सदरे आवडली. अनेक सदरांत सलग वेळ न देताही भाग घेता आला हे आवडले.
उपक्रमांपैकी - 'आपत्ती व्यवस्थापन' वाला धागा स्थायी करायला हवा. नोड वरून मिळत असला तरी लोकांना तो यापुढेही सहज उपलब्ध असायला हवा.
लोकांना काय आवडले नाही त्याबद्दल अनेकांनी वरती लिहीलेलेच आहे. त्यात नवीन भर घालण्यासारखे काही नाही. पण ज्यांना त्यात भाग घेण्याची इच्छा होती, ज्यांचे मतभेद होते त्यांच्याशी संवाद साधायची गरज होती हे नक्की. संयोजक आपल्या मतावर ठाम असणे आणि प्रत्येकाच्या मताची दखल घेत आपले निर्णय न बदलणे हे सगळे बरोबर आहे. पण ज्यांनी विरोधी मते व्यक्त केली त्यांना साधारण एका दिवसांत तुमच्या मताची दखल घेतली आहे, पण आणखी चर्चेनुसार आता यात बदल होउ शकत नाही - सारखी काहीतरी प्रतिक्रिया संयोजकांकडून येणे अपेक्षित होते.
अशा एक दोन त्रुटी नक्कीच होत्या. पण एकूण गणेशोत्सव यशस्वी झाला असेच म्हणेन! गेले १०-१२ दिवस खूप नवीन आणि इण्टरेस्टिंग वाचायला मिळाले. त्याबद्दल संयोजकांचे, स्पर्धकांचे आणि विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!
कोणता जुना लेख एखाद्या
कोणता जुना लेख एखाद्या सदस्याने वाचून त्यावर प्रतिक्रिया लिहू नये? >> तुम्ही कधी संयोजनात भाग घेतला आहे का? संयोजक म्हणून मला सर्वात जास्त काय हवे असेल असा विचार करून बघा.... ऊत्तर 'पेट्रन्सचे अटेंशन' ह्याशिवाय काही आले तर मला नवल वाटेल. ऊत्तर न सुचल्यास जुन्या यशस्वी संयोजकांना विचारून बघा.
बर संयोजकांनी फक्त संयोजकांच्याच जुन्या धाग्यांचे खोदकाम हे काम गणेशोत्सोवातच करणे जरूरी असते का? आय मीन असा विचार करून बघा तुम्ही दिवाळी अंक मुख्य संपादक आहात आणि आत्ताच नवा अंक प्रदर्शित केला आहे. लोक तो वाचायचे सोडून जुने धागे खोदून वर आणत आहेत. तुमची चीडचीड होणार नाही? आणि जर हे खोदकाम तुमच्या संपादक मंडळातले सदस्य करत असतील तर संपादक म्हणून तुम्ही पूर्णपणे फेल झाला असा त्याचा अर्थ होतो.
एक ऊदाहरण देतो... २०१७ चा गणेशोत्सोव माझा एक "केसचा खेळ" चालू असतांना येऊ घातला. त्यावेळी संयोजकांनी संपर्कातून केस गणेशोत्सोव सुरू होण्याआधी आवरती घेता येईल का? असे मला विचारले, जे मी आनंदाने मान्य केले. ह्याला म्हणतात संयोजनातली जबाबदारी, दूरदृष्टी, फोकस आणि प्रोफेशनलिझम. तुम्ही नवीन स्पर्धा/ऊपक्रम राबवण्याची मेहनत घेत आहात तर गणेशोत्सोवाशी सबंधित नसलेले जुने धागे तुम्हीच ऊकरून आणि पब्लिकला तिकडे जायला ऊद्यूक्त करून त्या मेहनतीला न्याय कसा मिळेल समजावता का? लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक क्लिक दूर आहात यशस्वी आणि अयशस्वी होण्यापासून. एक क्लिक गेम चेंज करू शकते.
अनप्रोफेशनल काय आहे त्यात? आय मिन सिरियसली? >> संयोजक म्हणून घेतलेली जबाबदारी पार न पाडता (लोकांनी एकच प्रश्न/ शंका अनेकदा विचारूनही त्याला ऊत्तरे देण्याकडे सातत्याने आणि सपशेल दुर्लक्ष करून) आपले मटेरिअल पब्लिश करणे. ह्यात तुम्हाला प्रोफेशनलिझम दिसत असेल तर अजून काय बोलणार?
संयोजक विनर आहेत कारण तुफान रिस्पॉन्स मिळाला त्यांच्या उपक्रमांना. >> एक विसरू नका ... कथा स्पर्धकांनी लिहिल्या आहेत संयोजकांनी नव्हे. मी आधीही म्हणलो तसे ही म्युच्युअल सिस्टिम आहे. जिथे शशक स्पर्धा हिट झाली तिथे हास्य आणि चंद्र कथांना अपेक्षित रिस्पॉन्स मिळाला नाही.
अहो कोणतातरी जुना लेख वर
अहो कोणतातरी जुना लेख वर आल्याने तिथे सगळा ट्रॅफिक वळला असं खरोखर दिसतंय का? उलट यावेळी भरपूर बझ गणेशोत्सवाचाच होता.
आणि पूर्वीचे संयोजक आपापली खाजगी गप्पांची पाने पण बंद ठेवायचे का गणेशोत्सवात? तिथे ट्रॅफिक वळू नये म्हणून? हे उगाच खुसपट काढल्यासारखं होतंय. पूर्वी आम्ही असं केलं म्हणून आता यांनी पण तसंच करावं हे फार 'हल्लीच्या सुना ना..' टाईप होतंय.
(लोकांनी एकच प्रश्न/ शंका अनेकदा विचारूनही त्याला ऊत्तरे देण्याकडे सातत्याने आणि सपशेल दुर्लक्ष करून) आपले मटेरिअल पब्लिश करणे. //
शंकेला उत्तर देण्यामध्ये डिले होऊ शकतो जर ते लोक आपसात चर्चा करून मग एक अधिकृत उत्तर देत आहेत. Meanwhile त्यांनी दुसरं काहीच करू नये असं नक्कीच नाही ना.
फारएन्ड, छान आढावा घेतला आहे.
फारएन्ड, छान आढावा घेतला आहे.
अहो कोणतातरी जुना लेख वर
अहो कोणतातरी जुना लेख वर आल्याने तिथे सगळा ट्रॅफिक वळला असं खरोखर दिसतंय का? उलट यावेळी भरपूर बझ गणेशोत्सवाचाच होता. >> एक दोन स्पर्धांचे अपवाद वगळता बहुतांश ऊपक्रमांना प्रतिसाद नाही ह्याचे काय कारण असावे असे तुम्हाला वाटते?
पूर्वी आम्ही असं केलं म्हणून आता यांनी पण तसंच करावं हे फार 'हल्लीच्या सुना ना..' टाईप होतंय. >>>पुर्वी आणि आता अशी काही तुलना नाही. प्रश्न मागून घेतलेल्या जबाबदारीप्रती प्रामाणिक असण्याचा आहे. व्यायसिकपणा दाखवणे हे स्थळ काळपरत्वे बदलत नाही.
शंकेला उत्तर देण्यामध्ये डिले होऊ शकतो जर ते लोक आपसात चर्चा करून मग एक अधिकृत उत्तर देत आहेत. Meanwhile त्यांनी दुसरं काहीच करू नये असं नक्कीच नाही ना. >> तीन, चार, दहा दिवसात एकदाही अधिकृत ऊत्तर न देणे ह्याबद्दल काय मत आहे.
ऊदाहरण हवे आहे का?
अरे माफ करा संयोजकाना. ना
अरे माफ करा संयोजकाना. ना त्याना वर्गनी जमा करता आली, ना त्या पैशातुन दारु पिवुन डिजे लावुन नाचता आले. दया करा!
अनप्रोफेशनल काय आहे त्यात? आय
अनप्रोफेशनल काय आहे त्यात? आय मिन सिरियसली? कोणता जुना लेख एखाद्या सदस्याने वाचून त्यावर प्रतिक्रिया लिहू नये? कारण तो संयोजक मंडळात आहे म्हणून? >>>> हा खाली वर्णन केलेला काय प्रकार आहे समजावू शकाल का?
हे जे खाली लिहिले आहे ते खरं तर None of my business आहे आणि I am not at all proud of this investigative work. पण मला हे अॅक्सिडेंटलीच ध्यानात आले. खाली दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये मी प्रतिक्रिया देणार्या संयोजन समितीतील सदस्याचा आयडी रिडॅक्ट केला आहे आणि ज्यावर त्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्या लेखांच्या लिंक्स दिलेल्या नाहीत.
संयोजक त्यांच्या जबाबदारीशी प्रामाणिक नव्हते हे पटवण्यासाठी हे एक प्रातिनिधिक ऊदाहरण म्हणून देत आहे, अशी अनेक आहेत.
संयोजन समितीतील एका सदस्याने समितीतल्या दुसर्या सदस्यांचे जुने लेख काढून केलेला प्रतिक्रिया देण्याचा हा अट्टहास .. बर प्रतिक्रिया देण्यात तरी प्रामाणिकपणा असावा ना? पण तो सुद्धा नाही.
ह्या एकाच सदस्याच्या केवळ एका मिनिटांच्या अंतरांनी दोन वेगळ्या लेखांवर आलेल्या प्रतिक्रिया आहेत.
पहिला प्रतिसाद खरे तर विनोदी कथेवर आहे पण कथाच वाचण्याची तसदी न घेतल्याने "मनाला भावनारी" असा ईमोशनल प्रतिसाद दिला.
आणि दुसर्याच मिनिटाला आलेली दुसरी प्रतिक्रिया ज्या लेखावर दिली आहे तो एक भला मोठा लेख आहे आणि अतिशय गहन विषयावर आहे. बर त्यातल्या ईमेजेस सुद्धा गायब आहेत ज्यामुळे तो लेख समजणेही तेवढे सोपे नाही.
कसे शक्य आहे कुणाला असा अर्धवट गहन लेख एका मिनिटात वाचून, समजून घेऊन प्रतिक्रिया देणे ? ज्यांच्या लेखावर प्रतिक्रिया दिली आहे त्याला कसे वाटेल हे वाचल्यानंतर की ह्या केवळ नाटकी प्रतिक्रिया आहेत.
आणि हे अगदी तेव्हाच झाले जेव्हा अनेक लोक निकालांच्या धाग्यांवर विजेत्या कथांच्या लिंका द्या म्हणून सांगत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हे खोदकाम करण्यामागे काय लॉजिक आहे. शेवटी वाचकांनीच आपापल्या लिंक्स शोधून घेतल्या.
तुमच्या मते काय ऊद्देश असावा ह्या कृतीमागे? माझ्या मते ह्याला लांगूलचालन आणि अनप्रोफेशनल वागणे असे म्हणतात.
ह्या अशा गोष्टींमुळे कथांचे प्रामाणिक आणि होलिस्टिक परिक्षण झाले ह्यावर माझा आजिबात विश्वास नाही.
-------------------------------------------------
अगदी मनाला भावनारी कथा.
आवडली.
Submitted by xxxx on 18 September, 2019 - 13:13
---------------------------------
इंटरेस्टींग कन्सेप्ट !
Submitted by xxxxx on 18 September, 2019 - 13:14
-----------------------------------
त्यानी आधी कधीतरी वाचला असेल
त्यानी आधी कधीतरी वाचला असेल आणि त्यदिवशी प्रतिक्रिया दिल्या असतिल असे होऊ शकते की. बेनिफिट ऑफ डाउट !
किती कीस पाडताय. असाच धिंगाना
H किती कीस पाडताय. असाच धिंगाना तुम्ही आधी पण बर्याच धाग्यावर घातला आहे . एक फुकट सल्ला देतो - अती तेथे माती . जो मुद्दा एकदा बोलुन समजतो त्याला भाराभार प्रतिसाद ह्यामरिंग केले की वाचणारे फक्त इरिटेट होतात. स्वताची इमेज जपा - लोक नुसता ट्रोल समजत आहेत तुम्हाला .
अती तेथे माती +७८६
अती तेथे माती +७८६
मायबोलीवरती अनेक वर्ष पडून असलेले हे स्लीपर सेल्स अश्या उत्सवात किंवा मोठ्या कार्यक्रमात बरोबर ट्रोलिंगकरिता कार्यरत होत असतात ... निव्वळ प्रशासन आणि सहभागी सदस्यांच्या मेहनतीवर आणि उत्सवातून मिळालेल्या आनंदावर विरझण घालण्याचे काम अश्या असंतुष्ट लोकांना बरोबर जमते आणि ते कार्य ही मंडळी ईमाने इतबारे पार पाडताना दिसून येतात.
हायझेनबर्ग पॉइंट है.
हायझेनबर्ग पॉइंट है.
अगदी मनाला भावनारी कथा.
आवडली.
हा प्रतिसाद असाच्या असाच आणखी एका विनोदी कथेवरही दिसला.
आणखी एक faux pas - संयोजकांपैकीच काहींनी गणेशोत्सवाच्या थीमला अनुसरून शतशब्द कथा लिहिणे. या कथा आधी स्पर्धेसाठी लिहिल्या होत्या, वाचकांनी ते दाखवून दिल्यावर गणेशोत्सच ग्रुपमधून बाहेर काढल्या गेल्या.
संयोजकांपैकी काहींनी इतरांच्या प्रवेशिकांवर टीकात्मक प्रतिसाद देऊन वर मी स्वतः परीक्षण करणार नाही, असं म्हणणं हाही त्यातलाच प्रकार.
मतदानाऐवजी संयोजकांनी परीक्षण करण्याचे समर्थन करणार्यांनी संयोजक आप ली कलेक्टिव्ह जजमेंट वापरतील, असं म्हटलेलं, त्यांच्या हे लक्षात आलेलं नसावं.
स्पर्धेसाठी आलेली एक गझल ही गझलच्या नियमांत बसत नाही, हे संयोजकांनी थेट निकालातून जाहीर केले. आधीच्या गणेशोत्सवांत, हे त्या प्रवेशिकेच्या धाग्यावरच काही तासांत सांगितलं जायचं. पाककृती आणि लेखन , दोहोंत असा अनुभव आला आहे.
त्यामुळे स्पर्धकाला नवी प्रवेशिका द्यायला वाव मिळायचा.
इथे भर गणेशोत्सवात आजीच्या माजी झालेल्या संयोजिकेने ते स्वतःच्या आयडीने सांगितले. तुम्ही म्हणाताय तसं खातेवाटप झालं असावं आणि ती संयोजकांतल्या प्रत्येकाची फक्त वैयक्तिक जबाबदारी झाली असावी. इथे वैयक्तिक आणि सामूहिक अशी दोन्ही जबाबदारी निभावणं अपेक्षित आहे.
यावेळचे बहुतेक संयोजक नवीन होते, अनेकांनी संयोजनातच काय कधी माबो गणेशोत्सवात किंवा अन्य उपक्रमांतही भाग घेतला नसेल.
चुका होतातच. पण त्या झाल्या हे मान्य करून परिमार्जन करता येते. इथे त्या चुका दडपायचा प्रयत्न झाला किंवा चुका नाहीतच असं सांगायचा.
सर्व संयोजकांचे अभिनंदन.
सर्व संयोजकांचे व विजेत्यांचे अभिनंदन.
यावेळी पाक स्पर्धेतलं काहीच आपल्याला धड येत नाहीये आणि पाल्हाळ लावण्याची सवय असल्याने शत शब्द मध्ये काही बसवता येणार नाही याची कल्पना असल्याने भाग घेतला नाही.आपण रोज इथे येत असून वर लिहिलेल्या गोंधळातलं आपल्याला काहीच माहीत नाही असं जाणवलं(वय झालं.....☺️☺️☺️☺️).बाकी कथा अजून वाचायच्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन ची रेडिमेड धागा लिंक मिळेल का?
गणेशोत्सव मधला इथला उत्साह पाहून मस्त वाटतं.
हाब यांचे सगळे मुद्दे पटले.
हाब यांचे सगळे मुद्दे पटले.
सदस्यात नवखेपणा असणे आणि आपली जबाबदारी नक्की काय आहे ते माहित नसणे, एका ऑथोरिटीव आवाजाचा अभाव किंवा आपली जबाबदारी फक्त आपण प्रस्ताव मांडलेल्या स्पर्धेपुरतीच आहे ही भावना अशी एक ना अनेक कारणे
संयोजकांनी स्वतःच शशक लिहून स्पर्धेसाठी देणे यामागे बहुतेक वरील कारण असावे. संयोजनात बहुतेक वेळेस जुने अनुभवी व नवे उत्साही यांचा भरणा असतो. नव्या उत्साह्यांना जुने अनुभवी योग्य मार्गावर ठेवतात. स्पर्धा फक्त संयोजकांवर सोडून न देता मायबोलीतील ज्येष्ठ व्यक्ती संयोजनात असावी हेमावैम. मी एका संयोजनात होते त्या ग्रुपमध्ये चिनूक्सही होता. स्पर्धेचे सर्व अधिकार व स्वातंत्र्य आम्हाला होते हे त्याने स्पष्ट केले असले तरी तो लक्ष ठेवून होता. अर्थात संयोजनात काही अनुभवीही होते त्यामुळे गोंधळाचे प्रसंग आले नाहीत पण ही व्यवस्था प्रत्येक वेळेस हवी हे यावेळच्या संयोजनातील गोंधळामुळे जाणवले.
mi_anu -https://www.maayboli
mi_anu -
https://www.maayboli.com/node/71302
यातच पुढच्या धाग्याची लिन्क आहे.
● यावर्षी संयोजनासाठी खूपच
● यावर्षी संयोजनासाठी खूपच कमी वेळ मिळाला होता हे खरंय. कमी वेळात संयोजन केल्याबद्दल कौतुक आहे.
शिकलेला धडा -
• पुढच्या वर्षी कमीतकमी १ महिना आधी संयोजकपदासाठी व्हॉलंटीअर मागवण्याचा धागा यावा
• ३ आठवडे आधी मंडळ बनले असावे
• कमीतकमी एकतरी अनुभवी माणूस मंडळात असावा, सगळेच नवीन नको.
● यावर्षी भरगच्च उपक्रम होते हे खरंय. एवढ्या कल्पना सुचण्याबद्दल कौतुक आहे.
शिकलेला धडा -
भरमसाठ नवीन आयडिया एकाच वेळी आणण्याऐवजी
• काही जुने यशस्वी उपक्रम नेहमी तसेच ठेवावेत (उदा. मुलांसाठी चित्र रंगवा, फोटोचे झब्बू नेहमी असायलाच हवेत),
• काळाच्या ओघात गायब झालेले एक किंवा दोन उपक्रम परत आणावेत (जसे की STY)
• आणि पूर्ण नवीन उपक्रम एकावेळी जास्तीत जास्त दोनच आणावेत. (यावर्षी शशक आल्या)
• समजोपयोगी एकाध प्रकल्प असू द्यावा (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा चांगला उपक्रम होता)
===
> बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील > अज्ञानी यांच काम छानच होतं यावर्षी. उत्सव म्हणल्यावर भडक रंग, चमकधमक या मार्गाने जाणे अपेक्षीत असते. पण यावर्षी व्हिन्टेज टाईपचा लूक होता, सौम्य रंग होते. आवडला हा बदल!!
===
'मतदानाऐवजी परिक्षण' याबाबतीत जबरी घोळ घातला गेला पण
यावर बऱ्याचजणांचं बरंच बोलून झालं आहे, बोलताहेत. त्यामुळे मी त्यात अजून भर घालत नाही.
===
भरपूर ट्रॅफिक होता, बझ होता वाटणारे शशकच्या यशाने दिपून गेले आहेत असं वाटतं. शशक स्पर्धा माबोसाठी नवीन आहे पण मिपा २०१५ पासून या स्पर्धा आयोजित करतय. आणि शशकला, कुठंही रिस्पॉन्स नेहमी असाच भरभरून येत असतो.
पण त्याच्यामुळे फेल गेलेले बरेच नवीन उपक्रम (चंद्र अर्धा राहिला, काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक)
जुन्या भरपूर रिस्पॉन्स मिळणाऱ्या उपक्रमांना (पाककृती, रांगोळी?, सजावट?) मिळालेला खूप कमी प्रतिसाद याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटते.
===
बाकी एक आजकाल नेहमी इतरत्रही दिसणारा प्रॉब्लेम इथेही (म्हणजे केवळ याच धाग्यावर असे नाही) दिसला - समर्थकांचे भक्तांत झालेले रूपांतर!
लेखक परवडले पण चाहते आवरा..
संयोजक परवडले पण त्यांचे समर्थक आवरा..
===
- हा प्रतिसाद मी आधीच टंकून ठेवला होता पण तो आता टाकला. दुसऱ्या पानावरचे प्रतिसादनंतर वाचले. काही मुद्दे वर इतरांच्या प्रतिसादात येऊन गेले आहेत. तरी माझा प्रतिसाद तसाच राहू देतेय.
पाककृती एकूणच मायबोलीवर हल्ली
पाककृती एकूणच मायबोलीवर हल्ली कमी असतात. त्यामुळे तिथे प्रतिसाद मिळाला नाही याचं आश्चर्य वाटलं नाही.
हाहा तुला माझे प्रतिसाद भक्त टाईप वाटले का? आय डोन्ट ब्लेम यू! वर कटप्पा व अस्लम बेग यांचे प्रतिसाद वाचून वाटलं की मी पण काही लोकांचे नेहमीचे ट्रोलिंगचे पॅटर्न समजून घेऊन दुर्लक्ष करायला हवं होतं.
असो. तू चांगलं लिहिलं आहेस , टीका केली आहेस पण कौतुकाचा समतोलही साधला आहेस हे आवडलं.
संयोजक, उपक्रम पूर्ण
संयोजक, उपक्रम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. सजावट अप्रतिमच होती.
रच्याकने हाबला नावं ठेवणार्यांनी एक मुद्दा विचारात घेतला पाहिजे - या उत्सवातील सगळ्यात यशस्वी स्पर्धा ठरली शत शब्द कोडी (या प्रकाराला कथा म्हणणे मला शक्य नाही). बहुतेक सर्व प्रवेशिका समजायला क्लिष्ट होत्या. हाबने त्यांची उकल केली नसती तर त्या वाचकांना कळणे कठीण होते, कळल्या नसत्या तर वाचकांचे प्रतिसाद आले नसते, प्रतिसाद आले नसते नविन प्रवेशिका पण आल्या नसत्या. त्यामुळे ती स्पर्धा यशस्वी करण्यात त्याचाच मोठा हात आहे. संयोजकांवर नाराज असला तरीही त्याने कुठेही हात आखडता घेतला नव्हता.
सजावटीबद्दल - अॅमी +१.
सजावटीबद्दल - अॅमी +१.
त्यानी नसती केली, दुसर्या
त्यांनी नसती केली, दुसर्या कोणितरी केली असती .
आणि त्यांचा मुद्दा चुक नाही बरोबर आहे- पण कितीदा ? दर दहा मिनिटाला संयोजकाना - तुम्ही कसे चुकला - तुम्ही हे नाही केले ते नाही केले.
त्यांना उपरोधक कमेन्टस टाकुन काय होणार आहे . तुम्हाला इग्नोर करत आहेत संयोजक याचा आलेला राग हे फक्त कारण.
> तुला माझे प्रतिसाद भक्त
> तुला माझे प्रतिसाद भक्त टाईप वाटले का? आय डोन्ट ब्लेम यू! > केवळ तुझेच आणि केवळ इथलेच असं नाही. 'मतदान कि परीक्षण' चर्चा जिथे जिथे झालीय तिथे संयोजकांच्या निर्णयाचे समर्थन करणारे भक्त टाईप'च' वाटले मला. दाखला म्हणून एक उदा सांगते - बॅट-बॉल-स्टम्प-आणि मैदानदेखील संयोजकांचे आहेत म्हणे!! :-O ऑ हे हस्तांतर कधी झालं? ही खाजगी जागा आहे ना? मालकांची! संयोजकदेखील समान्य सदस्यच आहेत इतरांसारखे. त्यांना एवढी पॉवर का, कधी कोणी दिली?
असो. यावर अधिक चर्चा करायची शक्ती माझ्यात नाही.
===
माधव +१.
हाय ऑल!
हाय ऑल!
मागील काही दिवसांपासून माबोवर जे चालूये, ते योग्य नाहीये असं वाटतंय!
गणेशोत्सवात संयोजकांकडून अनेक चुका झाल्यात, ज्या व्हायला नको होत्या.
परंतू, त्यांना ईतक्या दिवसांच्या मेहनतीचा हा मोबदला मिळावा हे सहन होत नाहीये म्हणून लिहितोय.
ज्या वेळी संयोजनासाठी आवहन केले, तेंव्हा उमेदवारांची इच्छा आणि वेळ या दोनच गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित होत्या, आणि नंतर आपण त्यांच्याकडून प्रोफेशनलिझम ची अपेक्षा कशी करू शकतो? जर त्यांनी अगदी प्रोफेशनल असणं गरजेचं होतं, तर आवहन करताना त्यांना तसं कळवणंही गरजेचं होतं, की तुम्हाला अगदी प्रोफेशनल पद्धतीने काम करावं लागेल.
आणि आजपर्यंत मी अशी एकही स्पर्धा किंवा परिक्षा पाहिली नाही जिचे नियम स्पर्धक ठरवत असतील. ते नेहमी संयोजक त्यांच्या सोयीनुसार ठरवतात. म्हणून "नियम ठरवणं आमचा अधिकार आहे." असं बोलणं अगदी अयोग्य वाटलं. पण हा संयोजकांचा अपमान करण्याचा अधिकार नेमका मिळतो तरी कसा? फक्त माबोचा सदस्य होवून? की संयोजकांना आपण मानधन देणार आहोत? की त्यांना आपण मतदानाद्वारे निवडून दिलंय? नेमका कसा....?
आता माझा प्रतिसाद वाचून काही जण मला संयोजकांचा भक्त म्हणतील, पण ईथे सर्वच टोकाची भुमिका निभवताय. काही या टोकाला तर काही त्या टोकाला. म्हणजे २ गृप पडतात भक्त आणि ईर्ष्याळू. पण त्यातही ईर्ष्या का केली जातेय ते अजूनही कळत नाहीये. त्याच त्याच गोष्टी परत परत नविन प्रतिसादात नविन प्रकारे देऊन नेमकं काय सिद्ध करायचंय? ते सरळ सरळ तरी सांगावं!
आता संयोजकांकडून चुका झाल्या, त्या रिपेअर करणं शक्य नाही. (Better be proactive than being reactive.)
पटलं तर घ्या.
अॅमी, इथे स्कोर सेटलिंग
अॅमी, इथे स्कोर सेटलिंग चाललेलं आहे, आणि ते करताना स्वतः ट्रोलिंग करून इतरांना ट्रोलचं लेबल लावलं जात आहे.
पूर्णविराम.
त्यानी नसती केली, दुसर्या
त्यानी नसती केली, दुसर्या कोणितरी केली असती . >>> 'जर तर'ला फारसा अर्थ नसतो. इतर कुणी (हाचाआ सोडल्यास) उकल केली नाही. एक तर कुणाला समजली नाही, समजली असल्यास त्या धाग्यांवर उकल करून सांगण्यात त्यांना स्वारस्य / वेळ नव्हता.
पण कितीदा ? >>> बरोबर. हाब, आता वाद पुरे कथा लिहायला घे
तुम्हाला इग्नोर करत आहेत संयोजक याचा आलेला राग हे फक्त कारण. >>> रागावून हाबने सोळा आण्यांची उकल न करता त्याची नवी कथा आणली असती त्याच काळात तर ?
असो, मी त्याचा भक्त नाही
. माझा या बाबतीतला शेवटचा प्रतिसाद.
अॅमीचे ‘शिकलेले धडे‘ पटले.
अॅमीचे ‘शिकलेले धडे‘ पटले. फक्त एक जुन्याऐवजी दोघेजण असावेत म्हणजे एकावरच भार येणार नाही आणि ते ‘सल्लागार’ म्हणुन असले तरी चालेल. म्हणजे नवी समिती सर्व उपक्रम ठरवणार, यांनी त्यात कमीजास्त, हे हवे, ते नको, नवी समिती काय चुका करतीये ते सांगायला, त्यांना काय समजत नाहीये ते समजवायला वगैरे सल्ले द्यावेत (जर त्यांना पुर्ण भाग घ्यायचा नसल्यास).
सर्व स्पर्धक, विजेते आणि
सर्व स्पर्धक, विजेते आणि संयोजक(विशेषतः अज्ञानी) यांचे अभिनदंन आणि आभार.
दंगलसदृश्य वातावरण निवळुस्तोवर थांबू म्हटलं पण तोपर्यंत दिवाळी पहाट उजाडायची वाट पाहावी लागेल अशी चिन्हे दिसल्याने नको थांबायला.
पुढच्या वर्षी एडमिन आणि वेमा स्वतःच संयोजक असतील अशी दाट शक्यता आहे कारण परत संयोजनासाठी कोणी धाडस करेल असं वाटत नाही. तोवर मी आहे/नाही म्हणून त्यांनाही आगाऊ शुभेच्छा.
बाकी चालुद्या निवांत.
गझलनवाज वर्सेस शशकनवाज
गझलनवाज वर्सेस शशकनवाज वादामध्ये उगीच अक्खी मायबोली ओढली जातेय. ह्यांना युगानुयुगापासून अगदी युगंतरापर्यन्त कुरघोडी करत राहायला भरपूर वेळ असला तरी एक गोष्ट दोन्ही पार्टी विसरतायेत.... जर संयोजक टीमने इतकी बकवास कामगिरी + अक्षम्य चुका ( शशक नवाज ह्यांच्या एकंदर मतितार्थनुसार स्पर्धकांचा अपराध / मायबोलीचा गुन्हा) केल्या असतील तर एडमिन त्याना परस्पर ताकीद देवून किंवा मंडळ बरखास्त करून परस्पर दूसरे सुयोग्य लोक नेमुन उत्सव पार पाडते झाले असते ! म्हणजे चुका झाल्या तरी त्या काही हेतु पुरस्सर गुन्हा स्मजण्याइतक्या खचितच नव्हत्या. जो प्रयत्न करतो, काम करतो , तोच चुकू शकतो. जे काही छान मिळाले ते न बोलता दहावीस टक्के चुका उगाळत राहणार तर काही अर्थ नाहीये.
*********************************
टीपः- काही ठराविक स्पर्धकांनी चांगल्या गोष्टींकडे डोळे झाक करून फक्त चुका उगाळणे मान्य नसल्याने कृपया १६आणे पूर्ण झाले तरी ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.
भरत, गॉट इट!
भरत, गॉट इट!
माधव, परत एकदा +१ .
===
बरं आता जाताजाता अजूनथोडा शानपना शिकवून जाते
• पुढच्या वर्षी शशक स्पर्धा घेणार असाल तर मिपाने यावर्षी जी पद्धत वापरली होती ती वापरा. शशक आवाहन धाग्यावर कुठल्यातरी पानावर मी ती लिहली आहे.
• आणि सगळ्यात मोठा 'शिकलेला धडा' विसरू नका
- संयोजकाने परीक्षण करायचा विचारदेखील डोक्यात आणू नका. मतदान हीच बेष्ट पद्धत आहे!
Pages