मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.

सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.

मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!

परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!

मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील

गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तरी सनवची कथा लॉन्ड्री लिस्ट कथेवरुन सुचलेली वाटली नाही/नव्हती.
आता हे वाचेपर्यंत ते लक्षातही आलं नव्हतं.
एखाद्याची विजेती कथा कशी ओरीजनल नाही, माझ्याच कथासुत्रावरुन लेखकाला सुचलीये, त्याला ओरीजनली सुचलीच नव्हती हे सगळं लिहिणं किती बालिश्पणाचं वाटतंय.
हे आता कुठल्या कुठे गेलंय. आवरा कृपया.

>>>>त्यातले सगळेच निरागस म्हणण्यासारखे वाटत नाहीयत.<<<

मायबोलीवर निरागस शोधून सापडणारा नाही... Proud

विचित्र वळण
धाग्याला नाहकच विचित्र वळण लागत आहे.

लोचटपणा आणि चिकाटी
हाब पुरे आता !

असे लिहायचे माझाही मनात आले होते पण
कोणता मुद्दा बरोबर आणि किती महत्वाचा हे सर्व सापेक्ष आहे. हाब त्याला योग्य वाटणार्‍या मुद्द्यांकरता गुद्द्यावर न येता, असांसदीय भाषेत न लिहिता जे म्हणणे मांडत आहे / जे प्रश्न संयोजकांना विचारत आहे त्याला मुभा असायला हवी. आपल्यापैकी एखाद्याला, त्याचे म्हणणे मांडण्याचा मार्ग चुकीचा वाटत असेल तर त्यातही काही वावगे नाही. लोचटपणा आणि चिकाटी हा एकच गुण आहे जो पाहणार्‍याच्या नजरेप्रमाणे बदलतो.

काही कळेना झालंय
सुरुवातीपासून पाहता हाब, भरत. ई. मंडळी विचारत असलेले प्रश्न संयोजकांकरता होते. इतरांनी ते स्वतः संयोजकांचे नियुक्त प्रतिनिधी असल्याप्रमाणे स्वतः उत्तरे द्यायला का सुरुवात केली असावी हे अनाकलनीय आहे. हाबला देखिल संयोजक सोडून इतरांनी दिलेले प्रतिसाद दुर्लक्षित करायला हरकत नव्हती. संयोजकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी असूनही ते का टाळाटाळ करत आहेत हे एक कळेना .

लिहिणे थांबवू नका
सनव, तुमचे कथेबाबतचे मुद्दे अगदी योग्य आहेत - त्रयस्थ वाचक या नात्याने तुम्हाला अनुमोदन. होपफुली तुम्ही या कारणावरून मायबोलीवर लिहिणं थांबवणार नाही, ह्या स्वाती ह्यांच्या प्रतिसादाला मम

ह्या बाबतीत काहीही हा हाब.

सनव आणि हाब, कृपया आपापसातले वाद पुरे आता. स्वतंत्रपणे लिखाण करत रहा. मायबोलीवर टाकत रहा. आमचा वाचनानंद हिरावून घेऊ नका. कृपया धन्यवाद.

संयोजक मंडळी तुम्ही आमचे आहात; आम्हीही तुमचे आहोत

काम करणार्‍यांकडूनच चुका होतात.
सगळ्यांनाच एकावेळी खूष करता येणे शक्य नसते.
आपल्या हातून काही चूक घडते आहे हे कधी कधी आपलं आपल्याला कळत नाही असंही होतंच.
चुका होतात; त्या मान्य करायला फार मोठे मन लागते जे सर्वांकडे असतेच असे नाही.

पण संयोजक मंडळी (Aaradhya, 'सिद्धि', मधुरा कुलकर्णी, स्वरुप, mayu4u, अज्ञानी, अभि_नव, पद्म) -

विचारल्या गेलेल्यांपैकी 'काहीच' निवडक प्रश्नांची उत्तरे देणे दूरच पण दखलही घेतली नाहीत / प्रकरण इतके वाढत जातंय तरी घेत नाही आहात हे बरे दिसत नाही. तुम्हाला काही विचारा-सुचवायला आलेली सगळी माणसे ट्रोलच आहेत असे वाटून घेऊ नका. तुम्हीही आमचेच आपल्यातलेच आहात असे मानून आणि म्हणूनच काही सांगायला सुधारणा सुचवायला माणसे पुढे येतात.

https://www.maayboli.com/node/71107 हा धागा निघाला तेव्हा त्यात https://www.maayboli.com/node/18506 ह्या धाग्याचा दुवा होता. त्यात लिहिलेल्या सूचना खरेतर इतक्या सर्व समावेशक आहेत की त्याची बर्‍यापैकी अंमलबजावणी केली तरी कुठली अडचण यायलाच नको. आपापल्या मनाशी तपासून पहा खरोखरच हातून काही गफलत तर झाली नाही ना?

मूक राहू नका; व्यक्त व्हा. संवादाचा पूल तोडू नका.
कृपया धन्यवाद.

18506 काय आहे?
मला पाहायची परवानगी नाही.

हर्पेन + १

18506 काय आहे? >>> 'आपली मायबोली' ग्रूपचे सदस्य व्हा भरत.

बापरे...किती तो कीस काढायचा एखाद्या गोष्टीचा.
गणेशोत्सव पार पडला, आम्ही नुसत्या वाचनमात्र असणार्या लोकांनी ज्या काही कथा , पा़ककृती आल्या त्याचा पुरेपुर आनंद घेतला.
संयोजकांचं काय चुकलं यावर बरेच वेळा बरेच ठीकाणी बोलुन झालं. पण आता बास की. अती होतय हे सगळं असं वाटतय.
आणि माफी वगैरे का बरं मागावी त्यांनी ? स्वतः चा एवढा वेळ दिलाय त्या लोकांनी म्हणुन गणेशोत्सव होउ तरी शकला ना माबो बर.
असो...सोडुन द्या ना लोकहो... इतकं कुठे ज्ञानपीठ पुरस्कार वगैरे हातचा गेल्यासारखं भांडताय इथे.
ज्यांना या वर्षी संयोजन आवडलं नाही, चुकीचं वाटतय त्यांनी पुढच्या वर्षी स्वतः संयोजक होउन "उत्तम संयोजनाचा" धडा द्या बर आम्हा सगळ्याना इथे Happy
तोवर हा धागा होल्ड वर वगैरे ठेवता येइल का बघा Happy

उत्तम प्रतिसाद हर्पेन.
इथे माझ्यासहित बर्‍याच जणांना जे म्हणायचं होतं ते व्यवस्थितरित्या मांडलं आहे तुम्ही Happy

खरंतर हाबने सनवला हा खालचा प्रतिसाद देऊन सॉरी म्हणालेलं आहे. ती अपॉलॉजी मान्य करायची आणि मुव्हऑन व्हायचं की नाही हे सनव ठरवेल. दोघे संध्याकाळी येतील तोपर्यंत इतरांनी वाट बघावी.

If you revert your decision I am happy to say I stand corrected.
Let's put this to rest.
Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2019 - 08:54
===

मुळात त्या दोघांचा हा वाद ज्याच्यामुळे चालू झाला तो मुद्दा हा होता
१. संयोजकांनी वेगळे 'तज्ञ' परिक्षक मंडळ का नेमले नाही?
२. संयोजक स्वतःच परीक्षण करण्याइतके तज्ञ आहेत याची खात्री काय होती?
३. कुठल्या निकषांवर परिक्षण केले जाईल ते आधीच स्पष्ट सांगायला हवे होते.
===

माझ्या (आणि बहुतेक हाबाच्यादेखील) मते संयोजक तज्ञ नव्हते हे त्यांनी लावलेल्या निकालावरूनच कळतंय खरंतर. निकाल धाग्यावरचा माझा प्रतिसाद:-

खरंतर यावर्षी 'रहस्य' ही थीम दिली होती; पण ट्रेंड दिसून आला तो मात्र 'घरगुती' कथाप्रकाराचा! बायकांच्या आडयन्सला हमखास टिपं गाळायला लावणार्या बाळंतपण, बाळ-आई वगैरे विषयावर भरपूर कथा आल्या. मला वाटतं सुरवात हायझेनबर्गच्या
लाँड्री लिस्ट या कथेमुळे झाली. थीममधे बसत नसल्याने मी या सगळ्या कथा वगळल्या आहेत. (निकालातल्या कोणकोणत्या कथा खरंच 'रहस्य'कथा आहेत बरे? :-P;))

∆ यातलेच मुद्दे थोडे सविस्तर मांडते.
● मला रहस्यकथा वाचायला आवडतात असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा 'रहस्य' म्हणजे काय अपेक्षीत असते तुम्हाला? बाळंतपण हे रहस्य होऊ शकते का? होत असेल तर 'आज माझ्या डब्ब्यात काय आणले ओळखा पाहू' हादेखील रहस्य उलगडणे खेळ होऊ शकतो Lol
आता प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या कथा परत वाचून बघा. आहेत का त्या रहस्यकथा?
हा आहे तज्ञ नसलेल्या पण परीक्षक झालेल्या संयोजकांनी लावलेला निर्णय.

● आता दुसरा मुद्दा
२०१२ साली Gone Girl हे पुस्तक आले होते. लय धुमाकूळ घालणारे. त्यानंतर Next Gone Girl म्हणून मार्केट केल्या जाणाऱ्या पुस्तकांची लाट आली होती, जी अजूनही काही प्रमाणात चालू आहे. या सगळ्या पुस्तकांत काही सारख्या बाबी होत्या
• एकापेक्षा अधिक निवेदक
• त्यातले एक किंवा सगळेच अविश्वसनीय
• न आवडण्यासारख्या स्त्री व्यक्तिरेखा
• निवेदक वेगवेगळ्या काळातील घटनांबद्दल बोलत असतील. किंवा एकाच घटनेकडे आपापल्या दृष्टीकोनातून बघत असतील.
वगैरे. आता परत गणेशोत्सव शशक स्पर्धाकडे वळूयात. बाळंतपण, बाळ दगावणे, आई दगावणे, दोघ दगावणे, दोघ (देवाच्या कृपेने) वाचणे वगैरे विषयावर ज्या कथा आल्या आहेत त्या सगळ्यांच्या लेखकांनी स्वतःलाच प्रश्न विचारूनपहा, उत्तर इथे लिहायची गरज नाही
• लॉंड्री लिस्ट ही कथा वाचेपर्यंत आपल्याला आपल्या कथेची कल्पना सुचली होती का?
ट्रेंड सेटर होती ती शशक. माबोची गॉन (बेबी) गर्ल. त्यानंतर आलेल्या सगळ्या 'नेक्स्ट' गॉन गर्ल आहेत.
===

आणि हो जर मतदान झालं असतं तर अनन्य आणि लॉंड्री लिस्ट उन्नीसबीस करत पहिल्या-दुसऱ्या आल्या असत्या असा माझा अंदाज आहे.
पण तरी त्या दोन्ही कथा रहस्य नाहीत आणि थीममधे बसत नाहीत.

उत्तम प्रतिसाद हर्पेन.
इथे माझ्यासहित बर्‍याच जणांना जे म्हणायचं होतं ते व्यवस्थितरित्या मांडलं आहे तुम्ही Happy >> +१११११११११११११११११

खूपच मुद्देसूद मांडलत हर्पेन, धन्यवाद!

हर्पेन, अ‍ॅमी
सविस्तर प्रतिसाद लिहिण्याबद्दल अनेक धन्यवाद. तुमच्या दोघांच्या प्रतिसादाशी बव्हंशी सहमत आहे. यथाशक्ती उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करेन.

सध्या एवढेच म्हणेन
मी लिहिलेले sorry किंवा apology अशा अर्थाचे नसून mutual understanding दाखवत हा वादाचा विषय त्वरित संपावा आणि त्याचे पर्यावसान unwanted व unintended गोष्टी मध्ये होऊ नये म्हणून सामंजस्याचा हात पुढे केलेला आहे.
I'm willing to admit my perception was imprecise provided Sanav retracts her decision.
I will be waiting for her statement.

MaBo3.jpgअ‍ॅमींना राशोमानबद्दल सांगावं की नाही अशा विचारात आहे.
राशोमान माहीत नसणार्‍यांना गॉन गर्लचा फॉर्म 'ओरिजनल' वाटतो आणि ती सहा शब्दांची कथा प्रसिद्ध असून 'लॉन्ड्री लिस्ट'ची कल्पना ओरिजनल असल्याचा दावा करणारेही निपजतात! सगळीच मजा!
बाय द वे, ती कथा स्पर्धेतून बादच समजायची होती ना? मग 'ओ अ‍ॅन एक्स्प्लेनेशन, बक्षिस परत करण्याची अप्रत्यक्ष सूचना वगैरे काय! काहीही!

सॉरी प्रयत्न करूनही मला प्रतिसादातली ईमेज मोठी करता येत नाहीये म्हणून थेट टेक्स्ट टाकत आहे.

मायबोलीवर अतिशय बॅलन्स्ड, सेंटर्ड व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या, ज्यांना गणेशोत्सोवाच्या ऊत्सवी भागात भाग घ्यावासा वाटला नाही पण ह्या विवादास्पद परिस्थ्तीमध्ये हिरिरिने मते मांडावीशी वाटत आहेत , त्या स्वाती आंबोळे अधिकारवाणीने एका कथेच्या अनुषंगाने माझ्या निपजण्यावर भाष्य करीत आहेत.
आणि सुदैव म्हणावे की दुर्दैव त्यांच्या त्या बाफवरच्या मित्रमंडळींपैकी कोणीही विरोध करीत नाही.
कोण कसे निपजले ह्यावर भाष्य करणे हा त्यांच्या पर्सेप्शनचा मुद्दा असावा बहुतेक.

हा आहे टीपापाचा खरा चेहरा. ही तर फक्त सार्वजनिक जागेतली झलक आहे... खाजगी जागेत ह्यांच्या प्रतिभेचा बहर काय वर्णावा.
ज्यांना कोणाच्या निपजण्याबद्दलच ईतका तिरस्कार वाटतो आणि असे बोलणे त्यांच्यासाठी मजा आहे काय बोलणार अशांच्या बाबतीत.

अ‍ॅडमिन हे वाचत असावेत अशी अपेक्षा.

Here, let me help you:

ही माझी टीपापातली पोस्टः
>>>
अ‍ॅमींना राशोमानबद्दल सांगावं की नाही अशा विचारात आहे.
राशोमान माहीत नसणार्‍यांना गॉन गर्लचा फॉर्म 'ओरिजनल' वाटतो आणि ती सहा शब्दांची कथा प्रसिद्ध असून 'लॉन्ड्री लिस्ट'ची कल्पना ओरिजनल असल्याचा दावा करणारेही निपजतात! सगळीच मजा!
बाय द वे, ती कथा स्पर्धेतून बादच समजायची होती ना? मग 'ओ अ‍ॅन एक्स्प्लेनेशन, बक्षिस परत करण्याची अप्रत्यक्ष सूचना वगैरे काय! काहीही!
<<<

धन्यवाद.
Do you stand by your post?

If I didn't, I would not paste it here, would I?

राशोमनबद्दल माहित आहे मला स्वाती.
गॉन गर्लचा (किंवा लॉंड्री लिस्टचा) फॉर्म ओरिजनल आहे असेही माझे म्हणणे नाही. फक्त ते त्या त्या काळात (/क्षेत्रात) ट्रेंड सेटर आहेत म्हणलं.

तुमचं काय म्हणणं आहे?
गॉन गर्लला 'नेक्स्ट राशोमन' च म्हणले पाहिजे?
नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून जी पुस्तकं गेल्या ७ वर्षात आली आहेत त्या सगळ्यांच्या कल्पना त्या त्या लेखकांच्या डोक्यात २०१२ सालच्या आधीपासूनच होत्या? आणि त्या राशोमन बघूनच सुचलेल्या?

>>>
राशोमनबद्दल माहित आहे मला स्वाती.
गॉन गर्लचा (किंवा लॉंड्री लिस्टचा) फॉर्म ओरिजनल आहे असेही माझे म्हणणे नाही.
<<<
गुड, थँक यू. मला तितकंच म्हणायचं होतं.

I wanted to be sure. My past experiences do not allow me to trust you or anyone associated with you.

तर... माझ्या कथेच्या अनुषंगाने तुम्हाला माझ्या चांगल्या वा वाईट निपजण्याबद्दल टीपापापेक्षा ह्या बर्‍याच मोठी सार्वजनिक फोरमवर काही मजेशीर सांगायचे आहे का?

नाही.

मी उत्तर दिल्यानंतरही तू प्रश्न बदलत राहणार का? makes it difficult for me to entrust you with my answer.
असो, मजेशीर नाही, गंभीर आही, त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे त्यापेक्षा अधिक काहीही नाही.

का बरे?
तुम्हाला एखाद्याने लिहिलेल्या १०० शब्दांवरून त्याच्या कुटुंबातून तो कसा निपजला ह्याची जी माहिती झाली आहे.. जसे तुम्ही टीपापामधील तुमच्या मित्रांना संगितले आहे त्यातली मजा ईथे सगळ्यांना का सांगावी वाटू नये?

प्रश्न बदललेला नाही त्यात तुमचे "मजा आहे" ह्यावरून सांगायचे आहे ह्यापुढे "मजेशीर" हे एवढेच विशेषण अ‍ॅड केले आहे.

मलाही माझ्या निपजण्याबाबत काय मजेशीर आहे ते जाणून घ्यायचे आहे.

>>> मजेशीर नाही, गंभीर नाही, त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे त्यापेक्षा अधिक काहीही नाही.
तुला धागा येनकेन प्रकारेण नांदताजागता ठेवायचा असावा, नाहीतर या वाक्यात न कळण्यासारखं काही नाही. तुझे निष्कर्ष काढायला, त्यात तुझं कुटुंब गोवायला इ. इ. अर्थातच तू मोकळा आहेसच.

> गुड, थँक यू. मला तितकंच म्हणायचं होतं. > ठीक आहे. मग

गॉन गर्लला (किंवा लॉंड्री लिस्टला) ट्रेंड सेटर म्हणलं आणि त्यानंतर आलेल्या कथांना नेक्स्ट गॉन गर्ल (किंवा नेक्स्ट लॉंड्री लिस्ट) म्हणलं तर तुमची हरकत आहे का?

या 'नेक्स्ट' कथांच्या कल्पना 'ट्रेंड सेटर' वरून सुचल्या असण्याची 'शक्यता' भरपूर आहे अस म्हणलं तर तुमची हरकत आहे का?

धाग्याचा सबंध नाही... हे माझ्याबद्दल "वैयक्तिक" आहे.

ठीक आहे तुम्ही वापरलेल्या "निपजणे" ह्या शब्दाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ तुम्हीच समजावून सांगा.

ही चर्चा माझ्या मते इथे समारोपाच्या धाग्यावर अप्रस्तुत आहे, म्हणून हा पब्लिक धागा काढला आहे. माझ्या पोस्टसंबंधी चर्चा तिथे व्हावी.

धागा संयोजकावरुन

सिद्धि
मधुरा
सनव
आणि आता स्वाती

दिसला स्त्री आयड़ी - घाल वाद ||
Bbb

Pages