मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.

सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.

मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!

परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!

मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील

गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावेळचे बहुतेक संयोजक नवीन होते, अनेकांनी संयोजनातच काय कधी माबो गणेशोत्सवात किंवा अन्य उपक्रमांतही भाग घेतला नसेल.
चुका होतातच. पण त्या झाल्या हे मान्य करून परिमार्जन करता येते. इथे त्या चुका दडपायचा प्रयत्न झाला किंवा चुका नाहीतच असं सांगायचा.>> भरत ++
हेच खरे सार आहे ह्या वर्षीच्या संयोजन मंडळाच्या कामगिरीचे. अपवाद अज्ञानी, त्यांचे काम खचितच वाखाणण्याजोगे आणि स्पेशल कौतुकास पात्र आहे.

सनव
तुमच्यासमोर एवढे फॅक्ट्स ठेवले, दाखले दिले त्यावर तुम्ही निरुत्तर झाल्याने ते दाखले दुर्लक्ष करून केवळ आपल्या समाधानासाठी ट्रोलिंग चा शिक्का मारणार?
हरकत नाही त्यातून तुम्हाला आपला मुद्दा खोडला न गेल्याचे समाधान मिळाले असेल अशी आशा करतो.

अ‍ॅमी, इथे स्कोर सेटलिंग चाललेलं आहे, आणि ते करताना स्वतः ट्रोलिंग करून इतरांना ट्रोलचं लेबल लावलं जात आहे.>>
Lol भरत त्यांना काय एवढा भाव द्यायचा नाही. त्यांची बर्‍याच दिवसांपासून तडफड चालू आहे. फॅन क्लब, जुने धागे उकरून काढणे, असंबंध कौतुक, आता म्हणे काय माझ्या इमेजची काळजी Lol अजून बरीच नाटके दिसतील पुढे.

धागा मनोरंजनात्मक आहे Happy

या वेळचा गणेशोत्सव फॉलो केला नाही, त्यामुळे काही बोलणार नाही, पण राहून राहून, काहीतरी जबरदस्त करमणूक चुकली असे वाटायला लागले आहे आता,

हाब, तुमचे मुद्दे तुम्ही पुरेश्या clarityने मांडले आहेत, ज्या लोकांना पण तसेच वाटत होते त्यांनी दुजोरा सुद्धा दिलाय, आता तुमची अपेक्षा काय आहे? माबो वर कोर्टमार्शल होऊन दोषी लोकांचे id उडवावेत वगैरे?? तशी नक्कीच नसणार,
मग सोडून द्या ना...
लोक आपल्या (दुसऱ्याच्या मते झालेल्या) चुका कधीच मान्य करत माहीत. अजूनही लोक डीमोनिटायझेशन ला मास्टर स्ट्रोक म्हणतात, तो गणेशोत्सव क्या चीज है Wink

बाकी गंमत इतकीच वाटते, मागे गणपती चे जानवे काळे का दाखवले म्हणून कट्ट्यावर संयोजकांना ट्रोल करणारे id आता अचानक संतुलित भूमिकेत प्रकटले आहेत Lol

अरे मोव ओन गाय्स - आता काय जीव घेणार का संयोजकांचा Happy
संयोजक तुम्ही पन एकवार माफी मागुन टाका ना- विषय संपेल !!!

सार्वजनिक थान्क्सगिविंग किंवा horror हल्लोवॆन स्पर्धा सुरु करा- मजा येते नव नविन कथा वाचायाला.

आता तुमची अपेक्षा काय आहे? >> मला मायबोलीवर Integrity, Responsibility, Honesty, Respectability अशा अनेक "-ty" ट्रेट्स वाढीस लागलेल्या बघायच्या आहेत. माणसे नवी जुनी येत राहतील, जात राहतील, मायबोली सारखे संस्थळ माणसांनी नाही तर त्यांच्या अशा ह्युमनली ट्रेट्सने बनते. अनेकदा जुने असे चांगले होते अणि नवे असे आहे अशा चर्चा-वाद होतात. जुन्या आणि नव्या मायबोलीत जो नेमका मुख्य फरक आहे तो आहे काही नव्या सदस्यांच्या वरच्या ट्रेट्स मधील अभाव. जो मायबोलीवर ठाई ठाई दिसतो. ह्यावर विषण्ण मनाने निघून जाणे वा मायबोलीवरच्या आपल्या एका ककून मध्ये बसून राहणे किंवा जमेल तिथे वर ऊल्लेखलेल्या ट्रेट्सचा अभाव दाखवून देणे असे दोन ऊपाय आहेत.
मी जमेल तोवर दुसरा मार्ग घेण्याचे माझ्यापुरते ठरवले आहे... ईतकेच.
गणेशोत्सोव हा मोठा फोरम आहे आणि अशा फोरमवर झालेली वरच्या ट्रेट्सची पायमल्ली चव्हाट्यावर आणत रहाणे मी माझे काम समजतो.
असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. Proud

ह्याचीही खिल्ली ऊडवणारे, मॉकेरी करणारे येतीलच ... आणि ते आले की माझा मुद्दा ज्यांना कळकळ आहे त्यांना अजून प्रकर्षाने जाणवतो.
आज मला दुजोरा देणारे अर्धा डझन लोक असतील ऊद्या चार डझन होतील. आणि मग एके दिवशी..... Lol

संयोजक तुम्ही पन एकवार माफी मागुन टाका ना- विषय संपेल !!!>>> काय सांगावं, संयोजक सुद्धा हाब ची तरफड एंजॉय करत असतील तर...!

बादवे हाब, २ वर्षांपूर्वी माबोवर मी तुमच्या कथा वाचल्यामुळेच सदस्यत्व घेतले होते. आज सांगतोय..
तुम्ही एक लेखक म्हणून खूप महान आहात. जितका तुम्ही ईथे टाईमपास करताय तितक्या वेळात कृष्णविवर कधीच पूर्ण झाली असती. पण फक्त मधुरा संयोजनात होत्या म्हणून तुम्ही संयोजकांच्या ईतक्या विरोधात जाणं तुमच्या ईमेजला मुळीच शोभत नाही.. हे एका धाग्यावर कुणीतरी म्हटलं होतं (आता तुम्ही हे अमान्य करणार हे ठाऊक आहेच, आणि त्यासाठी तुम्ही सुंदर शब्दप्रयोग करून प्रतिसाद देणार.. तुमच्यासारखा मी शब्दांचा जादूगर नाहीये, असो!)
माझा सर्वांत आवडता लेखक असं काही करतोय हे मला सहन होत नाही, म्हणून तुम्हाला सांगतोय... अपेक्षा करतो, पॉझिटीवली घ्याल आणि तुमच्या लिखाणाकडे लक्ष द्याल...
ईथे अ‍ॅडमिन आणि वेमांना काही पडली नाहीये, तुम्हीच का ईतकं घेऊन बसलाय... नेमकं कारण काय?
उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढताय का?
_
_
_
आज मला दुजोरा देणारे अर्धा डझन लोक असतील ऊद्या चार डझन होतील. आणि मग एके दिवशी..>>> पण माझ्यासारखे तुमच्या लिखाणाचे चाहते, तुमच्या अश्या वागण्याने दूर जाताहेत त्याचं काय???

>>अनेक "-ty" ट्रेट्स वाढीस लागलेल्या बघायच्या आहेत.<<
चांगलं आहे, यात एक मचुरिटी अ‍ॅड करुन सुरुवात स्वतःपासुन करा. नाहितरी गांधीजी म्हणालेच आहेत - बी द चेंज यु वान्ना सी...

दासानु दास +१

पुढच्या वर्षी माबोवर गणेशोत्सव हवाय की नकोय ?

हे वाचून कोणी धजेल का संयोजक व्हायला ?

पण फक्त मधुरा संयोजनात होत्या म्हणून तुम्ही संयोजकांच्या ईतक्या विरोधात जाणं तुमच्या ईमेजला मुळीच शोभत नाही..
---- आता बर्याच गोष्टी क्लियर झाल्या . तरीच त्यानी संयोजक पद सोडले .
त्यांच्या धाग्यावर खूप धिन्गाना घातला होता . आपलाच मुद्दा कसा बरोबर याच्यासाठी . एक मुद्दा पकड़ायचा आणि एकटेच भांडत बसायचे.
मागे शालिंच्या धाग्यावर पण हेच केले आणि आता या धाग्यावर .

एक लेखक म्हणुन जितके चांगले आहेत, एक प्रतिसादक या नात्याने तितकेच ट्रोल .

>>एक लेखक म्हणुन जितके चांगले आहेत, एक प्रतिसादक या नात्याने तितकेच ट्रोल .>>
आता जर कोणी नवख्या व्यक्तीने म्हटले की - अरे वा! इतके उत्तम लेखक आहेत हाब? तर ती स्तुती होइल की निंदा? Wink
किंवा
जर असे म्हटले की अरेरे इतके बंडल लेखक आहेत होय हाब ..... तरीही ती स्तुती होइल की निंदा? =))
_________________________
मजा म्हणुन वरील वाक्य लिहीले आहे. मला हाब माहित नाहीत. माबोवर मी नवीन आहे.
___________
बाकी चालू द्या!

माझे मराठी इतके चांगले नाही पण माझ्या म्हणण्याचा अर्थ सामो ते खूप चांगले लेखक आहेत. कुल्फिच्या बिस्किटाचे पाप्लेट , क्रुष्णविवर वगैरे वाचु शकता आपण. की -

कटप्पा नाही तुम्हाला उद्देश्युन नाही म्हणाले मी ते Happy कॉफीची किक बसल्याने उधळले अजुन काय.
पण होय! हाब यांचे लेखन वाचले नाही पण वाचायच्या यादीत सर्वात वरती आहे.

दासजी,
मी मायबोलीवर काही फुटकळ खरडले असेल नसेल, ते तुम्हाला आवडले असेल नसेल त्याचा इथे काय संबंध आहे. तुम्हाला मी चांगले वाईट लेखन केले आहे, नाही त्याबद्दल कौतुक वा टीका करायची आहे का? ते माझ्या एखाद्या लेखनाच्या धाग्यावर जाऊन लिहा. तिथे मी दोन्ही अगदी हसर्‍या चेहर्‍याने, बिन बोभाट, विना तक्रार स्वीकारतो. काहीही... अगदी काहीही लिहायला सूट आहे तुम्हाला तिथे.
ईथे गणेशोत्सोव संयोजनाचा विषय चालू आहे. त्याबद्दल काही लिहायचे असल्यास लिहा नसल्यास अवांतर लिहून विषय भरकटवू नका.

मुद्दा समजला असल्यास तो माझे परम मित्र राज ह्यांनाही समजाऊन सांगा... व्यक्तिगत आकस वा प्रेम (त्यांचे माझ्यावर दोन्ही अगदी भरपूर आहे हे मला ठाऊक आहे Proud ) बाजूला ठेऊन विषयाशी संबंधित लिहिणे हे मच्युअर असण्याचे पहिले लक्षण आहे हे सुद्धा त्यांच्या कानात हळूच सांगा. कानात ह्यासाठी की चारचौघात त्यांना 'तुम्ही स्युडो-मच्युअर' आहात असे म्हंटलेले बरे दिसत नाही. Proud

पण माझ्यासारखे तुमच्या लिखाणाचे चाहते, तुमच्या अश्या वागण्याने दूर जाताहेत त्याचं काय??? >> विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सर .... आय कुडन्ट केअर लेस... मी माझे कोण-कोण आणि किती चाहते आहेत ते बघून काय लिहायचे किंवा नाही लिहायचे ते ठरवत नाही हो Lol माझ्यापेक्षा आणि माझ्या लिखाणापेक्षा मायबोली एक एंटिटि, सोसायटी म्हणून मोठी आहे, पहिल्याने तिचे चाहते झाले पाहिजे आणि तिच्या प्रती प्रामाणिक राहून तिचा आदर केला पाहिजे.

हे असेच जनरल लिहिले आहे
मायबोली गणेशोत्सोव ह्या फीनॉमीनॉन मागे मागच्या अनेक संयोजकांनी जी लेगसी ठेवली आहे तिला असे ईमॉरल आणि अनएथिकल वागून डागाळण्याचा अधिकार कोणाला असू नये. तुम्हाला जेवढे जमते तेवढेच करा पण जे कराल ते एथिक्स आणि हॉनेस्टीच्या लेटर आणि स्पिरिट मध्ये करा. तुम्हाला ह्या लेगसीचा अनुभव घ्यायचा असेल तर २००७-२००८ पासूनचे गणेशोत्सोव काढून बघा.

पुढील गणेशोत्सव संयोजक मंडळात मी भाग घेणार आहे. >> दॅट्स द स्पिरिट बोकलत.

अपेक्षेप्रमाणे बाकी युज्वल सस्पेक्ट्स आलेच... ह्या जन्मी त्यांच्या जीवाला काही चैन पडणार नाही असे दिसते.. Proud

इथल्या पोस्ट्सच्या पुनरावलोकनात स्वत:च्या काही चुका लक्षात आल्या, त्या सुधारण्यासाठी ही पोस्ट.

१. वेळात वेळ काढून गणेशोत्सवाचं संयोजन केल्याबद्दल संयोजकांचे आणि संबंधितांचे आभार - हे सर्वप्रथम मानायला हवे होते.
२. उपक्रम भरपूर होते, काहींना उत्तम प्रतिसादही मिळाला. ब्राव्हो!
३. तुमच्याकडून काही अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, हे तुमच्यापर्यंत काही निराळ्या मार्गाने/पद्धतीने पोचवणं अधिक परिणामकारक ठरलं असतं का यावर विचार करत आहे. तुम्ही सांगितलंत तरी आवडेल.
४. चुका होतात, झाल्या, पदरात घालून झाल्या. आता त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी आपण सगळे काय करू शकतो याबद्द्ल विचारविनिमय झालेला वाचायला आवडेल.

>>नवीन Submitted by स्वाती_आंबोळे on 20 September, 2019 - 12:02<<
उत्तम "मच्युअर" प्रतिसाद.

जंजीर मधल्या अमिताभने साकारलेल्या भूमिके करता प्रकाश मेहरा राजकुमार कडे स्क्रिप्ट घेउन गेला. राजकुमारने स्क्रिप्ट वाचली, एक दीर्घ श्वास घेतला आणि प्रकाश मेहराकडे बघत, गळ्यावरुन (स्वतःच्या) हात फिरवत त्याच्या स्टाइलमधे म्हणाला - "जानी, स्क्रिप्ट बहोत अच्छी है, पिक्चरभी खुब चलेगी. लेकिन हम उसमे काम नहि करेंगे. क्युं कि तुम्हारे बालोंसे सरसोंके तेल कि बू आती है..."

यावर प्रकाश मेहरा किंकर्तव्यमुढ होउन तिथुन बाहेर पडला, आणि पुढे त्याने अमिताभला साइअनप केलं. पुढे काय झालं हे सांगण्याची आवश्यकता नाहि... Proud

स्वाती मस्त पोस्ट!
यंदा मंडळ बरच उसीशा तयार झालं. एव्हड्या कमी वेळात एव्हडा भरगच्च कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन आणि धन्यवाद.
आलेल्या सगळ्या अनुभवातून शिकलेले धडे (Lessons learnt) इथे लिहिले, तर पुढच्या मंडळांना फायदा होईल.

भरगच्च कार्यक्रमातल्या शतशब्दकथा स्पर्धकांची आणि कथेमागील त्यांच्या विचारांची खिल्ली ऊडवणारी कथा लिहून स्पर्धेचे मोराल बूस्ट केल्याबद्दल तुमचेही अभिनंदन आणि धन्यवाद.

चला, 'संयोजकांना भर चौकात लटकवून दशसहस्त्र कोरडे ओढून आधी फासावर लटकवून मग गिलोटिनखाली उभं केलं पाहिजे एवढा त्यांचा अपराध मोठा आहे,' असं सांगणारे हळूहळू 'घेऊ चुका पदरात' मोडमध्ये आलेत हेही नसे थोडके!

सनव
तुमच्यासमोर एवढे फॅक्ट्स ठेवले, दाखले दिले त्यावर तुम्ही निरुत्तर झाल्याने ते दाखले दुर्लक्ष करून केवळ आपल्या समाधानासाठी ट्रोलिंग चा शिक्का मारणार?
हरकत नाही त्यातून तुम्हाला आपला मुद्दा खोडला न गेल्याचे समाधान मिळाले असेल अशी आशा करतो.

हाब, किति तेच तेच बोलणार, nitpicking करणार असं मला वाटलं. यू सेड युअर पॉइंट्स आय सेड माईन. संपला विषय.

आणि तुमचं कौतुक आहे, चेक लिस्ट ही अप्रतिम कथा लिहिणं, अनेक कथा इतरांना उलगडून सांगणं हे सर्व तुम्ही छान केलं.

मी तुम्हाला ट्रोल म्हणत नाही. आपण ट्रोल करतो का हे तुम्ही स्वतःलाच विचारा. दुसरं म्हणजे, तुमचे मुद्दे मांडताना तुम्ही नकळत ट्रोल्सना प्लॅटफॉर्म तयार करुन दिलात ज्यावर कोणी स्कोअर सेटलिंग, कोणी नुसतंच वसवस रुडली बोलणं वगैरे व्यक्त होण्याची गरज पूर्ण करुन घेऊ लागले. हे इथे उत्सवी प्रसंगी होण्याची गरज नव्हती.

ज्या वेळी संयोजनासाठी आवहन केले, तेंव्हा उमेदवारांची इच्छा आणि वेळ या दोनच गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित होत्या, आणि नंतर आपण त्यांच्याकडून प्रोफेशनलिझम ची अपेक्षा कशी करू शकतो? जर त्यांनी अगदी प्रोफेशनल असणं गरजेचं होतं, तर आवहन करताना त्यांना तसं कळवणंही गरजेचं होतं, की तुम्हाला अगदी प्रोफेशनल पद्धतीने काम करावं लागेल.>>>
ही अपेक्षा चुकती आहे का ? मागे पण इथल्या सदस्याबरोबर यावर वाद झाल्याचे आठवत आहे कि प्रोफेशनल वागण्याची मी अपेक्षा करीत आहे ते कसे चुकीचे आहे. तुम्ही शक्ती, वेळ देत आहात म्हणुन तुमच्याकडून प्रोफेशन्लिझम अपेक्षा ठेवायची नाही हे चुकीचे आहे. काम घेतलं आहे ना मग जरी ते फुकट जरी करत असला तरी ते नीट करावे. इतरांनी चुका सांगितल्या तर सुधारणा कराव्या. constructive Criticism कडे दुर्लक्ष करता कामा नये. ह्या गोष्टी इथिक्स ला धरून आहेत. खरतर कॉमन सेन्स आहेत. प्रोफेशनलिझमची सुद्धा गरज नाही.
असो. पण असुदेत अशा पण काही मोठ्या चुका झाल्या नाहेयेत.
वरती हाब इतक्या कळकळीने लिहित आहेत. त्यांचे मुद्देही बरोबर आहेत. आता इथे फक्त संयोजन मंडळाने पुढे येवून माफी मागितली आणि पुढच्या वेळी अजुन एक संधी द्या , नक्की सुधारणा करू म्हटले तरी एवढा गदारोळ होणार नाही. बघा विचार करताय का ? Happy

मला अत्यंत आवडला यावेळचा गणेशोत्सव. पुर्वीच्या गणेशोत्सवापेक्षा जास्त लोकांना सामावून घेणारा वाटला. मला तरी ताबडतोब उत्तर पण मिळाली. उलट मलाच नंतर वाईट वाटल कि मी स्पर्धेत भाग घेवू शकले नाही ऐनवेळी. खरतर रेसीपी तयार होती पण रविवारी मायबोलीवर यायला मिळाल नाही पोस्ट करायला.

आता इथे फक्त संयोजन मंडळाने पुढे येवून माफी मागितली आणि पुढच्या वेळी अजुन एक संधी द्या , नक्की सुधारणा करू म्हटले>>>>
काहीच्या काही प्रतिसाद! ज्या कामातून मानसिक समाधानाव्यतिरिक्त काहीही फायदा नाही तिथे उलट मानसिक त्रास देण्याचाच लोकांनी विडा उचललेला दिसतोय.
संयोजक आहेत ते, राजकीय पक्षाचे उमेदवार नाहीत, की पुन्हा संधी द्या, आम्ही पैसे खातो!
तसंही आताच्या संयोजक मंडळातील कुणी लोक पुन्हा संयोजनात सहभागी होतील, असं वाटत नाही.

आता इथे फक्त संयोजन मंडळाने पुढे येवून माफी मागितली आणि पुढच्या वेळी अजुन एक संधी द्या , नक्की सुधारणा करू म्हटले>>>>

काहीच्या काही. ज्या मूठभर deluded / having inflated sense of importance/entitlement वाल्या लोकांना माफी हवी आहे त्यांनी सिरियसली डोकी तपासून घ्या.
@ admin - आवरा या तुमच्या जुन्या मानाच्या गणपतींना. अती होतंय हे.

दयनीय? मला तर ते एक क्लोजर वाटत मुव्ह ऑन होण्यासाठी. Happy पण असो. माझ मत ते. तुमच वेगळ असेल. नो वरीज. मुव्ह ऑन. तुमचा उपाय लिहा.
वरचे तीनही आयडीना,
तुम्हाला नाही माफी मागायची नाही ना नका मागु. त्यात एवढ चिडण्यासारख काय आहे. अस लिहिताय कि जणु तुम्हाला माफी मागायला सांगितली आहे. Happy आदळ आपट,आकांड तांडव करून तुम्ही आणखीणच वाद वाढवताय अस नाही का? आम्ही काहीही चुक केली नाही अस संयोजकाना वाटत असेल तर प्रश्न मिटला. वरती इतके तळमळीनं लिहित आहेत त्यांना उत्तर मिळाले असेल .
मला आता तुमच्या वागण्याच्या पद्धतीमुळ वाटत्य कि तुम्हीच संयोजन मंडळात होता. Happy

मुव्ह ऑन होण्यासाठी समोरच्याने माफी मागितली पाहिजेच का?
आपलं आपण थांबावं, मुव्ह ऑन व्हावं असं नसतं का?
आणि इथे कोणीही उपाय वैगेरे विचारलेले नाहीयेत.
ज्यांना संयोजकांचं काम, काम करण्याच्या पद्धती खटकल्या त्यांनी ते लिहिलं.
पुढच्या वेळी संयोजक होणारे ह्यातुन नक्कीच काही धडा घेतील.
पण फक्त तेच तेच सतत लिहिलं जातंय ह्यावर आक्षेप आहे.
माफी मागावी ही काहीच्या काही अपेक्षा आहे.

Pages