मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शिव म्हणे आरोहला कँप्टन्सीच्या टास्क मध्ये चावला,म्हणून बिबॉसने त्याला थेट नॉमिनेट केले आहे.>>>>>>काय????? खरं आहे का हे, खरं असेल तर कठीणच आहे शिव राहाणं. आणि अभिजीत केळकर होता तो पर्यंत शिव व्यवस्थित वागत होता ,तो बाहेर गेल्याचा परिणाम आहे का ,शिव चं असं वागणं??

गेला का बिचुकले. छान झालं! या आठवड्यात किशोरी कॅप्टन म्हणजे सरळ टॉप ६ मधे गेली की म्हणजे!
आता हिनाची टर्न आहे एलिमिनेशन ची असे वाटते. काल तो नेहा- बिचुकले वाद आणि काय ती भूक हरताळ ची धमकी वगैरे दाखवलेच नाही का?

या आठवड्यात किशोरी कॅप्टन म्हणजे सरळ टॉप ६ मधे गेली की .....
पण पुढचा पण आठवडा आहे ना,त्यात नॉमिनेट होऊ शकते.

हीना कुठे नॉमिनेटेड आहे? अजून नॉमिनेशन टास्क व्हायचंय.

मागल्या नॉमिनेशन टास्क मध्ये बिचुकलेला सिंहासनावर का बसवलं (आणि सेफ केलं) असा प्रश्न कोणातरी हाउसमेटला पडला होता.

नेहाला पडला होता तो प्रश्न. ती आणी वीणा गार्डन मध्ये फेर्या मारत होते तेंव्हा ती बोलली त्याना nomination ला कस नाही ठेवले या आठवड्यात. त्यानी बिचुकलेला केसर हे नाव ठेवले आहे.

बिचारी नेहा, किती सतावत असतो बिचुकले तिला. ती म्हणत असेल, केळकरच्या आधी ह्याला का नाही हाकलला? , केळकर परवडला. पण हा नको अस झाल असेल तिला. वैतागलीये जाम त्याला.

बिचकुले बिबॉला स्वत: च घर समजतो का काय? कधीही झोपाव, कसही रहाव. म्हणून त्याला हाकलल असेल बिबॉने.

शिव म्हणे आरोहला कँप्टन्सीच्या टास्क मध्ये चावला,म्हणून बिबॉसने त्याला थेट नॉमिनेट केले आहे. >>>>>>> अस जर झाल असेल तर मग आता बिबॉ कुणासाठी बघायचा? Sad इथे शिव सोडून कुणीही विनरची क्षमता असलेला वाटत नाही.

नाही सुलू बिचुकले चा एक मोठा वाद झाला होता. जो प्रोमो मध्ये दाखवला होता पण एपिसोड मध्ये नाही दाखवला.बिचुकले दात न घासताच पूर्ण घर भर फिरत असतो आणी बोलत असतो सगळ्यांची. नेहा काल सांगत होती त्याला बोलू तरी नका म्हणून. >>>>>> ओहो, अस झाल होत तर. धन्स अमुपरी. Happy

वीणा फोकस्ड. >>>>>> ++++++++११११११११ विणा छान खेळली काल. हिनासुद्दा फेअर खेळली. तिचे आरोहबद्दलचे बरेचसे मुद्दे खरे आहेत.

आरोह उद्या परत चिडणार ओरडणार रडणार. >>>>>>> आरोह शाळकरी मुलासारखा वागतो तेव्हा. खेळात जर त्याच्या दृष्टिने चिटिन्ग झाली तर तो मुलगा जसा चिडेल त्याच रिफ्लेक्शन आहे हे.

उद्याच्या भागात जे थोडंसं दाखवलं त्यात विणा शिव ला म्हणाली का दादागिरी अजिबात करायची नाही??? >>>>>>> मला पण तेच वाटल धनुडी, पण प्रोमोज मिसलिडिन्ग असतात.

या सीझनच्या इतिहासात पहिल्यांदाच धागा दुसऱ्या पानावर. >>>>>> म्हणजे? मला कळल नाही भरत. Uhoh

नाही सुलू बिचुकले चा एक मोठा वाद झाला होता. जो प्रोमो मध्ये दाखवला होता पण एपिसोड मध्ये नाही दाखवला.बिचुकले दात न घासताच पूर्ण घर भर फिरत असतो आणी बोलत असतो सगळ्यांची. नेहा काल सांगत होती त्याला बोलू तरी नका म्हणून.

काल नेहाला नॉमीनेट करुन उलट शिवानीने नेहाला सिंपथी मिळेल याची काळजी घेतलीय!
नेहाने तिला त्या बझर आणि पोत्याच्या टास्कमध्ये नॉमीनेशनपासून वाचवले होते..... आता फेव्हर रिटर्न करण्याचा शिवानीचा टर्न होता
शिवानीने नॉमीनेट केल्यावर नेहाने अवाजवी प्रतिक्रिया दिली नाही हे चांगलच केल.... असाही तिचा भरवसा नाहीये शिवानीवर

ते नॉमीनेशन टास्क सोडले तर बाकी सगळा फालतूपणा होता

काल नॉमिनेशन टास्क नव्हतं कॅप्टन्ससी टास्कसाठी कँडिडेट निवडायचे होते.

नेहा हीनाला तू फेअर खेळली नाहीस, असं का म्हणत होती? कोणाच्या तोंडाला काळं फासायचा हा निर्णय तिथे जाणार्‍याने घ्यायचा होता.

केळ्याचे फेसबुक लाइव्ह बघितले.... बरा बोलला!
खर म्हणजे बाहेर पडल्यानंतरच्या इंटरव्ह्यूजमध्ये आतापर्यंत सगळेच लोक घरातल्या त्यांच्या वावरा पेक्षा जास्त आवडलेत!
फक्त त्याने "मी"पणा जरा कमी करायला हवा.... बाकीच्या इतर साधर्म्याबरोबर या त्याच्या "मी"पणा मुळे मला तो छोटा 'पिळ'गावकर वाटतो Proud

>>काल नॉमिनेशन टास्क नव्हतं कॅप्टन्ससी टास्कसाठी कँडिडेट निवडायचे होते.

अरे हो!
बरोबर.... कॅप्टन्सी टास्क!

नेहा हीनाला तू फेअर खेळली नाहीस, असं का म्हणत होती? >>>>>
तिने आरोह च्या तोंडाला काळं फासलं ना म्हणून, आरोह अजून पर्यंत कॅप्टन नाही झालाय तर त्याला राहू द्यायला पाहीजे होतं असं नेहा म्हणे, पण हिना ने तिला जे उत्तर दिलं ते बरोबर होतं, ती सुद्धा कधी कॅप्टन झाली नाहीये इतकंच काय कॅप्टनसी टास्क ची उमेदवारी पण मिळाली नाही कधी हिना ला मग नेहाने हिना चं तोंड कसं काळं केल?

नेहा हीनाला तू फेअर खेळली नाहीस, असं का म्हणत होती? >>>>>
तिने आरोह च्या तोंडाला काळं फासलं ना म्हणून, आरोह अजून पर्यंत कॅप्टन नाही झालाय तर त्याला राहू द्यायला पाहीजे होतं असं नेहा म्हणे, पण हिना ने तिला जे उत्तर दिलं ते बरोबर होतं, ती सुद्धा कधी कॅप्टन झाली नाहीये इतकंच काय कॅप्टनसी टास्क ची उमेदवारी पण मिळाली नाही कधी हिना ला मग नेहाने हिना चं तोंड कसं काळं केल?

तेच म्हणतोय मी.
तिने तसं म्हणायचं कारण नव्हतं.
बाकी कोणी , काळं फासलं गेल्यावर काही विचारलं नाही.

हिना ला मराठी एवढं नीट येत नसूनही ती कधीकधी बरोबर युक्तिवाद करते. पण नेमकं कुठे थांबायचं हेच तिला कळत नाही त्यामुळे गिरणी सुरूच राहते. दळण दळत बसते

तेच म्हणतोय मी.
तिने तसं म्हणायचं कारण नव्हतं.
बाकी कोणी , काळं फासलं गेल्यावर काही विचारलं नाही.>>> नेहा पक्की च आहे.

नेहा हीनाशी जे बोलली ते मला पण नाही आवडलं. तिला हीनाला सुचवायचं होतं की कॅप्टन्सीसाठी जे क्रायटेरिया दिलेत त्यानुसार हीना केपेबल नाहीये म्हणून तिनी हीनाला बाद केलं. पण आरोहचं तसं नाहीये, तो केपेबल आहे म्हणून हीनानी त्याला बाद करायला नको होतं.

कम ऑन नेहा! इथे काही राजा हरीशचंद्र होण्याची स्पर्धा नाहीये.

नेहमीप्रमाणे इथेही किशोरीनी सगळ्यांकडे जोगवा मागितलाच! पण इथे अलाऊड होते, सो ओके!

शिवानीनी पाठीत खुपसलेला खंजीर नेहा कशा पद्धतीत घेते ते बघायला आवडेल.

शिवानीनी ह्या स्टेजला दोन जणांना शब्द देण्याची चूक कबूल केली असली तरी स्वतःचा बिनडोकपणा दाखून दिला आहे. ती टास्क खेळण्यातही फारशी चांगली नाहीये. तेव्हा आता घराबाहेर जायची तिची टर्न आहे खरं तर! बिबॉ तिच्यावर अजून किती कृपा करणार कोण जाणे!

महेश मांजरेकरांची मुलगी गौरी हिचे पांघरूण चित्रपटातून पदार्पण. त्यांच्या मुलीचे नाव गौरी इंगवले असे लिहीले आहे. इंगवले कसे काय? लग्न झाले आहे का तिचे?
बातमीची लिंक :
https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news...

>>इंगवले कसे काय? लग्न झाले आहे का तिचे?<<
ती मांजरेकरांची स्टेपडॉटर आहे...

वीणा स्लो अ‍ॅंड स्टेडी पुढे जात आहे. परवा सलमान मस्त बोलला - घरांत असं वागा कि बाहेर पडल्यावर तुम्हाला काम मिळायला अडचण होणार नाहि. त्याचा रोख बहुतेक होता कोणाकडे तरी... Proud

आरोह ने पण किशोरी ताई आणी शीव दोघाना शब्द दिला होता काळे करणार नाही म्हणुन. आणी शिवानि ने पण. त्यामुळे ते दोघे झाले कैप्टनसी चे दावेदार.
आरोह आणी शीव च्या भांडणामुळे टास्क cancel झाले असे येत आहे. म किशोरी कैप्टन कशी झाली.

परवा सलमान मस्त बोलला - घरांत असं वागा कि बाहेर पडल्यावर तुम्हाला काम मिळायला अडचण होणार नाहि. त्याचा रोख बहुतेक होता कोणाकडे तरी>>>>
त्याचा रोख कोणाकडे असेल असे नाही वाटत कारण तो मराठी बीबी नाही बघत आणी त्याला स्पर्धक पण आधी पासुन माहिती नव्हते. पण तो हिन्दी बीबी मध्ये ही हेच सांगत असतो. की हिन्दी बिबित कसे पण वागणारी लोक आता प्रसिध्द होतात पण नंतर कोण त्याना विचारत नाही. त्यामुळे चांगलं वागा.

टास्क कॅन्सल झाला असेल तरी शिव डायरेक्ट नॉमिनेट झाला बळाचा वापर केल्यामुळे. म्हणून किशोरी जिंकली असे जाहीर केले असेल.
शिव आणि वीणा लव स्टोरी अँगल प्ले करत असले तरी ते एकेकटेही स्ट्राँग आहेत पुढे जायला. लव स्टोरी खरी असेल तर असो पण टिआरपीसाठी करत असतील तर तो ड्रामा आता बास केला तरी चालेल. बघायला कंताळा येतो खरंच.
शिवानी फक्त ड्रामा क्वीन. एक पण टास्क धड खेळत नाही. हिनाच्या आधी ( किंवा निदान तिच्यानंतर) तिलाच उडवले पाहिजे. तिने नेहाला कॅप्टनशिप मधून बाहेर काढले तेव्हा मला गेल्या वेळी मेघाने आस्ताद ला कॅप्टनशिप देऊ केली तेव्हाच्या मेघा सई च्या भांडणाची आठवण आली. इथे नेहाने कूलली घेतले पण ते. बहुतेक शिवानीशी पेच अप झाले असले तरी तिच्या कडून फार होप्स नसाव्यात तिला.

एकंदरीत आता परत इंटरेस्ट क्रिएट होतो आहे.
तोंड काळं करण्याचा एपिसोड थोडा बघितला. कसलाही हिंसाचार नसल्यामुळे हा टास्क आवडला.
किशोरी कप्तान झाली असेल तर गुड फॉर हर. तिच्यात दुष्टपणा नाहीये म्हणून ती मला आवडते.
नेहाला बहुधा ती आणि किशोरी यांच्यात captaincy task हवं होतं म्हणजे किशोरीला सहज हरवून ती परत जिंकली असती असा प्लॅन असावा.

Pages